शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची अंबाजोगाई मधील रद्द झालेल्या सभेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील, असा टोला लगावला. उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम विधानसभेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल मॅक्सी ग्राउंड येथे राज ठाकरेंची जाहीर प्रचार सभा होणार आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी (१६ नोव्हेंबर) जाहीर सभा होणार आहे. नाना पेठ येथील डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेच्या अहिल्याश्रम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरातील हडपसर भागात एका 3 मजली इमारतीला आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, काशीतील काशी विश्वनाथ धामची 5 वर्षांपूर्वीपर्यंत काय स्थिती होती? इथे 50 भाविक एकत्र आले तर त्यांना दर्शन घेता येत नव्हते, पण आता 50 हजार भाविक एकत्र काशीला पोहोचले तरी त्यांना सहज दर्शन घेता येते. श्रावण महिन्यात हा आकडा लाखावर पोहोचतो.
जयपूर-दिल्ली महामार्गावर कारने दुचाकीला धडक दिल्याने एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
राजस्थानमधील टोंक येथील घटनेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तिचा निषेध व्हायला हवा. एका सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्यामुळे या घटनेमुळे सरकारची विश्वासार्हता कमी झाली आहे. राजस्थानचे वातावरण कसे आहे हे या घटनेवरून दिसून येते. ही घटना चिंताजनक आहे.”
मी मुख्यमंत्री आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. भाजप माझं घर आहे.जीना यहाँ मरना यहा, इसके सीवा जाना कहाँ, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. मोदींना या बिघाडामुळे देवघर विमानतळावर थांबावं लागलंय. त्यामुळे मोदींना दिल्लीला परतण्यास विलंब झाला आहे.
उद्धव साहेब तुम्ही सांगोला तालुक्यातील जनतेसाठी काहीच बोलला नाहीत. फक्त वरवर वाऱ्यावरचे बोलून गेलात. संसारात काय अडचणी असतात ते तुम्हाला मुंबईत बसून काय कळणार? अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेतून पाटील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
धुळ्यातील शिंदखेडा येथे पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करण्यात आली. त्या भाजप महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी आल्या असताना ही तपासणी झाली.
नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 348 सराईत गुन्हेगारांना हद्दपारची नोटीस बजावली आहे. भाजपसह इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांवर नाशिक शहर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची उद्या कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली. महाविकास आघाडीकडून तयारीचा आढावा घेण्यात आला.
लोकसभेला काही जागा अगदी कमी फरकाने गेल्या. विरोधकांनी फेक नेरेटिव्ह बनवला, त्याचा फटका आम्हाला बसला, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केले.
माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच आपण ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे केले. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असेही राज ठाकरे म्हणाले
राज ठाकरे यांची मुंबईत १७ रोजी सभा होणार होती. त्या सभेला अजून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ही सभा रद्द होणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. परंतु १७ तारखेला हिंगोली विधानसभेत राज ठाकरे यांची सभा होणार आहे, अशी माहिती हिंगोली विधानसभेचे मनसेचे उमेदवार बंडू कूटे यांनी दिली.
लोकसभा पाहिली असेल तर एक खासदार एका मताने निवडून आला होता. असं आपण कधी पाहिलं नव्हतं. नंतर रिकाऊंटिंगमध्ये ३९ मतांनी विजयी झाला. असं कधी झालं नव्हतं. मला वाटतं लोकांनी विसरू नये. तुम्ही उन्हातान्हात मतदान केलं. ते मत सध्या कुठे आहे, ते बघा. जो पक्ष तुम्हाला आवडत नाही त्यांना तुम्ही मतदान करत नाही. पण तुमच्या मतावर निवडून आलेला दुसऱ्या पक्षात गेला तर तुमच्या मताची किंमत काय राहिली. त्यामुळे तुम्ही २० तारखेला त्याचा विचार करा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले
येत्या १७ नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाही. सभेला परवानगी मिळाली नाही हे सत्य आहे. राजकारण आहे की नाही माहीत नाही. जे उमेदवार कामाला लागले आहेत. त्यांचा दिवस निघून जातो. नियोजन करण्यासाठी संधी मिळाली असती तर नियोजन करणं सोपं जातं. दीड दिवसात आता शक्य नाही. दुसऱ्या दिवशी पाच वाजता प्रचार संपतोय. मलाही वेळ मिळेल. उमेदवारांनाही वेळ मिळेल, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी त्यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख चार मुद्दे सांगितले.
पहिला सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान आहे. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे.
पुढच्या सेक्शनमध्ये दळणवळण, पाण्याचं नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट आहे
तिसरा सेक्शन, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन
चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे.
या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
नांदेड : भोकर मतदारसंघातील बारड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. भोकर विधानसभेच्या भाजपाचे उमेदवार श्रीजया चव्हाण व नांदेड लोकसभा पोटनिवडणूकेचे उमेदवार संतुक हंबर्डे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. खासदार अशोक चव्हाण, श्रीजया चव्हाण व लोकसभेचे उमेदवार संतूक हंबर्डे हे यावेळी उपस्थितीत राहणार आहेत.
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे उद्या 16 नोव्हेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर आहेत. पवन कल्याण यांची नांदेडच्या देगलूर येथे सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार जितेश अंतापुरकर आणी लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ पवन कल्याण यांची जाहीर सभा होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता पवन कल्याण यांची देगलूर येथील मिल मैदानात सभा घेतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज नांदेड जिल्ह्यात दोन सभा होत आहे. भोकर विधानसभेच्या भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची बारड येथे सभा आहे. बारड येथील सभेला महाराष्ट्र पोलिसांसह तेलंगणा पोलिसांचा बंदोबस्त आहे.
राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर मतदारसंघात सभा घेत आहेत. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्याचा दौरा करत आहेत. सावरगाव तळ, पेमगिरी आणि वडगाव लांडगा गावात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर काय टीका करणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्य मतदारसंघात पदयात्रेदरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी भाजीपाल्याच्या दुकानावर जाऊन भाजीपाल्यांचे दर विचारात त्याची बेरीज केली भाजीपाला खरेदीलाच जर आठशे रुपये लागत असतील तर दीड हजार रुपयांच्या लाडकी बहीण योजनेचा काय उपयोग असा सवाल विचारत लाडकी बहीण योजनेवरून अनोख्या पद्धतीने सरकारवर टीका केली आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा पदयात्रेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ जामखेड येथे पाशा पटेल यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली. त्यात जवळपास सर्वच वक्त्यांनी अतिशय खालच्या भाषेचा वापर केला. या सभेचा व्हिडीओ समाज माध्यमावर पोस्ट करत रोहित पवारांनी निषेध व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने वोट फॉर जिहादचा नारा दिला होता, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर बटोंगे तो कटोंगे हा योगी आदित्यनाथ यांचा नारा चुकीचा नाही, असा दावा सुद्धा फडणवीस यांनी केला.
एकनाथ शिंदे यांचं काम आता संपलं आहे. 20 नोव्हेंबरनंतर त्यांची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
2014 मध्ये युती तोडून भाजपची शत प्रतिशतची घोषणा… शत प्रतिशत भाजपा अशी घोषणा दिल्यावरत खरा घात झाला… ठाकरे गटाते खासदार अरविंद सावंत यांची भाजपवर टीका…
अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं. पण शिवसेनेबरोबर 25 वर्ष युती असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्याच्यामुळे फडणवीस खोट बोलत आहेत. मी त्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये होतो. हे चर्चाच करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदावर कोणतीच चर्चा होणार नाही, हे वारंवार सांगितलं जात होतं” असं खासदार संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची आज सिल्लोड मध्ये जाहीर सभा… ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ सिल्लोडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार… 5 वर्षांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभेसाठी ठाकरे सिल्लोडमध्ये आले होते… सिल्लोड आणि वैजापूरमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशा प्रमुख लढती होणार आहेत…
सिल्लोड येथील निवडणूक तपासणी पथकाने संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून जवळपास 19 कोटी रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने जप्त केले. ही कारवाई सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर करण्यात आली. सिल्लोड येथील स्थिर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली.
संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल. 9 डिसेंबरपासून परीक्षा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा येत्या 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार होत्या. मात्र, आता या परीक्षा 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांच्याजागी कल्याण पूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची नियुक्ती. पक्षासोबत बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी भरल्याने महेश गायकवाड यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
“फडणवीस खोट बोलतायत. अडीच वर्षांपासून फडणवीसांना खोट बोलण्याचा रोग. मोदींच्या कालच्या सभेत 5 हजार लोकही नव्हते” असं संजय राऊत म्हणाले.