विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी अजून जोरात तयारी सुरु केली आहे. फक्त आता कुठला पक्ष, किती जागांवर लढणार? उमेदवारांची नाव कधी जाहीर होणार? याचीच उत्सुक्ता आहे. यंदा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात? ते महत्त्वाच ठरणार आहे. भाजपा नेते माजी आमदार सुरेश धस यांनी काल मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मध्यरात्री 1 वाजता अंतरवाली सराटी येथे जाऊन घेतली भेट. मनोज जरांगे पाटील व सुरेश धस यांच्यात राजकीत विषयावर चर्चा झाली. सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी – पाटोदा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत. बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टर चालत असल्याने सुरेश धस जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आजपासून बिहारमध्ये हिंदू स्वाभिमान यात्रा सुरू करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही यात्रा सीमांचल, कटिहार, पूर्णिया, अररिया येथील भागलपूर येथून सुरू होऊन 22 ऑक्टोबरला किशनगंज येथे पोहोचून समाप्त होईल.
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील झैनापोरा येथे बिहारमधील तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला आहे. त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या.
यूसीसीचा मसुदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सीएम धामी म्हणाले की, राज्यातील जनतेला लवकरच यूसीसीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. यूसीसी लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनणार आहे.
पंतप्रधान मोदी 22 ऑक्टोबरला रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. कझान येथे होणाऱ्या 16 व्या ब्रिक्स परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात भाजपच्या राजेंद्र पिपाडांच्या भेटीला गेले आहेत. राहाता शहरातील निवासस्थानी ही भेट घेतली गेली. पिपाडांसोबत बंद दाराआड जवळपास अर्धातास चर्चा झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण समजली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण? ही चर्चा असताना या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. राजेंद्र पिपाडा हे भाजपमध्ये असुनही विखे विरोधक आहेत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरुन ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद उघड झाला आहे. ठाकरे गटाने नाना पटोले यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. पटोले असतील तर बैठक होणार नसल्याचं ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे. विदर्भातील जागांवरुन पटोले आणि ठाकरे गटात हा वाद झाल्याचं समोर आलं आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरून प्रवाशाने वाद घातला. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. प्रवाशाने तिकीट बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण केली. मारहाणीत महिलेला गंभीर दुखापत झाली. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कल्याण जीआरपीने मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून तपास केला जात आहेत.
पृथ्वीराज चव्हाण लाडकी बहिण योजना आमचीच आहे असं म्हणतायेत मग ते मुख्यमंत्री असताना लाडकी बहिण योजना का आणली नाही, असा सवाल शंभुराज देसाई यांनी केला आहे. कर्नाटक दिल्ली हे लांब आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना का नाही आणली योजना असा सवाल त्यांनी केला आहे.
भाजपमधील इच्छुक उमेदवार भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुक एकवटले. विद्यमान आमदारांना ऐवजी इच्छुकांमधील एकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. सर्व इच्छुक पक्ष कार्यालयावर धडकले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी मांडला तर गोवा व नागालँड मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमोदन दिले .चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व एनडीए शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरियाणा विजयाबद्दल अभिनंदनाचा व नेतृत्वाबद्दल आभार प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला
गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचा इशारा शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी दिला. त्यामुळे आता महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे.
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाला आहे. तर त्यापाठोपाठ कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. आताच्या वृत्तानुसार, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचला. याठिकाणी या हत्येसंबंधी दोघांमध्ये चर्चा झाली.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला हे निश्चित आहे. मात्र दावा करणं गैर नाही, लोकसभेच्या वेळी मीदेखील दावा केला होता. निवडणूक लढवण्यासंदर्भात व पक्ष वाढवण्या संदर्भात दावा करणे गैर नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी भाजपने दावा केला नव्हता, असे ते म्हणाले.
संभाजीनगरमध्ये सोशल माध्यमावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर वाढवली सुरक्षा.दिड महिन्यापूर्वी रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेले वक्तव्य…
“खडसेंच दुसरे नाव भूलथापा. सकाळी कोणत्या पक्षात तर संध्याकाळी कोणत्या पक्षात. खडसे म्हणजे जोक झाला आहे. खडसे आता कोणाच्याही घरात घुसायला लागले आहेत. खडसेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी नव्हे तर स्वतःच्या मुलीसाठी फिरत आहेत” अशी टीका मुक्ताईनगर अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
शिवसेना ठाकरे गटात इन्कमिंग वरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर. शहरातील सेनाभवन येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक. आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यावरून ठाकरेंचे शिवसैनिक अस्वस्थ. आज मातोश्रीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मोरेश्वर भोंडवे हे ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध आहे.
मुंबईत फेरीवाल्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. आता हे फेरीवाले नेतेमंडळीना ही जुमानत नसून या नेतेमंडळीना फेरीवाल्यांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. विक्रोळीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी महापौर दत्ता दळवी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केली आहे.
माजी आमदार दीपक आबा साळुंखे आज उबाठा गटात प्रवेश करणार. या प्रश्नावर बापूंनी दिले उत्तर. “दीपक आबांच्या भूमिकेमुळे माझ्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही. शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यात उभी फूट पडली असल्याने त्याचा मला निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे” असं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.
शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेले अक्षय जाधव यांनी शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडून बच्चू कडूंची भेट घेतलीय. अक्षय जाधव यांनी दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यानंतर अक्षय जाधव तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांची भेट घेतली. खेड आळंदी मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याने जाधव यांचा निर्णय. आता अक्षय जाधवने तिस-या आघाडीकडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
दम असेल तर समोर येऊन लढा. नाना पटोलेंच भाजपाला आव्हान. “भाजपाकडून रडीचा डाव खेळण्याच काम सुरु. महाराष्ट्रातील जनता भाजपाला त्यांची जागा दाखवेल. राज्याच्या तिजोरीतील पैशांची उधळपट्टी सुरु. भाजपा, महायुतीकडून रडीचा डाव सुरु” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पुन्हा दिल्लीत?. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काही जागांवर आग्रही. महाविकास आघाडीमधील 28 जागांवरती अजूनही एकमत नाहीच, सूत्रांची माहिती. दर्यापूर, रामटेक, तुमसर, अर्जुनी मोरगाव, गेवराई, परळी, उदगीर, नागपूर शहरातील दोन मतदारसंघ अशा जागांबाबत एकमत नाही. विदर्भात आणि मराठवाड्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत नाही. आज दुपारी मल्लिकार्जुन खरगे यांना ही 28 जागांची यादी पाठवली जाणार.
फायनल झालेल्या उमेदवारांना आज मातोश्रीवर बोलावले. किशनचंद तनवाणी, राजू शिंदे, उदयसिंग राजपूत, दिनेश परदेशी यांना मातोश्रीचा निरोप. दुपारी साडेतीन वाजता या चारही उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले. चारही उमेदवारांची नावे फायनल झाल्याची माहिती. मध्य मधून किशनचंद तनवाणी, पश्चिम मधून राजू शिंदे, कन्नड मधून उदयसिंग राजपूत, वैजापूर मधून डॉ. दिनेश परदेशी यांची नावे फायनल.
“आम्हाला मैदानातं हरवू शकत नाही, म्हणून बावळट सारखा बोलत असतो. शिवसेना उबाठा डी कंपनी आहे, असं आम्ही म्हणायचं का?. हिंदुद्वेष आणि दाऊद गँगचे सगळे गुण उबाठाने घेतले आहेत” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली.
कॅबिनेट मंत्री आदिती तटकरें समोर शरद पवारांची खेळी, ज्ञानदेव पवार यांचा शरद पवार गटात आज होणार प्रवेश. मुंबईत पार पडणार पक्षप्रवेश सोहळा. पवार हे माजी नगराध्यक्ष असून ते एकनाथ शिंदे गटातून शरद पवार गटात येत आहे. आदिती तटकरें समोर विरोधकांची ताकद वाढवण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात तीन ते चार संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
मुंबईच्या आसपासच्या परिसरातून या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
राजन तेली यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी दीपक केसरकरांवर कडाडून टीका केली. केसरकरांनी 15 वर्षांत एकही घोषणा पूर्ण केली नाही, तर गेल्या आठवड्यात फक्त घोषणाच घोषणा केल्या अशी टीका त्यांनी केली .
245 जागांवर महायुतीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र अजूनही 30- 35 जागांवर महायुतीत तिढा कायम असून तिनही नेते एकत्र बसून त्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मनसे कार्यकर्त्यांची टोलनाक्यावरती घोषणाबाजी. मनसे प्रमुख राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावरती असून त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली . ढोल ताशा वाजवत फुलाचा वर्षाव करत बाईक रॅली काढून स्वागत करण्याची तयारी.
चंदगड विधासभेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. चंदगडमधून भाजपचे शिवाजी पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर अजित पवार गटाचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत.
मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची टोल नाक्यावर गर्दी… थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात येणार असून ठाण्यात येण्याआधी कार्यकर्त्यांकडून फुलाचा वर्षाव करत राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात येणार आहे…
आम्हाला माहाराष्ट्राचा जास्त अनुभव आहे. मविआची जागावाटपाची चर्चा अधिक वेगाने झाली पाहिजे… जागावाटपावर राहुल गांधींसोबत चर्चा करणार… मविआची जागावाटपाची चर्चा अधिक वेगाने झाली पाहिजे… जागावाटपासाठी अत्यंत कमी वेळ, गती मिळावी… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
नाशिक मध्ये भाजपला मोठा धक्का… मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर… नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तुतारी घेण्याची शक्यता.. मुंबईत आज घेणार शरद पवारांची भेट… नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते निवडणूक लढण्यास इच्छुक… नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले आहेत भाजपचे विद्यमान आमदार… भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर
नाशिक जिल्ह्यातील 415 कोटींच्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक… 900 पैकी 415 कोटींच्या नियोजनास मान्यता… जिल्ह्याच्या विकासाची गती आचारसंहितेमुळे मंद… उर्वरित 415 कोटीचे नवीन आमदारांना असणार नियोजन… तर पालकमंत्र्यांची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण…
आदित्य ठाकरेंनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, खोटं बोलू नका, आशिष शेलार यांचा घणाघात
बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका !
◆1080 एकर आकडा आला कुठून ?
◆अदानीच्या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा…
◆उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 18, 2024
नवी दिल्ली : झेड प्लस सुरक्षेबाबत पुन्हा शरद पवार यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालय हा संपर्क साधला जाणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी संपर्क साधला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि पदाचा विचार करता सुरक्षा घेण्यासाठी पवारांशी संपर्क साधला जाणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झेड प्लस सुरक्षा देऊनही शरद पवार यांनी सुरक्षा न घेतल्याने सीआरपीएफचे अधिकारी शरद पवार यांना भेटून याबाबतची माहिती देऊ शकतात
नाशिक जिल्ह्यातील 415 कोटींच्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. 900 पैकी 415 कोटींच्या नियोजनास मान्यता देण्यात आली होती. मात्र जिल्ह्याच्या विकासाची गती आचारसंहितेमुळे मंदावली आहे. उर्वरित 415 कोटीचे नवीन आमदारांना असणार नियोजन आहे. तर पालकमंत्र्यांची भूमिका यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. समीर वानखेडे हे दोन वेळा एकनाथ शिंदेंना भेटले. यावेळी त्यांनी चेंबूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात सखोल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी स्वत: चेंबूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचंही सांगितले. तर IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्यासाठी शिवसेनेकडून दोन मतदार संघाची चाचपणी केली जात आहे. धारावी मतदार संघातून राहुल शेवाळेंनीही दावा केल्याने धारावीची जागा कोण लढवणार हा पक्षापुढे मोठा प्रश्न आहे.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला आता आमदार बेनकेंनी पूर्णविराम दिला आहे. आज सकाळी ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बेनकेंच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे चिन्ह असलेला पट्टाही पहायला मिळात आहे. आता बेनके घड्याळ चिन्हावर जुन्नरमधून लढणार असल्याचे निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ असल्याचा विश्वास व्यक्त करत अजित पवार आणि शरद पवार आपलेच असल्याचा नारा ही बेनकेंनी दिला आहे. त्यामुळे बेनकेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंघ असल्याचा केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरतोय
करमाळयातील शंभूराजे जगताप यांनी अंतरावली सराटी येथे येऊन घेतली मनोज जरांगे यांची भेट. करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी मराठा समाजाकडून उमेदवारीसाठी शंभूराजे जगताप इच्छुक. शंभूराजे जगताप हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कालपासून पुण्यात. काल सायंकाळी पुण्यातील इच्छुक उमेदवारांसोबत केली चर्चा. रात्री उशिरापर्यंत बावनकुळे यांनी अनेक इच्छुकांच्या घेतल्या भेटीगाठी. पुणे शहरातील अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक आहेत इच्छुक. पर्वती, खडकवासला, वडगावशेरी, कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपा नेते माजी आमदार सुरेश धस यांनी काल मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मध्यरात्री 1 वाजता अंतरवाली सराटी येथे जाऊन घेतली भेट. मनोज जरांगे पाटील व सुरेश धस यांच्यात राजकीत विषयावर चर्चा झाली. सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी – पाटोदा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत.
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडी पक्षातर्फेच निवडणूक लढवणार?. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी tv9 शी बोलताना दिले संकेत. चार दिवसात जाहीर मेळावा घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करणार. यड्रावकर यांची माहिती
“नांदेड हा एमआयएम’चा गड. निवडणुकीत आम्ही विजयी होऊ. मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काँग्रेस बोलत नाही. मग काँग्रेसला मुस्लिमांकडे वोट मागण्याचा अधिकार आहे का?” असा सवाल सय्यद मोईन यांनी केला. ते एमआयएम पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येणार आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने विनयभंग केलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि यादव याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची राज ठाकरे घेणार भेट. काही दिवसांपूर्वी ठाण्यात अकरा वर्षे अल्पवयीन मुलीचा झाला होता विनयभंग. याप्रकरणी पोलीस अंकात गुन्हा दाखल झाला.
छत्रपती संभाजी नगरमध्ये मतदारसंघात ठाकरे गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू. किशनचंद तनवाणी, डॉ. शोएब हाश्मी, नंदू घोडेले, बाळासाहेब थोरात यांच्यात रस्सी खेच सुरू. मध्य मतदारसंघात ठाकरे गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी होणार लढाई. मध्य मतदारसंघात एमआयएमचेही असणार मोठे आव्हान तर मध्य मतदारसंघात ठाकरे गटाकडून मुस्लिम चेहरा देण्याची मागणी. डॉ. शोएब हाश्मी या मुस्लिम चेहऱ्याचाही विचार सुरू असल्याची माहिती
सिंधुदुर्गातील राजन तेली भाजप सोडणार ही TV9 ची बातमी खरी ठरली. राजन तेली यांनी प्राथमिक सदस्यत्व व पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या मतदारसंघात चालत असलेली घराणेशाही (केसरकर) आपल्याला मान्य नाही तसेच राणे परिवाराकडून होत असलेले अंतर्गत खच्चीकरण, याला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे तेली यांनी म्हटलं आहे.राजन तेली आज ठाकरे सेनेत प्रवेश करणार,