Maharashtra Assembly Election 2024 LIVE : नाशिकमधील बडा नेता शरद पवारांच्या भेटीला

| Updated on: Oct 23, 2024 | 12:52 PM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात आजही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. आज काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व महत्त्वाच्या, लेटेस्ट अपडेट या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : नाशिकमधील बडा नेता शरद पवारांच्या भेटीला
MAHAYUTI
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Oct 2024 12:55 PM (IST)

    बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवणार

    बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवणार आहेत. सुलभा खोडकेंनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अमळनेरमधून अनिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उदगीरमधून संजय बनसोडेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 23 Oct 2024 12:47 PM (IST)

    मी कधीही राज ठाकरेंकडे कोणताही मतदारसंघ मागितला नाही- अमित ठाकरे

    “दादर, माहीममधील समस्या मला माहीत आहेत. मी इथल्या लोकांचे प्रश्न जाणतो. दादरचा  समुद्रकिनारा मला स्वच्छ करायचा आहे. माहीमच्या जनतेसाठी मी कायम उपलब्ध असेन. मी कधीही राज ठाकरेंकडे कोणताही मतदारसंघ मागितला नाही,” असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


  • 23 Oct 2024 12:45 PM (IST)

    राज ठाकरे भूमिका घेताना उपकार म्हणून घेत नाहीत- अमित ठाकरे

    “राज ठाकरे भूमिका घेताना उपकार म्हणून घेत नाहीत. राजकारणात समोरचे लोक कसे हे ओळखायला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणतात. कुणी परतफेड करावी अशी आमची इच्छा नाही. त्यांनी राजकारण करावं. माझ्यासाठी कुठेही तडजोड करू नका असं साहेबांना मी सांगितलं,” असं अमित ठाकरे म्हणाले.

  • 23 Oct 2024 12:40 PM (IST)

    उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा आला- अमित ठाकरे

    “उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा आला. निवडणूक लढण्याचा आत्मविश्वास आहे. दादरमध्ये मी लहानाचा मोठा झालोय. आमच्या इथं तीन पिढ्या राहिल्या आहेत. देवाने खूप दिलंय, देवाकडे मी काही मागत नाही,” असं अमित ठाकरे म्हणाले.

  • 23 Oct 2024 12:30 PM (IST)

    मुंबईतील माहीम मतदारसंघात बिग फाइट होणार

    मुंबईतील माहीम मतदारसंघात बिग फाइट होणार आहे. मनसे, शिंदे गटानंतर ठाकरे गटही उमेदवार देणार आहे. मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. शिंदेंकडून विद्यमान आमदार सदा सरवणकरांना तिकिट देण्यात आली आहे.


  • 23 Oct 2024 12:20 PM (IST)

    गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

    गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या शिक्षेला छोटा राजननं दिलेलं आव्हान निकाली लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील, असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय.

    मात्र इतर प्रकरणातील अटकेमुळे छोटा राजनचा मुक्काम तुर्तास कारागृहातच राहणार आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

  • 23 Oct 2024 12:10 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्याकडे आज पण इच्छुकांची गर्दी

    उद्धव ठाकरे यांच्याकडे आज पण इच्छुकांची गर्दी पहायला मिळतेय. नांदगाव विधानसभा इच्छुक उमेदवार गणेश धात्रक हजार कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शन करत गणेश धात्रक आपल्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

    तसंच कळमनुरी मतदार संघातील इच्छुक उमेदवार अजित मगर जे दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे गटात आलेले आहेत ते देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी करतील. शेतकरी नेते म्हणून अजित मगर यांची ओळख आहे. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढली होती.

  • 23 Oct 2024 11:50 AM (IST)

    Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल

    मंत्री अशोक सिन्हा यांनी विमानतळावर केलं स्वागत… सकाळी साडेअकरा वाजता एकनाथ शिंदे कामाख्या मंदिरात देवीची पूजा करणार… उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल…

  • 23 Oct 2024 11:37 AM (IST)

    Maharashtra News: रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव कन्नड विधानसभा निवडणूक लढवणार

    रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव कन्नड विधानसभा निवडणूक लढवणार… शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवण्याची शक्यता.. संजना जाधव यांच्या निवडणूक लढवण्यावर दोन दिवसात निर्णय होणार… एकनाथ शिंदे संजना जाधव यांच्या प्रवेशबाबत निर्णय घेणार… संजना जाधव या शिंदे गटाकडून कन्नड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक…

  • 23 Oct 2024 11:25 AM (IST)

    Maharashtra News: शिवसेनेच्या नेत्यांच्या माझ्यावर विश्वास असल्याने मला उमेदवारी – शहाजीबापू पाटील

    विरोधकांनी शिंदे, देसाईंचे कान भरले… शिवसेनेच्या नेत्यांच्या माझ्यावर विश्वास असल्याने मला उमेदवारी… मला उमेदवारी मिळू नये म्हणून विरोधकांचे प्रयत्न सुरु होते…. असं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.

  • 23 Oct 2024 11:08 AM (IST)

    Maharashtra News: मुळा सहकारी कारखान्याला आयकर विभागाची नोटीस

    मुळा सहकारी कारखान्याला आयकर विभागाची नोटीस… 137 कोटी रुपये भरण्याचे आयकर विभागाचे आदेश… मुळा सहकारी साखर कारखाना शंकरराव गडाख यांच्या ताब्यात…

  • 23 Oct 2024 10:56 AM (IST)

    अमरावतीमध्ये अडसूळ विरुद्ध राणा वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता

    अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

    महायुतीत असतानाही आमदार रवी राणा हे रमेश बुंदिले हे यांना अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता असून त्यामुळे अडसूळ विरुद्ध राणा वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

  • 23 Oct 2024 10:40 AM (IST)

    निलेश राणेंच्या शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय ?

    वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्याच पक्षात, मतदारांनी यावर विचार करावा. निलेश राणेंच्या शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया.

  • 23 Oct 2024 10:36 AM (IST)

    आम्हाला बंडखोरीची भीती नाही – संजय राऊत

    आम्ही उद्याचे सत्ताधारी, आम्हाला सत्तेत बसायचं आहे. म्हणून तोलूनमापून चर्चा सुरू आहे.  जे रावसाहेब होते ते तर निघून गेले, आता आम्हाला बंडखोरांची भीती नाही.

  • 23 Oct 2024 10:32 AM (IST)

    मविआचं जागावाटपाचं काम 99 टक्के पूर्ण – संजय राऊत

    मविआचं जागावाटपाचं काम 99 टक्के पूर्ण झालं आहे. आज संध्याकाळपर्यंत आम्ही जागावाटप जाहीर करू असे संजय राऊत यांनी सांगितले.

  • 23 Oct 2024 10:25 AM (IST)

    अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

    अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे या महिलेचा हात सुटला आणि ती खालू पडून गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 23 Oct 2024 10:15 AM (IST)

    उमेदवारी जाहीर होताच किरण सामंत यांची पहिली प्रतिक्रिया 

    उमेदवारी जाहीर होताच राजापूर विधानसभा मतदारसंघातील किरण सामंत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महायुतीने  मला उमेदवारी दिली त्याबद्दल आभार, राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित आहे.   राजापूर विधानसभा मतदारसंघातून युतीला अपेक्षित काम केलं जाईल असं किरण सामंत म्हणाले.

  • 23 Oct 2024 09:57 AM (IST)

    उमेदवारी जाहीर होताच संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

    लढत सोप्पी नाहीये, मला फार मोठं आव्हान वरळीतून आहे. एका धनाढ्य राजपुत्र विरूद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत आहे. जनता निर्णय घेईल की दारात येणारा आमदार पाहिजे की घरी बोलावणारा? अमित ठाकरे हे जिंकतील, माहिमची जनता अमित ठाकरे यांना कौल देईल. अमित ठाकरे यांचं बालपण इथे गेलंय. राज ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. आम्ही काही शक्ती प्रदर्शन करत नाही आमची ताकद दिसते. आम्हाला वरळीत चांगला कौल मिळेल. मोठेया फरकाने आम्ही जिंकू, असं संदीप देशपांडे म्हणाले.

     

  • 23 Oct 2024 09:45 AM (IST)

    रत्नागिरीतील बडा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार

    रत्नागिरीत भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेनेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीतून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर झाली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित आहे. रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहे. आज 11 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार आहे. भाजपचे बाळ माने कमळ सोडून हाती मशाल घेणार आहे. रत्नागिरी विधानसभेचे बाळ माने क्षेत्र प्रमुख आहेत.

  • 23 Oct 2024 09:30 AM (IST)

    मागाठाण्यात यंदा चुरशीची लढत

    मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी प्राप्त झाली आहे. त्यांच्या विरोधात मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव गट शिवसेनेने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. चारकोप विधानसभेसाठी भाजपने विद्यमान आमदार योगेश सागर यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर योगेश सागर यांच्या विरोधात मनसेने विभागप्रमुख दिनेश साळवी यांना उमेदवारी दिली आहे.

  • 23 Oct 2024 09:15 AM (IST)

    नाशिकमधील बडा नेता शरद पवारांच्या भेटीला

    नाशिकमधून मोठी बातमी…  अतुल मते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. अतुल मते नाशिक पूर्व मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. राहुल ढिकले नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी अतुल मते इच्छुक आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे.

  • 23 Oct 2024 08:55 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : माढ्यात मविआमधून उमेदवारीचा तिढा कायम

    माढ्यात मविआमधून शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम. उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार बबनराव शिंदेसह अभिजीत पाटलांच्या जोरदार हालचाली. आमदार बबनराव शिंदे, आमदार पुत्र रणजितसिह शिंदे आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील या तिघांपैकी कुणाला शरद पवार गटाची उमेदवादी मिळणार ? याकडे सोलापूर जिल्हासह मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

  • 23 Oct 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार

    रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने करणार उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश. शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीतून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर, तर दुसरीकडे ठाकरे गटाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित. रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर. आज 11 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश निश्चित. रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार. भाजपचे बाळ माने कमळ सोडून हाती घेणार मशाल.

  • 23 Oct 2024 08:48 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : भाजप आमदार प्रशांत बंब यांना मोठा झटका

    भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. प्राचार्य सुरेश सोनवणे गंगापूर मतदारसंघात करणार बंडखोरी. प्रशांत बंब यांच्या विरोधात सुरेश सोनवणे लढणार निवडणूक. भाजपच्या सदस्यत्वाचा सुरेश सोनवणे यांनी दिला राजीनामा. राजीनामा देऊन सुरेश सोनवणे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. प्रशांत बंब यांच्या विरोधात थोपटणार दंड. सतीश चव्हाण यांच्या नंतर प्रशांत बंब यांच्या विरोधात आणखी एक आव्हान.

  • 23 Oct 2024 08:46 AM (IST)

    Maharashtra Election 2024 : कोपरी पचपाखाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध कोण?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पचपाखाडी विधान सभा क्षेत्रात ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेना यांना संधी मिळणार. कोपरी पाचपाखाडी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार. ठाणे शहरातून ठाकरे गटाकडून माजी खासदार राजन विचारे याना ठाणे शहर विधान सभा क्षेत्रातून संधी मिळणार. लोकसभेत पराभव झाल्याने ठाकरेंकडून विचारे यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न. ठाणे शहर विधानसभेत मशाल विरुद्ध कमळ अशी लढत पाहायला मिळणार. ओवळा माजिवाडा विधान सभा क्षेत्रात शिवसेनेचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मनेरा लढत पाहायला मिळणार. ठाण्यात 2 जागांवर मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत होणार.

महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात एकनाथ शिंदेंसोबत बंडात सहभागी असलेल्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. यात दोन उमेदवारांची नाव लक्षवेधी आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे स्वत: माहिम विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. तेच संदीप देशपांडे हे वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध रिंगणात उतरले आहेत. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. त्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला समजेल. त्यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेस कडूनही आपपाल्या उमेदवार याद्यांची घोषणा होऊ शकते.