MLA Rohit Patil: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी आला. त्यानंतर राज्यातील सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी जाहिराती केल्या जात आहे. गावांमध्ये आणि शहरांमध्ये बॅनरबाजी केली जात आहे. परंतु मतदार संघाबाहेर एखाद्या आमदाराची बॅनरबाजी क्वचितच होत आहे. राज्य पातळीवरील नेत्यांचे बॅनर राज्यभरात लागले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांचे बॅनर भारताबाहेर अमेरिकेत लागले आहे. या बॅनरमधून रोहित पाटील यांना विजयाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील भारतीयांमध्ये हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आहे. वयाच्या २५ व्या वर्षी आमदार होण्याची किमया त्यांनी केली. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातून निवडून आले. त्याबद्दल आमदार रोहित पाटील यांना शुभेच्छा देणारा फलक थेट साता समुद्रापार अमेरिकेत झळकला आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधल्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर चौकातल्या प्रसिद्ध बिल्डिंगवरील डिजिटल बिलबोर्डवर रोहित पाटील यांना शुभेच्छा देणारा फलक झळकला आहे. रोहित पाटील यांच्या न्यूयॉर्कमधील चाहत्यांनी त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पाटील यांना अमेरिकेत शुभेच्छा फलक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रोहित पाटलांच्या अभिनंदनच पोस्टर थेट अमेरिकेत त्यांच्या मित्रांनी झळकवल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार रोहित पाटील यांचे काका राजाराम पाटील यांनी सांगितले की, रोहितच्या विजयाने अमेरिकेतील त्याच्या मित्रमंडळींना आनंद झाला आहे. विशेष म्हणजे टाइम्स स्क्वेअरवर जाहिरात करण्यासाठी एक महिन्यांपूर्वी बुकींग करावे लागते. त्या मित्रमंडळींनी निकालापूर्वी हे बुकींग केले होते.
संजयकाका पाटील यांचा पराभव केला. रोहित पाटील यांनी २७ हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आहे. संजयकाका पाटील यांच्यासाठी या मतदार संघात अजित पवार यांनीही सभा घेतल्या होत्या.