Election Result : शरद पवार VS अजित पवार, ‘त्या’ 40 जागांचा नेमका निकाल काय?
NCP Ajit Pawar VS Sharad Pawar Group Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. अजित पवार गटाने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या उमेदवारांमध्ये तब्बल ४० जागांवर समोरासमोर लढत झाली. या लढतीत अजित पवार गटाला बहुतांश ठिकाणी विजय मिळाला आहे. तर काही ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार जिंकलेले नाहीत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. या निकालाची कुणालाही अपेक्षा नव्हती. कारण महायुतीला या निवडणुकीत 220 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळालं आहे. अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ 53 ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी तब्बल 41 जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या उमेदवारांचा तब्बल 40 ठिकाणी सामना झाला. या 40 जागांचा निकाल काय लागला, याची संक्षिप्त माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला केवळ 10 जागांवर यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागणारा हा निकाल ठरु शकतो. दरम्यान, ज्या ठिकाणी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना झाला तिथला निकाल काय लागला? याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
शरद पवार VS अजित पवार, ‘त्या’ 40 जागांचा निकाल
- अणुशक्ती नगरमध्ये अजित पवार गटाच्या सना मलिक यांचा शरद पवार गटाचे फहाद अहमद यांच्या विरोधात लढत झाली. या मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत सना मलिक यांचा विजय झाला.
- श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या आदिती तटकरे विरुद्ध शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांच्यात सामना झाला. या सामान्यात आदिती तटकरे या भरघोस मतांनी विजयी झाल्या.
- जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे अतुल बेनकेंविरोधात यांच्याविरोधात शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर यांच्यात सामना झाला. पण या मतदारसंघात दोन्ही गटाच्या उमेदवारांचा विजय झाला नाही. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद दादा सोनवणे यांचा विजय झाला.
- आंबेगावात अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटल विरुद्ध शरद पवार गटाचे देवदत्त निकम असा सामना झाला. या लढतीत दिलीप वळसे पाटील विजयी झाले.
- शिरूरमध्ये अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके विरुद्ध शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्यात लढत झाली. या लढतीत अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके विजयी झाले.
- इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून भाजपातून आलेले हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीत हर्षवर्धन पाटील जिंकतील असा दावा केला जात होता. पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. दत्तात्रय भरणे यांचा इथे विजय झाला.
- बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांच्या सामन्यात काका अजित पवारांचा विजय झाला.
- पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत झाली. यात अण्णा बनसोडे यांचा विजय झाला.
- वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला. तर बापूसाहेब पठारे विजयी झाले.
- हडपसर मतदारसंघात अजित पवार गटाचे चेतन तुपे विरुद्ध शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. या लढतीत चेतन तुपे यांचा विजयी झाला.
- अकोलेत किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे यांच्यात लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे किरण लहामटे यांचा विजय झाला.
- कोपरगावात आशुतोष काळेंविरोधात संदीप वर्पे यांच्यात सामना झाला. यामध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांचा विजय झाला.
- पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्यात लढत झाली. यामध्ये काशीनाथ दाते यांचा विजय झाला आहे.
- नगरमध्ये संग्राम जगतापांविरोधात अभिषेक कळमकर यांच्यात विजय झाला.
- माजलगावात प्रकाश सोळंकेंविरोधात मोहन जगताप लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांचा विजय झाला.
- बीड विधानसभेत संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर यांच्यात लढत झाली. यामध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला.
- आष्टीत शरद पवार गटाचे मेहबूब शेख विरुद्ध अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांच्यात लढत झाली. तसेच इथे भाजपकडून सुरशे धस मैदानात होते. या निवडणुकीत सुरेश धस यांचाच विजय झाला.
- परळीत धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांच्याक लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजयी झाले.
- अहमदपुरात बाबासाहेब पाटलांविरोधात विनायक जाधव लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला.
- उदगीरमध्ये संजय बनसोडेंविरोधात सुधाकर भालेराव – अजित पवार गटाचे संजय बनसोडे विजयी.
- माढामध्ये अभिजीत पाटील विरुद्ध मीनल साठे लढत – शरद पवार गटाचे अभिजीत पाटील विजयी.
- मोहोळमध्ये यशवंत मानेंविरोधात राजू खरे – अजित पवार गटाचे राजू खरे विजयी.
- फलटण विधानसभेत दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील – शरद पवार गटाचे सचिन पाटील विजयी.
- वाईमध्ये मकरंद पाटलांविरोधात अरुणा पिसाळ – अजित पवार गटाचे मकरंद पाटील विजयी
- चिपळूण- शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव – अजित पवार गटाचे शेखर निकम विजयी.
- चंदगड- अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे नंदिता बाभूळकर आणि अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील विजयी झाले.
- कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे – अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विजयी.
- इस्लामपुरात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील – जयंत पाटील विजयी.
- तासगावात रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील – रोहित पाटील
- सिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणे विरुद्ध मनोज कायंदे – अजित पवार गटाचे मनोज कायंदे विजयी
- मोर्शीत अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार विरुद्ध शरद पवार गटाचे गिरीश कराळे आणि भाजपचे उमेश यावलकर यांच्यात लढत झाली. यामध्ये उमेळय यावलकर यांचा विजय झाला.
- तुमसर- राजू कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे – अजित पवार गटाचे राजू कारेमोरे विजयी.
- अहेरीमध्ये धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम – अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम विजयी.
- पुसद- इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद – अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक विजयी
- वसमत विधानसभेत राजू नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर – अजित पवार गटाचे राजू नवघरे विजयी
- येवल्यात छगन भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे – छगन भुजबळ विजयी
- सिन्नर- माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे – अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे विजयी
- दिंडोरी- नरहरी झिरवळ विरुद्द सुनीता चारोसकर – अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ विजयी
- शहापुरात दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा – अजित पवार गटाचे दौलत दरोडा विजयी
- मुंब्रा कळव्यात जितेंद्र आव्हाड विरुद्एध नजीब मुल्ला – जितेंद्र आव्हाड विजयी.