मुंबई | 11 डिसेंबर 2023 : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. मागील दोन दिवस विरोधकांनी शेतकरी प्रश्नांवर चर्चा करण्याचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे त्या विषयावर अधिवेशनात आज वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही? असा आरोप विरोधक करत आहे. तसेच अधिवेशनातील सर्व घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आज लक्ष लागले आहे. कलम ३७० संदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा राज्य दौरा सुरु आहे. राज्याच्या राजकारणातील सर्व अपडेट तुम्हाला इथे वाचायला मिळेल. या शिवाय क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचाही या लाईव्ह ब्लॉगमधून आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा लाईव्ह ब्सॉग फॉलो करयला विसरू नका. शिवाय टीव्ही 9 मराठी चॅनेल आणि यूट्यूब लाईव्हवरही तुम्हाला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील.
सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी कायम राहिली आहे. ऊस दराची बैठक पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. स्वाभिमानी साखर कारखानदारांनी प्रशासनाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. एफआरपी अधिक 100 मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. बैठक म्हणजे डोळयात केलेली धूळफेक असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय. वसंतदादा साखर कारखान्यासमोरील राजू शेट्टींचं ठिय्या आंदोलन कायम असणार आहे. दर जाहीर केल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी केलाय.
नाशिक | शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माजी आमदार नितीन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. नितीन भोसले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. नितीन भोसले हे या आधी मनसेकडून आमदार म्हणून निवडून आले होते.
यवतमाळ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जानेवारी महिन्यात 27 तारखेला बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दौरा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात नंगारा भवनाचे यावेळी केले जाणार उद्घाटन केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच बंजारा समाजाचे मोठे संमेलन यावेळी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नागूपर | राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच शिक्षक भरती प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रशनोत्तराच्या तासात दिली.
कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केंद्राने जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात आणि पूर्ण राज्याचा दर्जाही बहाल करावा.
ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ASI ला 18 डिसेंबरला सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काहीही सुटत नाही, परंतु काही लोकांना वाटते की कलम 370 त्या भावनेच्या बाजूने नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे आणि प्रत्येकजण तो मान्य करेल.
मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. त्यांच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही, असंही शिरसाट म्हणाले आहेत. तर दोन्ही नेत्यांनी संयम बाळगावा असं आव्हान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
लंडनमध्ये उद्धव ठाकरे इक्बाल मिर्चीला भेटले होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरेंनी खरं सांगावं नाही तर फोटो समोर आणू असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
नागपूर : जे देशभर काश्मीर पंडित विखुरले आहेत ते मतदान करतील कि नाही याची ग्यारंटी मोदींनी घ्यावी. पाकव्याप्त काश्मीर पण आपल्यात घ्या. तिथेही निवडणुका घ्या. इतरांचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली तशी करून दाखवावी. धारावीसाठीचा मोर्चा त्यांच्या मित्राचा विकासाच्या आड येणारा आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये केली.
लासलगाव : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात येवला तालुक्यातील कातरणी येथील शेतकऱ्याने आमरण उपोष सुरु केलंय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालय प्रवेशद्वाराजवळ हे आमरण उपोषणाला सुरु आहे. गोरख वाल्मिक संत असे आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. जोपर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार असा इशारा या शेतकऱ्याने दिलाय.
नागपूर : कोर्टात जे होईल ते होऊ द्या. तुम्ही आम्हाला सरकारच्या वतीने आरक्षण द्या. त्याशिवाय मी शांत बसणार नाही. आतापर्यंत आम्ही संयमाने लढाई घेतली. महाराष्ट्रात कायदा हातात घेण्याची वेळ महाराष्ट्रमधील धनगरावर सरकारने आणू नये. हिवाळी अधिवेशन संपवण्याचे आधी धनगरांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या. एक उपोषण सुरू झालं सगळं मंत्री मंडळ तिथे गेलं. सरकार दुजाभाव करत आहे अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
अकोला : राज्यात आगामी निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. अकोला जिल्हा प्रशासन आणि जिल्हा निवडणूक विभागाकडून ईव्हीएम मशीनच्या चाचण्या घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथील असलेल्या ईव्हीएम गोदामात निवडणूक आयोग विभागामार्फत ईव्हीएम मशीनच्या प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या.
जळगाव : आयकर विभागाच्या कारवाईत काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे तब्बल 300 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये भाजप महिला मोर्चाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार धीरज साहू यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा असलेले बॅनर जाळण्यात येवून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हा महानगर आणि जळगाव जिल्हा महानगर महिला मोर्चाच्या वतीने प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
जालना : जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या खंदे समर्थकावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत गजानन तौर या युवकाचा मृत्यू झाला. शहरातील मंठा चौफुली या भागात ही घटना घडली. अज्ञात बंदूकधाऱ्याने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
येवला : केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आहे. या निर्णयाविरोधात आता येवल्यातील मनसेदेखील आक्रमक होत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी येवला तहसीलवर धडक दिली. कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळेस मनसेच्या वतीने करण्यात येऊन निर्यात बंदी मागे न घेतल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
नागपूर : तुम्ही गेल्या अधिवेशनात कुठे गेला होतात. अडीच वर्ष, अडीच वर्ष सारख करत आहात. पण, यांना सारखं सकाळ, संध्याकाळ अडीच वर्ष हेच दिसतय. मुंबई गोवा मागमार्ग होत नाही. डिसेंबरमध्ये पूर्ण होणार होता. बारा वर्ष झाली तरी पूर्ण होत नाही नाही याला जबाबदार कोण?
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे. त्यात कर्ज देणं बंद होत असेल तर त्याला सदावर्तेंचे पॅनल जबाबदार आहे. सदावर्तेंच्या दबावाला सहकार खाते कमी पडतं आहे. त्यांचे लागेबांधे सदावर्तेंसोबत आहे का अशी शंका येते आहे. सहकार खाते, सदावर्ते आणि संचालक मंडळ यांच्यामुळे बॅंक डबघाईस आली आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांनी केला.
मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात मुलुंडच्या नवघर विभागात परवानगी देण्यात आलेल्या प्रकल्प धारकांच्या सदनिकामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलंय. या प्रकल्पाला त्यांनी विरोध सुरु केला आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे काम सुरू असल्याने स्थानिकांना रात्री झोप मिळत नाही. पोलीस कंट्रोलला फोन केला तरी पोलीस कारवाई करीत नाहीत. यामुळे स्थानिकांसह किरीट सोमय्या यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या 207 किलो सोने व 2 हजार 500 किलो चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विधी व न्याय विभागाने दिली होती सोने वितळवायला परवानगी मात्र त्याला काही भाविक पुजारी यांचा विरोध केला होता. हिंदू जनजागरण समितीने याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. तब्बल 13 वर्षानंतर राबवली जाणार होती सोने वितळविणे प्रक्रिया. भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी केली होती दान.
अहमदनगर : छत्तीसगड येथील खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटींची रोकड सापडली आहे. अनेक लोक आहेत जे ब्लॅक मार्केटिंग करून पैसे घेऊन बसले आहेत त्यांचा शोध केंद्रीय यंत्रणा घेतील. पंतप्रधानांचा जे वाक्य आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा ते आता देशासमोर येत आहे. काँग्रेसने जो भ्रष्टाचार केला आहे तो पैसा कुठे कुठे लपून ठेवला आहे बाहेर पडू लागला आहे.
अहमदनगर : आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला फारसा प्रतिसाद मिळालेला मला पाहायला मिळाला नाही. त्यांना जनतेने कसा प्रतिसाद दिला याबद्दल निवडणुकीत समजेल. एका युवा आमदाराने म्हणून एखादी भूमिका घेणे आणि संघर्ष यात्रा काढण ही चांगली गोष्ट आहे. – सुजय विखे पाटील
कलम 370 बाबत आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय म्हणजे आनंदाचा क्षण आहे. मोदींनी घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचं अधोरेखित झाले आहे. ज्यांनी त्यांच्या निर्णयावर अधिवेशनामध्ये संशय निर्माण केला होता त्यांना देखील या निर्णयाच्या माध्यमातून उत्तर मिळालं आहे. या निर्णयामुळे पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.
अहमदनगर : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आज अधिवेशनाला उपस्थित असल्याने भाजप खासदार सुजय विखे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने फटाके फोडून आनंद व्यक्त करायला हवा. घराबाहेर पडणारे जे क्वचित नेते आहेत त्यापैकी ठाकरे हे एक आहेत. अशी टीका त्यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाची मंगळवारी अधिवेशनानंतर बैठक बोलवली आहे. ऊद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पीक विमा, कांदा निर्यात, मराठा आरक्षण, अध्यक्षांकडे सुरु असलेली सुनावणी याबाबत सर्व आमदारांशी ऊद्धव ठाकरे चर्चा करणार आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे बसमध्ये प्रवासी महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या. हरियाणा राज्यातील 6 सराईत गुन्हेगारांना सोने चोरी प्रकरणी इंदापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली.
रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आता आंदोलनानंतर दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे. ‘रास्ता रोको’तून केंद्र सरकाला आज संदेश दिला.
शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही, हे दुर्देव आहे. मी कृषीमंत्री असताना कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते. परंतु आताचे सरकार ते करु शकत नाही.
नाशिक जिल्हा देशात शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. घाम गाळून काळ्या आईशी इमान राखण्याची भूमिका तुम्ही घेतली. देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्णय घेतल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
संकेत व संदेश समजून घ्या, आज मला जास्त बोलता येणार नाही. 80 टक्के लढाई जिंकली आहे, आता पर्यंत 35 लाख लोकांना मिळाले आहे, हेच 70 वर्षांपूर्वी दिले असते तर जगात एक नंबर जात राहिली असती, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळणार, काही झाले तरी आरक्षण मिळणार, असे नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
काल जी सभा झाली, त्यात सुहास कांदे यांनी बालिश चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की सुषमा अंधारे काम थांबवेल. पण हा तुमचा भेदरटपणा आहे. त्यांचा प्रयत्न फार काही सफल झाला नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
मानधन नको वेतन हवे अशी मागणी करत अंगणवाडी सेविकांना सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकरी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी अंगणवाडी सेविकांना हातात चटणी भाकरी घेत आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांना मार्शल बोलवून सभागृहाच्या बाहेर काढायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
सोलापुरात कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कांद्याची आवक झाली आहे. बाजार समितीत आज सुमारे 1 हजार ते 1200 गाडी कांद्याची आवक असल्याची व्यापाऱ्यांची माहिती आहे. कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील अनेक बाजार पेठेत कांदा लिलाव बंद होते. त्यामुळे आवक वाढल्याची शक्यता आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांद्याचे प्रति क्विंटल 1 हजार रुपयांनी दर घसरले आहेत. सोलापूरच्या बाजारात आज कांद्याला 2800 रुपये भाव आहे. याच कांद्याला कालपर्यंत 4 हजार रुपयापर्यंत भाव होता. दरम्यान आज वाढलेल्या कांदा आवकमुळे उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद राहणार आहे.
नवी दिल्ली- शक्य तितक्या लवकर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक व्हायला हवी, असंही चंद्रचूड म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही, अशी अजित पवारांची भूमिका होती. त्यांच्यासह एनसीपीतील प्रमुख नेत्यांचीही तीच भूमिका होती, असं संजय राऊत म्हणाले.
धर्माच्या नावावर निवडणुका लढवल्या जात आहेत. 2019 मध्ये भाजप आमच्यासोबत सरकार बनवण्यास तयार नव्हतं. त्यांनीच फेकलेल्या जाळ्यात तेच अडकलेत. भाजपची प्रफुल्ल पटेलांविषयी नेमकी भूमिका काय, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
नवी दिल्ली- पाच न्यायाधीशांकडून तीन निकाल येण्याची शक्यता आहे. “जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर पुन्हा निर्णय घेणे योग्य नाही. जम्मू काश्मीरमधील संविधान हे देशाच्या संविधानापैकीच एक आहे. कलम 370 हटवणे हा योग्य उद्देश आहे. राष्ट्रपतींकडे 370 हटवण्याचा अधिकार आहे,” असं चंद्रचूड म्हणाले.
लासलगाव- कांदा निर्यात बंदीमुळे कांदा निर्यातदारांना कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे. कांद्याने भरलेले शेकडो कंटेनर अद्यापही मुंबई, चेन्नई आणि बांग्लादेश, नेपाळ पोर्टवर उभे आहेत. तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसणार आहे. कंटेनर निर्यात होऊन द्यावी, कांदा निर्यात बंदीचा फेरविचार करावा, अशी मागणी कांदा व्यापाऱ्यांनी केली आहे.
नवी दिल्ली- कलम 370 बाबत सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात निर्णय होणार आहे. न्यायाधीशांकडून निकाल वाचन सुरू आहे. 370 कलम हटणार की कायम राहणार याचा थोड्याच वेळात फैसला होणार आहे.
सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी असेल. दीड वर्षांत 10 ते 12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले,
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नागपूर – शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले असून कांदा निर्यात बंदीच्या मुद्यावरून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे.
नागपूर – उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत.
माझा बोलविता धनी कोण हे 24 डिसेंबरला समजेल. 24 तारखेपर्यंत आपण कोणत्याही नेत्याबद्दल बोलणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, असे अजित पवार म्हणाले. कांदा निर्यातबंदी प्रश्नासंदर्भात अमित शहांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सांगलीमध्ये राजू शेट्टी यांचं तब्बल 20 तासांपासून आंदोलन सुरू आहे. वसंतदादा कारखान्यासमोर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या दिला आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे.
गडचिरोली – पोलीस पाटलाची हत्या केलेल्या कट्टर नक्षलवाद्याला पोलीसांनी अटक केली आहे. नक्षलवाद्यांचा पी एल जी सप्ताह सुरू असताना या नक्षलवाघाला काल गडचिरोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 23 नोव्हेंबर रोजी टिटोळा येथील लालसु वेळदा पोलीस पाटलाची हत्या करण्यात आली होती.
नाशिक – चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीवर कांदा निर्यात बंदीविरोधात आंदोलन करत रास्तारोको करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार असून ते आंदोलकांना मार्गदर्शनही करणार आहेत.
मुंबई आग्रा महामार्गावर हे आंदोलन होत असल्याने महामार्गावर एक प्रकारे चक्काजाम होणार असून त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
राज्यात पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज… राज्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून किमान तापमान होत असलेली घट थांबेल.. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे
पश्चिम रेल्वेवर लवकरच अतिरिक्त 30 लोकल धावणार आहेत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. चर्चगेट – विरार दरम्यान 20 – 30 अतिरिक्त लोकल धावणार आहेत. अतिरिक्त फेऱ्यांमुळे लोकलमधील गर्दी देखील कमी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सोलापुरातील बार्शी मध्ये जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात… बार्शीतील वैराग-माढा रोडवरील मालवंडी गावाजवळ झाला अपघात… अपघातात 5 ते 6 जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती…. माढ्याला जनावरे घेऊन जात असताना समोरून आलेल्या वाहनाला जोराची धडक लागल्याने अपघात…
गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ इंदापूर शहरासह तालुका बंदची हाक देण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद असतील. आजच्या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारा यांची भेट घेतली… नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्यास शरद पवारांची सहमती… ठाकरेंच्या उमेदवारासाठी पवार करणार नाशिकमध्ये प्रचार दौरे… ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ?
बातमी नाशिकमधून… ठाकरे गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. माजी आमदार वसंत गीते, उबाठा गट जिल्हाप्रमुख विजय करंजकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत. ही सदिच्छा भेट आहे. शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात शरद पवार चांदवडला रवाना होणार आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी हा दावा केला आहे. अमरावतीच्या उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणांनी अजित पवारांची भेट घेतली होती. महायुतीची उमेदवारी खासदार नवनीत राणा की आनंदराव अडसूळ असणार? याची सध्या चर्चा होत आहे.
लसण्याच्या दरात वाढ, आवक घटल्याने भावात वाढ झाली आहे. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका लसणावर झाला आहे. उत्पादन कमी असल्याने लसणाच्या भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण ३५० रुपये किलोपर्यंत गेला आहे. तर किरकोळ बाजारात 400 ते 410 रुपये पर्यंत गेल्याने व्यापारी आणि महिला वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
पादचारी दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मी रोडवर आज वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळी दहा ते संध्याकाळी सातच्या दरम्यान पीएमपी बसेस बंद राहणार आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या बसेस दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत. उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती असा वॉकिंग प्लाझा आयोजित करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अर्थसंकल्पासाठी प्रत्येक विभागाने जमा, खर्चासह गेल्या वर्षभरातील फलनिष्पत्ती याबाबत १५ डिसेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार स्वतः रस्त्यावर उतरणार आहे. चांदवड येथे महामार्गावर सकाळी ११ वाजता ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार आहे. आंदोलनानंतर शरद पवार आंदोलकांना संबोधित करणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीने केली आहे.
सप्तशृंगी देवीच्या गडाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून ८१.८६ कोटींचा निधी दिला गेला आहे. या निधीतून अद्ययावत बसस्थानक, भक्तनिवास आणि पोलीस ठाणे इमारत उभारली जाणार आहे. तसेच नांदुरी घाटात दरड प्रतिबंधक उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज जीव मुठीत धरून दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेवर लवकरच अतिरिक्त ३० लोकल धावणार आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. त्याचा फायदा होणार आहे.