मुंबई | 12 डिसेंबर 2023 : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आणि कांदा निर्यातबंदीवरुन विरोधक आक्रमक आहे. सत्ताधारी बॅकफूटवर आले आहेत. आता मंगळवारी विरोधक पुन्हा सरकारला कोंडीत पकडण्याची डावपेच करणार आहे. उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नागपूरला पोहचले आहे. त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक बोलवली आहे. मराठा आरक्षणासाठी लढ देणारे मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाले आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशनंतर आज भाजपकडून राजस्थान मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. या शिवाय क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचाही या लाईव्ह ब्लॉगमधून आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा लाईव्ह ब्सॉग फॉलो करयला विसरू नका. शिवाय टीव्ही 9 मराठी चॅनेल आणि यूट्यूब लाईव्हवरही तुम्हाला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील.
नागपूर | “रोहीत पवार हे फुसका बार… त्यांना ही यात्रा काढून नेता बनायचं होतं पण त्यांना ते जमलं नाही. कायदा सुव्यस्था बिघडवण्याचं त्यांनी काम केलं. विधान भवनावर मोर्चा आणायचा हट्ट का ? रोहीत पवारांचा संधर्ष हा देखावा”, अशी टीका भाजप आमदार राम शिंदे यांनी केलीय.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GPAI) समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” AI हे 21व्या शतकातील विकासाचे सर्वात मोठे साधन बनू शकते आणि 21व्या शतकाला नष्ट करण्यातही सर्वात मोठी भूमिका बजावू शकते.”
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतासाठी प्राण दिले, वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. गृहमंत्री अमित शहा यांना इतिहास माहीत नसावा. केवळ गोंधळ घालण्यासाठी हे करण्यात आले आहे.
एनआयएने जयपूरमध्ये सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येचा तपास सुरू केला.
इस्लामाबाद हायकोर्टाने अल-अझिझिया स्टील मिल भ्रष्टाचार प्रकरणात मोठा निकाल देताना पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आपल्याला सांगूया की भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने याच प्रकरणात 2018 साली 73 वर्षीय शरीफ यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.
नागपूर | येत्या विधानसभा निवडणूकपूर्वी OPS बाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. जुन्या पेंशन योजनेसंदर्भात सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याचबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेंशन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे. ती माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल. जुन्या पेंशन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणूकपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मी देतो, असं अजित पवार म्हणाले.
नागपूर | मुंबईत रस्ते अपघातांची दिवसेंदिवस आकडेवारी वाढतेय. फक्त मुंबईच 1895 रस्ते अपघात तर 355 जीवघेणे अपघात झाले. यामध्ये 371 जणांचा अपघाती मृत्यू झाला, जी चिंताजनक बाब आहे. पण याबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाल पाहायला मिळत नाही. वाहतुकीच्या नियमावली आहेत. पण त्याची अंमलबजावणी का होत नाही? मुंबईतील रस्ते अपघात रोखण्यासाठी काय उपाय योजना राज्य सरकार करणार आहे? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारसमोर उपस्थित केला आहे. उपराजधानी नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनच्या चौथ्या दिवशी गायकवाड यांनी हा मुद्दा उपस्थित करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
नागपूर : बांधकाम विभागात कामगारमध्ये पक्षाचे पदाधिकारी आहेत. विश्वकर्मा योजना चॉकलेट आहे. अनेक महामंडळ बंद झाली आहेत. सरकारच्या डोक्यात भुसा भरला आहे का? जिल्हाधिकारी फक्त खुर्चीत बसून पैसे घेत आहेत काम काय करतात. कामगारांना स्किल नुसार पैसे द्या. देवेंद्र फडणवीस यांना फुकट बदनाम केलं जात. ओबीसीसाठी चांगली योजना आखली आहे. पण जनजातीचा सर्वे झाला पाहिजे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली.
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी अनोख्या शुभेच्छा दिल्यात. शरद पवार यांचे भाषणातलं वाक्य वापरत या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. “मी काय म्हातारा झालोय का? अजून लय जणांना घरी पाठवायचं” हे शरद पवारांच्या भाषणाचे वाक्य वापरत पुण्यात बॅनरबाजी करण्यात आलीय.
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भाजपने भजनलाल शर्मा यांचे जाहीर केले. त्यांची नेते पदी निवड झाल्याचे पत्र घेऊन भाजप नेते राजभवनावर जाण्यासाठी रवाना झाले आहेत. सांगानेर मतदार संघातून भजनलाल शर्मा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत भाजपने येथे दिया कुमारी आणि प्रेम चंद बैरवा असे दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत.
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भाजपने भजनलाल शर्मा यांचे नाव पुढे आणले आहे. वसुंधरा राजे आणि बाबा बालकनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर करण्यात आले.
मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ट पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा या एसआयटीत समावेश आहे. देवेन भारती हे या एसआयटीवर लक्ष ठेवून राहतील. पण, ते समोर येणार नाहीत अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.
बीड : काही लोक जातीयवाद करायला लागले. जाती जातीत दंगली घडवायच्या आहेत. आरक्षण आपल्या पदरात पडू द्या, तो पर्यंत शांत राहा. एकदा आरक्षण मिळाले की ती आणि आपण एकाच गल्लीत आहोत. कुऱ्हाड कोयत्याची भाषा करत आहेत पण आपण शांत राहायचे. त्यांचे ऐकून सरकारने मराठा समाजावर अन्याय करू नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. गळ्यात कांद्याच्या माळा घालून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्यांनी हे आंदोलन केलं.
ठाणे : अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या खाडी किनारी झोपडपट्टीवर महापालिकेने कारवाई केली होती .त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांना स्थलांतरासाठी रेंटल मध्ये जाण्यासाठी घरांच्या चाव्या दिल्या होत्या ,मात्र अजून देखील त्यांचा पुनर्वसन न झाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालया बाहेर क्रांती नगर झोपडपट्टी धारकांनी मोर्चा काढला होता. यावेळी ठाणे महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बेघरांना घर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.
देशात महिला आणि बालकांच्या विरोधात वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा विनायक राऊत यांनी संसदेत उपस्थित केला आहे. देशात ५ राज्यात गुन्हेगारी वाढली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या सदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घालावे. टास्क फ़ोर्सची निर्मिती करुन राज्यांना सुचना देण्याची मागणी त्यांनी केली. विनायक राऊतांनी एनसीआरबीचा मांडला रिपोर्ट.
पुण्यात विकास कामांसाठी कात्रज कोंढवा रस्त्यावर अनोखे बॅनर. लोकप्रतिनिधींच्या फोटोचे आणि आश्वासनाचे बॅनर लावत कात्रज कोंढवा रस्त्यावर स्थानिकांच आंदोलन. आमदार आणि खासदारांनी भाषणात केलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत लावण्यात आले पोस्टर्स. खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, आमदार भीमराव तापकीर यांचे फोटो पोस्टर्सवर लावण्यात आले आहे.
इंदापुरात आमदार गोपीचंद पडळकर ज्या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी गेले होते, त्या आमरण उपोषणातील एका उपोषणकर्त्याची तब्येत खालवली असून माऊली वणवे असे तब्येत खालावलेल्या उपोषणकर्त्याचे नाव आहे. तब्येत खालवल्यामुळे वनवे यांना तात्काळ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज जयपूरमध्ये महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विनोद तावडे, सरोज पांडे, वसुंधराराजे, सिपी जोशी या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या नेत्यांची जयपुर मध्ये बैठक होत आहे. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री पदाचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे.
अपार आयडी कार्डला महत्व आहे. हे कार्ड विद्यार्थ्यांची शिक्षणपत्रिकाच असेल. त्याची इत्यंभूत माहिती या कार्डमध्ये असेल. त्याची शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्याची माहिती या कार्डमध्ये असेल. अपार कार्ड हे एक राष्ट्र , एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारीत ओळखपत्र आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी असतील. त्याची क्रीडा क्षेत्रातील निपुणता यामध्ये नोंदवला जाईल. लवकरच विविध शाळांमध्ये अपार कार्ड नोंदणीला सुरुवात होत आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विनोद तावडे, सरोज पांडे, वसुंधराराजे, सिपी जोशी यांचा बैठकीत समावेश आहे. पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या नेत्यांची जयपुर मध्ये बैठक सुरु आहे. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री पदाचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.
रेडमी लवकरच भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहेत. ब्रँडने Redmi Note 13 मधील नवीन स्मार्टफोनची झलक दाखवली आहे. हा नवीन फोन पुढील वर्षात, जानेवारीमध्ये बाजारात दाखल होणार आहे. या फोनमध्ये कंपनीने 200MP कॅमेरा आणि इतर फीचर्स दिले आहेत.
तुळजाभवानीच्या पुरातन सोने चांदीच्या अलंकारावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हा आदेश दिला. महंत ( पुजारी ) सेवेकरी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे तहसीलदार यांना आदेश देण्यात आले आहे. तुळजाभवानी देवीच्या पुरातन दागिण्यापैकी काही दागिने व अलंकार व चांदीच्या वस्तू गहाळ झाल्याचा चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला. त्यानंतर हा आदेश देण्यात आला. चांदीचा मुकुट, त्रिशूल प्रभावळ धुपारती यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब असल्याचे अहवालात समोर आले आहे.
पुण्यातील शाळेच्या विद्यार्थी घेऊन जात असलेल्या रिक्षाला अपघात झाला. यामध्ये ५ विद्यार्थी जखमी झाले. डंपरने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये अपघात झाला. पुण्यातील चांदणी चौकात भरधाव डंपरने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली.ही सर्व एमआयटी ग्रुप स्कुलची मुले असल्याची माहिती समोर येत आहे. तीन विद्यार्थ्यांना एशियन हॉस्पिटलमध्ये तर एका विद्यार्थ्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रिक्षा भुयारी मार्गात डंपरला जाऊन धडकली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले.
तुम्ही आम्हा सर्वांसाठी सदैव अखंड उर्जादायी आहात. तुम्ही आमच्यासाठी स्पेशल आहात. कुटुंब असो की समाजकारण तुम्ही सर्वत्र आमचे मार्गदर्शक आणि आदर्श आहात. तुम्ही आम्हाला स्वाभिमानी विचारांचा आणि त्यासाठी लढण्याचा वारसा दिला आहे. तुमच्या विचारांची मशाल कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण अखंड प्रयत्न करीत आहोत. तुमचा मायेचा हात असाच कायम डोक्यावर राहो. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो हि सदिच्छा, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी लिहिली.
अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पारनेर येथील संपर्क कार्यालयाबाहेर वाढदिवसाचा बॅनर लावण्यात आले. शुभेच्छा बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर ही शरद पवारांसोबत असलेले फोटो त्यांनी पोस्ट केला.
आमदार गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणानंतर मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आंदोलकांनी चप्पल फेकल्या नाहीत. चप्पलफेक षडयंत्र करणाऱ्यांचा प्रशासनाने शोध घ्यावा अशी मागणी मराठा आंदोलकांची सरकारकडे केली आहे.आमदार पडळकर यांना आंदोलना ठिकाणी कोण घेऊन आले याचा शोध प्रशासनाने घ्यावा. पडळकर यांना मुद्दाम आमच्या आंदोलनाकडे आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आमचे साखळी उपोषण शांततेच्या मार्गांने सुरु आहे, आम्हाला बदनाम कुणी करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
मंत्री छगन भुजबळ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. हायकोर्टातील याचिकेवरुन दमानिया यांनी ईडीसह भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ईडीने भुजबळांविरोधातील मनी लाँड्रिंगची केस बिलकूल मागे घेतली नाही, असा दावा दमानिया यांनी केला.
अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पारनेर येथील संपर्क कार्यालयाबाहेर वाढदिवसाचा बॅनर लावण्याक आलं आहे. शुभेच्छा बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर देखील शरद पवारांसोबत असलेले फोटो केले पोस्ट केले आहेत.
पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे हातात टाळ घेऊन भजनात दंग झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महानंदा डेरीतील कामगार व कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच आहे. मुंबईचा गोरेगाव पूर्व परिसरात महानंदा डेअरी चा गेट बाहेर महानंद डेअरी मध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांचा आज दुसऱ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरू आहे.
महानंदा डेअरी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गेल्या सहा महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महानंदा डेअरी मध्ये काम करणारे मोठा संख्या मध्ये कर्मचाऱ्यांनी आजपासून उद्यापासून बेमुदत उपोषणावर बसले आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेससह पुरोगामी संघटना आक्रमक झाली आहे. शिर्डीच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन सुरू केलं असून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत हल्लाबोल आंदोलन केलं आहे. काँग्रेसने निलंबित केलेले माजी आमदार डॉ. तांबे काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झालेत.
पुणे-मुंबई दुर्गतीमार्गावरील वाहतूक पूर्ववत झालीय, दोन तासांचा ब्लॉक अवघ्या 43 मिनिटात आटोपला असून मुंबईहून पुण्याच्या दिशेने वाहतूक सुरू करण्यात आलीय. 12 ते 2 च्या दरम्यान हा ब्लॉग घेण्यात आला होता मात्र ओव्हर ग्रँटी बसवण्याचं काम घ्या 43 मिनिटात झाल्याने वेळे आधीच मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू झालीय.
नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे उपस्थित झाले आहेत. त्यांच्यावोबत आदित्य ठाकरेदेखील आहेत.
2021 साली तत्कालिन पिंपरी चिंचवडचे पोलिस निरीक्षक यांनी ललित पाटील प्रकरणी गृहमंत्रालयाला पत्र लिहून या प्रकणाची माहिती दिली होती मात्र गृहमंत्रालयाने याबाबतीत कुठलीच चौकशी न केल्याने ललित पाटील पळून गेला असं फडणवीस म्हणाले. ड्रग्ज प्रकणात कोणालाही माफी मिळणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सरकारने 10 पोलिसांवर कारवाई केली मात्र ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्याचाही हात असू शकतो. त्यामुळे या प्रकणात सखोल तपास व्हावा अशी मागणी जगताप यांनी सभागृहात केली.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात 4 पोलिसांना बडतर्फ करण्यात आले तर 6 पोलिसांना निलंबीत करण्याची करवाई करण्यात आली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सभागृहात चर्चा सुरू आहे.
विधानपरिषदेत ललित पाटील प्रकरणावर चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात झालेल्या करवाईची माहिती सभागृहात देत आहेत. ड्रग्स प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरूवात झाली आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर खासदार राहूल शेवाळ यांची उलट साक्ष सुरू आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी सुरू आहे.
न्यायाधीश लोया यांनी नागपूरात आत्महत्त्या केली होती. या आत्महत्त्येची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. न्यायाधीश लोया यांच्या आत्महत्त्येनंतर अनेक चर्चांना उधाण आले होते.
बीड- मनोज जरांगे पाटील हे आजचा मराठा संवाद दौरा आणि सभा पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील उपचार घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. डॉक्टरांनी त्यांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
बीड- मनोज जरांगे पाटील हे थोरात हॉस्पिटलमधून मराठा संवाद दौऱ्यासाठी निघाले आहेत. तब्येत खालावली असली तरी जरांगे पाटील आज सभा घेणार आहेत. आज त्यांची बीड जिल्ह्यातील बोरी सावरगाव, धारूर, हरकी निमगाव येथील माऊली फाटा येथे मराठा संवाद सभा पार पडणार आहे.
पंढरपूर- आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर इथं चप्पल फेक केल्याप्रकरणी माळशिरस शहर बंद आहे. ओबीसी समाजाच्या वतीने आज कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा, दवाखाने, मेडिकल सोडून इतर सर्व व्यवहार बंद राहतील.
सभागृहात आज संध्याकाळी मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आज SIT ची स्थापना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एसआयटीसंदर्भात फोनवरून चर्चा झाली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुंबई पोलिसांनी लेखी स्वरुपात आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर – विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
जस्टीस लोया यांच्या आत्महत्येची SIT चौकशी व्हावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
बीएमसीचं ऑडिट करा, म्हटल्यावर एवढं झोंबण्याचं कारण नाही अशा शब्दांत उदय सामंत यांनी ठाकरे गटाला सुनावलं. ऑडिटसाठी सरकारकडून तीन सदस्यीय समिती देखील गठित करण्यात आली आहे. पुढील अधिवेशनात समितीचा अहवाल सादर केला जाईल.
दिशा सालियान आत्महत्याप्रकरणी आजच SIT ची स्थापना होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. SIT स्थापन करण्याचे राज्य सरकारचे लेखी आदेश आहेत.
राजकीय विरोधकांबाबत खोटा भ्रम निर्माण करण्याचं काम सुरू आहे . सरकार हे विरोधकांवर SIT लावण्यातच व्यस्त आहे, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.
कुणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही, किती वर्ष SIT करणार ? 2024 साली सरकार बदलणार अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान मोदींविषयी मनात आदर आहे. त्यांच्यावर जी टीका होते ती राजकीय असते, वैयक्तिक स्वरूपाची नव्हे, असे संजय राऊत म्हणाले.
अमित शहांनी नेहरूंवर टीका केली म्हणून गुन्हा दाखल करणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थत केला.
उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी सरकारचा नवा डाव आहे का ? असा सवाल आता विचारला जात आहे. कारण मुंबई महानगरपालिकेचं मागील 25 वर्षांचं ऑडिट करण्यात येणार आहे.
ऑडिटसाठी सरकारकडून तीन सदस्यीय समिती देखील गठित करण्यात आली आहे. पुढील अधिवेशनात समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
ज्या समजला माय बाप मानलं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं की, त्यांनी मला लेकरू मानलंय… आरक्षणासाठी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत… एक जीव जाईल पण, 6 कोटी जीव वाचतील… लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
राज्य सरकार कुठेही आणि कुणाच्याही प्रेशरमध्ये काम करत नाही… अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या आध्यक्षांची निवड लवकरच होईल. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा…
प्रकृती ठिक नसली तरी, नियोजित कार्यक्रमाला जाणार… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा समाजाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. स्वतःच्या लेकरांसाठी मराठा समाज एकत्र आला आला… एका नेत्याच्या दबावाखाली सरकार येतंय का? असा प्रश्न देखील यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
राममंदिर उद्ध्वस्त व्हावं हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत, असं कालिचरण महाराज म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरच्या बनेश्वर मंदिरात कालीचरण महाराजांच्या हस्ते महाभस्मारती आणि सहस्त्र जलधारा अभिषेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता…न्यायालयाच्या आदेशानंतर जयाप्रदा यांना होणार अटक, जयाप्रदा यांच्या जामीनदारांना देखील ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस.. वाचा सविस्तर…
मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज 12 वा आणि शेवटचा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने जरांगे पाटील यांना अंबेजोगाई येथील थोरात मल्टी स्पेशालिटीमध्ये उपचार सुरू आहेत. तब्येत खालावल्याने तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तब्येत खालावली असली तरी जरांगे पाटील आजचा शेवटचा दौरा करणार आहेत. आज त्यांची बीड जिल्ह्यातील बोरी सावरगाव, धारूर, हरकी निमगाव येथील माऊली फाटा येथे पार पडणार मराठा संवाद सभा असणार आहे.
मुंबईतील सात सार्वजनिक प्रकल्पाची महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पाहणी करणार आहे. पाहणीत मेट्रो, बुलेट, सागरी किनारा मार्ग, ट्रान्स हार्बर, वर्सोवा – वांद्रे सागरी सेतू आणि मधुपार्क मार्ग या प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्प हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याच्या वृत्ताची दखल घेत पाहणी करून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
माजी खासदार देविदास पिंगळे यांनी नाशिकमध्ये शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देविदास पिंगळे हे सध्या अजित पवार गटात आहेत. फक्त शुभेच्छा दिल्या, राजकीय चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया देविदास पिंगळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
पीएमपीबरोबर एसटी महामंडळानेही ऑनलाइन तिकिटाची सुविधा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध आहे. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशांसाठी होणारी कटकट मिटली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 पर्यंत मुंबई, पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याला येणाऱ्या लेनवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव हद्दीत 2 लेग सर्विसेबल ग्रंट्री बसवण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे ९७.५१ टक्के इतके होते. गतवर्षीच्या तुलनेत ६० टीएमसी कमी आहे. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत फक्त १३३.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
नवी मुंबईच्या बाजार समितीत सणाच्या दरात घट झाली आहे. लसणाची आवक वाढली आहे. मंगळवारी १५१ टन लसणाची आवक झाली आहे. यामुळे बाजारभाव ११० ते १८० रुपयांवरून १०० ते १५० रुपयांवर आले आहेत.
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाज्यांचे नुकसान झाल्यामुळे आवक कमी झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दूधी भोपळा, फ्लॉवर, मिरचीसह पालेभाज्यांच्या दारात वाढ झाली आहे.