Maharashtra Breaking News LIVE updates : मराठी साहित्य क्षेत्रासाठी आनंदाची बातमी

| Updated on: Dec 15, 2023 | 7:21 AM

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 14 डिसेंबर... राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासंदर्भातील प्रत्येक घडामोडी... विरोधकांचे आरोप अन् सत्ताधाऱ्यांची उत्तरं... अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE updates : मराठी साहित्य क्षेत्रासाठी आनंदाची बातमी
Follow us on

मुंबई | 14 डिसेंबर 2023 : संसदेवर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर संसदेतील प्रेक्षक पासवर निर्बंध आणले. या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना राज्य सरकार कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात आज घोषणा झाली नाही तर संप करण्यात येणार आहे. तसेच अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहे. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. पुणे लोकसभा निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक होणार का? किंवा आयोग सर्वोच्च न्यायालयात जाईल, याकडे लक्ष लागले आहे. राज्यभरातील रुग्णालयांच्या परिचारिका 14 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा  ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Dec 2023 07:54 PM (IST)

    राहुल शेवाळे यांनी कुटुंबासह घेतली पंतप्रधान मोदींची भेट

    नवी दिल्ली : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पत्नी आणि दोन्ही मुलांसह राहुल शेवाळे यांनी आज मोदींची भेट घेतली.

  • 14 Dec 2023 06:55 PM (IST)

    मथुरा वाद दशकांपूर्वी सोडवला गेला: ओवैसी

    मथुरेच्या शाही ईदगाहचे सर्वेक्षण करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया आली आहे. ओवेसी म्हणाले की, मथुरेतील वाद मस्जिद समिती आणि मंदिर ट्रस्टमध्ये दशकांपूर्वी परस्पर संमतीने सोडवण्यात आला होता. एक नवीन गट आहे जो पुन्हा हे वाद वाढवत आहे.


  • 14 Dec 2023 06:45 PM (IST)

    खासदार डेरेक ओब्रायन यांच्या निलंबनाचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे

    खासदार डेरेक ओब्रायन यांचे प्रकरण राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले आहे. चौकशीनंतर समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करेल. निलंबित झाल्यानंतरही डेरेक राज्यसभेतून बाहेर पडत नव्हते. तसेच सभापतींचंही ऐकत नव्हते. सभापतींनी डेरेक यांना निलंबित केल्यानंतर त्यांनी सभागृहाबाहेर जावे, जेणेकरून सभागृहाचे कामकाज सुरू राहावे, अशी विनंती केली. यानंतर राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

  • 14 Dec 2023 06:32 PM (IST)

    वाराणसीतील नितीश कुमारांची सभा होणार की नाही?

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वाराणसीमध्ये २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित रॅलीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. जेडीयूने रॅलीसाठी जगतपूर इंटर कॉलेज मैदान निवडले होते. यूपी सरकारच्या दबावाखाली कॉलेज व्यवस्थापनाने मैदान देण्यास नकार दिल्याचा आरोप बिहार सरकारचे मंत्री श्रवण कुमार यांनी केला आहे. जेडीयू आता दुसऱ्या पर्यायावर विचार करत आहे.

  • 14 Dec 2023 06:25 PM (IST)

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केला स्फोट, एक बीएसएफ जवान शहीद

    छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला, ज्यात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

  • 14 Dec 2023 06:10 PM (IST)

    भाजप कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोझर

    भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्याचा हात कापणारा आरोपी फारुख रैन उर्फ ​​मिन्नी याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कुणाच्या घरावर बुलडोझरची कारवाई झाली आहे. आरोपी फारुख रैनवर भाजप कार्यकर्त्याचा हात कापल्याचा आरोप आहे.

  • 14 Dec 2023 05:26 PM (IST)

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड कोटींचे वाढीव अनुदान : सूत्र

    नागपूर | मराठी साहित्य क्षेत्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आता 50 लाखांऐवजी 2 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. आज कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. संमेलनाचे अनुदान वाढवा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. त्यामुळे आता या प्रस्तावाकडे साहित्य क्षेत्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • 14 Dec 2023 05:07 PM (IST)

    सायबर क्राईम सारख्या गुन्ह्यांसाठी सरकार धोरणात्मक योजना आखणार?

    नागपूर | सध्या डीपफेक हा प्रकार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डीपफेक व्हिडिओ टेक्नॉलॉजी म्हणजे आपला चेहरा वापरून हुबेहुब आणि तंतोतंत असा डुप्लिकेट तयार करून चुकीच्या पध्दतीने बनवला गेलेला व्हीडिओ असतो. भविष्यात डीपफेक तसेच सायबर क्राईम सारख्या गुन्ह्यांच्या संदर्भात सरकार धोरणात्मक योजना आखणार का? असा सवाल मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत उपस्थित केला.

  • 14 Dec 2023 04:57 PM (IST)

    ब्राम्हण समाजासाठी परशूराम विकास महामंडळ, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    नागपूर : सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या धर्तीवर राज्यातील ब्राम्हण समाजासाठी परशूराम विकास महामंडळ स्थापन करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्राम्हण समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. सविस्तर प्रस्ताव तयार करून कॅबिनेटला प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले.

  • 14 Dec 2023 04:44 PM (IST)

    बारसूच्या आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, ठाकरे गटाचे फडणवीस यांना निवेदन

    नागपूर : बारसू रिफायनरी प्रकल्पात मातीपरीक्षण विरोधात आंदोलन करणाऱ्या ३०० पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे गटाने भेटून निवेदन दिले. सभागृहात सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आला होता.

  • 14 Dec 2023 04:30 PM (IST)

    सभागृहात इतर कोणतेही कामकाज हाती घेऊ नये, मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी

    नवी दिल्ली : संसदेत घडलेल्या प्रकाराबाबत राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेच्या सुरक्षेचा भंग ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता संसदेतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत केली आहे. गृहमंत्री या विषयावर निवेदन करेपर्यंत आणि त्यानंतर नियम 267 अंतर्गत चर्चा होईपर्यंत सभागृहात इतर कोणतेही कामकाज हाती घेऊ नये अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पत्रातून केली आहे.

  • 14 Dec 2023 04:20 PM (IST)

    प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासातील भ्रष्टाचाराचा मुद्दा, मनसे आक्रमक

    मुंबई : आदेश बांदेकर यांच्या काळात सिद्धिविनायक मंदिर येथील पुस्तक पेढीत गैरव्यवहार झाला. नियमबाह्य पद्धतीने पुस्तकांचे वाटप विविध संस्थांना करण्यात आले. त्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेने केलाय. अधिवेशन काळात हा मुद्दा आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्यात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितले. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि आदेश बांदेकर यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे कारवाई होत नाही. असा आरोप मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला.

  • 14 Dec 2023 04:10 PM (IST)

    जुनी पेन्शन लागू करा, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट

    अकोला : राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शासन जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय. त्यामुळे कार्यालय परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

  • 14 Dec 2023 04:04 PM (IST)

    संसद घुसखोरी प्रकरणी 14 खासदार निलंबित, लोकसभा अध्यक्ष यांची मोठी कारवाई

    नवी दिल्ली : संसद घुसखोरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तसेच, सभागृहात गदारोळ माजवल्याप्रकरणी एकूण 14 खासदार निलंबीत करण्यात आले आहेत.

  • 14 Dec 2023 04:02 PM (IST)

    डंकी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉलिवूडचा किंग साईंच्या दर्शनाला

    शिर्डी : डंकी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉलिवूडचा किंग साईंच्या दर्शनासाठी आला आहे. वैष्णव देवी दर्शनानंतर शाहरुख शिर्डीत आला आहे. नवी मुंबईहून खाजगी विमानाने शाहरुख खान शिर्डीत पोहोचला. शाहरुख शिर्डी विमानतळाहुन साई मंदिराकडे रवाना. सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणाऱ्या साईबाबा समाधीचे थोड्याच वेळात घेणार दर्शन. येत्या 21 तारखेला डंकी चित्रपट होणार प्रदर्शित. अभिनेता शाहरुख खानसह विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी या चित्रपटात दिसणार आहे.

  • 14 Dec 2023 03:58 PM (IST)

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिल्लीकरांसाठी पुन्हा नव्या इलेक्ट्रिक बसेस

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिल्लीकरांसाठी पुन्हा नव्या इलेक्ट्रिक बसेसची भेट. राजधानी दिल्लीत 500 नव्या इलेक्ट्रिक बसेस रस्त्यांवर धावणार. नव्या बसेसचं आज करण्यात आल उद्घाटन. यापुढे देशात सर्वात जास्त बसेस राजधानी दिल्लीत धावणार आहेत. 1300 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यांवर धावणार आहेत. 2025 पर्यंत 8000 इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटले आहे.

  • 14 Dec 2023 03:31 PM (IST)

    मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून तुफान हाणामारी

    अहमदनगर : प्रसिद्ध मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून तुफान हाणामारी. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलण्यात आलेल्या सभेमध्ये लाठ्या काठ्यानी हाणामारी. तीन ते चार जण जखमी झाल असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाथर्डी पोलिसांकडून  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू.

  • 14 Dec 2023 03:13 PM (IST)

    सांगली जिल्ह्यातील हमाल-माथाडी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

    राज्य सरकारकडून हमाल- माथाडी कामगारांच्यासाठी मंजूर करण्यात आलेलं सुधारित विधेयक तातडीने रद्द करावं यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील हमाल-माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

  • 14 Dec 2023 02:55 PM (IST)

    दुष्काळाची पाहणी न करता पथक चाळीसगावकडे रवाना

    केंद्रीय दुष्काळ समितीचे पहाणी पथक धुळ्यात पोहोचलं आहे. दुष्काळाची पाहणी न करता पथक चाळीसगावकडे रवाना झालं. पथकातील दोन अधिकारी रात्री उशिरा धुळ्यात आलेत. शिंदखेडा तालुक्याची पाहणी करणार होते. धुळ्यातील शिंदखेडा तालुका दुष्काळ म्हणून करण्यात आला आहे.

  • 14 Dec 2023 02:45 PM (IST)

    तृणमुल काँग्रेसचे खासदार ओबेरायन यांचं निलंबन

    संसद घुसखोरी प्रकरणानंतर राज्यसभेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्या गदारोळात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत तृणमुल काँग्रेसचे खासदार ओबेरायन यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

  • 14 Dec 2023 02:35 PM (IST)

    लोकसभेत पुन्हा एकदा विरोधी पक्षांचा गदारोळ

    लोकसभेत पुन्हा एकदा विरोधी पक्षांचा गदारोळ घातल आहे. या गदारोळा नंतर दुपारी तीन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्याता आलं आहे.

  • 14 Dec 2023 02:20 PM (IST)

    इंडिया आघाडीची बैठक राजधानी नवी दिल्लीत 19 तारखेला बैठक

    इंडिया आघाडीची बैठक राजधानी नवी दिल्लीत 19 तारखेला अशोका हॉटेलमध्ये दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. 20 डिसेंबरला सकाळी 11 वाजता संसद भवनात ममता बॅनर्जी भेट घेणार असल्याची माहिती समजत आहे. बैठकीला नितीश कुमार एम के स्टॅलिन, उद्धव ठाकरे शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

  • 14 Dec 2023 02:10 PM (IST)

    जुन्या पेन्शनबाबत विधान परिषदेत चर्चा

    लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी हप्ता भरावा. हप्ता भरल्याने खूप गोष्टी मार्गी लागतील, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

  • 14 Dec 2023 01:50 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 100 टक्के यशस्वी – मिलिंद सरदेशमुख

    सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 100 टक्के यशस्वी झाला आहे. सरकारी कार्यालय, रुग्णालयामध्ये १०० टक्के शुकशुकाट आहे असे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी म्हटले आहे.

  • 14 Dec 2023 01:35 PM (IST)

    मंत्रालयाच्या बाहेर सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

    जुन्या पेन्शन योजना सह 18 विविध मागण्यांसाठी मंत्रालयाच्या गार्डन गेटवर सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

  • 14 Dec 2023 01:19 PM (IST)

    धुळ्यात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

    धुळ्यात सकल मराठा समाजाने भाजप नेते नितेश राणे यांचा फोटो श्वानाला लावून प्रतिकात्मक आंदोलन पुकारले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्राला राणे यांनी विरोध केला होता.

     

  • 14 Dec 2023 12:59 PM (IST)

    हरिभाऊ राठोड यांचा छगन भुजबळ यांच्यावर आरोप

    छगन भुजबळ हे आगीत तेल ओतण्याचा काम करत आहेत. ते ओबीसीच्या अडून मराठा समाजाला विरोध करत आहेत. ज्या दंगली झाल्या त्या आंदोलनाचा भाग होत्या. छगन भुजबळांना नेमके काय करायचे आहे ?

  • 14 Dec 2023 12:38 PM (IST)

    गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

    आटपाडीमध्ये ओबीसींच्या मागण्यासह आमदार पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निघाला भव्य मोर्चा.  मोर्चा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

  • 14 Dec 2023 12:26 PM (IST)

    काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची मोठी मागणी

    सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली मागणी.

  • 14 Dec 2023 12:18 PM (IST)

    शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप

    शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजना सह व एकूण 18 विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज पासून संपाला सुरुवात.

  • 14 Dec 2023 12:07 PM (IST)

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

    यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई लेनवर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येत आहे.

  • 14 Dec 2023 11:59 AM (IST)

    Live Update : अमरावती जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत कामबंद आंदोलन

    अमरावती जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत कामबंद आंदोलन… अमरावती कर्मचारी आंदोलनात सहभागी… शासकीय कार्यालये पडली ओसाड… आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद, महसूल अधिकारी व शिक्षक आंदोलनात सहभागी… आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार बंद मध्ये सहभागी झाल्याने आरोग्य सेवा कोलमडन्याची शक्यता.. जुनी पेन्शन लागू होत नाही तो वर माघार नाही-कर्मचाऱ्यांची भूमिका

  • 14 Dec 2023 11:55 AM (IST)

    Live Update : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

    जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आले आहेत.

  • 14 Dec 2023 11:40 AM (IST)

    Live Update : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासाठी टोल आकाराण्याची शक्यता

    मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासाठी टोल आकाराण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टोल आकारण्यासाठी मुंबई महापालिका विचाराधीन असल्याची माहिती मिळत आहे. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे.

  • 14 Dec 2023 11:35 AM (IST)

    Live Update : पेपपफुटीला आळा घालण्यासाठी सरकार नवीन कायदा आणणार

    पेपपफुटीला आळा घालण्यासाठी सरकार नवीन कायदा आणणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कायद्यासाठी सामान्य प्रशासन विभाग तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येणार आहे. समिती अभ्यासानंतर कायदा करण्यासंदर्भात सरकारला शिफारक करणार आहे. तलाठी, शिक्षक भरतीत झालेल्या प्रकारानंतर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

     

  • 14 Dec 2023 11:25 AM (IST)

    Live Update : आम्ही सर्व खासदारांनी खबरदारी घेणे गरजेचे – राजनाथ सिंह

    आम्ही सर्व खासदारांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्यांना आम्ही पास देतो त्याबाबत काळजी घ्यायला हवी. संसदेच्या सभागृहात विरोधकांनी अराजकता निर्माण करणे हे योग्य नाही… असं वक्तव्य केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

     

  • 14 Dec 2023 11:09 AM (IST)

    Live Update : कांद्याच्या दरात घसरण सुरूच, कांदा लिलाव पाडले बंद

    कांद्याच्या दरात घसरण सुरूच… नांदगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद… नांदगाव – येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता – रोको… दुतर्फा वाहतूक ठप्प… कांद्याला सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल भाव…. नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोर मांडला ठिय्या…

  • 14 Dec 2023 10:59 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी सायकल यात्रा

    मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा करण्यात येत आहे. मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा सुरू केली आहे.बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेची सुरुवात केली.सायकलवर दोन्ही बाजूने मराठा आरक्षणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 14 Dec 2023 10:50 AM (IST)

    सत्ताधारी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक

    संसदेच्या कामकाजापूर्वी सत्ताधारी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली आहे. एकीकडे इंडिया आघाडीची बैठक होत असतानाच सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांची बैठक होत आहे. संसदेमधील कालच्या घुसखोरीवर चर्चा होणार.

  • 14 Dec 2023 10:45 AM (IST)

    आयफोन चोरीला बसेल आळा

    आयफोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी iPhone मध्ये एक दमदार फीचर जोडण्यात येणार आहे. Stolen Device Protection असे त्याचे नाव आहे. Apple कंपनी आयफोन युझर्ससाठी लवकरच iOS चे नवीन व्हर्जन घेऊन येत आहे. यामध्ये Stolen Device Protection ही सुविधा देण्यात येईल. ही सुरक्षेची दुसरी पायरी असेल. त्यामुळे आयफोन चोरीला गेला तरी, तरी त्याचा तो वापर करु शकणार नाही.

  • 14 Dec 2023 10:41 AM (IST)

    अध्यक्षांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती -जरांगे

    मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनाम देण्याची गरज नव्हती, असे मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त केले. घटनात्मक पदावरील व्यक्तीला जात नसते. या पदावरील व्यक्तीने न्यायाने वागणे अपेक्षित असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. सारथीच्या रखडलेल्या नियुक्त्या देण्याची मागणी त्यांनी केली.

  • 14 Dec 2023 10:35 AM (IST)

    46 भरमार बंदुका पोलिसांच्या हवाली

    गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांनी केल्या 46 भरमार बंदुका पोलीस दलाच्या हवाली केल्या.पीएलजीए सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांकडून पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. डिसेंबर महिन्यात माओवाद्यांकडुन राबविल्या जाणा­या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवाद विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्व पोस्टे हद्दीतील नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या एकुण 46 भरमार बंदूका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत. अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत होते.

  • 14 Dec 2023 10:28 AM (IST)

    फडणवीस यांच्याविरोधात समाजात असंतोष – मनोज जरांगे

    छगन भुजबळ हे विश्वासघाती माणूस असल्याचा घणाघाती आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. भुजबळ यांच्या डाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. फडणवीस यांच्याविरोधात मराठा समाजात असंतोष असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार सातत्याने भुजबळ यांची बाजू घेऊन मराठा समाजावर आरोप करत असल्याची टीका ही त्यांनी केली.

  • 14 Dec 2023 10:25 AM (IST)

    सरकारी कंपनीने केले मालामाल

    शेअर बाजारात सरकारी कंपन्या पण दमदार कामगिरी बजावताना दिसतात. कमी वेळेत जास्त परतावा देणाऱ्या शेअरच्या शोधात गुंतवणूकदार असतात. या सरकारी कंपनीने हीच कमाल केली आहे. अवघ्या 15 दिवसांत या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाईचा मौका दिला. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्ह एजेन्सीने ( IREDA) ही कमाल केली. सार्वजनिक सेवेतील या कंपनीचा शेअर 30 रुपयांहून शेअर थेट 112 रुपयांवर पोहचला. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली.

  • 14 Dec 2023 10:18 AM (IST)

    पेन्शनचा निर्णय पुढील अर्थसंकल्पापर्यंत सोडविण्यात येईल -अजित पवार

    जुन्या पेन्शनबाबत कर्मचारी संघटनांशी राज्य सरकारने काल बैठक घेतली. जुन्या पेन्शनबाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल. पेन्शनचा निर्णय पुढील अर्थसंकल्पापर्यंत सोडविण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले. आता संघटनांनी हा मुद्दा ताणून धरु नये असे आवाहन त्यांनी केले.

  • 14 Dec 2023 10:15 AM (IST)

    अंबाबाई मंदिरातील सुरक्षा अलर्ट मोडवर

    संसदेतील कालच्या घटनेनंतर कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या साहित्याची कसून तपासणी करण्यात येत आहे. तर प्रसादाचे लाडू आणि मंदिरातील दैनंदिन साहित्य तपासूनच मंदिरात आणण्यात येत आहे. संसदेमधील कालची घटना आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थान समितीने ही खबरदारी घेतली आहे. मंदिरातील सुरक्षारक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांचाही मंदिराच्या चारही गेटवर खडा पहारा देण्यात येत आहे.

  • 14 Dec 2023 10:05 AM (IST)

    सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या

    सोने-चांदीने पुन्हा एकदा आनंदवार्ता दिली आहे. वर्षाच्या सरत्या महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यापासून विचार करता, सोन्यात जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीने पण माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. दिवाळीपासून दोन्ही धातूच्या किंमती सूसाट होत्या. सोन्याने 65 हजारांच्या टप्पा ओलांडला तर चांदी 78 हजारांच्या घरात पोहचली होती. लग्नसराईत भाव एकदम वाढल्याने चिंता वाढली होती. भाव कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे

  • 14 Dec 2023 10:00 AM (IST)

    संसद घुसखोरीप्रकरणात तरुणांना न्यायालयात हजर करणार

    संसद घुसखोरी प्रकरणात सर्व संशयितांना दुपारी दोन वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे.राजधानी दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये दुपारी दोन वाजता हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बुधवारी, 13 डिसेंबर रोजी चार संशयितांनी संसद परिसरात घुसखोरी करत स्मोक क्रॅकर्सचा वापर केला आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

  • 14 Dec 2023 09:57 AM (IST)

    Maharashtra News : एमआयडीसीसाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं- रोहित पवार

    माझ्या मतदार संघात एमआयडीसी होण्याबाबत मी मुख्यमंत्र्याना पत्र दिलं आहे. राजकारण बाजूला ठेवून हा प्रश्न मार्गी लावावा असं रोहित पवार म्हणाले. निरव मोदीनी जमिनी विकत घेतल्या होत्या असा आरोप करणाऱ्यांना रोहित पवार यांनी खडेबोल सुनावले आहे. तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन या मी माझे कागदपत्र घेऊन येतो असंही ते म्हणाले.

  • 14 Dec 2023 09:49 AM (IST)

    Maharashtra News : राज्यातील परिचारीकांचा बेमुदत संप सुरू

    राज्यातील परिचारीकांचा बेमुदत संप सुरू केला आहे. छत्रपती संभाजी नगरातील घाटी रूग्णालयात आणि पुण्यातील ससून रूग्णालयात परिचारीकांनी आंदोलन सुरू केलं आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे.

  • 14 Dec 2023 09:44 AM (IST)

    Maharashtra News : जुन्या पेंशन योजनेसाठी आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

    जुन्या पेंशन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्त्यार उपसलं आहे. सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 14 Dec 2023 09:41 AM (IST)

    Mahrashtra News : मराठा समाजाचे आंदोलनं शांततेत सुरू – अंबादास दानवे

    मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेत सुरू आहे मात्र भुजबळ स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत असं अंबादास दानवे म्हणाले. एकट्या भउजबळांना कोण कशाला धमक्या देईल, जे काही होईल ते वैधानिक मार्गानेच होणार आहे असंही दानवे म्हणाले.

  • 14 Dec 2023 09:37 AM (IST)

    Maharashtra News : संसदेतील घुसखोरीचं समर्थन नाही- संजय राऊत

    संसदेत खुसखोरी करणाऱ्या तरूणांचे आम्ही समर्थन करत नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले. सुरक्षा भेदून कोणी कुठेही घुसू शकतं अशी देशाची परिस्थिती आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

  • 14 Dec 2023 09:32 AM (IST)

    Maharashtra News : महागाई बेरोजगारीमुळे तरूण संतप्त- संजय राऊत

    संसदेत दोन तरूणांनी केलेल्या स्मोक बाँब हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. देशातला तरूण जर या दिशेने जात असेल तर ही अराजकतेची सुरूवात आहे. असं राऊत म्हणाले. महागाई, बेरोजगारीमुळे तरूण संतप्त झाले असल्याचेही ते म्हणाले.

  • 14 Dec 2023 09:27 AM (IST)

    Maharashtra News : सरकारकडे कोणत्याही प्रकारची मजबूत सुरक्षा व्यवस्था नाही- संजय राऊत

    रकारकडे कोणत्याही प्रकारची मजबूत सुरक्षा व्यवस्था नाही अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे. संसदेतीत तरूण बेरोजगार असल्याचेही राऊत म्हणाले.

  • 14 Dec 2023 08:57 AM (IST)

    ऊस पीकाच्या लागवडीत हरभरा आंतरपिकांची लावणी सुरु

    पवन मावळातील मळवंडी ठुले येथे ऊस पीकाच्या लागवडीत हरभरा आंतरपिकांची लावणी सुरु झाली आहे. पवनमावळ भागात रब्बी पिकाच्या पेरणी लावणीला वेग आला आहे. ऊस पिकाच्या लागवडी चालू आहेत. ऊसाचे बेणे कांड्या करून सरी पद्धतीने लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.  त्यांनी ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हूणन हरभरा पिकांची टोकन पद्धतीने लावणी केली आहे.  एकाच वेळी दोन्ही पिकाच्या लागवडी मुळे आर्थिक फायदा होणार आहे.

  • 14 Dec 2023 08:45 AM (IST)

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेन वर हा ब्लॉक असणार आहे.  यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवरओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ कि.मी ७९/००० येथे गॅन्ट्री उभारण्याचं काम करण्यात येतंय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आज दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई लेनवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने किवळे ब्रिजवरुन जुना महामार्गाने वळविण्यात येणार आहेत. तर पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका इथून एक्सप्रेस हायवेवर मुंबई मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील.

  • 14 Dec 2023 08:30 AM (IST)

    मराठा आरक्षणावर आजही सभागृहात चर्चा होणार

    मराठा आरक्षणावर आजही सभागृहात चर्चा होणार आहे.  या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. आज मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय यावर निर्णय येण्याची शक्यता कमी आहे. जवळपास १५० आमदारांना यावर आपलं म्हणणं मांडायचं आहेत.  त्यामुळे आज आणि उद्या यावर चर्चा सुरूच राहणार आहे. सोमवारी मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री आपली भूमिका घेण्याची शक्यता आहे. उद्या आपात्कालीन सत्रात अवकाळी पावसावर सरकारकडून शेतकर्यांना खाण्यात आलेल्या मदतीचा हवाला दिला जाणार आहे. मुख्यमंत्री आज पूर्ण दिवस सभागृहात कामकाजात सहभागी होणार आहेत.

  • 14 Dec 2023 08:15 AM (IST)

    एमडी ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट

    एमडी ड्रग्ज प्रकरणातील भूषण पानपाटील आणि अभिषेक बलकवडे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्याने नाशिक पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. या दोघांचीही रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात होणार असल्याची माहिती आहे. भूषणच्या दोन सप्लायर्सचा देखील नाशिक पोलीस लवकरच ताबा घेणार आहेत.

  • 14 Dec 2023 07:59 AM (IST)

    Maharashtra News | ६८ खासगी सावकारांची लवकरच तपासणी

    रत्नागिरी जिल्ह्यातील ६८ खासगी सावकारांची लवकरच तपासणी होणार आहे. सावकारीतून होणारी पिळवणूक टाळण्यासाठी आता जिल्हा उपनिबंधक अँक्शन मोडमध्ये आले आहे. नोंदणीकृत ६८ सावकारांची तपासणी करण्याचे आदेश उपनिबंधकांनी दिले आहे.

  • 14 Dec 2023 07:52 AM (IST)

    Maharashtra News | परिचारिका आजपासून बेमुदत संपावर

    राज्यातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर जात आहे. निवृत्तिवेतन आणि निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला. संपात पुणे जिल्ह्यातील एक हजार परिचारिका सहभागी होणार आहेत.
    संपामुळे पुणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.

  • 14 Dec 2023 07:40 AM (IST)

    assembly winter session | विधिमंडळावर आज १५ मोर्चे धडकणार

    विधिमंडळावर सलग तिसऱ्या दिवशी आज चर्चा होणार आहे. तसेच विधिमंडळावर १५ मोर्चे धडकणार आहे. तसेच आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. या सर्वांचा पडसाद विधिमंडळात पडणार आहे.

  • 14 Dec 2023 07:27 AM (IST)

    parliament attack | संसद हल्ल्यातील आरोपी वर्षभरापासून संपर्कात

    संसद हल्ला प्रकरणाणीतल आरोपी 1 ते दीड वर्षांपासून फेसबुकवर एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला होता. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे हे तीन दिवसांपूर्वी दिल्लीत दाखल झाले होते.

  • 14 Dec 2023 07:14 AM (IST)

    Maharashtra News | देवदिवाळीनिमित्त १० हजार पणत्यांनी उजळले मंदिर

    सप्तरंगी दिव्यांनी सजलेले मंदिर… विविधरंगी फुलांची रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात पुणे येथील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला. मंदिर परिसरात तेलाच्या १० हजार दिव्यांची आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.