मुंबई | 16 डिसेंबर 2023 : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरु आहे. शनिवार आणि रविवारी सुटीमुळे कामकाज होणार नाही. यामुळे आज भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थिती राहणार आहे. बैठकीत 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नियोजन करुन निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पड्याकडे कर्णधारपद दिले. त्यानंतर अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड सुरु झाला आहे. मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्याचा फायदा मुंबईतील ५० हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.