Maharashtra Marathi Breaking News Live : लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण

| Updated on: Dec 20, 2023 | 7:34 AM

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 19 डिसेंबर... राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासंदर्भातील प्रत्येक घडामोडी... विरोधकांचे आरोप अन् सत्ताधाऱ्यांची उत्तरं... अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Marathi Breaking News Live : लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण
Follow us on

मुंबई | 19 डिसेंबर 2023 : राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाचा शेवटचा आठवडा नागपुरात सुरु आहे. सोमवारी मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या न्या. शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. त्यासंदर्भात आज कॅबिनेटची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधिमंडळात याबाबत मुख्यमंत्री आज बोलण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मिनी ऑक्शनसाठी आज दुबईत लिलाव होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख नवी दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट घेणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाबाबत आज बैठक होणार आहे. या अधिवेशनला चार दिवस उरले आहेत. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा  ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Dec 2023 08:11 PM (IST)

    साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली

    शिर्डी | साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती केल्यावर ग्रामस्थांनी विरोध केला होता. शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीव यांची भेट घेतली होती. मुंबईतील भेटीनंतर अचानक बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. सामान्य प्रशासनाकडून पदभार दुसऱ्याकडे सोपवून कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन अधिकारी कोण येणार? याकडे ग्रामस्थांच लक्ष लागलं आहे.

  • 19 Dec 2023 07:12 PM (IST)

    मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

    मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे. राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिन्याभरात देणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेतलं जाईल, अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.


  • 19 Dec 2023 06:54 PM (IST)

    गुजरातमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची चिंता

    राज्यात कोविडचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही रुग्ण दक्षिण भारतात गेले होते. दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

  • 19 Dec 2023 06:43 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा मोठा निर्णय, पाच सदस्यीय समिती स्थापन

    इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पाच सदस्यीय समितीमध्ये अशोक गेहलोत, सलमान खुर्शीद, भूपेश बघेल, मुकुल वासनिक आणि मोहन प्रकाश यांच्या नावांचा समावेश आहे. वासनिक यांना समन्वयक करण्यात आले आहे.

  • 19 Dec 2023 06:28 PM (IST)

    एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा यांना दिलासा

    एल्गार परिषद-माओवादी कनेक्शन प्रकरणात अटक करण्यात आलेला कार्यकर्ता गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, नवलखा यांची जामीनासाठी केलेली याचिका स्वीकारली आहे. यावर एनआयएने या आदेशाच्या अंमलबजावणीला सहा आठवड्यांसाठी स्थगिती द्यावी, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येईल. त्यावर खंडपीठाने या आदेशाला तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिली.

  • 19 Dec 2023 06:15 PM (IST)

    मेरठमध्ये भरदिवसा महिलेची गोळ्या झाडून हत्या

    मेरठ जिल्ह्यातील दौराला भागात एका मोटारसायकलस्वार तरुणाने भरदिवसा एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. सोनी (28) ही तिचा भाऊ अनुज याच्या घरातून माविमिरा गावात पायी जात असताना ती मोठ्या मंदिराजवळ आली असता मोटारसायकलवरून आलेल्या तरुणाने तिच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या सोनी यांना मोदीपुरम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • 19 Dec 2023 05:56 PM (IST)

    दोन्ही नेत्यांना डावलल्याची सोशल मीडियावर दिवसभर अफवा

    नवी दिल्ली | लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना घरी जाऊन निमंत्रण दिलं. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना दोन्ही नेत्यांना डावलल्याची चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर होती.

  • 19 Dec 2023 05:36 PM (IST)

    गौतम नवलखा यांना ऑगस्ट 2018 मध्ये यांना अटक

    मुंबई | एल्गार परिषद प्रकरणी गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
    गौतम नवलखा यांना ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, नवलखा यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळवणारे ते सातवे आरोपी आहेत.

  • 19 Dec 2023 05:11 PM (IST)

    Corona | कर्नाटक राज्य सरकारचा मोठा निर्णय

    बंगळुरु | कर्नाटक राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका पाहता सरकारने जेष्ठ नागरिकांना मास्क बंधनकारक केला आहे. केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • 19 Dec 2023 04:59 PM (IST)

    सुधाकर बडगुजर यांची चौकशी

    ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होत आहे. काल प्रकृती अस्वास्थतेमुळे बडगुजर चौकशीसाठी गैरहजर होते. आज चौथ्यांदा बडगुजर यांची चौकशी होत आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वतः चौकशी करत आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

  • 19 Dec 2023 04:55 PM (IST)

    ग्रामसेवक, सरपंच यांचा संप सुरुच

    ग्रामसेवक आणि सरपंच परिषदेने संप पुकारला आहे. या संपाचा दुसरा दिवस आहे. मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामकाज सध्या ठप्प आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची कामे यामुळे खोळंबली आहेत.

  • 19 Dec 2023 04:48 PM (IST)

    भुजबळ भांडणे लावत आहेत

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा तोंडसूख घेतले. भुजबळ मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. भुजबळ त्यांची राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंजारी, आणि धनगर समाजाला मराठ्यांविरोधात भडकविण्याचा प्रयत्न भुजबळ करत असल्याची टीका त्यांनी केली.

  • 19 Dec 2023 04:33 PM (IST)

    सरकारने आमचा अंत पाहू नये

    मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. विशेष सत्र बोलावावे, पण मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. पण किती दिवस सरकार झुलवत ठेवणार, त्यामुळे समाजाला दिशा ठरवावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  आई ओबीसी असले तर ती जात मुलांना लावा. मराठवाडा-विदर्भातील मराठे एकच असल्याचे ते म्हणाले. आरक्षण न दिल्यास 24 डिसेंबर रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, यावर ते ठाम आहेत.

  • 19 Dec 2023 04:26 PM (IST)

    तर आम्ही सरकारचं ऐकणार नाही

    24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेतला नाही तर, त्यानंतर आम्ही सरकारचं ऐकणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सरकारला वेळ वाढवून देणार नाही. आरक्षण न दिल्यास 24 डिसेंबर रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 19 Dec 2023 04:18 PM (IST)

    पंतप्रधानांना वाटते विरोधकांनी प्रश्न विचारू नये

    पंतप्रधानाना वाटत का की विरोधकांनी प्रश्नच विचारू नये. म्हणजे प्रश्न विचारणं हे चूक आहे का? मूळ मुद्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सभागृहात चर्चा केली जात नाही, अशी घणाघाती टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडले आहे. संसदेतील घुसखोरीचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन की बात ऐवजी फक्त मन की बात करायची आहे, असा टोला त्यांनी हाणला.

  • 19 Dec 2023 04:10 PM (IST)

    दिंडोशी पोलिसांनी चोरीच्या 5 लक्जरी कारसह आरोपींना केली अटक

    मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी लक्जरी गाड्या चोरणाऱ्या, चेसी नंबर बदलून डुप्लिकेट कागदपत्रे बनवून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे… पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या ५ लक्जरी गाड्या जप्त केल्या असून, ज्याची किंमत सुमारे कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही टोळी चोरीच्या गाड्यांची डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    वसीम अल्ताफ पठाण असे अटक करण्यात आलेल्या पहिल्या आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.

  • 19 Dec 2023 04:04 PM (IST)

    अनाथ मुलांना मिळावा हक्काचा निवारा

    अनाथ मुलांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी आमदार बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केला. सिडकोच्या धरतीवर अनाथ मुलांना १८ वर्षानंतर घर मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यासोबतच त्यांच्यासाठी एक नवीन योजना आणली पाहिजे ज्यात जेव्हा ते १८ वर्षाचे होतील त्यानंतर त्यांच्या हाती एक रकमी पाच लाख रुपये भेटतील अशी व्यवस्था करायला हवी, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

  • 19 Dec 2023 03:54 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरवात, दिग्गज नेते हजर

    नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या नवी दिल्ली येथील बैठकीसाठी दिग्गज नेते हजर झाले आहेत. सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बनर्जी, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे, लालूप्रसाद यादव आदि नेते या बैठकीसाठी दिल्लीत हजर झाले आहेत.

  • 19 Dec 2023 03:50 PM (IST)

    विरोधकांची मानसिकता औरंगजेबची आहे, अयोध्या येथील संतांची टीका

    अमरावती : न्यायालय आधी पण होते आणि आज पण आहे. न्यायालयाने आदेश दिला म्हणून राम मंदिर झालं नाही. तीन राज्याचे निकाल आले आहे. जो राम का नही हो कीसी काम का नही. विरोधकांची मानसिकता औरंगजेबची आहे. म्हणूनच हनुमान चालीसा वाचली म्हणून नवनीत राणा यांना जेल झाली, अशी टीका अयोध्या येथील संतांनी केली.

  • 19 Dec 2023 03:44 PM (IST)

    जन की बात ऐवजी फक्त मन की बात करायची, खासदार अमोल कोल्हे यांची टीका

    नवी दिल्ली : आज कांद्यावर निर्यात बंदी केली आहे शेतकऱ्यांच कंबरडे मोडलं आहे. त्यावर सरकारला चर्चा करायची नाही. सरकारला कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायची नाही. आणीबाणी फक्त ऐकला होता मात्र आज ती अनुभवली. पंतप्रधानाना वाटते की विरोधकांनी प्रश्नच विचारू नये. म्हणजे प्रश्न विचारणं हे चूक आहे का? जन की बात ऐवजी फक्त मन की बात करायची आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

  • 19 Dec 2023 03:41 PM (IST)

    सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

    नागपूर : विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मात्र, यात काहीच खास निघालं नाही. त्यामुळं आम्ही सभागृहाबाहेर पडलो. या सरकारने दुष्काळ आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही. फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं आहे. एकनाथ खडसे सारख्या जेष्ठ सदस्याला बोलू दिलं जात नाही हे दुदैवी आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

  • 19 Dec 2023 03:27 PM (IST)

    अनाथ मुलांबाबत आमदार बच्चू कडू यांची सरकारकडे महत्वाची मागणी

    नागपूर : सिडकोच्या धर्तीवर राज्यातील सर्व अनाथ मुलांना १८ वर्षानंतर घर मिळाली पाहिजे. त्यासोबतच त्यांच्यासाठी एक नवीन योजना आणली पाहिजे. ज्यात जेव्हा ते १८ वर्षाचे होतील तेव्हा त्यांच्या हाती एक रकमी पाच लाख रुपये मिळावे अशी व्यवस्था करायला हवीअशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत राज्यसरकारकडे केली. यामुळे ते त्यांच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्वतःला समाविष्ट करून घेऊ शकतात असे ते म्हणाले.

  • 19 Dec 2023 03:21 PM (IST)

    मंत्र्यांचे नाराजी नाट्य चांगलेच रंगले, नागरिकांनी त्यांना चांगलेच झापले

    जळगाव : रेल्वे उड्डाणपुलाच्या आमंत्रण पत्रिकेत तसेच कोनशिलेवर नाव नसल्यामुळे मंत्र्यांचे नाराजी नाट्य चांगलेच रंगले. लोकार्पण सोहळ्याला 24 तास उलटत नाही तोच कोणशिलेची तोडफोड करण्यात आली. यावरून नागरिक संतापले आहेत. तोडफोड करण्यापर्यंतचा प्रकार निश्चितच चुकीचा आहे. मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांनी सामंजस्यपणा दाखवायला हवा होता अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 19 Dec 2023 03:12 PM (IST)

    रस्त्यांच्या प्रगतीची माहिती आता पोर्टलवर, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

    नागपूर : राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येत आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली. जानेवारी महिन्यात हे पोर्टल सुरू होणार आहे. या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असेही त्यांनी सांगितले.

  • 19 Dec 2023 03:06 PM (IST)

    १४१ खासदारांचं निलंबन ही घटना हुकूमशाहीची, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

    नागपूर : १४१ खासदारांचं निलंबन ही घटना हुकूमशाहीची आहे. हे योग्य नाही. संसदेत घुसखोरी करण्यासंदर्भात चर्चा व्हावी ही मागणी सदस्यांची होती त्यात चुकीच काय आहे? विरोधकांचं काम असतं विरोध करणे, आवाज उठवणे. यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन करणं योग्य नाही. माझ्या राजकीय जीवनात मी असे पहिल्यांदा पाहिलंय अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केलीय.

  • 19 Dec 2023 03:01 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

    नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. दिल्लीतल्या हॉटेल अशोका मध्ये ही बैठक होत आहे.

  • 19 Dec 2023 03:01 PM (IST)

    उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात महत्वाची बैठक सुरु, शरद पवार ही पोहोचणार

    नवी दिल्ली : इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित आहेत. दिल्लीतील हॉटेल अशोका येथे ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी राष्ट्र्वादिचे शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही वेळातच पोहोचणार आहेत.

  • 19 Dec 2023 02:26 PM (IST)

    उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यातील बैठक संपली

    उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरु असलेली बैठक संपली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते दिल्लीत पोहोचले आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यात ही बैठक झाली.

  • 19 Dec 2023 02:23 PM (IST)

    साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं युवकाला पडलं महागात.

    साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं युवकाला महागात पडले आहे. व्हिडिओ Instragram वर शेअर केल्यानंतर प्रकार समोर आला. साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी असताना मुंबईच्या रील स्टारने उडवला ड्रोन. शिर्डी पोलिसांकडून तात्काळ संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. मुंबई येथील देव दोडिया या व्यक्ती विरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर 1106 / 2023 कलम 188 अन्वये गुन्हा दाखल. साईमंदिर परिसरात एक किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्यास आहे बंदी.

  • 19 Dec 2023 12:56 PM (IST)

    Latest Update : TMC खासदाराने केली उपराष्ट्रपतींची चेष्टा

    TMC खासदाराने केली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची चेष्टा केली. TMC खासदाराने उपराष्ट्रपती यांच्या मनक्याच्या त्रासावरून नक्कल केली आहे. कल्याण बॅनर्जी असं खासदाराचं नाव आहे.

  • 19 Dec 2023 12:41 PM (IST)

    Corona Update Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाचे 13 नवे रूग्ण

    महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 13 रूग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 24 सक्रीय रूग्ण आहेत. काही महिन्यातील हा मोठा आकडा आहे.

  • 19 Dec 2023 12:36 PM (IST)

    Maharashtra News : मुंबई उपनगरात थंडी वाढली

    मुंंबई उपनगरात गारठा वाढला आहे. नवी मुंबई, विरार, ठाण्यामध्ये थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे.

  • 19 Dec 2023 12:29 PM (IST)

    Maharashtra News : सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्क भंगाचा प्रस्ताव

    ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांच्याकडून माझ्यावर खोटो आरोप करण्यात आले आहेत. सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्क भंगाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. भाजपचे आमदार देवयानी फरादे यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.

  • 19 Dec 2023 12:18 PM (IST)

    Maharashtra News : संभाजीनगरमधील फुलंब्रीत ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा

    संभाजीनगरमधील फुलंब्रीत ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा निघालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून फुलंब्री तहसील कार्यालयावर हा मोर्चा कढण्यात आला. मराठा समाजाची ओबीसी समाजात समावेश न करण्याची मागणी या मोर्चेकरांची आहे. या मोर्च्यात लहान मुलंही सामिल झाले आहेत.

  • 19 Dec 2023 12:13 PM (IST)

    Maharashtra News : नाशिकमध्ये भेसळयुक्त पनीर जप्त

    नाशिकच्या सिडकोमध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले आहे. अन्न प्रशासन विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.

  • 19 Dec 2023 11:59 AM (IST)

    मराठा समाज 6 कोटी असल्याचं जरांगे म्हणतात, पण.. – छगन भुजबळ

    राज्यात धर्मा-धर्मातही भांडणं सुरू आहेत. जनगणनेची मागणी केल्यास लोक कोर्टात जातात. मराठा समाज 6 कोटी असल्याचं जरांगे म्हणतात. 6 कोटी म्हणजे 50 टक्के समाज, हे खरं कसं मानायचं, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

  • 19 Dec 2023 11:50 AM (IST)

    संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

    नवी दिल्ली- लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मोठं वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे. देशातील विरोधक मोठी चूक करत आहेत. त्यांचा मार्ग चुकत आहे, असं मोदी म्हणाले. संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 19 Dec 2023 11:40 AM (IST)

    रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

    रविकांत तुपकर यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. रविकांत तुपकरसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी तुपकरांचा विधानभवनाकडे जाणारा मोर्चा रोखला आहे.

  • 19 Dec 2023 11:30 AM (IST)

    शिवराज सिंहांप्रमाणे उद्या मोदींनाही बदललं जाऊ शकतं- उद्धव ठाकरे

    शिवराज सिंहांप्रमाणे उद्या मोदींनाही बदललं जाऊ शकतं. आजच्या बैठकीत मीदेखील काही गोष्टी सुचवणार आहे. आज मी भेटीगाठी घेणार, पण मला हुडी घालायची गरज नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.

  • 19 Dec 2023 11:20 AM (IST)

    अहमदनगर : आंदोलकांकडून कालवा फोडण्याचा प्रयत्न

    अकोले, अहमदनगर : आंदोलकांकडून कालवा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर कालव्याजवळ आंदोलकांनी ठिय्या केला आहे. पालकमंत्री , खासदार आणि आमदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी आले आहेत. अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात हे आंदोलन सुरू असून कालव्यांचं सिमेंट क्रॉंक्रीटीकरण व्हावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

  • 19 Dec 2023 11:10 AM (IST)

    ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही- उद्धव ठाकरे

    ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही. बऱ्याच काळानंतर ही बैठक झाली. आमच्या कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरली नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

  • 19 Dec 2023 10:55 AM (IST)

    Live Update : शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली – तुपकर

    शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली…महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत…. असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं. सोयाबीन, कापसाला दरवाढ देण्याची मागणी करताना तुपकरांची टीका

  • 19 Dec 2023 10:41 AM (IST)

    Live Update : सरकारने भुजबळांचं ऐकून निर्णय घेऊ नये – जरांगे पाटील

    सरकारने भुजबळांचं ऐकून निर्णय घेऊ नये… भुजबळांचं ऐकाल तर 6 कोटी मराठ्यांची नाराजी ओढवून घ्याल. छगन भुजबळ राजकारणी माणूस आहे… मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

  • 19 Dec 2023 10:30 AM (IST)

    Live Update : मराठा आरक्षणासी सरकार पुढच्या महिन्यात मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता

    मराठा आरक्षणासी सरकार पुढच्या महिन्यात मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता… मागासवर्गिय आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांची माहीती…. या संदर्भात मुख्यमंत्री आज महत्वाची भूमिका मांडणार असल्याची माहीती… विषय जटील असल्याने तसेच बर्याच तांत्रीक अडचणी यात समोर येत असल्याने सरकारकडून पुढच्या महिन्यात मराठा आरक्षणासाठी विषेश अधिवेशन घेतलं जाणार अशी चर्चा

     

     

  • 19 Dec 2023 10:17 AM (IST)

    Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत. शिंदे आज विधिमंडळात मराठा आरक्षणावर बोलण्याची शक्यता आहे. शिंदेच्या आरक्षणावरील निवेदनापूर्वी दादा भेटीला आल्यानं चर्चा रंगल्या आहेत.

     

  • 19 Dec 2023 10:01 AM (IST)

    उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी असतील तर हिंदुत्वाला विरोध करण्याऱ्यांशी युती कशी ?

    शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी असतील तर हिंदुत्वाला विरोध करण्याऱ्यांशी युती कशी झाली ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. भाजप आणि नरेंद्र मोदींना घाबरून ही आघाडी झाली आहे. हिंदुत्वाला विरोध करणारे सगळे पक्ष एकत्रित आले आहेत, असे ते म्हणाले.

     

  • 19 Dec 2023 09:49 AM (IST)

    अमरावतीमध्ये आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बांधवाचं उपोषण

    अमरावतीमध्ये आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बांधवाचं उपोषण सुरू झालं आहे. कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाण पत्र देण्याची मागणी सुरू आहे.

    उपोषणकर्ते जुवार, चुनकीकर यांची प्रकृती खालावली. शासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • 19 Dec 2023 09:37 AM (IST)

    संसद परिसरात सुरक्षा दलाकडून घुसखोरीचं रिक्रिएशन

    संसद परिसरात सुरक्षा दलाकडून घुसखोरीचं रिक्रिएशन करण्यात आलं. आत्तापर्यंत तीन वेळा हे रिक्रिएशन करण्यात आलं. तसेच याप्रकरणी संसदेच्या कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी करण्यात आली.

  • 19 Dec 2023 09:31 AM (IST)

    रत्नागिरी- बारसू रिफायनरीसाठी पाईप लाईन सर्वेक्षणाचे काम ६५ टक्के पूर्ण

    बारसू रिफायनरीसाठी पाईप लाईन सर्वेक्षणाचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. कोयना अवजलाचे पाणी रिफायनरीसाठी नेण्यासंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले. १६० किलोमीटरच्या पाईप लाईनच्या जागेची पाहणी पूर्ण झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून जीओ इन्फो कंपनीकडून प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू असून १६० किलोमिटर पैकी ९० टक्के पाईप लाईन महामार्गाजवळून जाणार आहे.

  • 19 Dec 2023 08:57 AM (IST)

    नाशिकच्या गंगापूर रोडवर पुन्हा वाहतूक कोंडी

    नाशिकच्या गंगापूर रोडवर पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.  तब्बल 2 तासांपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  हॉटेल्स आणि लॉन्सच्या अनधिकृत पार्किंगचा नाशिककरांना फटका बसतोय. पालिका प्रशासन मात्र ढिम्म आहे.  त्यामुळे  वाहतूक कोंडीचा मनस्ताप नाशिककरांना रोजच सहन करावा लागतोय.

  • 19 Dec 2023 08:52 AM (IST)

    पुण्यातील शाळासाठी अनोखा उपक्रम

    पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवण्यात येणार आहे.  शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल उत्तरदायित्वाची भावना निर्माण होण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी शाळांना 45 दिवसांचा कालावधी आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

  • 19 Dec 2023 08:45 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात थंडीमध्ये अचानक वाढ

    जळगाव जिल्ह्यात थंडीमध्ये अचानक वाढ झाली आहे.  तापमानाचा पारा घसरला आहे. किमान तापमान १४ अंश ते कमाल २८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.  अचानक वाढलेल्या थंडीने जळगावकर गारठलेत.  बोचऱ्या थंडीपासून बचावासाठी नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोट्यांचा आधार घेत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी आठवडाभर जळगावकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.

  • 19 Dec 2023 08:30 AM (IST)

    नवी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक

    नवी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.  बैठकीला इंडिया आघाडीचे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. अशोक हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 वाजता हॉटलमध्ये नेते यायला सुरुवात होईल.  उद्धव ठाकरे बैठकीसाठी कालच दाखल झाले आहेत.

  • 19 Dec 2023 08:17 AM (IST)

    आरोग्य विभागाकडून पुणे शहरातील 7 बड्या हॉस्पिटल्सना नोटीस

    आरोग्य विभागाने पुणे शहरातील सात बड्या हॉस्पिटल्सना  नोटीस बजावण्यात आली आहे. नर्सिंग होम अँक्टची पायमल्ली केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे.  हॉस्पिटल्स आपल्या स्वागत कक्षात रूग्णांसाठी तक्रार नोंदवही नसल्याचं आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आलं आहे. आयसीयूत पुरेशा सुविधा नसणे, दोन बेड मधील अंतर न राखणे, अशा अनेक नियमाचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलंय.

  • 19 Dec 2023 07:58 AM (IST)

    Maharashtra News | गुगल प्ले स्टोअरमधून कर्ज देणारी अ‍ॅप हटवली

    गुगल प्ले स्टोअरमधून कर्ज देणारी अडीच हजार अ‍ॅप हटवली गेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ही माहिती दिली. यापुढे नागरिकांना लुबाडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सितारामन यांनी म्हटले आहे.

  • 19 Dec 2023 07:44 AM (IST)

    Maharashtra News | दाऊदवर विषप्रयोग केवळ अफवा

    कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याबद्दल समाजमाध्यमांवर प्रसारित झालेले वृत्त ही केवळ अफवा असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासणीत यामध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले.

  • 19 Dec 2023 07:29 AM (IST)

    Maharashtra News | कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटमुळे केंद्रांच्या राज्यांना सूचना

    करोना संसर्गाचा प्रादुर्भाव करणाऱ्या विषाणूच्या स्वरूपामध्ये परिवर्तन झाले असून भारतात ‘जेएनवन’ नावाचा उपप्रकार आढळल्याने केंद्राने राज्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. करोनासंसर्गाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. श्वसनविकारासह इतर करोनासदृश आजाराबाबत सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  • 19 Dec 2023 07:14 AM (IST)

    Maharashtra News | संसदीय दलाची महत्त्वपूर्ण बैठक

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे चार दिवस उरले आहे. यामुळे आज सकाळी संसदीय दलाची महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. संसदेच्या ग्रंथालयात सकाळी साडेनऊ वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदीय दलाच्या बैठकीत संबोधित करणार आहेत.