परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग, आजच्या पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
परभणी इथे संविधानाची विटंबना करण्यात आली, भीम सैनिक सोमंथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, बीड इथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता, पण अध्यक्षांनी हे स्थगन फेटाळले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला
“उद्या राज्यात सगळे कार्यकर्त्यांशी चर्चा करू. लोकशाहीत तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठंही वातावरण बिघडवू नका, मी सांगितलं. मंत्रिपद कोणी नाकारलं ते शोधावं लागेल. अमित शहा यांनी सांगितलं होतं नाशिकला भुजबळ उभे राहणार. सगळी तयारी झाली, सर्व लोक आले. त्यांनी आठ-पंधरा दिवसांत नाव जाहीर करायचं होतं. त्यांनी एक महिना लावला, मी माघार घेतली,” असं छगन भुजबळ म्हणाले.
“सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारहाण केली, म्हणून त्याचा मृत्यू झाला. सरकार आम्हाला सभागृहात का बोलू देत नाही? गुंडांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला बहुमत दिलंय का? बीडमध्ये संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण झाली. विरोधक बीड आणि परभणीला भेट देणार”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार आजही विधानभवनात उपस्थित नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असून ते आजही सभागृहात उपस्थित नाहीत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही अजित पवार अनुपस्थित आहेत.
‘वाल्मिक कराडला खंडणीत आरोपी केलं, हत्येच्या गुन्ह्यात का नाही? वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का? बीड, परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही. आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहोत. पुढील आठवड्यात बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“सरकारने कुठेही कुणबी नोंद सापडली तरी त्या व्यक्तीला त्याच्या तालुका ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी अंतरवाली सराटीमध्ये 25 जानेवारीला उपोषण सुरू करणार. 25 जानेवारीपूर्वी मागण्या मान्य करा. अन्यथा सरकार पश्चात्ताप करेल. 25 जानेवारीला राज्यातील मराठा समाजाने अंतरवाली सराटीमध्ये यायचं आहे. मराठा समाजाने पुन्हा आपली शक्ती दाखवायची आहे,” असं आवाहन जरांगेंनी केलंय.
जालना, अंतरवाली सराटी- मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. विधानसभा निवडणूक पार पडल्यावर पुन्हा मराठा आरक्षण आंदोलन सुरू करण्याचा जरांगे यांनी इशारा दिला होता. अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आज जरांगे आंदोलनाची दिशा आणि तारीख जाहीर करणार आहेत.
गुन्हेगाराला दोन बॉडीगार्ड कसे? वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत सवाल केला. “आमदाराला एक मग गुन्हेगाराला दोन अंगरक्षक कसे? वाल्मिक कराडचे फोन रेकॉर्ड सापडले तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. बीडचा गुन्हेगारीचा पॅटर्न संपवा. अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक व्हायला हवी. नाहीतर बीडमध्ये मोठा मोर्चा काढला जाईल”, असं क्षीरसागर म्हणाले.
परभणी- आमदार रोहित पवारांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शहरातील नवा मोंढा परिसरातील घरी त्यांनी ही भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. विधानसभेत नाना पटोले म्हणाले, “परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. चार तासांपेक्षा जास्त वेळ परभणीतला प्रकार पेटत ठेवला. चार तासांनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. “
बीड आणि परभणीतील घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
महाराष्ट्रात गुजरातमधून ईव्हीएम मशीन आणले. महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. योग्यवेळी त्याची निवड केली जाईल, काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया
नाशिक : नाशिकमध्ये उद्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक होणार आहे. या बैठकीसाठी समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समता सैनिक उपस्थितीत राहणार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने समता परिषद आक्रमक झाली आहे. उद्या सकाळी दहा वाजता नाशिकच्या जय शंकर फेस्टिवल लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके नागपूरहून माजलगावला रवाना झाले. अजित पवारांसोबत माझी भेट झाली नाही. तसेच कोणतीही चर्चा झाली नाही. अधिवेशनात फार काही महत्त्वाची कामे नव्हती, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली.
शिवसेना आमदारांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, अशा आमदारांच्या नाराजीवर या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. आज १० वाजता शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना आमदारांची बैठक होईल, अशी माहिती समोर येत आहे.
ठाणे जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यात दोन शिंदेसेनेकडे आणि एक भाजपला दिली गेली आहे. भाजपने गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन शिंदेसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे आणि नाईक यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष असून, नाईक यांनी शिंदेच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. या संघर्षाचे परिणाम ऐरोली आणि नवी मुंबईतील राजकारणावर होण्याची शक्यता आहे.
शिंदे आणि नाईक यांचे पालकमंत्रिपदावर दावा असल्याने, आगामी काळात ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू राहील.
मुख्यमंत्र्यांनी बीड आणि परभणीतील घटनांकडे लक्ष द्यावं… इतरही जण अश्रू ढाळत आहेत, पण त्यांच्या अश्रूंना कोण विचारतंय… संजय राऊतांचा महायुतील नराजवीरांन टोला…
नऊ प्रभाग समित्यांतील झोपडपट्ट्या आणि मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अंधाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या मागासवर्गीय निधीतून प्रकल्प राबवला जाणार… या प्रकल्पामुळे सुरक्षितता आणि प्रकाश व्यवस्था सुधारून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची पालिका प्रशासनाची माहिती…
आळंदीत कुत्रा चावल्याने 66 जण जखमी झालेत… लहान मुलांना देखील कुत्रा चावल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत… रविवारी 20, सोमवारी 46 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलाय… अखेर आळंदी नगरपरिषदेने लोखंडी पिंजऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद केलंय… यानिमित्ताने मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आळंदीकर करत आहेत.
खातेवाटपात कुठलाही तिढा नाही, 2 दिवसात निर्णय… भुजबळांची नाराजी हा त्यांच्या पक्षांतर्गत मुद्दा… भुजबळांच्या बाबतीत मी बोलणं योग्य नाही… मंत्रिपद न मिळाल्याने नाराद झालेल्यांची शिंगे समजूत काढतील… असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
कुटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूल राहण्याचा प्रसंग… अशी प्रतिक्रिया भाजप आमदार संजय कुटे यांनी दिली आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे कुटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली नाराजी…
अनिल पाटील यांना मंत्री पद न मिळाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. खानदेशातले एकमेव आमदार असताना आम्हाला संधी मिळायला पाहिजे होती. आम्हालाही यावेळी न्याय मिळाला पाहिजे होता. या शब्दात जळगावचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज वन नेशन, वन इलेक्शन बिल लोकसभेत सादर होणार आहे. शिवसेना खासदारांना त्यासाठी व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेचे सर्व खासदार आज संसदेत उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत समुद्रावर थंडीमुळे धुक्याची चादर. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटे सदृश परिस्थिती. मुंबईतही किमान तापमान घसरले. सकाळी-सकाळी दादर चौपाटीवर दिसत आहे. मनमोहक दृश्य. गुरुवारपर्यंत थंडीचा कडाका कायम असणार अशी हवामान विभागाची माहिती.
कुर्ल्यातील अब्दुला मेंशन येथील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची घटना. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मीटर बॉक्स असल्यामुळे नागरिकांना आत बाहेर करण्यात अडचण. घटनास्थळी अग्निशमन दल उपस्थित. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश.
सोलापुरात अज्ञात व्यक्तीने बस डेपोतील एसटी जाळली. एसटी डेपोमध्ये लावलेली शिवशाही बस पेटवून दिल्याची घटना समोर. परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कालपासून सोलापुरात तीन बसेसच्या काचा फोडल्या तर एक बस पेटवून दिली. मध्यरात्री एक ते दोन च्या सुमारास बस पेटवून देण्याची घटना घडली आहे. काल सायंकाळच्या सुमारास तीन बसेसच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. सोलापूर शहर आणि परिसरात पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालपासून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मंत्रिपदाची संधी हुकल्याने सध्या राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आज त्यांच्या गटातील आमदारांची भेट घेणार आहेत. शिवसेना आणि चिन्हावरची सुनावणी २० डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तात्पुरती तारीख लिस्ट करण्यात आली आहे. मात्र 21 तारखेपासून 1 जानेवारीपर्यंत कोर्टाला हिवाळी सुट्ट्या आहेत, जर 20 तारखेला सुनावणी झाली नाही तर थेट जानेवारी नवीन वर्षात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होताना दिसत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातवरण असल्याचे जाणवत आहे. मागील आठवडाभरापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा थंड हवेचे ठिकाण असलेल्या इगतपुरी तालुक्यात परतली असून थंडीचा जोर वाढला आहे.