पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौऱ्यावर असून उद्या ते युक्रेनला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड देशातील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. हे स्मारक दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलिश लोकांसाठी समर्पित आहे. वळिवडे, कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या छावणीने युद्धकाळात पोलिश लोकांना आश्रय दिला. दरम्यान बदलापूरमधील शाळेत दोन मुलींबरोबर झालेल्या घृणास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसाच्या शाळांना सूचना. कल्याण डोंबिवली परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, पालिकेच्या शाळा प्रमुख, मुख्याध्यापक बोलवून पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना.
एमपीएससी विद्यार्थ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने विद्यार्थ्याची तारीख बदलण्याची मागणी. कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी. आज तोडगा निघाला नाही, तर आंदोलनात सहभागी होणार, शरद पवार यांचा इशारा.
बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी शाळेत काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन चौकशी केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणी लवकरच शाळेतील शिक्षकांचीदेखील चौकशी होणार आहे.
कोल्हापूर : समरजित घाटगे यांनी भाजपपासून फारकत घेतली? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. भाजप नेते समरजित घाटगे यांनी सोशल मीडिया हॅण्डलवरून कमळ हटवलं आहे. वारसा शाहूंचा लढा सर्वसामान्यांचा असं नव वॉल लावलं आङे. महायुतीच्या मेळाव्यानंतर काही तासांतच समरजीत घाटगे यांनी सोशल मीडिया हॅण्डलवरुन कमळ हटवलं आहे. समरजीत घाटगे यांनी उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. त्यांनी या मेळाव्याआधीच कमळ हटवलं आहे. समरजीत घाटगे यांच्या पवार गटात प्रवेशाची आता केवळ औपचारिकता बाकी असल्याच्या चर्चा सुरु आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये युतीची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले की, आम्ही सर्व 90 जागांवर निवडणूक लढवू. अब्दुल्ला म्हणाले की, या आघाडीत कोणासाठीही दरवाजे बंद नाहीत.
माजी मंत्री आणि आरजेडीचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम रजक यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
लडाखमध्ये गुरुवारी एक बस खड्ड्यात पडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. लेहचे डीसी संतोष सुखदेवे म्हणाले की, दुर्बुकला पोहोचण्याच्या 3 किलोमीटर आधी हा अपघात झाला. लेहहून दुरबुकला जात असलेल्या बसमध्ये 27 लोक होते, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत.
युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्ष हा चिंतेचा विषय आहे. आमचा विश्वास आहे की युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. कोणतीही समस्या केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवली जाऊ शकते. भारत चर्चेच्या बाजूने आहे.
उन्मेष पाटील यांनी भाजपला चाळीसगावात जोरदार झटका दिला आहे. भाजपमधून अनेकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना मोठा झटका लागला आहे.
कोलकाता अत्याचार प्रकरणी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयात 5 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांविरोधात अटक, गुन्हा दाखल करणे अशा स्वरुपाची कोणतीही कारवाई करू नका, सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य सचिवांना विविध राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार विद्यार्थ्यांना टेरेसवर नेऊन त्यांना शिक्षकाने दांडक्याने मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार कराड तालुक्यातील एका खासगी शाळेत घडला आहे. या प्रकरणी सचिन नलवडे या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो शाळा संस्था चालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे.
कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.
निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांविरोधात अटक , गुन्हा दाखल करणे अशा स्वरुपाची कोणतीही कारवाई करू नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
तसेच केंद्रीय आरोग्य सचिवांना विविध राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेण्याचे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
काल मावळमधील फाशीच्या शिक्षेचा दाखला दिला , त्या घटनेतीला आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
बदलापूरमधील घटनेवरून विरोधकांचं राजकारण सुरू आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. आंदोलकांकडे लाडकी बहीण योजेनेचे बॅनर कसे आले, ? असा सवालही त्यांनी विचारला
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून समाजातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. बदलापूर येथील घटनेमुळे महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. शनिवारी सोलापुरातून महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते मोर्चा आणि बंदमध्ये सहभागी होणार .
मुंबई भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यात होणार आहे. मुंबई भाजपच्या सहा जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी विभागवार कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं जात आहे.
मागच्या निवडीवरून वाद निर्माण झाले होते हे वाद टाळण्यासाठी यावेळी कार्यकर्त्यांचे मत घेतलं जात असून त्यानंतर अहवाल तयार केला जाणार.
पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाणार .
वारंवार एमपीएससीकडून गैरप्रकारचे पाऊले का उचलली जातात ?. आंदोलनासाठी का थांबतात. आम्ही पाठींबा दिला, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वानी पाठींबा दिला, असे आदित्य ठाकरेने म्हटले आहे.
महाराष्ट्र बंद करुन जन जीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा , अशोक चव्हाण यांचा सल्ला. कोणत्याच पक्षाने राजकारण करू नये
ईडी कार्यालयावर कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा
कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना संघटना मजबूत करण्याचे दिले आदेश. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा अशा पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंच्या आदेश. संघटना मजबूत कराल तर गडचिरोलीतूनही निवडणूक लढू. निवडणुकीच्या दोन महिने आधी मी संघटना बळकट करण्यासाठी हा दौरा काढलेला आहे
कोल्हापूरच्या शिये गावातील राम नगर परिसरातील धक्कादायक घटना. संबंधित मुलगी काल दुपारपासून होती बेपत्ता
कोरोना व्हारसशी लढलो, तसा हा विकृतीचा व्हायरस आहे,. राज्यातील कानाकोपऱ्यात वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा बंद करत आहोत. त्यामागे राजकारण नाहीये. सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुली जर का सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ काय राहणार. त्यासाठी राज्याने व्यक्त होण्याची गरज आहे. राजकारण म्हणून नाही तर माता भगिनीं सुरक्षित राहिली पाहिजे. याचा भान सर्वांना हवं. त्यानंतर राजकारण येतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुण्यातील एमपीएससीच्या आंदोलनात गोंधळ झाला आहे. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत, असं रोहित पवार म्हणाले.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भरपावसात तरूणाई रस्त्यावर उतरली आहे. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली.
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ वैजापुरात मोर्चा सुरू झाला आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यावरही मोर्चा काढण्याचा तरुणांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या तरुणांना रोखलं. वैजापूर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कलम 144 लागू असल्यामुळे मोर्चा काढायला पोलिसांचा विरोध आहे.
प्रकरणातील काही गोष्टी FIR मध्ये नमूद नाहीत. पोलिसांकडून प्रकरणातील सर्व गुन्ह्यांचे कागदपत्र कोर्टात का दाखवले जात नाहीयेत? एका पीडितेचा जबाब नोंदवला, मग दुसऱ्या पीडितेचा का नाही?, असा सवाल न्यायमूर्ती चव्हाण यांनी केला.
नवी मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आले आहेत. यावर राज्यसेवेच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
यासोबतच कृषीच्या 258 जागा असून कृषीच्या पदांची परीक्षा राज्यसेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी या मुद्द्यावरदेखील चर्चा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सचिव आणि चार सदस्यांमध्ये ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात नव्या रोजगाराच्या संधी नाहीत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलनं का करावी लागत आहेत? रोजगारासाठी तरुणांना आंदोलनं करावी लागत आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
आम्हाला FIR आणि केस डायरी दाखवा, नुसतं बोलू नका. आतापर्यंत कोणती कारवाई झाली, चौकशी झाली ते सांगा, असा प्रश्न न्यायमूर्तींनी केला. पोक्सो अंतर्गत गुन्हा येतो, मग FIR दाखल का झाला नाही, असाही सवाल त्यांनी केला.
बदलापूर प्रकरणातील सुमोटो याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. बदलापूर प्रकरणात SIT स्थापन झाल्याची माहिती महाधिवक्ता सराफ यांनी दिली. एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारे कोर्टात हजर झाले आहेत. प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असल्याची आणि पीडित मुलीचा जबाब SIT ने घेतल्याची माहिती महाधिवक्ता सराफ यांनी दिली.
जळगावच्या पाचोऱ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. संजय राऊत पाचोर्यातील शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. शिवसैनिकांकडून पाचोर्यात संजय राऊत यांचे फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
कोणाला फाशी दिली, कशी दिली, कुठे दिली हे त्यांनी सांगावं. दोन महिन्यांत की चार महिन्यांत ते तरी शिंदेंनी स्पष्ट करावं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
कोल्हापूर- आज कोल्हापूरमध्ये होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला भाजप नेते समरजित घाटगे उपस्थित राहणार नाहीत. देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये येत असताना पहिल्यांदाच समरजित घाटगे अनुपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा आणि माझी लाडकी बहीण सन्मान कार्यक्रम होणार आहे. समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश जवळपास नक्की आहे. शरद पवार गटात प्रवेश करणार असल्यानेच घाटगे आज महायुतीच्या मेळाव्याला येणार नसल्याची माहिती आहे.
“कसं खोटं बोलावे हे यांच्याकडून शिकावं. खोटारडे, भ्रष्टाचाऱ्यांचा महाराष्ट्र असं हे सरकार दिसत आहे. सरकारचा मुखिया धादांत खोटं बोलत आहेत. दोन महिन्यात कोणाला फाशी दिली हे त्यांनी सांगावं. देशाला कळू द्या की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती खोटं बोलत आहे. तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि हे काही लोकांना पाठीशी घालत आहेत,” अशा शब्दांत खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे… याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे… महत्त्वाचं म्हणजे हे सगळे मित्र आहेत आणि अत्याचार करणारे तरुण हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे… दारूच्या नशेत त्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे… याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली… पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे इतर दोघांचा शोध सुरू…
छत्रपती संभाजीनगर याठिकाणी महानगपालिकेच्या इंधनाची चोरी करून स्वस्तात विक्रीचा प्रकार.. जेसीबीतून इंधन काढून ते विक्री केला जात असल्याची माहिती… महानगरपलिकेच्या वाहनांतून डिझेल विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार… महानगरपालिकेच्या गाड्यातील इंधन अवैध पद्धतीने विक्री करून काहीजण कमावतात पैसा… महानगरपालिकेला तोट्यात टाकून बिनधास्तपणे पैसे कमवण्यासाठी इंधनाची विक्री…
ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनांचा आंदोलन… काळ्या फिती लावून प्रवाशांचं मध्ये रेल्वेविरोधात आंदोलन… ठाण्याहून कर्जत, कसाऱ्यासाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी… मध्ये रेल्वेवर होणाऱ्या दिरंगाईमुळे प्रवाली आक्रमक…
एमपीएससी विद्यार्थ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु… राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने विद्यार्थ्याची तारीख बदलण्याची मागणी… कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी… आज तोडगा निघाला नाही तर आंदोलनात सहभागी होणार, शरद पवारांचा इशारा
बदलापूर घटनेवरून संजय राऊत यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा… सीएम शिंदे किंवा त्यांचा मुलगा आंदोलकांना भेटू शकला नाही… कोणत्या आरोपीला 2 महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा झाली, ते सांगा… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री संशयी आत्मा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जादूटोणा प्रेमी आहेत… शिंदेंच्या मनात दिवसभर संशयकल्लोळ सुरु असतो… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर
भंडाऱ्यात राज ठाकरेंकडून मुलींची विचारपूस
साकोलीतील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील राज ठाकरे दाखल
राज ठाकरेंनी साधला मुलींशी संवाद
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या 23 ते 26 ऑगस्ट 2024 या काळात अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या अमेरिका भेटीदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांच्यादरम्यान द्विपक्षीय बैठक होणार आहे. या दौऱ्यात, संरक्षणमंत्री अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण व्यवहार संस्थेचे अध्यक्ष जेक सुलीव्हन यांची देखील भेट घेणार आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांना मिळत असलेली वाढती गती आणि दोन्ही देशांदरम्यान विविध पातळ्यांवर संरक्षणविषयक गुंतवणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी सखोल आणि विस्तृत होईल अशी अपेक्षा आहे.
या अमेरिका भेटीदरम्यान, दोन्ही देशांदरम्यान सध्या असलेल्या तसेच भविष्यात होऊ घातलेल्या संरक्षणविषयक सहयोगासंदर्भात अमेरिकेच्या संरक्षण उद्योगांसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च-स्तरीय गोलमेज बैठकीचे आयोजन देखील केले जाणार आहे.
– सोलापुरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्चाधिकार समितीकडून 282 कोटी मंजूर
– जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मांडलेल्या संकल्पनांचे, सादरीकरण केलेल्या पर्यटन विकास आराखड्याचे विशेष कौतुक
– पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून रोजगार निर्मिती शक्य होणार
– जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन सर्किट विकसित केले जाणार
– उजनी धरणातील जल पर्यटन हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असणार
– विविध स्थळामध्ये जल, धार्मिक, कृषी, नैसर्गिक विनयार्ड पर्यटन स्थळांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद घेता येणार
– स्थानिकांचा प्रकल्पात सक्रीय सहभाग स्थानिक महिला गट, शेतकरी उत्पादक गटांचा प्रकल्पात सक्रीय सहभाग असणार
कोकणात शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वच कार्यक्रमांना भाजप नेत्यांनी दांडी
भाजपचा एकही पदाधिकारी आणि नेता कार्यक्रमाला हजर नसल्याने भाजपच्या अप्रत्यक्ष बहिष्काराची राजकीय वर्तुळात चर्चा
शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्याची खदखद युतीत कायम
रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांची देखील या कार्यक्रमाला अनुपस्थित
कदम चव्हाण वादाला मुख्यमंत्र्यांनी बगल दिल्याने महायुतीतचा कोकणातला दुरावा वाढण्याची चिन्हे
महंत रामगिरी महाराज आणि बांगलादेश येथील हिंदुंच्या समर्थनार्थ आज वैजापुरात जन आक्रोश मोर्चा. रामगिरी महाराजांवरील गुन्हे मागे घ्यावे आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी. बांगलादेश येथे हिंदुंवर होत असलेल्या अत्याचारावर सरकारने लक्ष घालावे आणि त्यांचे रक्षण करावे यासाठी मोर्चा. वैजापूर तालुक्यात कलम 144 लागू असताना देखील निघणार मोर्चा. पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती.
बदलापूर स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला. बदलापूर येथे सकाळी 7.33 मिनिटाच्या लोकल ट्रेनमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड. मात्र लगेचच रेल्वे प्रशासनाकडून त्या लोकल ट्रेनचे रॅक बदलत ट्रेन कल्याणच्या दिशेने सोडण्यात आली. या दरम्यान काही लोकल बदलापूर स्थानकावर 5 ते 10 मिनिटे थांबवण्यात आल्या होत्या. सध्या बदलापूरकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू आहेत.
महंत रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यात गुन्हे दाखल. पुण्यातील 2 पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, तर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल. जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बदलापूर प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रे यांना शिवसेना पाठीशी घालणार नाही. पत्रकाराविरुद्ध अशोभनीय भाषा वापरणाऱ्या वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पक्षाची संमती. सूत्रांची माहिती.