मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला. या बंदमध्ये लोकांचा स्वेच्छेन सहभाग घेतला आहे असा दावा मविआ नेते करत आहेत. तर आजचा बंद हा पूर्णपणे फसला आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
वसई-विरार :
– वसई-विरार नालासोपाऱ्यात बंदला दिवसभरात संमिश्र प्रतिसाद
– वसईत आक्रमक पवित्रा घेत दुकाने बंद केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीकसह 15 जणांवर गुन्हे दाखल
– दमदाटी करून दुकाने बंद करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, यासह भादवी 188, मुंबई पोलीस अॅक्ट 137 (1), 135 प्रमाणे माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांची माहिती
शिवसेना नेते संजय राऊत यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर :
लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच
शिवसेना ज्या बंदमध्ये सहभागी असते तो बंद लादावा लागत नाही
हा बंद आमच्या वैयक्तिक फायद्यासाठी पुकारला नव्हता. तुमच्याच भाजपशासित राज्यात शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने ठरवून चिरडलं. त्याचा संताप आमच्या राज्याच्या विरोधी पक्षालाही लागायला हवी
जळगाव :
जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची दादागिरी
एका आईस्क्रीम पार्लरमधून शीतपेय व खाद्यपदार्थ घेऊन पैसे न देताच पळ काढल्याचा दुकानदाराचा आरोप
दुकानदाराने पैसे मागितल्यानंतर कारमधून कार्यकर्त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न, पाठलाग करताना सुदैवाने कारखाली येण्यापासून वाचला दुकानदार, पायाला झाली गंभीर दुखापत
जळगाव शहरातील नवीपेठेत घडलाय हा संतापजनक प्रकार
पुणे :
लक्ष्मी रस्त्यावरची दूकानं उघडली,
तीननंतर दूकानं उघडणार व्यापारी महासंघानं घेतला होता निर्णय,
तीननंतर पुण्यातील दूकानं झाली सुरू,
रस्त्यावरची वाहतूक सुरळीत
“अमानवीय कृत्याचं दु:ख होणं हे माणुसकीचं दर्शन आहे. सत्येची मग्रुरी आणि सत्तेचा माज दिसतोय. गोरगरीब शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. मागणं येणारी जीप त्यांच्या अंगावर घालायची. त्यांना चिरडून मारुन टाकायचं. त्यांच्याबद्दल वाईट वाटणारच असेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शेतकरी कुठलाही असो शेवटी या देशाचा शेतकरी आहे ना? उत्तर प्रदेशात ज्या भागात ही घटना घडली त्या भागात सर्वात जास्त गहू पिकतो. तुमच्या घरामध्ये पोळ्या आहेत त्या तिथल्या वावरातून आल्या आहेत. खाताना बरोबर वाटतं ना? तुमच्या लेखी शेतकऱ्यांचं किंमत काय हेच यातून दिसून येतं”, अशी प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
महाराष्ट्र बंदला जनतेचा चांगला प्रतिसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा, भाजपचं धोरण शेतकरी विरोधी, पटोलेंची टीका
राजभवनात राज्यपाल नव्हते , आतमध्ये आम्ही आंदोलन केलं, शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायची नव्हती म्हणून राज्यपाल भवनात नव्हते. आम्ही शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेलो , कंगना राणावत , भाजप नेत्यांना राज्यपाल वेळ देतात , भाजप नेत्याची भाषा दादागिरीची आहे , बंदला सपोर्ट मिळू नये म्हणून देशमुख यांच्यावर कारवाई पुन्हा दाखवली जात आहे, असा हल्लाबोल वस्त्रोद्योग मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी केला.
महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांच्या, शेतकर्यांच्या वेदना समजून घ्यायला राज्य सरकारला वेळ नाही, पण शेजारच्या राज्यात घटना घडली तर त्याचं राजकारण करून हा बंद पुकारला गेला या बंदचा मी निषेध करतो. या बंदला जनता जुमानणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही.महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर केली.
चंद्रपूर –
दुकान बंद करण्याच्या वादावरुन राडा, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
चंद्रपुरातील बल्लारपूर ची घटना
आंदोलनकांची युवकाला मारहाण, दुकाना समोर उभा होता युवक, आंदोलक झाले आक्रमक
पोलिसांच्या सतर्कतेने युवकाची सुटका, बंद ला विरोध म्हणून शिवीगाळ केल्याचा युवकावर आरोप, पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात
सुप्रिया सुळेंना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवल नाही का ? चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना तुडवलं गेलं, काँग्रेस सरकारने बेछूट मारलं, त्यावर का बोलत नाही? हे राजकीय वक्तव्य करत आहेत, पोळी भाजत आहेत, लखीमपूर घटनेमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण भाजपपासून दूर करतील असं त्यांचं दिवास्वप्न आहे. पण शेतकऱ्यांवर खरा अन्याय यांनीच केलाय. मोदीजींनी शेतकरी सन्मान आणली, त्यांनी नाही आणली. शेतकरी यांच्यासोबत कधीही जाणार नाही, यांची पोळी भाजणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिक्षा ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा. चिरडणाऱ्यांना न्यायालय योग्य ती शिक्षा देईल. कुणीतरी गाडीखाली चिरडलं म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढं निंदनीय असेल तर त्याला समोर ठेवून असं काम होईल तर ते देखील तेवढंच निंदनीय आहे, शेतकऱ्यांना चिरडणं जेवढं निंदनीय, तेवढंच निंदनीय इतरांना निंदनीय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाविकास आघाडी प्रायोजिक आजच्या बंदमध्ये मविआ सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झाला. हे पूर्णपणे ढोंगी सरकार. लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रात बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात. हे सरकार आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजार आणि ५० हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटं आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या.
त्यांच्या घटकपक्षातील लोकही म्हणतात, पूर्वीचं भाजप सरकार मदत करत होतं, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय, ते मदत करायला तयार नाहीत. त्यामुळे आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. ही तीच मंडळी आहेत, मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का?
लखीमपूरची घटना गंभीर आहे, तिथलं सरकार त्यावर कारवाई करत आहे. आजचा बंद हा त्या घटनेला संवेदना दाखवण्यासाठी नाही, पण राजकीय पोळी भाजता येईल का, या संकुचित विचाराने केलेला बंद आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही, पण प्रशासनाची दमदाटी, पोलिसांची दमदाटी करुन, जीएसटी, यांचा वापर करुन बंद केला जात आहे.
या सरकारचं नाव बंद सरकार आहे, हे सत्तेत आल्यानंतर यांनी योजना बंद केल्या, शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश उघडा होता, महाराष्ट्र बंद केला, आमचे छोटे दुकानदार, व्यावसायिक यांचे गाडे रुळावर येत असताना सरकारने बंद केला.
धमक्या देऊन हा बंद केला जात आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोजून दहा कार्यकर्ते हायवे रोखतात आणि पोलीस तमाशा बघतात, कारवाई करत नाहीत. एकूणच सरकार स्पॉर्नर दहशतवाद सुरु आहे.
या सरकारला थोडी नैतिकता असेल तर महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादं पॅकेज घोषित करतील अन्यथा यांचा ढोंगीपण अजून उघड होईल.
Maharashtra Band : सत्ताधारीच बंद कसा पुकारु शकतात?, महाराष्ट्र बंदविरोधात वकिलाची हायकोर्टात धाव
मुंबईतील एका वकिलाने आजच्या महाराष्ट्र बंदविरोधात मुंबई हायकोर्टाच्या सरन्यायाधीशांना विनंती अर्ज केला आहे. कोर्टाने या बंदबाबत स्वत: दखल घ्यावी अशी विनंती अॅडव्होकेट अटल बिहारी दुबे यांनी हायकोर्टाला केली. सत्तेत असलेल्या सरकारची जाबाबदारी सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकराचं रक्षण करण्याची आहे. मात्र महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. म्हणून हायकोर्टाने स्वतः दखल घेत सामान्य जनतेच्या मूलभूत अधिकरांचं रक्षण करावं अशी मागणी अॅडव्होकेट अटल बिहारी दुबे यांनी मुंबई हायकोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांकडे केली आहे.
कोल्हापूर : आजचा महाराष्ट्र बंद हा पूर्णपणे फसलेला आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक का दिली, हे अनाकलनीय असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच व्यापाऱ्यांना लखीमपूर प्रकरणाची अर्धी बाजू माहितीच नसल्याचा दावाही पाटील यांनी केला.
निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहिती नाही. त्यांना या प्रकरणाची केवळ अर्धी बाजू माहित आहे. लखीमपूर घटनेत जीप घुसली, त्यामध्ये चार जण चिरडले गेले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अमानवी आहे. शेतकऱ्यांनी त्याची रिअॅक्शन म्हणून चार जणांना ठेचून मारलं, त्यानंतर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असता तर त्यालाही मारलं असतं, मी त्या खोलात जात नाही, कारण तो माझा विषय नाही. या सगळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलाला अटक झाली, आता त्याची चौकशी होईल, मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याची गरज काय होती, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची राजभवनावर धडक, मात्र 100 मीटर आधीच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना रोखलं, यूपीतील लखीमपूर खीरीत शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं मूक आंदोलन, आम्ही काँग्रेसवाले, शांतताप्रिय आहोत, आम्ही शांततेच आंदोलन करणार, आमचं मूक आंदोलन आहे, हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने होत आहे, लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील –
हा विषय प्रचंड लावून धरलेला आहे
घडलेली घटना ही दुर्दैवी आहे
जी घटना घडली त्याची चौकशी, कारवाई होऊ शकते
त्या घटनेचा भाजपशी उत्तर-प्रदेश सरकारशी, केंद्र सरकारशी काय संबंध आहे मला कळत नाही
केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने ही घटना केली असा त्यांचा आरोप आहे
त्याला अटक झालीये, चौकशी होईल, चौकशीतून काहीतरी निष्पन्न होईल
पण, त्यानंतरही हा विषय चालू ठेवणे आणि महाराष्ट्र बंदचा कॉल देणं हे न कळणारं आहे
आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला आहे
जो काही बंद आहे तो भीतीने आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की शिवसेना स्टाईल बंद करा
म्हणजे यांच्यात काहीच ताकद नाही, वारंवार मी हा मुद्दा मांडतोय उद्धवजींकडे की हे तुमच्या जीवावर हे मोठे होत आहेत
बंद करायला यांच्याकडे लोक नाहीत, यांचा धाक नाही
शिवसेने बंद केला म्हटल्यावर लोक लगेच घाबरतात
कोल्हापुरचे एक महान नेते म्हणाले, शिवसेना स्टाईल बंद करा, मग हा जो बंद झालाय थोडाफार तो मनापासून झालाय का
व्यापाऱ्यांची मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा लखीमपूरमध्ये काय घटना घडली ते म्हणतीलस माहित नाही
पुण्यामध्येही तिन्ही पक्षाचे नेते व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना जाऊन विनंती करतात की तुम्ही बंद करा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले –
लखीमपूर येथे केंद्रातल्या गृह राज्यमंत्री ज्यांच्यावर खुनाचे हायकोर्टात ट्रायल सुरुये, त्यांच्यावर नेपाळ आणि भारतात स्मगलिंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. अशा अजय मिश्रा नावाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं त्यामध्ये दुर्दैवी घटना घडली
या घटनेनंतर आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं, किडण्याप करण्यात आलं आणि कुठल्याही न्यायालयासमोर त्यांना हजर न करता ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, ज्या प्रकारे एका महिलेला भाजपने त्रास दिलातेही देशाच्या लोकांनी पाहिलं
आशिष मिश्राला अटक केली पण, त्याला कुठलाही पिसीआर न घेता न्यायालयीन कोठडीत टाकणे म्हणजे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे
त्यावर ३०२ अंतर्गत तातडीने कारवाई व्हावी, तसेच, अजय मिश्रा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढण्यात यावे ही मागणी आज काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरात केली जात आहे
महाराष्ट्र बंदचा नारा महाविकास आघाडीने लावला आहे
हुतात्मा चौकात राष्ट्रवादी पक्षाचे आंदोलन
आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी
यावेळी त्या म्हणाल्या –
लखीमपूरची घटना, देशात अनेक ठिकाणी अन्नदात्यावर अत्याचार होत आहेत त्याविरोधात हा मोठा बंद आणि त्या समर्थनात आम्ही इथे जमलो आहे
माणुसकी ही उरलीच नाही, हे दुर्दैव आहे
एके काळी राजकारणात माणुसकी जिवंत होती, जी सध्याच्या केंद्र सरकारने पूर्णपणे संपवून टाकली आहे
हा बंद पुकारला आहे, ज्या लोकांचा खून त्या मुलाने केला आहे त्या विरोधात पुकारला आहे
आजही तो व्हिडीओ पाहिला की अंगावर शहारे येतात, इतका क्रूरपमा हा तुम्ही कधीही पाहिला नसेल
त्यावर निषेध करुन संपणार नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे
केंद्र सरकारमधील नेत्यांनी राजीनामा दिला पाहिजे
ठाणे
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बंदमध्ये शेवट ठाण्यातील नौपाडा येथे सांगता केली
काही दुकाने सुरू होती ती तोडफोड करण्या आधी पोलिसांनी त्यांना थांबवले
रिक्षा स्टॅन्ड देखील बंद केला
महाराष्ट्र बंदचा फटका विद्यार्थ्यांना
लखिनपुरला शेतकऱ्यांना चिरडल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने बंद पुकारलाय
या बंदचा फटका चाकरमनी, प्रवासी यांना बसलाय
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील एडमिशनसाठी आज ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाता येत नाहीये
वांद्रे ते भायखळा तिथल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बेस्ट बंद असल्यामुळे प्रवास करु शकत नाहीये
कारण, रेल्वेने प्रवास करताना दोन डोस कोरोना व्हेक्सिनचे झाले नसल्यामुळे रेल्वेत नाही प्रवास करता येत नाहीये
त्यामुळे वांद्रे येथे रेल्वे स्थानक आणि बस डेपो स्थानकाच्या बाहेर विद्यार्थी ताटकळत आहेत
– लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या आंदोलनाला पुण्यात सुरुवात
– पुण्यातील धायरी भागात राष्ट्रवादीचे आंदोलन,
– राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पिंपरी चिंचवड
– पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद
– शहराची मुख्य बाजार पेठ असलेल्या पिंपरी कॅम्पमध्ये काही अपवाद वगळता सर्व दुकाने बंद आहेत
– कॅम्प परिसरात 10 च्या सुमाराला व्यापारी दुकाने सुरु करत असतात, मात्र आज ती बंद असल्याचे चित्र दिसले
– दुसरीकडे पोलीस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावर तैनात आहेत
वसई –
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला वसई विरार नालासोपाऱ्यात संमिश्र प्रतिसाद
वसई रोड रेल्वे स्टेशन परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करुन रस्ता रोको करण्याचा केला प्रयत्न
रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माणिकपूर पोलिसांनी घेतले ताब्यात
महाविकास आघाडीच्या बंदला वसई-विरारमध्ये संमिश्र प्रतिसाद
आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
जळगावात महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर, सर्वपक्षीय नेत्यांचे रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत आहेत, तिन्ही पक्षाकडून शहारत काढण्यात आली रॅली
महाराष्ट्राच्या बंदकडे देशाचं लक्ष, बंदला पाठिंबा नाही असं कोणी राजकीय विधानं कोणी करत असेल तर त्यांनी आपण देशाचे नागरिक आहोत का, शेतकऱ्यांचे देणं लागतो का हा प्रश्न स्वत:ला विचारावा, बंद मोडून काढू, रस्त्यावर येऊन दाखवा असं आव्हान कोणी देऊ नये. मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांना चिरडलं, थार जीपगाडीने चिरडलं, अशी कोणती गाडी मुंबईत, महाराष्ट्रात असेल तर त्याने रस्त्यावर आणावी, बंद चांगला आहे, तिन्ही पक्ष ताकदीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. किरकोळ घटना घडतात, त्या जगभरात बंदमध्ये होत असतात, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
विरोधाचे किडे वळवळत असतात, हा शेतकऱ्यांसाठी बंद आहे, शेतकऱ्याने पिकवलं नाही तर जे बस गाड्या काढा म्हणत आहेत ते उपाशी मरतील, शेतकऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा १०० टक्के होणार, षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील, देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील, असं संजय राऊत म्हणाले.
सोलापूर : भाजप आणि मोदी सरकारला हमारा कोई बिघाड नही सकता असं वाटतं, ज्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, त्या मंत्र्याने दुसरीकडे उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले, इतकं सरकार निगरगट्ट झालं आहे, सरकार देशातील लोकांचा अंत पाहत आहे, आम्ही काय काय करू शकतो ते सरकारकडून दाखवण्याचा प्रयत्न आहे, सरकारच्या मग्रूर पणाच्या विरोधात बंद पुकारला आहे, केंद्र सरकारच्याविरोधात निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन करण्यात येत आहे, असं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर दुकानं उघडायला सुरुवात, रस्त्यावरची वाहतूक सुरळीत, पूर्वीप्रमाणेच शिवाजी रस्त्यावरची परिस्थिती, काही दुकानं बंद, तर काही दुकानं सुरू
महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील पीएमपीएल बससेवा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे पुणेरकरांची गैरसोय होताना दिसतेय, कुठलीही सूचना न देता पीएमपी बसेस अचानक बंद केल्यामुळे, कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी तरी बसेस सुरू ठेवल्या पाहिजे होत्या, अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली. पीएमपीएल बसेस बंद असल्यामुळे रिक्षाचालकही जादा पैशांची मागणी करत आहेत.
उत्तर प्रदेशातील लाखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक परिसरात ठिय्या आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला . पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच, राष्ट्रवादी पदाधिकरी संदीप देसाई यांनी अटक केली तर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊ असा इशारा दिला. पोलिसांनी संदीप देसाई यांच्यासह सर्वांनाच ताब्यात घेतलं.
बीडमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बीड बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते. त्याच धर्तीवर बीड मध्ये नागरिक व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग नोंदविला आहे. सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. दरम्यान शिवसैनिक रस्त्यावर उतरत केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. शिवाय दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी दाखविण्यात आलीय.
महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र भाजप आणि मनसेने (MNS) या बंदला तीव्र विरोध केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
बेस्ट प्रशासनाची माहिती, सध्या मुंबईत तुरळक प्रमाणात बेस्ट बसेस धावत आहेत. बेस्ट प्रशासनानं पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. पोलीस संरक्षण मिळाले की बेस्ट सेवा पूर्ववत केली जाईल, आतापर्यंत ८ बेस्ट गाड्यांची तोडफोड झाली आहे, धारावी,शिवाजी नगर,देवनार, मालवणी येथे बेस्ट बसेसची तोडफोड,
नंदुरबार: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात कडक बंदोबस्त, 1100 पोलीस कर्मचारी आणि 100 अधिकारी, 400 होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची सर्वच तालुक्यात बंदची हाक, तर भाजपचा बंदला विरोध, जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील व्यवहार बंद राहणार आहेत, मात्र काही व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समितीतील कांदा आणि धान्याचे लिलाव राहणार बंद, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा, कांदा आणि धान्य लिलाव बंद असल्यामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट, यामुळे पंचवीस ते तीस कोटी रुपयांचे व्यवहार होणार ठप्प
नाशिक – बंदची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, बंदमध्ये सहभागी होण्याची गरज नाही, गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्हाला मदत करू, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांचं व्यापाऱ्यांना आवाहन, तिथल्या शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळा दाखवण्यापेक्षा, इथल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, प्रदीप पेशकर यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद, ग्रामीण भागातील दुकानं व्यापाऱ्यांनी ठेवली कडकडीत बंद. शिवसेना नेते आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या गावात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, कडकडीत बंद, औरंगाबाद जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात सारखेच चित्र
मुंबई : प्रतीक्षानगर येथील आगारात सर्व बस उभ्या, #महाराष्ट्रबंद ला प्रतिसाद
#MaharashtraBandh – मुंबई : प्रतीक्षानगर येथील आगारात सर्व बस उभ्या, #महाराष्ट्रबंद ला प्रतिसाद pic.twitter.com/ZORec8rvsm
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
सिंधुदुर्गात महाराष्ट्र बंदचा परिणाम नाही. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ या बंदमध्ये सहभागी नसल्यामुळे बाजारपेठा उघडू लागल्या आहेत. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीबरोबरच खासगी वाहतूकही सुरु आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे सर्वांना केले होते आवाहन. मात्र व्यापाऱ्यांसह सर्वांनीच या आवाहनाला दाद दिली नसल्याचं चित्र आहे
– महाविकास आधाडीच्या महाराष्ट्र बंदला नागपुरात व्यापाऱ्यांचा विरोध
– बाजारपेठा सुरु ठेवण्यावर व्यापारी संघटना ठाम
– ‘व्यापाऱ्यांची सुरक्षा राज्य सरकारची जबाबदारी’
– ‘जबरदस्तीने दुकानं बंद करु नये’
– व्यापाऱ्यांची राज्य संघटना ‘कॅमेट’चे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांची सरकारकडे मागणी
जळगाव –
महाराष्ट्र बंदचा परिणाम जळगाव भाजी मार्केटमध्ये दिसला नाही
शेतकऱ्याच्या विरोधात आघाडी सरकार आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.
बंदला नागरिकांनी फिरवली पाठ भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी दिसून आहे,
सकाळची वेळ असली तरी बंदचा प्रभाव इथे दिसत नाही
‘महाराष्ट्र बंद’मधून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ की मोदी सरकारला इशारा?; वाचा स्पेशल रिपोर्टhttps://t.co/XUo0IQ1rWY #MaharashtraBandh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
– पीएमपीएल डेपोवर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन करण्यात आले,
– स्वारगेट बस डेपो बंद करण्याचं आवाहन
– काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, दत्ता सागरे, भाऊ करपे रस्त्यावर बसून केलं आंदोलन
कोल्हापूर
कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्ड सुरळीतपणे सुरू
शेतकऱ्यांचा माल काल रात्रीच आल्याने सौदे सुरू ठेवण्याचा बाजार समितीचा निर्णय
बंदमुळे मात्र भाजीपाल्याची आवक नेहमीपेक्षा झाली कमी
– नागपूरच्या बसस्थानकावर बसेस सुरुळीत सुरु
– राज्यभरात विविध जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस सुरु
– बसस्टॅापवर प्रवाशांचीही गर्दी
– महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देता बस सेवा सुरळीत सुरु
ठाणे
भारतीय जय हिंद पार्टीचे बाळासाहेब भोसले राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन थोड्या वेळात करणार आहे
लाखीमपूर खेरी येथील झालेल्या घटने बाबत शेतकऱ्यांना आणि महाविकास आघाडीला पाठींबा….
नागपुरात महाविकास आघाडीच्या बंदला व्यापाऱ्यांचं समर्थन नाही
उत्तर प्रदेश मधील घटनेचा आम्ही निषेध करतो
मात्र आता काहीच दिवस झाले नियमित व्यापार सुरू झाला तो बंद करणे शक्य नाही
आता सणासुदीचे दिवस आहे त्या मुळे व्यापार बंद ठेवता येणार नाही
ज्यांना स्वतः हुन बंद ठेवायचा ते ठेऊ शकतात , मात्र कोणी जबरदस्ती ने व्यापार बंद करू नये
पोलिसांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे
नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ची भूमिका
– आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये पुण्यातील मार्केट यार्डही बंद राहणार,
– मार्केट यार्डमधील भाजीपाला मार्केट, भुसार मार्केट बंद राहणार,
– मार्केटमधील आडते आणि हमाल संघटना सहभागी होणार,
– एव्हीआयवरून लाईव्ह फ्रेम चेक करा
महाराष्ट्र बंदचा मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये परिणाम दिसला नाही
लखीमपूर खीरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे
पण नेहमीप्रमाणे दादरच्या भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी दिसून येत आहे,
सकाळची वेळ असली तरी बंदचा प्रभाव इथे दिसत नाही, कदाचित वेळ निघून गेल्यामुळे बंदचा प्रभाव इथेही दिसू लागेल.
सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरळीतपणे सुरू
महाविकास आघाडी सरकारने आज आहे महाराष्ट्र बंद
मात्र बंदचा कृषी उत्पन्न बाजार समितीत कसलाच परिणाम नाही
कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू