Marathi News Maharashtra Maharashtra bjp activist sloganeering against congress state pesident nana patole about his controversial statement about pm narendra modi movement in thane pune aurangabad nagpur gadchiroli nashik up
‘नाना पटोले तुमचं बेताल वक्तव्य मागे घ्या’, भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा आरोप करत भाजपने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं. नाना पटोलेंच्या विधानाचा राज्यभर निषेध करण्यात आला.
1 / 10
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा आरोप करत भाजपने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं. नाना पटोलेंच्या विधानाचा राज्यभर निषेध करण्यात आला.
2 / 10
राज्यातील विविध शहरात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आज आंदोलन छेडलं. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादपाठोपाठ गडचिरोलीत देखील भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पटोलेंचा निषेध केला.
3 / 10
ठाण्यातील भाजपकार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. पटोलेंचा तीव्र निषेध व्यक्त करत बॅनरबाजी आणि पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनर आणि प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेत असताना पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये झटापट देखील झाली.
4 / 10
पुण्यातही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात नाना पटोलेंच्या विधानाविरोधात रोष पहायला मिळाला. तिथेही जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं.
5 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपने औरंगाबादमध्ये देखील रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात झटापट सुद्धा पाहायला मिळाली.
6 / 10
नाना पटोले सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करतात, असं म्हणत गडचिरोलीच्या भाजप कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार आंदोलन केलं. शहरातील गांधी चौकात एकत्र येत पटोलेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला.
7 / 10
नाना पटोले पंतप्रधान मोदी यांना वारंवार लक्ष्य करत असल्याने काँग्रेसची मानसिकता लक्षात आल्याची भावना भाजपने व्यक्त करत ठाण्यातही आंदोलन करण्यात आलं. गावातील गुंडांना मोदी असे नाव द्या असे नाना पटोले यांचे विधान अत्यंत आक्षेपार्ह असल्याची मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
8 / 10
नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं आणि त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. 'त्यांनी मी मोदीला मारू शकतो'. असं विधान केलं जे भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलं. त्याचेच पडसाद आज पहायला मिळाले.
9 / 10
आज नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने राज्यभर केलं. राज्यभरातले भाजप कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
10 / 10
भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांचा निषेध व्यक्त केला. या आक्रोषाला नाना पटोले काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असेल.