मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज लेखाअनुदान म्हणजेच अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी मागे घेतल्यानंतर आता ते वैद्यकीय उपचार करणार आहेत. त्यानंतर राज्याचा दौरा करणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात चार मार्चला होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. त्याचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील पाणीपुरवठा केंद्रात आग लागली. त्यामुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मतदारांना पर्याय हवा आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे. आज बारामतीमध्ये 150 ते 200 कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, कार्यकर्त्यांनी दबावाला बळी पडू नये आम्ही पाठिशी असं शरद पवार म्हणाले.
मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आज शरद पवार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. मात्र भेटीनंतर काही वेळातच ते मनसेच्या मराठी भाषेच्या सही मोहिमेच्या कार्यक्रमाला उपंस्थित राहिले. पुण्याच्या राजकीय वर्तुळात आज भेटीची चर्चा झाली. मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहून मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा.
प्रत्येक सरकार म्हणताय की हे आरक्षण टिकणार आहे. मात्र गेल्यावर आमच्या मुलाचं वाटोळं होणार आहे. जर हे रद्द झाल तर आमचे मुल घरी येतील, तुम्ही मला जेल मध्ये टाकलं तरी मी समाजशी गद्दारी करणार नाही. सगेसोयरे लागू करा, खोट्या केसेस दाखल करुण आमच्यावर दबाव आणला जात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
पुण्यात उद्या बुथप्रमुख कार्यकर्ता संमेलन होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, आणि युपीचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक मार्गदर्शन करणार आहेत. उद्या संध्याकाळी पाच वाजता महालक्ष्मी लॉस येथे होणार कार्यक्रम होणार असून आगामी पुणे लोकसभा निवडणूकिसाठी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे अशी चर्चा होत आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये माननीय आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ मोठ्या दिमाखात साजरा केला गेला. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मराठी गीत गायन, निबंध कविता वाचन, स्वरचित कविता वाचन, वक्तृत्व स्पर्धा, अभिवाचन, कवि कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन ,भाषिक खेळ ,मराठी भाषेतील विनोद इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी होणार आहे. या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. आम आदमी पार्टी आजच उमेदवारांच्या नावांची घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे.
मद्य घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठवे समन्स पाठवले आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि थायलंडचे परराष्ट्र मंत्री पर्णप्री बहिधा-नुकारा यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील परस्पर संबंध आणि व्यापारी संबंधांवर चर्चा होत आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, ‘भाजप आठही जागा जिंकेल. समाजवादी पक्षातील भांडणाची पातळी काय आहे हे आज स्पष्ट झाले. देशाच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना कोणी मतदान केले असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करतो, पण समाजवादी पक्षाचे भवितव्य अंधकारमय आहे.
मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. श्याम तांबे नावाच्या गुंडास पिस्तुलासह अटक केली आहे. वरळी जिजामाता परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने ही कारवाई केली. एक गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे आरोपीकडून जप्त करण्यात आली आहेत.
शहापूर : लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा मुक्त संवाद दौरा सुरु आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर तोफ डागली. कपिल पाटील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. कपिल पाटील यांची शहापुरात सभा असल्याने गर्दी जमणार नाही म्हणून ते गौतमी पाटील यांना खास गर्दी जमवण्यासाठी घेऊन येत आहेत. जर गौतमी पाटीलमुळे लोक जमत असतील तर तर तिकीट गौतमी पाटीललाच द्या असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
मुंबई : जर वेळेवर प्रत्येक जण प्रत्येकाला भेटले असते तर आज लिफ्ट रिकामी असण्याची वेळ आली नसती. आजच बजेट हे विकासचे बजेट होते. आमच्या पक्षात तिकीट वाटपाचे सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे यांना आहेत. पण, इंडिया आघाडीने त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा. मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला.
मुंबई : सरकार तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालणार नाही हे अजित पवार यांनी काल सांगितले आहे. महागाई किती कमी होईल यांची लोकांना आस होती. पण, तसे काही झाले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजानक आहे. महाविकास आघाडीमधील जागावाटपाची चर्चा आज आणि उद्या पुर्ण होईल. आमच्याकडे सगळे ठिक ठाक आहे. पण, जागावाटपावर महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
शिरूर – शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलवली अतीतातडीची बैठक. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. २९ फेब्रुवारीला आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे बोलावली बैठक.
गणपत गायकवाड यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसाची वाढ करण्यात आली आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्या नंतर आज पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना जोपर्यंत गणपत गायकवाड यांच्या वकीलांकडून जामीनसाठी अर्ज देण्यात येणार नाही किव्हा पोलिसांकडून चार शीट दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे न्यायालयीन कोठडीत वाढ होणार असल्याची वकिलांची माहिती.
मी आई बहिणीवरून काही बोललो असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माफी मागतो आणि दिलगीरी व्यक्त करतो असं मनोज जरांगे म्हणाले.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सभागृहात सादर होत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पात ग्रामविकास विभागासाठी 9280 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गृह परिवहन बंदरे विभागाला 4,094 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. बंदर विकासाची कामं हाती घेतली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला जात आहे. राज्यात 18 लघू उद्योग संकूल स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्यात सध्या सहा वंदेभारतची वाहतूक सुरू असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. अंतरिम अर्थसंकल्पात 4 महिन्याच्या खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. राज्याला आठ हजार कोटीचा जीएसटी परतावा मिळाला आहे.
पुणे | मनसे नेते वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. वसंत मोरे यांच्या भेटीमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.
जळगाव | पारोळा तालुक्याला गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला आहे. पारोळा तालुक्यात चक्क लिंबू एवढ्या आकाराची अर्धातास गारपीट झाली. रात्री झालेल्या वादळ, गारपीट अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान हे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात शेती पिकांचे झालं. पारोळा तालुक्यातील कंकराज, महारपुर,बहादरपुर,भिलाली,रत्नपिप्रि,शेवगे,हिवरखेडा,शिसोदा आदीसह इत्यादी गावांना गारपिठीचां मोठा फटका बसला आहे. गहु, दादर, मका, ज्वारी, हरभरा हे उभी रब्बी पिक तसेच लिंबू, तसेच इतर पपई , टरबूज , हा फळवर्गीय पिके जमीनदोस्त झाली आहे.
कुस्ती कबड्डी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन. शहरात विविध ठिकाणी लागले बॅनर. भाजप युवा मोर्चाच्या वतीने स्पर्धेचा आयोजन..
नुकताच राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, मराठी नाटके जास्तीत जास्त बघावीत.
करोडो रुपयाची गांजाची शेती उध्वस्त. शिरपूर तालुक्यात दोन ते तीन एकरावर गांजाची शेती. करोडो रुपयांचा ओला सुखा गांजा जप्त. पाच ते सात फुटाची गांजाची झाडे…
इतके वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. आंदोलकांनी आमदारांची घरं जाळली, एसटी बस जाळल्या. मनोज जरांगे पाटील हे माझ्याबद्दलही वाईट बोलले. जरांगेंची भाषा राजकीय आहे. आता सगळ्याच गोष्टी बाहेर येत आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्वांनी एकमतानं आरक्षण दिलंय. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या बदलत गेल्या. मराठी आरक्षण टिकणार नाही अशी चर्चा काहींनी सुरू केली. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देताना सर्व बाबी लक्षात घेतल्या. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकारने दिलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“आमच्या आई-बहिणींच्या छातीवर गोळ्या घातल्या तेव्हा त्यांना वाईट वाटलं नाही का? 20-20 पोलीस एकेका आईबहिणीला हाणत होते, तेव्हा ते कुठे गेलेले? मराठ्यांच्या आई-बहिणी, पोरांवर हात उचलू देणार नाही. आमच्या आई-बहिणींच्या डोक्याच्या चारही बाजूला टाके आहेत. त्यांचे पाय तुटले आहेत,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.
संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी शाहू महाराज यांच्यासोबतचा फोटो इन्स्टा स्टोरी ठेवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले जागेवर अंतिम निर्णय येत असताना संभाजीराजे यांच्या स्टोरीची चर्चा रंगली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश.
जरांगेंच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार, जरांगेच्या घरी जाणारे कोण ? आधीचे मराठा मोर्चे अतिशय शांततेत झाले. पण आताच्या आंदोलनात शांतता नव्हती. जरांगेंच्या मागे कोण हे शोधावं लागेल.
जरांगे पाटील यांच्या सभेसाठी लाखो रुपये कुठून आले ? त्यांच्या स्वागतासाठी जेसीबी, ट्रॅक्टर कुठून आले ? प्रवीण दरेकर यांचा सवाल
जरांगेंच्या आंदोलनाबाबत चौकशी करा, दगडफेकीची एसआयटी चौकशी करा – विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र बेचिराख होणार होता, मी वाचवला असं जरांगे म्हणतात. धमकी देण्याची हिंमत जरांगेमध्ये कशी आली, आशिष शेलार यांचा सवाल.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं आहे. गेली शिवशाही, आली गुंडशाही – असे बॅनर्स फडकावत विरोधक हे सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत.
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला. काढणीला आलेला हरभरा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने गहू पीक जमीनदोस्त झाले आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार,अंजनगाव सुर्जी, चांदुर रेल्वे, दर्यापूर तालुक्यात हरभरा,गहू, तूर ,कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नाशिकच्या यशवंत मंडईतील पाडकामाला २४ भाडेकरू, व्यापाऱ्यांचा विरोध आहे. धोकादायक इमारत यशवंत मंडई प्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत धोकेदायक असल्याचं समोर आल्यावर पाडण्याचा निर्णय घेतला होता. इमारत पाडण्या विरोधात 24 भाडेकरुंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. स्मार्ट सिटीअंतर्गत इमारतीच्या जागेवर वाहन तळ उभारण्याचा घेतला होता.
मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सोलापुरातील शालेय विद्यार्थ्यांनी राजभाषा दिनाचे पोस्टर साकारले आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी मराठी गौरव गीताचे गायन केले. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबवण्यात आला. म. फ. दमाणी विद्यालयातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांचे पोट्रेट साकारले आहे. विद्यार्थ्यांनी विविध रंग आणि साहित्य वापरून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारा बॅनर तयार केला आहे.
पुण्यामध्ये काल एका रानडुकराने धुमाकूळ घातला. येरवड्यातील मदर तेरेसा नगर परिसरात पहाटे पाच वाजल्यापासून हे रान डुक्कर फिरत होतं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना परिसरातील सात ते आठ जणांना चावा घेतला. त्यात नागरिकांना मोठी दुखापत झाली आहे. सुमारे तीन तास या डुकराचा धुमाकूळ सुरू होता. स्थानिक कार्यकर्ते डॅनिअल लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला पकडलं आणि जंगलात सोडून दिलं.
स्वामी शांतिगीरी महाराजांच्या नेतृत्वात शिर्डीत बैठक. जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रचारकांची शिर्डीत बैठक. सात लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवणार. नाशिकमधून शांतिगीरी महाराज लढवणार निवडणूक. शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, दिंडोरी, जळगाव येथेही देणार उमेदवार. स्वामी शांतिगीरी महाराज यांची माहिती. जय बाबाजी परिवार भक्त परिवार मोठा असल्याने या सात लोकसभा मतदारसंघात कोणाची गणितं बिघडणार ?
नाशिक मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात. कार, शिवशाही बस आणि टँकर यांच्यात समोरासमोर धडक. अपघातात कुठलीही मोठी हानी नाही, मात्र कार चालक गंभीररित्या जखमी. विरुद्ध दिशेने आलेल्या कारमुळे शिवशाही आणि टँकरचाही अपघात.
चाळीसगाव तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. रात्री झालेल्या वादळ, गारपीट अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. चितेगाव, शामवाडी, बेलदारवाडी, कोदगाव, शिवापूर तांबोळे, पिंप्री, गणेशपुर, पाटणा, ओढरे, इत्यादी गावांना गारपिठीची मोठा फटका बसला आहे. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा हे रब्बी पिक जमीनदोस्त झाली आहेत.
महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आज कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता. हातकणंगलेमधून राजू शेट्टींना पाठिंबा द्यायची महविकास आघाडीची तयारी. मात्र, राजू शेट्टींकडून अपेक्षित प्रतिसाद नसल्याने आजच्या बैठकीत अन्य पर्यायावर ही विचार होणार. अन्य पर्यायामध्ये जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावावर ही होऊ शकते चर्चा.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील पानशेत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आल. छत्रपती शिवाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेल्हे पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशी आणि उबाठा गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आणि वर्षा टेंबवलकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील पाणी पुरवठा केंद्रात संयंत्राला आग लागली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये पुढील २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच याचा परिणाम पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. आता 27 फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जाणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल.