मुंबई, दि. 23 फेब्रुवारी 2024 | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे 3 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांचा आजचा जनसंवाद दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. पुणे ड्रग्स प्रकरणी दिल्लीतून अटक केलेल्या 3 आरोपीना घेऊन पुणे पोलीस पुण्यात दाखल झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल अजून वाजायचा आहे मात्र सांगली लोकसभा मतदान संघामध्ये संभाव्य उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जल्लोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई बरोबर पक्षाकडून हा आनंद व्यक्त करण्यात आला. पक्षाचे हे चिन्ह मिळणे सकारात्मक असल्याचे सांगतानाच हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणे अवघड नसल्याची भावना शहराचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केली. तुतारी चिन्ह सामन्यांचे आहे असंही ते म्हणले.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना युवासेनेतर्फे ‘युवा महाराष्ट्र’ या मेळाव्याचे आयोजन शनिवारी 24 फेब्रुवारीला करण्यात आलेले आहे. ठाण्यातील रेमंड्स ग्राउंड येथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातील युवा सेनेचे हजारो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे खुपते तिथे गुप्ते फेम सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत श्रीकांत शिंदे यांना नेमके काय खुपते याचा खुलासा होणार आहे. अवधूत गुप्ते त्यांच्या खुपते तिथे गुप्तेच्या सेगमेंटमध्ये मुलाखतीला येणाऱ्या पाहुण्यांना नेमके काय खुपते हे त्यांच्या विशेष शैलीत बाहेर काढतात. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मुलाखतीत सुद्धा अनेक गोष्टींचा खुलासा होणार असे मानले जात आहे.
बारामती | अजित पवार शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांचे उद्या तीन मेळावे पार पडणार आहेत. खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यात अजित पवारांचे कार्यकर्ता मेळावे होणार आहेत. तसेच अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या पक्ष प्रवेशही पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे संसद संस्कृत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, काशी ही सर्व ज्ञानाची राजधानी आहे. आज काशीचे सामर्थ्य आणि स्वरूप पुन्हा सुधारत आहे. काशीत हे करणारा एकमेव महादेव आहे. जिथे जिथे महादेवाचा आशीर्वाद असतो तिथे पृथ्वी समृद्ध होते.
अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात समाजवादी पक्षाचे नेते विनय शंकर तिवारी यांच्या निवासस्थानासह उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, चर्चा अद्याप अंतिम टप्प्यात आहे. जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून लवकरच त्याची घोषणा होईल, असे मला वाटते.
उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेच्या 13 रिक्त जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विधान परिषदेच्या सर्व 13 जागांसाठी 21 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून दाखवावी त्यांना 1 लाख रुपयांच बक्षीस देईल, फक्त आवाज तुतारीतुन आला पाहिजे असे चिमटा अमोल मिटकरी यांनी काढला.
पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेले आहे. हा खुप गंभीर मुद्दा आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. मनसे अवेअरनेस कॅपेन सुरु करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. जर ४ हजार कोटीच ड्रग्ज सापडत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कमी पडतायत का या प्रश्नावर हो अस उत्तर अमित ठाकरे यांनी दिले.
कल्याणमध्ये एन. आर. सी. कामगार आणि रहिवाशांनी धडक मोर्चा काढला. कंपनीच्या विरोधात कामगारांचा न्यायालयात लढा सुरू असताना पालिकेने एन. आर. सी. कॉलनी मधील रहिवासीना धोकादाय इमारत असल्याच्या नोटीस बजावल्यानंतर रहिवासी व कर्मचारी आक्रमक झाले.
कल्याण एन. आर. सी कंपनी ते पालिका अ प्रभाग कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढत कामगारांनी पालिका आणि कंपनीचा निषेध केला.
महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत 26 आणि 27 तारखेला मुंबई येथे बैठक होत आहे.कोण किती जागा लढवणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी माध्यमांना दिली.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ते नांदेड दौऱ्यावर आले आहेत. कोणीही कितीही टीका केली तर जनमताचा रेटा समजून घ्यायला हवा. नेशन ऑफ मूड काय आहे, हे समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
खासदार रक्षा खडसे यांनी रावेर मतदार संघावर दावा सांगितला आहे. मला तिकीट दिलंच पाहिजे असा हट्ट नसल्याचे त्या म्हणाल्या. मतदार संघावरुन वाद नसल्याचे मत त्यांनी मांडले. एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर आनंदच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली
जळगावात मंत्री अनिल पाटील यांनी खो खो खेळण्याचा आनंद लुटला. नाशिक विभागीय महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते खो-खो स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर मंत्री अनिल पाटील यांनाही खो खो खेळण्याचा मोह आवरला नाही.
पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐका फोन वर राजीनामा देणाऱ्या जोशी सरांकडे पाहिले की निष्ठा काय असते हे समजते. अशा शब्दात कोल्हे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.
कल्याण लोकसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साउथ स्टाईल पोस्टर लावण्यात आले आहेत. कल्याण लोकसभेतील मानपाडा विको नाका परिसरातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याबाहेर राज ठाकरे यांचं साउथ स्टाईल वीस ते पंचवीस फूट उंच पोस्टरनं साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.
नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच नांदेड एअरपोर्टवर जंगी स्वागत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये. एअरपोर्टवर अशोक चव्हाण समर्थकांसह भाजपा कार्यकर्त्यांची घोषणा बाजी.
वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी यांच्यावर
चर्नी रोड मधील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
अमित ठाकरे कुलगुरूंच्या भेटीसाठी पुणे विद्यापीठात पोहोचले आहेत. सुरेश गोसावी यांना देणार निवेदन देणार आहेत.
डोंबिवलीत राज ठाकरे यांचे 20 फुटी कटआऊट लागेल. कल्याण डोंबिवलीत मोठी बॅनरबाजी. आज संध्याकाळी राज ठाकरे कल्याण पश्चिम येणार असून भिवंडी लोकसभेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भेट घेणार आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी नांदेड एअरपोर्टवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.
सारखं लोकांना वेठीस धरणं समाजाच्या हिताचं नाही. रास्ता रोको करणं जनतेसाठी त्रासदायक ठरणार आहे. मुलांच्या परीक्षा असताना रास्ता रोको आंदोलन करू नये, असं शंभूराज देसाई मनोज जरांगे यांना म्हणाले.
मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसे मोर्चा काढणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेकडून हा मोर्चा काढण्यात येत आहे. चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मोठ्या संख्येने मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
नवी दिल्ली- चीनमधील गुप्तचर यंत्रणा तसंच तिथल्या हॅकर्सनी ‘इमिग्रेशन’संदर्भात भारताच्या तब्बल 95.2 गिगाबाईट डेटावर डल्ला मारल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील हॅकर्सकडून अनेक परदेशी सरकारे, कंपन्यांच्या माहितीची चोरी करण्यात आली आहे.
नागपूर- नागपूर मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरूच आहे. काल संध्याकाळी 5 वाजतापासून वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहे, मात्र इतर सेवा बंद आहेत. या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड मधून रुग्ण येतात.
उद्या पासून आंदोलन सुरू होत आहे.. सर्वांनी सावध राहावं. आंदोलन करताना चारही बाजूची व्हिडिओ शूटिंग काढा.. ३ मार्च रोजी जिल्ह्यात एकाच ठिकाणी ताकतीने आंदोलन करा.. असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
पुणे पोलिसांनी जप्त केलेलं ड्रग्ज पुणे पोलीस मुख्यालयात आणलं आहे. ९०० किलोच्या जवळपास हा सगळा माल आहे. पुणे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून पंचनामा केला जाणार आहे. पुणे पोलीस मुख्यालयात हे ड्रग्ज आणण्यात आलं आहे
छगन भुजबळ यांनी मनोहर जोशी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दुःखद निधन झाले ही बातमी सकाळी कळली.. शिवसेना स्थापनेपासून ते सोडेपर्यंत मी त्यांच्या सोबत काम केले… पक्षाच्या संकटकाळात आम्ही सगळे एकत्र काम केले होते… अतिशय गरीब कुटूंबातील ते व्यक्ती होते… पुढे ते व्यवसायिक झाले… गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते… असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
नगरसेवक ते महापौर आणि मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष इथपर्यंत स्वतःच्या कर्तुत्वार एक सुसंस्कृत असे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाला आणि शिवसेनेला न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे… अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यानी मनोहर जोशी यांना श्रधांजली वाहिली आहे …
मी मनोहर जोशी साहेब यांच्यासोबत 30 ते 35 वर्ष काम केलं आहे.. मी जिल्हाप्रमुख असताना तसेच मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना माझ्या पाळधी गावात ते येवून गेले आहेत… शिस्तबद्ध माणूस आणि वेळेवर चालणारा माणूस म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. अशा थोर नेत्याला महाराष्ट्रने गमवालं आहे.. त्या नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो… असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीची यांचे आज निधन झाले, गेल्या काही महिन्यापासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील अशी आम्हाला आशा होती, पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला आहे. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांच्या यांच्या पक्षांतराच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. वायकर यांनी सादर केलेल्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेले अचानक ही भुमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकिय वर्तुळात शोककळा पसरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.भाजपचे नेतेही आमच्या संपर्कात, त्यांना कल्पना नाही असं पटोले म्हणाले. सत्त्येच्या जोरावर यांना जितका खेळ खेळायचा तितका खेळू द्या नंतर आम्ही लोहाराचा एकच हातोडा मारू असं सुचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले आहे. दिर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणूकीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना महाविकास आघाडीत मतभेद झाल्याचे चित्र आहे. शरद पवार गट मुंबईतील तीन जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. इशान्य मुंबईतील या जागा शरद पवार गट लठवण्यास इच्छुक आहे.
पुणे ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पुणे ड्रग्स प्रकरणी आता संदीप धुनिया याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस. ड्रग्स प्रकरणात आता इंटरपोलची मदत घेतली जाणार. धुनिया आणि ड्रग्स प्रकरणी तपासात आता केंद्रीय यंत्रणा सहभागी होणार आहेत. तसेच एनआयए, एनसीबी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणा सुद्धा या तपासात सहभागी होतील. संदीप धुनिया पाटणा येथून नेपाळमधील काठमांडू आणि तिथून कुवैतला पळून गेल्याची संशय पुणे पोलिसांना आहे. या रॅकेट मध्ये टेरर फंडींग, अंडरवर्ल्ड आणि हवाला रॅकेट संबंधी तपास देखील केला जाणार.
मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते, पक्षाच्या कठीण काळात ते शिवसेनेसोबत होते. शिवसेना परिवार आणि ठाकरे परिवारातर्फे मनोहर जोशींना श्रद्धांजली, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना अभिवादन केलं.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांच पार्थिव त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात त्यांचं पार्थिव अंत्यदश्नासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. बांधकाम मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात फेरफार करत फसवणूक केल्याची तक्रार केडीएमसी कडून बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी या आरोपीची नावे असून राजेश बागुल नगररचना विभागात ड्राफ्ट्समन तर बहिराम हा सर्व्हे करणारा आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट प्रकरणात जप्त केलेलं एम डी ड्रग्सचा गोव्यात पुरवठा, मोठ्या प्रमाणात ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतून जप्त केलेले ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आले होते. पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदीप धूनिया हा मूळचा पंजाबचा आहे. संदीप दिल्लीतून परदेशात आणि इतरत्र ड्रग्जचा पुरवठा करत होता. या पार्श्वभूमीवर काही मुद्देमाल हा पंजाब आणि हरयाणा मध्ये पाठवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी अजित पवार आले आहे. या बैठकीला Pwd विभागाचे चीफ इंजिनियर न आल्याने अजित पवार यांनी झापले. आम्ही इथे माशा मारायला आलो आहोत का ?. बैठकीला यायला चीफ इंजिनियर यांना अडचण होते का? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, तात्काळ बोलवून घ्या असे आदेश अजित पवार यांनी दिले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता, निधी खर्च झाला नसल्याने अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता. निधी खर्च झाला नसल्याने व्यक्त केली नाराजी. पाणी पुरवठा व्यतिरिक्त अन्य कामे आचारसंहिता लागल्यावर थांबतील. प्रशासकीय मान्यता इतर मान्यता लवकर घ्या, निवडणुक आचारसंहिता पूर्वी कामे सुरु करा, पालकमंत्री यांना विश्वासात घेऊन कामे सुरु करा असं अजित पवार यांनी सांगितलं.
अमित ठाकरेंचा आज पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा. सेनापती बापट रोडवरून मोर्चा निघणार. मोर्च्यांची जोरदार तयारी. सगळीकडे मनसेचे झेंडे , पोस्टर झळकलेत. विविध मागण्यासाठी आज 12 वाजता मोर्च्याच आयोजन.
खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर. सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघात गावभेटी देणार, तर सुनेत्रा पवार बारामतीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार. काल जय पवारांनी गावभेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. तर युगेंद्र पवारांनीही शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत रणधुमाळीला सुरुवात.
पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत (पीबीए) ॲड. संतोष खामकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. अॅड. अमित गिरमे आणि अॅड. संतोष खामकर यांच्यात अध्यक्षपदासाठी दुहेरी लढत झाली. त्यात ॲड. खामकर यांनी मोठ्या फरकाने विजयी मिळविला.
मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा काही महिन्यांपासून त्रास झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला. शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. आता दुपारी 3 नंतर त्यांची अंतिम यात्रा सुरू होणार आहे. दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण असणारी मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही.बारावीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.