मुंबई, दि. 17 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. आता या प्रकरणी सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत सगेसोयरे कायदा करण्यासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण आज आठव्या दिवशी सुरुच होते. रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात राज्यातील जंगलात वणव्याच्या ३७ हजार ४०३ घटनांची नोंद झाली. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
महाराष्ट्राला एक उगवता सूर्य लाभला आहे त्याचे नाव आहे आदित्य ठाकरे. आता नुकतच दाढीवाला दावोदला गेला होता पण सोबत मराठी ट्रांसलेटर घेऊन गेला होता. यापूर्वी आदित्य ठाकरे गेले होते दावोसला त्यांची बुद्धीमत्ता तिथले लोकं बघून आश्चर्य चकित झाल्याचं ठाकरे गटाचे अरविंद सावंत म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी शिंदेंची दाढीच्या बानगडीत पडू नये दाढीचा पडलेला केस उचलून दाखवावा, मग दाढीला हात घालायच्या कल्पना करा. शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या शिवसेना मंदिराचं पावित्र आम्ही जाऊ देणार नाही, असं शहाजी बापु पाटील कोल्हापूरमध्ये म्हणाले.
कोल्हापुरातील एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर गांधी मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मैदान कडे जाणाऱ्या रस्त्यावरच ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांचं कार्यालय आहे. रविकिरण इंगवले यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये बॅनर रंगलय.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार कमलनाथ दिल्लीत पोहोचले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी वाराणसी येथून एक दिवस भारत जोडो न्याय यात्रा थांबवून थेट त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाडला जात आहेत. राहुल गांधी उद्या वायनाडहून थेट प्रयागराज गाठून प्रवासाला सुरुवात करतील. उद्या दुपारी ३ वाजता राहुल प्रयागराज येथील न्याय यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
18 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा शेतकरी संघटना भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली हरियाणात शेतकरी, कामगार संघटना आणि सरपंचांची बैठक होणार आहे. ज्यामध्ये पुढील रणनीती बनवली जाईल. 18 रोजी कुरुक्षेत्र ब्रह्मसरोवर येथे होणाऱ्या बैठकीत भविष्यातील रणनीती ठरविण्यात येणार आहे.
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील घोगरा गावात शनिवारी झालेल्या अपघातात आम आदमी पक्षाचे (आप) आमदार करमबीर सिंग घुमान आणि अन्य चार जण जखमी झाले. करमबीर सिंह घुमन हे होशियारपूर जिल्ह्यातील दसूयाचे आमदार आहेत. घुमान हे काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कारमधून तलवाडा शहराकडे जात असताना हा अपघात झाला.
सातारा : माढा आणि परभणी मतदार संघातून एकाच वेळी लोकसभा उमेदवारी लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. यावेळी भाजप आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधत भाजपमध्ये सध्या काँग्रेस आल्यामुळे भाजप काँग्रेसमय झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. सत्तेचा गैरवापर होतोय. सामान्य जनता बोलत आहे. हे असं वागणं योग्य नाही. सामान्य लोकं याला उत्तर देतील असा इशाराही त्यांनी दिला.
शिरूर : माजी खासदार आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाले. लोकसभेआधी एखादे पद मिळाले तर ती व्यक्ती उमेदवार राहत नाही असे संकेत असतात. अजित पवार यांच्या घरातील काही लोक शिरूरमध्ये देवदर्शनासाठी येवून गेली. त्यामुळे आता पार्थ पवार मावळ नाही तर शिरूरमधून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू झाली. शिरूरमध्ये लढतील की नाही हे माहित नाही. मात्र बारामतीत त्यांच्या कुटुंबातील नाव जाहीर झालं नाही जेव्हा नाव जाहीर होईल त्यावेळी पाहू. शिरूरमधून अमोल कोल्हे हेच निवडणुकीच्या रिंगणात असणार असे आमदार रोहित पवार म्हणाले.
नगर : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे पाचवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. अत्याचार करणारे चर्चचे पाद्री आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांकडून अटक केली आहे. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढला आहे. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरीक सामील झाले आहेत.
मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनामुळे कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहे ते सगळे अवैध ठरेल. मागास आयोगाचा रिपोर्ट आहे. जे नवीन आरक्षण देण्याचे चालले आहे ते संविधान संमत असू शकेल असे मला वाटत नाही. दोन्ही आरक्षण मराठा समाज तुलनेने ठरत नाही. जरांगेच्या सभेत दिलावर शेख नावाचं व्यक्ती ज्यांनी मंत्र्यांना शिवी दिलं त्याचा संबंध सिमिशी आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे दिल्लीत दाखल झाले आहेत. कमलनाथ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर भाजपमध्ये जाण्याविषयी मीडियाने छेडले असता, अगोदर तुम्हाला सांगणार असे ते म्हणाले.
इस्त्रोचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह INSAT-3DS चे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक 2024 साठी आम्ही तयार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अमरावतीत धावत्या कारने अचानक पेट घेतला. कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. अमरावती शहरातील दस्तुर नगर चौकात ही घटना घडली. नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.आग लागण्याच्या काही वेळापूर्वीच वाहन चालकाने गाडीच्या एसीचे काम केले होते.
भाजप नेत्या अमृता पवार यांच्यावर येवला तालुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखेड डाव्या कालव्याचे गेट तोडून पाणी सोडल्या प्रकारणी तक्रार देण्यात आली होती. शेतकरी व भाजप पदाधिकाऱ्यासह अमृता पवार येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
भाजप नेत्यांना संपविण्याचे काम करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. येत्या निवडणुकीत निकाल पवार साहेबांच्या बाजूने लागलेला दिसेल.आरक्षण कोणाला द्यायचे नाहीं फक्त गुंतागुंत करून ठेवायची आहे. सगळे म्हणतात विकासासाठी आम्ही भाजपा सोबत गेलो मग विकासाच कोण बोलत नाहीय हे सत्तेसाठी भाजपासोबत गेल्याचा आरोप त्यांनी केला.
तुर्भे मधील पावणे MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगेची तीव्रता मोठी असल्याने ही आग आता केमिकल कंपनीच्या बाजूला असलेल्या मेहक कंपनीपर्यंत पोहचली आहे. आगीच्या धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहेत. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
या दाढीला खेचून आणले असते असे म्हणता. दाढी हलकी आहे का ? या दाढीने तुम्हाला खड्ड्यात घातले आहे हलक्यात घेऊ नका ? असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात म्हटले.
एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री झाला याचं दुःख त्यांना आहे, त्यांची जलेसी आहे, द्वेष आहे, शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये, धनदांडगे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, सोन्याच्या चमच्यावाल्यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतू आपण
परिवार वादाला फाटा दिला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आता माझे 24 तास कधी संपतात हे मला कळतच नाही, अख्खा महाराष्ट्र आणि शिवसेना माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझं परिवार इतकंच मी राहत नाही. लोकांकडून मला ऊर्जा मिळते, गर्दी हेच माझं टॉनिक आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील महाअधिवेशनात म्हटले आहे.
तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि मोदी साहेबांना दोन वेळा फसवलं आहे मग तुम्ही आमच्यावर का आरोप करताय अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोल्हापूर येथील महाअधिवेशनात केली आहे.
लवकरच आपल्याला अयोध्येला जायचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा प्रस्ताव मंजूर झाला. 370 कलम जो रद्द झाला त्या संदर्भात प्रस्ताव होता, त्यामध्ये अमित शहा यांचा अभिनंदन केले.
मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत अशोक चव्हाण अधिवेशनाकडे रवाना झाले आहेत.
दुपारी तीन वाजल्यापासून ते 20 तारखेपर्यंत हिंगोली जिल्हातील सगळे रास्ता रोको आंदोलन स्थगित होणार. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशासने रास्ता रोको आंदोलन स्थगित करत असल्याच मराठा समाजाची माहिती
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि राज्यसभा उमेदवार झाल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच दिल्लीत. भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूरमध्ये आज संध्याकाळी सभा घेणार आहेत.
बारामतीचे लोकं शरद पवार यांच्यासोबत आहेत, अजित पवार आता भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत असं संजय राऊत म्हणाले.
धनगर आरक्षणाची पूर्तता करण्यावरून विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला. एकीकडे चारशे पारचा नारा देतात आणि पक्ष पळवतात असा टोलाही त्यांनी लगावला.
चिपळूणमधील राड्यावरून दीपक केसरकरांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाला अस्तित्त्वाची काळजी निर्माण झाली आहे. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं केसरकर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांना काहीही झालं तरी त्याला सरकारच जबाबदार असेल. महाराष्ट्र सरकार असंवेदनशील आहे. आरक्षणाबाबत जरांगेंची फसवणूक होतेय असंच दिसतंय, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.
नवी दिल्ली- जवाहरलाल स्टेडियमवरील गेट नंबर 2 जवळ मंडप कोसळला. या मंडपाखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे. या घटनेत आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आमच्याकडून भावनिक राजकारण होणार नाही. अजित पवारांकडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय. पण बारामतीचा मतदार समजूतदार आहे, तो योग्य निर्णय घेईल, असं शरद पवार म्हणाले.
“पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली हे सर्व देशाला माहीत आहे. लोकांना भावनिक आवाहन करण्याचं काम आम्ही करणार नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडून काढून घेणं हा अन्याय आहे,” असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
कोल्हापूर सर्किट हाऊस येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य जनतेला पोलिसांनी रोखले… पोलीस व निवेदन देणाऱ्यांमध्ये काही काळ वादावादीचा प्रकार… सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री कसे का? असा सवाल महिलांनी केला…
वाराणसीतील सभेतून राहुल गांधी यांनी साधला सरकारवर निशाणा. एकालाही जीएसटी, नोटबंदीचा फायदा झाला नाही… देशातील लोकांना जीएसटी, नोटबंदीचा फायदा झाला नाही… देशातील सर्व उद्योग अदानी यांच्याकडे… असं देखील राहुल गांधी म्हणाले…
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार… पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे… येत्या मंगळवारी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे… महापालिकेचा 42 वा अर्थसंकल्प आहे
आमदार रवींद्र धंगेकर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला… ‘धंगेकर पॅटर्न’ म्हणत धंगेकारांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी… पुन्हा येतोय! ‘धंगेकर पॅटर्न’ प्रदूषणमुक्त होण्यासाठी… पुन्हा येतोय! ‘धंगेकर पॅटर्न’ भयमुक्त पुण्यासाठी… अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट
संजय राऊत यांच्याबद्दल काही बोलणार नाही ते महान नेते आहेत… अनेक वर्षे धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडला होता, ते आत्ता होत आहे…. योग्य काम करत असेल त्याच्यावर व्यक्ती द्वेषातून आरोप करणे चुकीचं… असं वक्तव्य निलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावर आंदोलन सुरू असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे. आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अधिसूचनेची अंमलबजावणी कशी होत नाही तेच बघतो . २० तारखेनंतर आंदोलन सुरू करू. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे. परीक्षा सुरू आहेत, विद्यार्थ्यांना अडचण येऊ देऊ नका, खबरदारी आणि काळजी घ्या. 20, 21 तारखेपर्यंत समाजाने आंदोलन करू नये.
भाजपने चिखलफेक करण्यासाठी टोळ्यांची नेमणूक केली. राज्याची राजकीय संस्कृती लयाला जात आहे , याला फडणवीस जबाबदार आहेत. फडणवीस, शाह मोदींमुळे राज्याची संस्कृती लयाला गेली अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पुण्यातील मंमदवाडी रोडवर असलेल्या तरवडे वस्तीत पार्क केलेली 8 ते 10 वाहनं अज्ञाताने पेटवली. महंमदवाडीतील साठे नगर मधे पार्क केलेल्या दुचाकी अज्ञाताने दिल्या पेटवून . यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पुण्यातील वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणेंना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर. तर हिना गावित आणि अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला. तसेच श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणे दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं. या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या तरुणांचा तातडीने शोध घेत दोन तरुणांना अटक केली. -प्रतीक शिंगटे आणि ओमकार मुंडे अशी अटक केलेल्या तरुणांची नावे असून त्या दोघांवरही भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची कारही जप्त करण्यात आली.
मंत्री दर्जाचे पद असावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत होतं. म्हणून पुणे म्हाडावर अध्यक्षपदी माझी निवड केली. पुणे म्हाडा च्या अध्यक्षपदी निवड झाली असले तरी शिरूर लोकसभेवरचा क्लेम सोडलेला नाही. महायुतीचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार आहे. पुणे म्हाडा नंतर मी लोकसभा निवडणूक लढणार नाही हा गैरसमज आहे, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
जाळपोळ प्रकरणातील किरकोळ गुन्हे मागे घेणार असल्याचा बीड पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव दिला आहे. 69 पैकी 36 गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव दाखल झाले आहेत. गंभीर गुन्ह्यात कारवाई होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या गुन्ह्यात कारवाई होणार आहे. नेत्यांची घरे आणि कार्यालय जाळण्याऱ्यावर कडक कारवाई होणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी हिंसाचार घडला होता. रस्ता रोको, टायर जाळणे यातील किरकोळ गुन्हे मागे घेणार आहेत.
शिरूर लोकसभेची जागेचा तिढा सुटण्याआधीच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची बॅनरबाजी पाहायला मिळते आहे. जनतेच्या मनात अढळ काल आज आणि उद्या ही अशा आशयाचे शिरूर मतदार संघात सर्वत्र बॅनर लागले आहेत. शिरूर लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँगेस आणि भाजप आग्रही असताना शिंदे गटाकडून फ्लेक्स बाजी पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी खासदार कोल्हे याच्या समोर तगडा उमेदवार देण्याचे आव्हान दिले असताना शिरूर मतदार संघात उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. बॅनर वर महायुतीतील सर्व नेत्यांचे फोटो, आढळराव यांच्या बॅनर मुळे शिरूर लोकसभा मतदार संघात चर्चा सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी मंडळामध्ये तात्काळ दुष्काळी अनुदान वाटप करा, मनसे शेतकरी सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केलीय. जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ दुष्काळ निवारण उपाययोजना सुरू कराव्यात. दुष्काळी मंडळामध्ये पीक कापणी उत्पन्न जास्त दाखवल्याने पिक विमा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी मनसे शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली.
गावामध्ये हिंदू स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी रस्त्यावरच केले अंत्यसंस्कार. गावाला स्मशानभुमी नसल्याने ग्रामस्थ आक्रमक.दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेवाडी येथे हिंदू समाजाला स्मशानभुमी नसल्यामुळे चक्क रस्त्यावर करावे लागतात अंत्यसंस्कार.
“ज्या समाजाचा आशीर्वाद पाठीशी त्याला काय दुःख. माझ्या समाजाला किती त्रास होतो हे महत्वाचे आहे. 20 तारखेला अधिसूचनेची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, परंतु आम्ही मागितल्या प्रमाणे टक्केवारी कुणाला पडता येणार नाही, सुसूत्रता आणावी लागेल आणि ते आरक्षण कुणी नाकारले नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनसे वर्धापन दिनाच्या तयारीला वेग. यंदाचा वर्धापन दिन होणार नाशिकमध्ये. राज ठाकरे यांच्या संमतीनंतर नाशिकमध्ये तयारी सुरू. बाबासाहेब गायकवाड सभागृह किंवा ठक्कर डोमची चाचपणी सुरू. वर्धापन दिन पहिल्यांदाच नाशिकला होत असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह. लोकसभा निवडणुकांचा रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार
रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल मधील तांत्रिक सुधारणेसाठी रविवारी तिन्ही मार्गावर राहणार मेगा ब्लॉक. मध्यरेल्वेच्या ठाणे ते कल्याण उप डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे उप डाऊन हार्बर मार्गावर राहणार 11.40 ते 4.40 पर्यंत मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर अप डाउन जलद मार्गावर शनिवारी रविवारी मध्यरात्री 12 ते 3.30 पर्यंत मेगा ब्लॉक असणार.
मराठा आरक्षणासाठी सुरु केलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आठव्या दिवशीही सुरु होते. सग्यासोयऱ्या बाबत सरकारने जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा, या प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे.
पुण्यात महाराष्ट्र सरकारतर्फे डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात पार पडणार डिफेन्स एक्स्पो होणार आहे. आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला चालना देण्यासाठी पुण्यात डिफेन्स होत आहे. डिफेन्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपना यामुळे मोठी संधी मिळणार आहे.
कल्याण- लातूर अंतर पार करण्यासाठी सध्या १० तास लागतात. पण आता येत्या काही वर्षांत हे अंतर केवळ चार तासांत पार करता येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण ते लातूर प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी ४४५ किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत दहा तासांसाठी न्हावा शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.