मुंबई दि. 22 फेब्रुवारी 2024 | बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. परंतु आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. पुणेकरांना मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यास टाटाची तत्वतः मंजुरी दिली आहे. दस्तनोंदणी ऑनलाइन करण्यात पुणेकर स्मार्ट ठरले आहे. राज्यात सर्वाधिक नोंदणी पुण्यात झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित करण्यात आले आहे. ‘एमकेसीएल’ कंत्राटासह अन्य तक्रारींप्रकरणी डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांची कारवाई केली. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
आमच्या कुटुंब बद्दल बोलणार असाल तर मी सुद्धा तुमच्या कुटुंबावर बोलणार. अमित शहा म्हणतात घराणेशाही संपवणार, सत्ता आंधळे झालेत. मुख्यमंत्री ठरवणारा जनता आहे. सत्तेच्या मस्ती मध्ये तुमच्या मुलाला क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष केलं आहे- उद्धव ठाकरे
बुलढाणा हा शिवसेना चा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात तीन वेळा डॉक्टर ल निवडून दिले. डॉक्टर आहे असे म्हणतात , पण त्यांनी खारपण पट्ट्यासाठी काही केले का? उद्धव ठाकरे याना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. वाजपेयी मोदी यांना कचऱ्यात टाकायला निघाले होते. जर शिवसेना मोदींच्या पाठीशी उभी राहिली नसती तर मोदी दिसले नसते. राजनाथ सिंह अध्यक्ष असताना मोदी यांचे नाव जाहीर केले होते पंतप्रधानसाठी, तेव्हा शिवसेनेने त्याचे प्रथम अभिनंदन केल्याचं उद्धव ठाकरे बुलढाणामधील सभेत बोलले.
भाजपचा चोरांचा बाजार झाला आणि त्यांचे सरदार फडणवीस आहे. खासदार जिल्ह्यातला गद्दार झाला, यानंतर ते लोकसभेत जाता कामा नये . हजारो शेतकरी दिल्लीत हक्कासाठी जात आहे. मोदींचे सरकार त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांचे मुडते पाडत आहेत. या मोदीला आपण परत निवडून देता कामा नये, असं संजय राऊत यांनी बुलढाणामधील सभेत म्हटलं आहे.
नवी दिल्ली | काँग्रेस आमदार मामन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील नुह हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदारावर UAPA खाली गुन्हा नोंद केला गेला आहे. याआधी भारतीय दंडविधान संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. UAPA या दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ३, ११ नुसार नव्याने गुन्हा दाखल केला गेला आहे.
कल्याण | मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी कल्याण दौरा करणार आहेत. मनसे अध्यक्षांचं दुपारी 3 वाजता दुर्गाडी चौक या ठिकाणी स्वागत होणार आहे. तर त्यानंतरकल्याण शहरात दुपारी 4 वाजता दाखल होतील. तसेच राज ठाकरे कल्याण खडकपाडा स्प्रिंग टाईम हॉटेल मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. सोबतचखडकपाडा साईबाबा भंडारा ला राज ठाकरे भेट देतील. कल्याण खडकपाडाला रात्री गुरुदेव हॉटेलमध्ये मुक्काम करतील.त्यानंतर राज ठाकरे 24 तारखेला डोंबिवली दौरा करतील.
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे गुरुवारी झालेल्या हिमस्खलनात एका परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला तर दुसरा बेपत्ता आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच स्कायर्सना वाचवण्यात आले आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.
सीबीएसईच्या 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तकाची परीक्षा होणार आहे. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये वाढता ताण पाहता हा प्रकार केला जात आहे. सीबीएसईच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव औपचारिकपणे ठेवण्यात आला आहे. आत्तापर्यंत, पथदर्शी प्रकल्प म्हणून यासाठी काही शाळांची निवड करण्यात आली आहे. यंदा नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तकाची चाचणी होणार आहे. NCFSE च्या शिफारशींनुसार, फक्त इंग्रजी, विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र या विषयांसाठी खुल्या पुस्तकाच्या चाचण्या असतील.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला तयार होताना दिसत आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी आता काँग्रेसला 2 जागांच्या ऐवजी 5 जागा देण्यास तयार दिसत आहेत. काँग्रेस नेतृत्वाच्या मध्यस्थीनंतर ममता बॅनर्जी पुन्हा पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाबाबत बोलत आहेत.
आयपीएल 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 22 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीमवर 7 एप्रिलपर्यंतच वेळापत्रक समोर आलं आहे. यात एकूण 21 सामने होणार आहेत.
बुलढाणा : इकडचा एक बेडूक तिकडे गेला आहे. या बेडकाचा डराव डराव कायमचा बंद करायचा आहे. आमदार, खासदार गेले मात्र शिवसेना जागेवर आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष नद्दा की तद्दा. नेहमी नाद्दा सुटलेला असतो असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. मोदी फक्त मन की बात, मन की बात करतात. पण, आता मोदी यांची नाही तर उद्धव यांची गॅरंटी चालेल असेही ते म्हणाले.
मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गले आहेत. निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी 8 हजार डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. मानधनात वाढ आणि हॉस्टेल चांगली सुविधा या मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संप माघे घेण्याचं आवाहन केलं होतं पण निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप मार्डने केलाय.
पुणे : सांगली, दिल्ली, पुणे या ठिकाणी चौकशी सुरु आहे. फरार आरोपीना अटक करण्यासाठी देशात 7 वेगवेगळी पथक गेले आहेत. ही साखळी तोडण्याचे काम सुरु आहे. या केसला फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 1750 – 1800 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. त्याची किमंत 4000 कोटींच्या आसपास आहे अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सांगली : केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये केलेली वाढ ही तोकडी आहे. शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक तसेच वाढलेले रासायनिक खतांचे दर पाहता यामध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन २२५ रूपयांची वाढ केली आहे.
मुंबई : पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या जागावाटपाच्या वृतांबाबत चर्चा झाली. राज्यात किती जागा जिंकू शकतो याची माहिती त्यांना दिली. निवडणूक चिन्हबाबतीत आम्ही जे ऑप्शन दिले आहे ते नाही म्हटल्यावर आम्ही नवे पर्याय दिले आहेत. आता त्यांना उत्तर हायकोर्टातच देऊ, अशी माहिती एनसीपी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
कल्याण व भिवंडी लोकसभा मतदार संघात राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा होत आहे. उद्या 23 व 24 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतील. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मालेगाव तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने छगन भुजबळांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांना दौऱ्यातून माघार घेतली. त्यांच्या दौऱ्याला मालेगावात विरोध झाला. कार्यकर्त्यांनी हा दौरा अडवला. भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिडा संपत नाही तोपर्यंत छगन भुजबळ यांच्यासह कुटुंबीयांना फिरकू देणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक केले आहे. मराठा आरक्षण विधेयक मंजूर केलं,त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री याचं स्वागत केलं ही एक येणाऱ्या राजकारणची नांदी आहे,हे चांगले आहे,सर्व पक्षांनी एक मताने पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे सभागृहात आले, थांबले हे चांगलंच आहे,शिंदेचे आभार मानले हे चांगलंच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भिवंडी येथील अल्पवयीन मुलाच्या हत्ये प्रकरणी मुख्य आरोपी शिवसेना उपशहर प्रमुख कैलास लोंढे यास भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली आहे.या गुन्ह्यात आता पर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. ते द्यायला पाहिजे. समाजात दुफळी निर्माण झाली आहे त्यामुळे मला हार तुरे फेटे नको वाटतं. मराठा आरक्षणाचे आकडे ठरविले पाहिजे. विदर्भातला, पश्चिम महाराष्ट्रातला बराच मराठा ओबीसी मध्ये आहे. इकडे दहा टक्के मराठा आरक्षण देणे आणि कुनभी प्रमाणपत्र देखील देणे यात मी कन्फ्युज आहे,असे वक्तव्य पंकज मुंडे यांनी केले सत्ताधाऱ्यांनी यात मार्ग काढला पाहिजे. ज्यांनी अध्यादेश काढला त्यांनी व्यवस्थित भूमिका मांडावी म्हणजे कन्फ्युज होणार नाही. राजकारणात जर तर ला महत्त्व नसल्याचे त्या म्हणाल्या.
मी माझा जास्त वेळ ग्रामीण भागात माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरत होतो.लोकांच्या अडचणी सोडवत होतो. आज म्हाडा अध्यक्ष पद स्वीकारलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली आहे. आपल्या सर्वांना वाटत असे पत्ता कट झाला की काय पण तसे काही नाही? अशी प्रतिक्रिया शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली.
प्रेक्षक पाहून दर वेळी वेगळे भाषण झाले पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमात मला बाबांची आठवण येते. निवडणूक तोंडावर आल्यावर बूथ रचनेवर जास्त भर दिले पाहिजे. माझ्यासाठी ही एक स्क्रिनिंग असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे नसतानाही आमची निवडणूक सहज झाली होती. आता एकत्र असलो तरी मतात वाढ होईल असे वाटत नाही.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सकल मराठा समाज बांधवांना धुळे येथे पोलिसांनी अटक केली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी दादा भुसे आणि उदय सावंत यांना हेलिकॉप्टरमधून उतरवून आदिवासीच्या लहान मुलांना हेलिकॉप्टरची सैर घडविली. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा गावात शिवसेना पक्षा अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचं शिवसैनिकांनी फटाके फोडून जंगी स्वागत केले आहे.
बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटनं होत आहे. उद्या सुर्यनगरीत सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी बारस्करांनी 40 लाख रूपये घेतले असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकारचा हा ट्रॅप असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उन्हाळा लागायला अजून अवकाश असला तरी पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरूवात केली आहे. गिरणा धरणातील जलसाठा 33 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे नागरीकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज ठाकरे उद्या भिवंडी दौऱ्यावर असणार आहे. लोकसभा निवडणूच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असणार आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. हिरानंदानी ग्रुपवर ही छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे. फेमा कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी छापेमारी सुरू असल्याचं कळतंय.
“कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज ५७ वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खूप मोलाचे आहे. हे प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले प्रेम, विश्वास आणि साथ याबद्दल आपणा सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे व्यक्त झाल्या.
नवी दिल्ली- नवनियुक्त राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दहा जनपथवरील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट खासदार हंडोरे यांनी घेतली. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर खासदार हंडोरे दिल्लीत आले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही त्यांनी भेट घेतली. राज्यात काँग्रेसला सशक्त करा अशा सूचना राहुल गांधी यांनी या भेटीप्रसंगी दिलेल्या आहेत अशी महिती खा. हांडोरे यांनी दिली.
डहाणू- वाढवण बंदर रद्द करा या मागणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील चारोटी नाका इथं मुंबई आणि गुजरात दोन्ही लेन बंद करून रास्ता रोको करण्यात आला आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. महामार्गावरील दोन्ही दिशाची वाहतूक ठप्प करण्यात आली आहे.
नवी मुंबई- मुंबई अश्वमेध महायज्ञ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि जे. पी. नड्डा दाखल झाले आहेत. खारघरच्या कॉर्पोरेट ग्राऊंडमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे महायज्ञ करण्यास बसले आहेत.
धुळे शहरात शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचा आयोजन… मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती… साठ शिवसेना शाखांचा अनावरण… धुळे शहरात 40 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन… शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन..
केंद्रीय यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांचा पुणे पोलिसांच्या ड्रग्ज कारवाईत श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न. दिल्लीतल्या कारवाईत सापडलेल एमडी ताब्यात घेत असताना पुणे पोलिसांची अडवणूक करण्याचा प्रयत्न… दिल्लीत वेगळा गुन्हा दाखल करून जप्त एमडी तिथेच ताब्यात घेण्याचा होता प्रयत्न… पुणे पोलिस आयुक्तांच्या कठोर भुमिकेनंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडून मध्यस्थी… दिल्लीतून जप्त केलेल ९७० किलो एमडी कंटेनरने पुण्याला रवाना
डहाणू | बहुचर्चित वाढवणं बंदर विरोधात आंदोलनकर्ते जमायला सुरवात झाली आहे. महामार्गपासून अर्धा किलोमीटर असणाऱ्या चारोटी गावातील मैदानावर आंदोलनकर्ते जमायला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात हातात काळे झेंडे घेऊन आंदोलन करते सहभागी झाले आहेत.
मराठा आरक्षणाबद्दल जरांगे पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बारसकर हा मुख्यमंत्री शिंदेंच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्र्रॅप. बासकर महाराजाला विकत घेतलं आहे. ३ तारखेचा रास्तारोको शांततेत होणार… जरांगे पाटील यांचं वक्तव्य
पुण्याच्या अंतराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचं “पंजाब व्हाया इंग्लंड” असं कनेक्शन समोर आलं आहे. ड्रग्स रॅकेट चा “मास्टर माईंड” हा मूळचा पंजाब प्रांतातील आहे. तो कुटुंबीयांसह गेल्या अनेक वर्षांपूर्वी इंग्लंड मध्ये स्थाइक झाला असून 2016 मधील कुरकुंभ येथे मारलेल्या छाप्यात त्याला पकडण्यात आले होते. त्यावेळी ३५० किलो चे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता. त्या ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. किरू जलविद्युत प्रकल्पातील घोटाळा प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
कल्याण व भिवंडी लोकसभेत राज ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. उद्या 23 व 24 तारखेला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे कल्याण व भिवंडी लोकसभेत उपस्थित राहतील.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती व कामकाजाबाबत ही चर्चा करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे.
नाशिक पोलीस जॉगिंग ट्रॅक वर साधनार नागरिकांशी संवाद आहेत. नागरिकांच्या फीडबॅक द्वारे उपाय योजना करणार आहेत. संवाद साधत इतर तक्रारी ही जाणून घेणार आहेत. शनिवारपासून नाशिक पोलीस मैदान, जॉगिंग ट्रॅकवर संवाद साधणार आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वसई ते खाणीवडे टोल नाक्या पर्यंत दोन्ही लेनवर वाहन ठप्प झाले आहेत.महामार्गावर सिमेंट काँक्रीट चे काम सुरू असल्याने मागच्या एक महिन्यापासून वाहतूक कोंडी सुरू आहे. अनेक लांब पल्याच्या गाड्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात काळ्या काचांबाबत वर्षभरात तब्बल 40 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई वर्षभर सुरु असते. कारवाई सातत्याने सुरु असताना देखील वाहन चालक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे बेकायदेशीर असताना देखील अनेक वाहने काळ्या काचा लाऊन फिरत असल्याचे दिसते. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात तब्बल 40 हजार 917 वाहनांवर काचांना काळी फिल्म लावल्या प्रकरणी कारवाई केलीय. मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने 40 हजार 917 केसेस करून त्यावर चार कोटी 44 लाख सात हजार 500 रुपये एवढा दंड आकारला आहे.
अहमदनगरमधील ‘मॅकडोनॉल्ड’ ला चीज’ हा शब्द काढून टाकण्याचे आदेश आहेत. रेस्तराँमध्ये प्रत्यक्ष ‘चीज’ न वापरता ‘चीज’ सदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली होती. याबाबत अन्न आणि सुरक्षा आयुक्तांची कारवाई करण्यात आलं आहे. सर्वच पदार्थांच्या नावातून ‘चीज’ हा शब्द काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार पदार्थांतून ‘चीज’ शब्द काढून टाकत पदार्थांची नवी नावे जाहीर केली. तर ‘चीज’च्या नावाखाली आतापर्यंत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झालं.
भाजपा शिंदे आणि अजित पवारांची गँग घेऊन निवडणूक लढतेय. मविआत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर 27 तारखेला निर्णय होणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
फडणवीस मुंबईचा सौदा करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत. उद्या मुंबईही गुजरातमध्ये घेऊन जाणार असा दावा संजय राऊत यांनी केला.
आमचा बाप बाळासाहेब, पण भाजपाच्या बापाचा पत्ता आहे का?. जनतेच्या लुटलेल्या पैशांवर मोदींच्या श्रीमंतीचा थाट. जनतेने ठरवलय भाजपाचे महागडे सूट उतरवायचे. भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर ढोंग बंद कराव. मी वीर सावरकरांना ओळखतो, रणजीत सावरकरांना ओळखत नाही असं संजय राऊत म्हणाले.
भाजपाची जागा जिंकण्याची घोषणा म्हणजे लोकशाहीची थट्टा. मोदींच्या खिशात 25 लाख किंमतीच पेन. भाजपाच्या नेत्यांकडे महागडी घड्याळ आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला.
नाशिककरांवरील पाणी कपात तूर्तास टळली. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा. जिल्हाधिकाऱ्यांनंतर पालकमंत्री दादा भुसे आज घेणार पाणी आढावा. विविध शासकीय यंत्रणांसोबत पाण्यासंदर्भात बैठक
अमरावती लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडूनही आता उमेदवारांची चाचपणी सुरू. विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती. महायुती मधून खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेच्या अडसुळानी केला आहे दावा. खासदार नवनीत राणा यांनी कमळाच्या चिन्हावर लढलं पाहिजे अशी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली होती इच्छा. भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरु केल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण. दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागण्याची शक्यता.
राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची सलग दुसऱ्या वर्षी मोहोर. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटीलने मारले मैदान. पैलवान समाधान पाटील हा 2024 सालचा हिंदकेसरी ठरला. दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत समाधानने हिंदकेसरीचे मैदान मारले. समाधान पाटील हा मोर्चा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातला आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी त्यांचा जामीन अर्ज पटलावर आली नाही. यामुळे आज सकाळच्या सत्रात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूरात होत आहे. १५, १६ आणि १७ मार्चला नागपूरात रेशीमबाग येथे ही सभा होणार आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात बारावीत इंग्रजीच्या पेपरला तब्बल 392 विद्यार्थ्यांची दांडी मारली. या पेपरात एकही कॉपीबहाद्दर सापडला नाही. जिल्ह्यातील 76 परीक्षा केंद्रावरुन 19 हजार 512 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित करण्यात आले आहे. ‘एमकेसीएल’ कंत्राटासह अन्य तक्रारींप्रकरणी डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांची कारवाई केली. डॉ. चौधरी यांच्या विरोधातील तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी राज्यपालांनी त्यांना बुधवारी बोलावले होते.