मुंबई | दि. 29 फेब्रुवारी 2024 : नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. नागपूर मनपाचे आयुक्त डॅा. अभिजित चौधरी ३५०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परभणीत चार महिन्यांपासून थकलेल्या वेतन देण्याच्या मागणीसाठी मनपा कर्मचारी संपावर गेले. गडचिरोली मतदार संघात भाजप आपला उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्रम यांना विचारणा करण्यात आली आहे. राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांची जळगाव लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीबद्दल चर्चा सुरु झाली आहे. कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेतील नगररचना विभागातील दोन कर्मचारी निलंबित झाले आहे. बांधकाम आराखड्यात फेरफार केल्याप्रकरणी ही कारवाई झाली. तसेच यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मला वाटतं ठाणे करांना मी गेले 40 वर्ष या ठाण्यामध्ये काम करतोय जनतेची सेवा करतोय आणि जनतेने मला भरभरून मत दिलेली आहेत. आतापर्यंतच्या ठाण्याच्या इतिहासामध्ये मी एक शाखाप्रमुख होतो. चार वेळा नगरसेवक म्हणून वेगवेगळ्या फोर्ड मध्ये मी निवडणूक लढलो त्यानंतर मी महापौर होतो त्यानंतर मी आमदार होतो पाच वर्ष आणि दोनदा खासदार. ठाणेकरांचा विश्वास आहे म्हणून मला संधी दिली आणि तोच विश्वास आजही कायम आहे ठाणेकरांचा माझ्यावर आणि भविष्यात सुद्धा असेल. ठाण्याचा जो विकास झाला त्याचे खरे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तमाम सर्व ठाणेकर असतील- राजन विचारे
तीन वेळा खासदार असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजता आहे. पंचवीस ते तीस टक्के विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे. 10 मार्चपूर्वी भाजपकडून देशातल्या 300 उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
वैयक्तिक कोण शिवी देत नाही, एसआटी चौकशी लावायची आहे तर बिंदास लावा त्याच्यात काय वाद नाही. मात्र नितेश राणे यांच्या बाबत काय चौकशी करणार असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
भाजप मुख्यालयात पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक, आजच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या जागांबाबत चर्चा होणार नाही. देशातल्या 21 राज्यांमधल्या जागांबाबत चर्चा होणार आहे. 21 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसून उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल दिल्ली गोवा गुजरात सह 21 राज्यांमधल्या जागांबाबत आज होणार महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
1993 च्या अजमेर बॉम्बस्फोटातील आरोपी करीम टुंडाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोन आरोपी दोषी आढळले आहेत. आरोपी इम्रान आणि हनिमुद्दीन यांना दोषी घोषित करण्यात आले. टाडा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्ष सीपीआय आणि सीपीआय-एम यांच्यासोबत जागावाटप युतीवर शिक्कामोर्तब केले; दोन्ही पक्षांना 2-2 जागा देण्यात आल्या.
मुंबई विमानतळावर 80 वर्षीय प्रवाशासह व्हीलचेअरच्या घटनेप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
टीएमसीने शाहजहान शेख यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की शाहजहानला 55 दिवसांनंतर आज म्हणजेच गुरुवारी अटक करण्यात आली आहे. त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आ
अमरावती | अमरावती येथील पेपरफुटी प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापकासह दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँड येथील 21 तारखेला परीक्षा केंद्रावर मृद-जलसंधारण विभागाचा पेपर फुटला होता. परीक्षा केंद्रावर परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फोडला होता पेपर. मात्र मुख्यसूत्रधार अद्यापही बेपत्ताच आहे. तसेच 21 तारखेला झालेली परीक्षाच रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांना अवघ्या काही दिवस बाकी आहेत. अशात प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरु आहे. भाजपनेही लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. भाजपने लोकसभा उमेदवार निश्चित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीत एकूण 6 जणांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे.
कोल्हापूर : वरणगे पाडळी येथील कृष्णात पाटील यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी कोल्हापूरला नेला. मात्र, अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेल्यानंतर कृष्णात पाटील यांच्याऐवजी दुसऱ्याच वयस्कर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अदलाबदलीमुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे बदललेला मृतदेह पुन्हा मुंबईला नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली.
मुंबई : कोकणची जागा आम्हीच जिंकणार, आम्ही एकत्र आहोत. राणे हे भाजपबद्दल बोलले. तर, उदय सामंत शिवसेनेबद्दल बोलले आहेत, जागा कुणालाही मिळाली तरी आम्ही ३ लाख मतांनी जिंकणार आहोत, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. गोखले ब्रिजचे काम आम्ही वेळेत पूर्ण केले. जे काहीच करत नाही ते काहीही बोलतात. जे ३ वर्ष टेंडर काढू शकले नाही ते आता बोलत आहेत. १४ महिन्यात रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये काम पूर्ण झाले. रेल्वे सेफ्टी पॉलिसीमुळे ब्रिजची हाइट उंच केली आहे. आमचे उदिष्ट जनता आहे कंत्राटदार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाणे : भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेसची आहे. भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार या माध्यमातून येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष यांना ही माहिती दिली आहे. त्यांनी ही माहिती महाराष्ट्राचे प्रभारी चेनीथला यांना द्यायला सांगितली आहे. खरगे यांनी आश्वासन दिलं आहे की भिवंडी लोकसभा काँग्रेस लढेल अशी माहिती काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली.
धुळे : लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे निरीक्षक श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे यांची चाचपणी केली. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 9 उमेदवार इच्छुक आहेत. विद्यमान खासदार सुभाष भामरे, माजी सनदी अधिकारी प्रतापराव दिघावकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे, भाजपाच्या पदाधिकारी माधुरी बाफना, डॉक्टर विलास बच्छाव, जिल्हा परिषदेच सदस्य हर्षवर्धन दहिते, बिंदू माधव हे प्रमुक इच्छुक उमेदवार आहेत.
अमरावती : नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलती का नाम गाडी आहे. यांना दोघांना काय काम धंदे राहिले नाही. आजही शिवसेनेचा दावा आहे आणि त्या ठिकाणी आनंदराव अडसूळ ही जागा लढवतील. शिवसेनेचे तेच उमेदवार आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रचाराला यावं लागेल असा टोला शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांनी लगावला.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आज नागपुरात आल्या होत्या. शुक्ला यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सुमारे 15 मिनिटे रश्मी शुक्ला यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शरद पवार गटाचा सोशल मीडिया राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत याच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. सांताक्रूझ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबई परिसरातून योगेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज बांद्रा कोर्ट येथे योगेश सावंत यांची अधिकची पोलीस कोठडी मागणार आहेत.
लोकसभा जागा वाटपाबाबक शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवास्थानातील बैठक संपली आहे. संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेव थोरात हे सिल्वर ओक मधून बाहेर पडले आहेत
दोन मार्चला बारामतीत विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो महारोजगार मेळावा होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर शेतजमीन बळकावल्याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. गायकवाड यांचा मुलगा मृतुंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. मोताळा येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने आदेश दिले आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार ते घोडबंदर हद्दीत पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे.
सध्या महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे काम चालू असल्याने विरार खानिवडे, पेल्हार, वसई फाटा, सातीवली चढण, चिंचोटी, ते सनई ढाबा, घोडबंदर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना पक्षाने लोकसभेसाठी तयारी करायला सांगितल्याने पुन्हा या जागेचा पेच कायम. मिलिंद देवरा २ वेळचे खासदार ,माजी केंद्रीय मंत्री ,दक्षिण मुंबईची पकड असलेला नेता ,सुशिक्षित आणि पुरोगामी चेहरा. एनडीएच्या सर्वेनुसार २ लाख वैयक्तिक मते त्यांच्याकडे आहेत
जय पवारांच्या वाढदिवसानिमित्त धीरज घाटेनी घेतली भेट. यावेळी सत्कार करत घाटेनी जय पवारांना दिल्यात शुभेच्छा. राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकरांनी घडवून आणली भेट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला सुरुवात. कृपाशंकर सिंह शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार. कृपाशंकर सिंह संध्याकाळी आपला अहवाल प्रदेश कार्यालयाला देणार
याआधी लढवलेल्या जागांवर शिवसेनेचा दावा राहाणारच असं म्हणत रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या जागेवर शिवसेनेचाच दावा असल्याचे प्रमोद सावंत म्हणाले. दापोली येथे ते बोलत होते.
शरद पवार यांच्या भेटीसाठी नाना पटोले सिल्वर ओकवर दाखल झाले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यासाठी नाना पटोले यांनी शरद पवारांची भेट घेतली.
सलीम कुत्ता याच्यासोबत नाचल्याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे. आठ वर्षापूर्वीच्या प्रकरणात आज गुन्हा दाखल झाला, माझ्यावर सुडबुद्धीनं करावाई करण्यात येत असल्याचे सुधाकर बडगुजर म्हणाले.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्यात आली आहे. दुर्लक्ष करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
योगेश सावंत याच्याबद्दल माहिती देताना रोहित पवार म्हणाले की, योगेश पवार हा कार्यकर्ता आहे. तसेच भाजप आमदारांनी मांडलेला प्रश्न फडणवीसांना खुश करण्यासाठी असल्याचंही रोहित पवार म्हणाले.
राज्यातील परिक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढा तसेच पेपरफुटी प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. या कारणासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरू आहे.
पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच… पुण्यातील मुंढवा भागात आरोपीचा धुडगूस… दारूच्या नशेत आरोपींकडून 8 गाड्यांची तोडफोड… मुंढवा पोलिसांकडून संबधीत आरोपीला अटक… येरवड्या नंतर मुंढवा भागात गाड्यांची तोडफोड
जळगावातील महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्र गीत न वाजल्याने मक्तेदारावर गुन्हा दाखल… कोटींचा निधी देवूनही ढिसाळ नियोजन झाल्याचे म्हणत भाषणात खासदार उन्मेष पाटील यांची जिल्हा प्रशासनावर नाराजी… तांत्रिक अडचणीमुळे बराच वेळ उलटून ही महाराष्ट्र गीत सुरूच न झाल्याने मक्तेदारावर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद… राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात… तब्बल 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा… 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन… गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे…
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सहा महिने बोललो का? तर नाही… एका अधिवेशनात बोलता अधिवेशनात एस आय टी चौकशी नको. दुसऱ्या अधिवेशनात चौकशी लावण्याचे आदेश देता. न्यायालय सांगते शांततेत आंदोलन करा आम्ही शांततेत आंदोलन केले.मात्र गुन्हे दाखल करता.खुन्नस दाखवायला फुगे फोड्याची बंदूक दाखवता.मात्र मराठे घाबरत नाही. मराठे काय असेत ते कळेल…
अमित ठाकरे यांच्या आंदोलनाचा पुणे विद्यापीठाने घेतला धसका. ८ दिवसात अमित ठाकरे यांनी मागितल होतं लेखी उत्तर. विद्यापीठाने अमित ठाकरे यांना लेखी उत्तर देत १ मे २०२४ पर्यंत मराठी भाषा भवनच काम पूर्ण करुन उपलब्ध करणार असल्याचं नमूद केलं.
पुढील चार पाच वर्षात वसतीगृहातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असेल. कँटीन दर्जा सुधारण्यासाठी विशेष यंत्रणा राबवत आहोत असंही त्यात लिहीण्यात आलं आहे.
कोल्हापूर – मराठा आंदोलक दिलीप पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, जरांगेना विरोध केल्याने समर्थकाकडून धमकी. दिलीप पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. अर्ज करूनही संरक्षण नाही.
पंतप्रधानांनी खोटं बोलू नये. शरद पवार हे देशातील उत्तम कृषीमंत्री होते हे मोदींचं वक्तव्य. शरद पवार माझे राजकीय गुरू असंही नरेंद्र मोदी म्हणाले होते.
सांगलीत चिंचणी ते सांगलीवाडी असे सर्वात लांब पल्ल्याचे घोडे मैदान जल्लोषी वातावरणात संपन्न झाले. हजारो घोडे प्रेमिंच्या उपस्थितीत मध्यरात्रीच्या सुमारास हे घोडे मैदान संपन्न झाले. विशेष म्हणजे या घोडे मैदानाला कोणतेही बक्षीस नसते मात्र पहिला येण्याचा मान असलेने मोठी चुरस असते. चिंचणी मायाक्का देवीची यात्रा संपताच सांगलीवाडीतील 20 घोडा गाड्यांमध्ये सर्वात आधी पोहचण्याची चुरस निर्माण होते.
उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या दोन्ही याचिका लांबण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील याचिका लांबण्याची शक्यता आहे. उद्या विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे. एक मार्चला होणारी सुनावणी पुढे जाण्याचीही शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाच्या विरोधात पक्ष चिन्ह आणि नाव दिल्याच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. एक मार्चला म्हणजेच उद्या होणारी सुनावणी पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे.
वारंवार आवाहन करूनही वीजदेयकांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. या दरम्यान कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण झाल्यास त्यांची गंभीर दखल घेतली जाणार आहे. संबंधितावर थेट फौजदारी कारवाई करण्याचां इशारा देण्यात आलाय. गेल्या पाच महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्याचे पुणे, सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी सहा आणि सांगलीत एक असे एकूण १३ प्रकार घडले. या प्रकरणातील १९ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींच्या अटकेची देखील कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक… राजधानी दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीनंतर येत्या दोन दिवसात भाजपची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या किँवा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या 160 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा पहिल्या यादीमधून केली जाणार असल्याची सूत्रांची महिती आहे.
निलेश राणेंकडून मिळकतीचा 25 लाखाचा धनादेश पालिकेकडे जमा करण्यात आला आहे. उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला असल्याने महापालिकेने आता थकबाकी शून्य केली आहे. निलेश राणे यांच्या व्यावसायिक जागेचे तीन कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी राहिल्याने पालिकेने काल कारवाई करत मिळकत सील केली होती.
राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात. तब्बल 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी 1 लाख 80 हजार कर्मचारी करतायत काम.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 1 तारखेला होणारी सुनावणी थेट 19 एप्रिलला होणार. 19 एप्रिलला हे प्रकरण लिस्टेड दाखवण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होण कठीण असल्याचं दिसतय. आचारसंहिता लागली तर मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 200 जणांना विषबाधा झाली. नवरदेवाच्या घरी होता हळदीचा कार्यक्रम. जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने अनेकांना रुग्णालयात हलवले. 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा समावेश.
नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचारी पुन्हा संपावर. थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आज पासून संप. यापूर्वी देखील 4 वेळेस सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी केला होता संप. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्याने विद्यार्थ्यांचे हाल.
कल्याण डोंबिवली नगरपालिकेतील नगररचना विभागातील दोन कर्मचारी निलंबित झाले आहे. बांधकाम आराखड्यात फेरफार केल्या प्रकरणाच्या ही कारवाई झाली. भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल असे कर्मचाऱ्यांचे नाव आहे. गुन्ह्यात ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्याने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
राज्यातील काही भागात उद्या गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरुन बाष्पयुक्त उष्ण वारे एकत्र येणार आहेत. त्यामुळे उद्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी हलका, मध्यम पाऊस होईल. तसेच तुरळक ठिकाणी गारपीठ होण्याचा अंदाज आहे.
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जय पवार सध्या पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले आहे.
नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. मनपाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आज साधारण ३५०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. नागपूरकरांचा मालमत्ताकर वाढणार की नाही, याचा फैसला आज होणार आहे.