मुंबई, दि. 11 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात दोन्ही पवार गटाचे आज मेळावे होणार आहे. दोन वेगवेगळ्या मेळाव्यांना शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आज पुणे ते लोणावळा तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पुणे ते लोणावळा १४ लोकल गाड्यांवर परिणाम झाला आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मसुदा काढला आहे. शासनाच्या या मसुद्याला भोई समाजाने हरकत घेतली आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
वर्धा | हिंगणघाट परिसराला गारपिटीचा तडाखा बसला आहे. जवळपास अर्धा तास गारपीट झालीय. गारपिटीमुळे ग्रामीण भागात गहू, चणा, तूर आदी पिकांचे नुकसान झालंय.
मुंबई | मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या आज पुन्हा उशिराने धावत आहेत. व्रिक्रोळी येथे सिग्नल यंत्रणा बिघडल्याने मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. सीएसएमटी दिशेने येणाऱ्या जलद मार्गिकेवरिल सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 2.45 पासून झालाय बिघाड झालाय. त्यामुळे आताही लोकल उशिराने धावत आहेत. बिघाड दुरुस्त करण्यासाठी अजून अर्धा तासाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. रविवार असल्याने आधीच कमी लोकल धावत आहेत, त्यात मेगा ब्लॉक होता, त्यात हा बिघाड झालाय. कालच्या गोंधळाने प्रवासी संतापले असताना आज पुन्हा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे | पत्रकार निखिल वागळे यांना संरक्षण देणाऱ्या तरुणींनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी संध्याकाळी निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. शरद पवार यांनी तरुणींकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली .
प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना घडलेल्या प्रकारची संपूर्ण माहिती दिली.
अंतरवाली सराटी/जालना | मनोज जरांगे पाटील यांनी आरोग्य तपासणीस नकार दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी दुसऱ्या दिवशीही आरोग्य तपासनीस नकार दिलाय. उपोषणामुळे अन्न पाणी नसल्याने शरीरातील शुगर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच शरीरात अन्न पाणी आणि औषध न घेतल्याने जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. जरांगे पाटील यांच्या तपासनीस आलेले डॉक्टर भीमराव दोडके यांनी याबाबत माहिती दिली.
जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे. दुसऱ्या दिवशीही आरोग्य तपासनीस जरांगे पाटील यांचा नकार दिला आहे. शरीरात अन्न पाणी नसल्याने शरीरातील शुगर कमी होऊ शकते. तसेच शरीरात अन्न पाणी आणि औषध न घेतल्याने जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. जरांगे पाटील यांच्या तपासनीस आलेले डॉक्टर भीमराव दोडके यांनी माहिती दिली.
शाई फेकणाऱ्यांची विकृती यात दिसून येते. शाई फेकून त्यांचं कर्तुत्व आणि त्यांचे काम कोणीही झाकू शकत नाही. शाई फेकणाऱ्यांचा जाहीर निषेध त्याच्यावर योग्य कारवाई आम्ही करू. आम्हाला तो सापडला तर त्याला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत. सुमित्रा वहिनी बारामतीच्या संभाव्य उमेदवार आहेत. विरोधकांच्या पोटामध्ये हाच त्रास होत आहे. विरोधकांनी हा केवळ राग काढल्याचं रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात दिव्यांव् ठिय्या आंदोलन सुरू आहे. केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्यासमोर नारेवादी करत आंदोलन केलं आहे. शासनाकडून अधिकृत दिलेल्या टपरीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कारवाई होत असल्याने संतप्त दिव्यांगण संघटनेने आंदोलन केलं.
अत्यंत तापदायक आणि निंदाजनक ही घटना आहे. हे नालायक लोकांनी केला आहे त्याचा धिक्कार आणि जाहीर निषेध करण्यात आलाय. एखाद्या स्त्रीच्या बॅनर वर शाईफेक करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. धमक असेल तर समोरासमोर येऊन लढा पण असा नालायकपणा करू नका यांना बारामतीकर चोप देतील, अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
गोंदिया : महाराष्ट्रात असे मुख्यमंत्री असले तर अमृतकाळात आणखी सूख मिळते. प्रफुल्ल पटेल यांनीही राजकारणाची ट्रेनिंग गोंदिया येथून घेतील. शिक्षण परिवर्तनाचे सर्वात मोठं केंद्र आहे. दिल्लीत दोन प्रकारचे नेते असतात. जे जमिनीशी जुडलेले असतात आणि जे जमिनीवर काम करतात. एका क्षणात मुख्यमंत्र्यांनी २५ चे ३० कोटी केले, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी सांगितले. गोंदिया येथे मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई : मनसे 21 लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माहिती गोळा करणार आहे. राजदूत यांच्याकडून ही माहिती घेऊन ऍपवर भरली जाणार आहे. २० तारखेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करा असे आदेश मनसेच्या वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. या ऍपच्या माध्यमातून मतदारांच्या भावना मनसे जाणून घेणार आहे.
ठाणे : ठाणे गुन्हे शाखा पथकाने आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रंजीत यादव याला नगरवरून ताब्यात घेतले. आज सकाळी उल्हासनगर चोपडा न्यायालयात त्याला हजर केले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. रंजीत यादव हा 15 ते 20 वर्षापासून गणपत गायकवाड यांचा वाहन चालक आहे.
लातूर : मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षण किंवा मंडल आयोगाच्या शिफारशींना चॅलेंज करू नये असं आरपीआय नेते सचिन खरात यांनी म्हटले आहे. ओबीसीच्या आरक्षणासाठी दलित समाजानेही आपले योगदान दिलेले आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी किंवा ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू नये असं ते म्हणाले.
पुणे : पुण्यात एका व्यक्तीवर हल्ला केला. गाडीवर हल्ला केला. गाडी फोडण्यात आली याचा अर्थ असा की आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. ही लोकांना पटणारी नाही. महाराष्ट्रात या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य जागा दिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. ज्या पक्षाने हे उद्योग केले याची दखल राज्य आणि केंद्राने घ्यायला हवी होती ती घेतली नाही ही दुर्दैवी घटना आहे.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे बारामतीमध्ये वातावरण तापलंय. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे ही घटना घडलीय. अजित पवार यांच्या मराठी येथील कार्यकर्त्यांनी आपल्या शेती फार्मवर सुनेत्रा पवार यांचा फ्लेक्स लावलेला होता या फ्लेक्सवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने शाई फेक केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहाय्यक पदाचा मुंबई, छत्रपती संभाजीनगर ,नागपूर येथील सेंटरवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी टेलिग्राम चॅनलच्या ॲडमिन विरोधात छत्रपती संभाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला. मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियातून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्याप्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती.
बीडमध्ये आज धनगर समाजाचा इशारा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा अशी प्रमुख आजच्या इशारा सभेत होणार आहे. छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून धनगर समाजातील सर्वच नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
मिरजेत सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी पुष्पा स्टाईलने डान्स करून अधिकारी कर्मचारी यांची वाहवा मिळवली,सांगली महापालिका वर्धापन दिनानिमित्त कलासंगम 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यात पत्रकार निखील वागळे, वकील असीम सरोदे यांच्यावर हल्लाप्रकरणी आता पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी राजकीय गुंडांची परेड काढावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. पुणे पोलिस आयुक्त घाबरले का, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी असं कोणतं काम केलं आहे की, त्यांचं नाव आदरानं घ्यावं, असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना राज्य सांभाळणे कठिण झाले आहे. राज्याची विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घ्या, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. राज्यात सुरु असलेल्या गुंडगिरीविरोधात आम्ही आवाज उठविणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
शरद पवार गटाचा पुण्यात थोड्याच वेळात मेळावा सुरु होत आहे.शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र प्रदेश डॉक्टर सेलचा कार्यक्रम आहे. शरद पवार आरोग्यदूत अभियानाची सुरुवात शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे.आमदार रोहित पवारही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भवानी मंडप परिसरात जय्याद तयारी… थोड्याचवेळात संभाजी राजे छत्रपती अंबाबाई आणि भवानी मातेच्या दर्शनाला येणार.. भवानी मंडप परिसरातच काही वेळ संभाजीराजे शुभेच्छा स्वीकारणार
19 फेब्रुवारीला आग्रा येथे साजरी होणार शिवजयंती… लाल किल्ल्यात साजरी केली जाणार शिवजयंती… मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांची माहिती.. सलग दुसऱ्या वर्षी लाल किल्ल्यात साजरी केली जाणार शिवजयंती…पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण
राज्यात गोळीबाराच्या घटनेनंतर नेत्यांच्या सुरक्षेत वाढ… महत्वाच्या नेत्यांचा ताफा जाताना पोलिसांसोबत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही तैनात असणार.. मुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या मंत्र्यांना ही सुरक्षा देण्यात आलीये… पोलीस प्रत्येक महत्त्वाच्या सिग्नलवर आणि चेक पॉइंटवर उपस्थित राहणार. त्यासोबतच नेत्यांच्या मंत्र्यांच्या ऑफिस बाहेरही मेटल डिटेक्टर लावण्यात येणार… महाराष्ट्रात वाढलेल्या गोळीबारीच्या घटनेनंतर गृहमंत्रालय ॲक्शन मोडमध्ये
सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य करणं अभिनेता विद्युत जामवाल याला पडलं महागात, पोलिसांनी केली अटक, नक्की काय आहे पूर्ण प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्युत जामवाल याचीच चर्चा… वाचा सविस्तर
मध्य रेल्वेच्या आज पुणे विभागात पुणे ते लोणावळा तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. पुणे ते लोणावळा १४ लोकल गाड्यांवर परिणाम झाला आहे. १४ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे या मार्गावरील गाड्यांचा समावेश आहे.
बातमी रत्नागिरीतून… आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आंबा मोहर संरक्षण समितीचे ४८ गावात सर्वेक्षण झालं आहे. प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्यात आला आहे. औषध फवासणीसोबत खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे.
निखिल वगळेंना संरक्षण देणाऱ्या राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. शरद पवार आज आरोग्यदूत अभियानाची सुरुवात करणार आहेत. त्या कार्यक्रमात हा सत्कार केला जाणार आहे. युवती पदाधिकाऱ्यांना पण मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्या मुलींचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. आज मनसे कार्यलयात कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भेटण्याची शक्यता आहे. उद्यापासून दोन दिवस राज ठाकरे ग्रामीण भागात असणार आहेत. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्ते गाठीभेटी व कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
जळगावच्या निंभोरा सिम इथल्या कानिफनाथ यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. अडीचशे वर्षांपासून सुरू असलेली कानिफनाथ यात्रेची परंपरा आजही कायम आहे. खानदेश मध्य प्रदेश विदर्भातील भाविक कानिफनाथ महाराज आणि गुरुदत्त मंदिरात दर्शन घेत आहेत. सकाळपासून या ठिकाणी भक्तिमय वातावरण असून भाविक दर्शन घेत आहेत. उत्सवात संपूर्ण गावात काठी काढून मिरवणूक काढण्यात विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत असतात. पंचक्रोशीतील भाविक या यात्रा उत्सवात सहभागी होत असतात.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुण्यात दाखल झाले आहे. शनिवारी रात्री पुणे विमानतळावर भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. योगी आदित्यनाथ आज आळंदीत भक्तीउत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गोळीबार, पत्रकार यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करून दोन धर्मीयांमध्ये तणाव पसरवला जात आहे. वाढती गुन्हेगारी आणि वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत नाशिकच्या बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करत गृहमंत्री फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पुण्यात आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे होणार आहे. एकीकडे अजित पवारांची तर दुसरीकडे शरद पवार यांची उपस्थित असणार आहे. अजित पवार गटाचा युवा मेळावा तर शरद पवार गटाचा संजीवनी आरोग्य मित्र प्रदेश डॉक्टर सेलचा कार्यक्रम कार्यक्रम आहे.
राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मसुदा काढला आहे. मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य आहे. त्यांच्या या मसुद्याला भोई समाजाने हरकत घेतली आहे. तसेच राज्यातील ओबीसी भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करणार आहे.