मुंबई | दि. 11 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष आणि चिन्हचा वादवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोध शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. भाजप आणि काँगेस दोन्ही पक्षांच्या केंद्रीय निवडणुक समित्यांची बैठक आज होणार आहे. यामध्ये जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार आहे. आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दौऱ्यावर असताना यांची भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा शांतीगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची भाजप मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभेच्या उमेदवारांबाबत अतिशय महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.
गांधीनगर | गुजरातच्या गांधीनगर येथे भूकंपाचे झटके जाणवले आहे. या झटक्यांची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल होती, अशी माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली | CAA अंतर्गत 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान, बांगलादेशातून धार्मिक आधारावर छळ करून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व दिले जाईल. या तीन देशांतील लोकच नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
नवी दिल्ली | भाजप मुख्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी फडणवीस पोहचले आहेत. फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे,चंद्रशेखर बावनकुळे,सुधीर मुनगंटीवार,आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटीलही आहेत.
नवी दिल्ली | या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीएए अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट अखेर देशभरात लागू करण्यात आला आहे.
अमरावती | आमदार बच्चू कडू यांची भाजपवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. कडू यांनी जागावाटपावरुन ही नाराजी व्यक्त केलीय. आम्हाला एकदा दिल्लीत बोलवल नंतर चर्चा करायला बोलवल नाही. भाजपला आमची गरज नसेल मात्र आम्ही पण जागा लढवू. तसेच जिथे वाटेल तिथे निवडणूक लढवू, असं कडू यांनी म्हटलं. तसेच त्याना आमचा पक्ष छोटा वाटत असेल मात्र महायुतीच बंधन आमच्यावर नाही. मी अमरावतीच्या सगळ्या लोकांना आवाहन करतो की शांतता महत्त्वाची आहे. मी कोणाच्या बाजूने बोलतोय अस न होता शांतता महत्त्वाची आहे, असंही कडू म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, प्रचंड बहुमत मिळवून त्यांचा (भाजप) संविधान बदलण्याचा मानस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे कोणतेही योगदान नाही. तिरंग्यालाही त्यांनी विरोध केला.
अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी चाचणी पार पडली. पंतप्रधान मोदींनी मिशन दिव्यस्त्रासाठी डीआरडीओचे अभिनंदन केले.
Proud of our DRDO scientists for Mission Divyastra, the first flight test of indigenously developed Agni-5 missile with Multiple Independently Targetable Re-entry Vehicle (MIRV) technology.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2024
दिल्ली उच्च न्यायालयाने आपचे आमदार अमानतुल्ला खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यापूर्वी त्यांचा जामीन अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळला होता. ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान कोणती मोठी घोषणा करणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इस्रो, सीएए किंवा निवडणुकीबाबत काही घोषणा करतात का? याकडे लक्ष लागून आहे.
CAA नियम अधिसूचित करण्यासाठी केंद्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकार देशात CAA लागू करणार आहे. सूत्रांकडून असा दावा केला जात आहे की, गृह मंत्रालय आज रात्री CAA नियमांची अधिसूचना जारी करू शकते.
हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. हरियाणातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दुष्यंत चौटाला दिल्लीत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH दिल्ली: हरियाणा के उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा के आवास से रवाना हुए। pic.twitter.com/7faODU3VQf
— ANI_HindiNews (@AHindinews) March 11, 2024
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित होते.
बुलडाण्याची जागा ही आमचीच आहे त्यामुळे ती मागण्याचा प्रश्नच नाही. जर काही लोकांनी सर्व्हे केला असेल आणि २५ लाख मतदार असतील आणि पाच लाख नकारात्मक असतील तर त्याला नकारात्मकता म्हणता येत नाही. त्यांच्या (भाजपा) सर्व्हेला काही महत्त्व नाही असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
शिरूर : जागा वाटपाबाबत जे निर्णय घेणारे होते, जागा देणारे होते ते आज दिल्ली वाऱ्या करत आहेत. गद्दारी तत्त्वाशी असेल तरी ते लोकांना आवडत नाही. अस्वस्थ असणारे अनेक जण आहेत. त्यामुळे पवार आणि लंके याच्या भेटीत काय घडलं मला माहित नाही. वडिलांना त्रास होतो तेव्हा ठामपणे सगळे उभा रहातात. पवार साहेब यांना जेव्हा घेरल जातंय तेव्हा सामन्य माणूस पवार साहेब सोबत आहेत याकॅह प्रत्येक आमदारांनी विचार केला पाहिजे असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
मुंबई : उद्धव ठाकरे यांची जी अवस्था झाली त्याचे वाईट वाटतंय. उद्धव ठाकरे यांच्या फायनान्स पार्टनरने त्यांची साथ सोडली. गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराचे टेरेरिझम सुरू होत ते आम्ही संपवलं आहे. आता कोणी कुठेही आला असेल तरी राज्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. किरीट सोमय्या यांचे काम असेच सुरू राहणार. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दिले त्यामुळे ही उद्धव ठाकरेंची दहशत संपवली आहे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिला.
चंद्रपूर : चेंनिथला यांच्यासोबत मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, त्यांनी कुठलंच आश्वासन दिलं नाही, काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही. मला कुठले निर्देश नसले तरी माझी तयारी सुरू आहे. मला निवडणूक लढवायची आहे. आमच्या पक्षात भाजपच्या पेरोलवर चालणारे काही लोक आहेत. ते स्वतः भाजपमध्ये जाणार आहेत. पण, मी भाजपमध्ये जाणार हे आमच्याच पक्षातील लोकांनी भाजपच्या सांगण्यावरून अफवा पसरवल्या आहेत. मात्र, मी काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार आहे असे प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले.
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणीत शक्ती प्रदर्शन केले. पोखरणी येथून परभणी सभास्थळापर्यंत रासपकडून चार चाकी वाहनांची रैली काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीआधी जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात शक्ती प्रदर्शन केले.
सिंधुदुर्ग : ईडीच्या तुरुंगाचा धाक दाखवून प्रामाणिक कार्यकर्त्याला सतवलं जातंय. पण, त्यांच्या कुटुंबाला देखील तुरुंगात टाकण्याची भीती निर्माण केली जाते. त्यावेळेला दुर्दैवाने अशा पध्दतीचा निर्णय घ्यावा लागतो. रवींद्र वायकर हे ईडीचे बळी ठरले आहेत असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. गद्दार आणि बेईमान तानाजी सावंतला उध्दवजींवर बोलण्याचा अधिकार नाही अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी मेळाव्याला सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पवार, बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, शेकापचे नेते जयंत पाटील यांचे व्यासपीठावर आगमन झाले.
सांगलीत पाणी टंचाईवरुन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेत आंदोलन केले.
देवेंद्र फडवणीस किती दिवस दडपशाही करतात ते बघूया, मराठ्यांच्या लेकरांसाठी गुलाल उधाळल्या शिवाय आपण शांत बसणार नाही. आता सर्वात मोठी सभा घेणार असून त्याला परभणीच्या सर्वांनी यायचे असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी परभणीत आवाहन केले आहे.
काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी कागदपत्रांची माहिती दिली जात नसल्याने शहर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सतीश उगीले यांच्या दालनात झोपून आंदोलन केले.
शाळेचं उदघाटन झाल्याचं जाहीर केलं. नगरसेवक कोणी नसताना बिल्डिंग तयार झालीय. भूमिपूजन ही मी केलं होतं. काही मूर्ख लोक रावणाच्या भूमिकेत आलेत मी कोणाला घाबरत नाही, असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारचा सुटलेला स्थगिती देणारा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाला मागितली होती स्थगिती
निवडणूक काळात दिलेली तीन आश्वासन दिली होती. तीन आश्वासन पूर्ण केल्याचा दावा
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा उपोषणाला आज पाचवा दिवस. आतापर्यंत 14 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आक्रमक..
मागे जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा शिवसेनेने जिंकलेले सर्व 18 जागा आम्हाला मिळाले पाहिजे ही आमची मागणी होती. राज्यात अद्याप महायुतीच्या जागा जाहीर झाले नाहीत. नाशिक सह शिवसेनेच्या सर्व विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार, असे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले.
नांदेड जिल्ह्यात सध्या केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या महिनाभरात केळीचे दर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलने घसरले आहेत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा व्यापारी निम्म्या भावानं केळी खरेदी करत आहेत. त्यामुळं सरकारनं केळीला हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा पुरंदर तालुक्यात संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी निश्चित मानली जात असताना जय पवार आज पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत लोकांच्या भेटी गाठी घेणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपच्या पदाधिकारी ॲड ललिता पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा उपस्थित ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
बेळगाव मध्ये जय महाराष्ट्र म्हणायला विरोध करणाऱ्या उद्योजकाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा दणका. श्रीकांत देसाई या उद्योजकाच्या फलकाला फासलं काळ. देसाई यांच्या शिनोळी येथील कंपनी कार्यालया बाहेरील फलकावर गद्दार असा केला उल्लेख, तर गेटवर जय महाराष्ट्र असा लिहीला मजकूर.
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर जय महाराष्ट्र म्हणवाच लागेल, शुभम शेळके यांचा इशारा.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपच्या पदाधिकारी ॲड ललिता पाटील आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा हस्ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार. दोन दिवसापूर्वी ललिता पाटील यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ललिता पाटील काही वेळात अधिकृतपणे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार.
कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव याचा आनंद आहे , अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी गेमचेंजर ठरेल.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा दक्षिण भारत दौरा. दक्षिण भारतामधून मोदींचा प्रचार सुरु होणार
15 ते 19 मार्च दरम्यान मोदींचा तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये दौरा होणार आहे.
वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत 1 हजार उमेदवारी अर्ज भरण्याचा इशारा… मराठा आरक्षण आंदोलक विनायक पाटील यांनी इशारा देत वाराणसीत करणार आत्मक्लेश आंदोलन… मराठवाड्यातील हैद्राबाद गॅझेट स्वीकारून सरसकट कुणबी मराठा आरक्षण देण्याची मागणी… आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करुन करणार…
निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रकरण कोर्टात… आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात… पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय समिती नेमणार निवडणूक आयुक्त… या नियुक्तीला वकील जया ठाकूर यांच्याकडून आव्हान देणारी याचिका दाखल
95 टक्के कारवाई ही विरोधी पक्षातील लोकांवर झाली आहे… 2004 ते 2014 मध्ये फक्त 26 टक्के कारवाया झाल्या आहेत… आज राजकीय सुडापोटी ईडीची कारवाई केली जातेय… निवडणुकीला उभं राहू नका अशा धमक्या दिल्या जातात… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
ईडीने जप्त केलेल्या कन्नड कारखान्यावर रोहित पवार दाखल… कामगार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी रोहित पवार साधणार संवाद… कारखाना परिसरात रोहित पवार समर्थकांची जोरदार बॅनरबाजी… कारखाना ईडीने जप्त केल्यानंतर रोहित पवार पहिल्यांदा कारखान्यावर दाखल
रोहित पवारांवरील ईडी कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया, यंत्रणांचा वापर करुन सरकारचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न… इतर राज्यांमध्येही मंत्र्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर… शरद पवार यांचं वक्तव्य
पुण्यातील तळजाई फॉरेस्टमध्ये वनविभागाकडूनच झाडांची सरसकट कत्तल? पर्यावरण प्रेमींनी वनरक्षक आणि वृक्षतोड ठेकेदाराला घेराव घातला आहे. वृक्षतोड केलेले तीन ट्रक पर्यावरण प्रेमीनी थेट पोलीस ठाण्यात नेलं. वनविभागाला फक्त ग्लिसरेडीया हे झाड तोडण्याची परवानगी असताना ठेकेदाराने सरसकट कत्तल केल्याचा स्थानिक वृक्षप्रेमींकडून गंभीर आरोप करण्यात आलाय. तर वन विभागाकडून नियमानुसारच वृक्षतोड केल्याचा दावा करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता हरियाणातील गुरुग्रामला पंतप्रधान भेट देणार आहेत. देशभरात पसरलेल्या सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. मोदी सरकारचा महत्वाचा प्रकल्प मानलेल्या द्वारका एक्सप्रेस वेच्या हरियाणा विभागाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामुळं गुरुग्राममधील मानेसरपासून दिल्लीतील द्वारकापर्यंत जाण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागणार आहेत. पंतप्रधान मोदी हे प्रचार सभेला देखील संबोधित करतील.
अमरावतीत विदर्भातून आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. 50 पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी आमरण उपोषनाला बसले आहेत. आमरण उपोषण करणाऱ्या 14 वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालावली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला. तसेच सरकरी नोकरी देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. यापूर्वीही या शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर लॉंग मार्च काढला होता. याच शेतकऱ्यांनी अडवला अजित पवार यांचा ताफा होता.
जी एन साईबाबा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा यांना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायधिश बी आर गवई आणि न्यायधिश संदीप मेहता यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
पुण्यातील दोन व्यापारी पोलिसांच्या रडारवर. दोन व्यापाऱ्यांमार्फत आजवर ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया ड्रग प्रकरणातील पैशांचे व्यवहार करत असल्याची माहिती उघड. संदीप धुनियाच्या दुसऱ्या प्रेयसीच्या चौकशीतून या दोन व्यापाऱ्यांबद्दलची माहिती उघड झाली. इतकंच नाही तर या प्रकरणात दिल्लीतील तीन जण संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष असतं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या निवडणुकीकडे. तब्बल चार वर्षांनंतर निवडणूक जाहीर झाली आहे. 22 मार्चला होणार मतदान. 24 मार्चला होणार मतमोजणी. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कुणाचा होणार?. लोकसभा निवडणुकीपूर्वी JNU ची निवडणूक. तरुण वर्गासाठी महत्त्वाची निवडणूक.
धावत्या ट्रॅव्हलवर अज्ञाताने गोळीबार केला. चालकाच्या दिशेने केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा जवळ रात्री उशिराची घटना. अमरावतीवरून नागपूरकडे ट्रॅव्हल जात असतांना गोळीबार. पहाटेपर्यंत पोलिसांची नाकाबंदी. गोळीबार का करण्यात आला याच कारण अस्पष्ट. जखमीवर तिवसा रुग्णालयात उपचार सुरू. तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
निवडणूक रोख्याबाबत दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्याबाबत निकाल देताना SBI ला सर्व माहिती 6 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र SBI ने ती माहिती सादर करण्यासाठी कोर्टाकडे 30 जून पर्यंतचा वेळ मागितला होता. कोर्टाच्या निकालानंतर देखील ही माहिती सादर न करणे म्हणजे हा कोर्टाचा अपमान आहे, अस म्हणत याचिकाकर्ते ADR ने ही अवमान याचिका दाखल केली होती. कोर्ट आज काय निर्देश देत हे पाहणे महत्वाचं.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होळी सणाच्या निमित्ताने मध्य आणि कोकण रेल्वेने ११२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. गाड्यांचे आरक्षण रविवारपासून खुले झाले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम साप्ताहिक (६ फेऱ्या), पनवेल ते सावंतवाडी (६ फेऱ्या), एलटीटी ते थिविम (६ फेऱ्या), पनवेल ते थिविम (१४ फेऱ्या) एलटीटी ते वाराणसी साप्ताहिक (६ फेऱ्या), एलटीटी ते दानापूर (६ फेऱ्या), एलटीटी-समस्तीपूर साप्ताहिक (४ फेऱ्या), एलटीटी ते प्रयागराज (१२ फेऱ्या), एलटीटी ते गोरखपूर साप्ताहिक (६ फेऱ्या) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर साप्ताहिक (६ फेऱ्या) चालवण्यात येणार आहे. उर्वरित पुणे विभागातून कोकणासह उत्तर भारतासाठी ही रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे.
देश व राज्यासमोर अमली पदार्थ हे मोठे संकट उभे राहिले आहे. विविध पोलीस आयुक्तालयाने अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई केली आहे. मात्र काही घटनांमध्ये पोलीस या नशेच्या व्यापारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सामीत असल्याचे समोर आले आहे. यापुढे नशेच्या व्यापारात पोलिसांचे संबंध आढळल्यास त्याचे निलंबन करण्याचा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.
निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांची आज बैठक होणार आहे. बैठकीत लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. सकाळी 10 वाजता विज्ञान भवनात बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरांत मार्च महिन्याच्या सुरुवातीस थंडी पडली होती. संपूर्ण फेब्रुवारी उकाड्याच्या जाणिवेने गेल्यानंतर मुंबईकरांना मागील काही दिवस दिलासा मिळाला होता. दरम्यान, पुढीत दोन दिवस पहाटे गारवा जाणवेल, तर दुपारी उष्ण हवामान राहील.