जामनगर | दि. 5 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ५ आणि ६ मार्च रोजी संभाजीनगर, अकोला, जळगाव आणि मुंबईमध्ये असणार आहे. यावेळी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात सकल मराठा समाज पुन्हा एकत्र आला. पुण्यातील कोथरुड चौकात एकत्र येतं सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरात रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांचा पैसे भरावे लागणार असल्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेत मनसे कडून अनोखे आंदोलन करण्यात आले. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुणे | रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर अखेर मेट्रो धावणार आहे. उद्यापासून या मेट्रो मार्गावर मेट्रो धावणार आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे ऑनलाईन उदघाटन होणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी एकूण 5.5 किमीचा मेट्रो मार्ग आहे. या मेट्रो मार्गामुळे वाहतूककोंडीतून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी दिल्ली | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 7 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. आता या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
संभाजीनगर | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. जळगावमधील सभा आटोपल्यानंतर गृहमंत्र्यांची संभाजीनगरात सभा पार पडणार आहे. अमित शहांच्या भेटीसाठी नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हॉटेल रामामध्ये दाखल झाले आहेत.
मुंबई | टीएमसी आमदार रामेंदू सिन्हा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राम मंदिरासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात आरामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ते म्हणाले होते, राम मंदिर हे अपवित्र ठिकाण आहे. येथे कोणत्याही हिंदूने पूजा करू नये.
गांधीनगर | गुजरातमधील ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडिया, अंबरिश डेर आणि इतरांनी काल काँग्रेसचा राजीनामा दिला होता. या सर्वांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
जळगाव | मी येणाऱ्या 2024च्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आलो आहे. मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक आहे, असं वाटत आहे, तर या भ्रमात राहू नका. २०४७ मध्ये भारत विकसित करण्यासाठी आणि आत्मनिर्भर करण्यासाठीची ही निवडणूक आहे. २०४७मध्ये या मंचावरील लोक असतील नसतील. पण समोरचे तरुण २०४७मध्ये असतील. त्या विकसीत भारतात हे लोक असतील. भाजपला मतदान करणं म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीचं मतदान असेल.
कोलकाता : न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी अकाली दल एकत्र आले आहेत. शिरोमणी अकाली दल युनायटेडचे अध्यक्ष सुखदेव सिंह धिंडसा यांनी आपला पक्ष अकाली दलात विलीन केला आहे. सुखदेव सिंह धिंडसा हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. सुखबीर बादल यांच्यामुळे नाराज होऊन त्यांनी अकाली दलापासून वेगळे होऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि भाजपसोबत युतीही केली.
बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल. अमित शहा मोदींना महाराष्ट्रात यावं लागत कारण त्यांना लोकांची भीती आहे. बारामतीची जनता ही पवारांच्या आणि विचारांच्या पाठीशी राहिल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावरील युवा संमेलन कार्यक्रम स्थळाकडे अमित शहा यांचा ताफा रवाना झाला आहे. अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती आहे. गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. क्रांती चौकातील ऐतिहासिक पुतळ्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आमदार निलेश लंके यांचं सूचक विधान राजकारणात अजून बरेच पुलाखालून पाणी वाहून जायच आहे. राजकारणात कधी काहीही होतं. मात्र जर प्रस्ताव मागितला तर मी नेतृत्वाला सांगेन की जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी. जर पक्षाने संधी दिली तर मी जबाबदारी पार पाडेन, मात्र अजून बरेच काही व्हायचं आहे. अमोल कोल्हे यांनी काय ऑफर दिली माहिती नाही. मी आता अजित पवारांच्या नेतृत्वात काम करतोय. आम्ही केलेलं नियोजन आवडल असाव त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलं असावं असं निलेश लंके म्हणाले.
अडीच वाजता अमित भाई जळगावात येणार आहेत. तीन सभा होणार आहेत, जळगावात युवक युवती संवाद होणार आहे मोठ्या संख्येने युवा पिढी जमणार आहे. इथे मेळावा आहे, लोकसभा 4 5 दिवसात लागेल, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे, यशोमती ठाकूर, मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे हे उपस्थित होते.
सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा. सभेसाठी लाखो लोक उपस्थित राहण्याचा अंदाज
थोड्याच वेळात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५६ वी बैठक व संत ज्ञानेश्वर उद्यान जिर्णोध्दार शिखर समितीची बैठकीत राहणार उपस्थित
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दिग्गज अभिनेते नाना पाटेकर सरकारवर संतापले आहेत. आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणतं करायचं हे ठरवा, असं ते शेतकऱ्यांना म्हणाले. आमच्या पिढीसमोर तुम्ही कोणता आदर्श ठेवता, असा सवाल त्यांनी केला.
तेलंगणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणामधील जाहीर सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “घराणेशाहीमधील लोक तरुणांना घाबरतात, घराणेशाही पक्षांनी आपल्या तिजोऱ्या भरल्या, त्यांनी आपल्यासाठी शीशमहल तयार केले. मी इमानदार तरुणांना पुढे आणत आहे. मी माझी नाही तर गरीबांची घरं तयार केली. घराणेशाहीमधील लोकांनी जमीन आणि आकाश विक्रीला काढलं. माझा विरोध व्यक्तीला नाही घराणेशाहीला आहे”, असं मोदी म्हणाले.
नवी दिल्ली- भाजपच्या ‘मोदी का परिवार’ या थीमवर टीका करण्यात आली होती. नव्या संसदेजवळ काँग्रेसने पोस्टर्स लावले होते. हा आहे मोदींचा परिवार अशा पद्धतीची टीका करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी पोस्टर्स तात्काळ हटवले आहेत. उद्योगपतींचे फोटो लावून मोदी परिवारावर टीका केली होती.
धुळे- जळगाव इथल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी धुळ्याहून हजारो युवक रवाना होणार आहेत. जळगावसाठी 500 खाजगी वाहनं आणि 5 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी वाहनांतून हजारो तरुण तर बसमधून युवती जळगाव युवा संमेलनासाठी रवाना होणार आहेत.
इस्रायल – लेबनॉन सीमेजवळ एका भारतीय तरुणाचा मृत्यू… अन्य दोन तरुण गंभीररीत्या जखमी… अँटी टँक मिसायल हल्ल्यात जीवितहानी… तिघेही तरुण केरळमधील असल्याची माहिती समोर…
धुळे शहरात खासदार सुभाष भामरे यांच्या वतीने बॅनरबाजी… लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी… विविध विकासकामांचे लावले शहरात बॅनर… मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात… धुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला अक्कलपाडा योजना सुरू…
कंत्राटी वीज कर्मचारी आज पासून संपावर… विविध मागण्यांसाठी जात आहे संपावर… नागपूरच्या संविधान चौकात करणार आंदोलन
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दुकानाला भीषण आग… बॅटरी आणि इन्व्हर्टरमुळे दुकानाला लागली आग… बस स्थानकाजवळील भंडारी इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला भिषण आग…आगीत लाखो रूपयांचा माल जळून खाक… अग्निशमनकडून आग विझवण्याचे शर्थाचे प्रयत्न सुरू
नाशिकमध्ये हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा निघाल्याने आंदोलन आठ दिवसानंतर मागे घेण्यात आले.
कोल्हापूर मधून छत्रपतींनी निवडणूक लढवावी अशी आमची तिन्ही पक्षांची भूमिका आहे, ते ठरवतील कुठून लढायचे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. तर देशाचे मोठे नेते महाराष्ट्रात आहेत, भावी पंतप्रधान नितीन गडकरी असे असताना भाजपच्या यादीत त्यांच्या नाव नाही हे चिंतेचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे. म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे. आमचेच काही आमदार आहेत. माझी माहिती त्यांना पुरवीत आहेत. आज त्यांचं नाव मी घेणार नाही. असे 36 आमदार आहेत.कितीही दबाव येवू द्या, मराठा एक इंच देखील मागे हटणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मालवणी पोलिसांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या संयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यात भाजप नेते नितीश राणे सहभागी झाले होते.पोलीस सूत्रांनी सांगितले की, आयोजक भगवान ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन आयोजित केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणात योगेश सावंत याने हायकोर्टात धाव घेतली आहे. पोलीस कोठडी सुनावण्याच्या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सरकारने आमची फसवणूक केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. सत्तेत मी काटा आहे. मला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल तयार झाला आहे. न टिकणारे दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल सुरू आहेत, असे ते म्हणाले.
आजची सभा ही लोकसभा प्रचाराची पहिली सभा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले. 45 जागा जिंकण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर साठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. छत्रपती संभाजी नगरचा खासदार हा महायुतीचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भातील सहा लोकसभा मतदार संघासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी अकोल्यात अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली क्लस्टर बैठक होत आहे. या बैठकीत या सहा जागांवर मंथन होईल. या बैठकीला झाडून भाजपचे वरिष्ठ हजर असतील.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. योगी आदित्यनाथ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पाच नवीन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी पाच वाजता लखनऊच्या राजभवनामध्ये शपथविधी पार पडणार आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे दहा मार्चला उद्घाटन होणार आहे. कोल्हापूर पुण्यासह जबलपूर आणि ग्वाल्हेर विमानतळाच्या टर्मिनलंचही उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहात चार ही त्यांच्या टर्मिनल इमारतींचे लोकार्पण करणार आहेत. तर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळाची पाहणी केली होती. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रयत्न सुरू होते.
भावना गवळी समर्थकांची यवतमाळच्या दारव्हा शहरात पोस्टरबाजी पाहायला मिळत आहे. संजय राठोडच्या मतदार संघात भावना गवळी यांचे पोस्टर लागले आहेत. ‘आम्हाला पराभवाची भिती नाही कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय’, असा मजकूर या पोस्टरवर पाहायला मिळतोय. मत पुछ मेरे नाम की पहचान कहा तक है , तू बदनाम कर ‘तेरी ओकात जहा तक है, अश्या आशयाचे बॅनर लागले होते. हे बॅनर नगर परिषदने रात्रीत काढून टाकले. नेमकी पोस्टरबाजी कोणासाठी ह्या चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये रस्ता पार करताना बिबट्याला वाहनाची जोरदार धडक झाली आहे. या धडकेत बिबट्या जखमी झाला आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील आदासा गणपती मंदिर परिसरात जवळची घटना आहे. जखमी झालेल्या बिबट्या बराच वेळ रस्त्यावर दुचाकीखाली पडून होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केले.
रस्ता पार करताना बिबट्याला वाहनाची जोरदार धडक. धडकेत बिबट्या जखमी. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील आदासा गणपती मंदिर परिसरात जवळची घटना. जखमी झालेल्या बिबट्या बराच वेळ रस्त्यावर दुचाकीखाली पडून. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केले.
कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून कोल्हापूरची निवडणूक लढवणार. शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरच्या जागेचा दावा सोडला. कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाला आता सांगलीची जागा मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती.
अर्ध्याहून अधिक जानेवारी थंडीच्या प्रतिक्षेत व फेब्रुवारी उकाड्यात गेल्यावर आता ऐन मार्चमध्ये मुंबईत थंडी जाणवू लागली आहे. मुंबईत 2020 नंतर मार्चमधील नीचांकी किमान तापमानाची नोंद काल झाली. काल कुलाबा येथे 19 तर सांताक्रुझ येथे 17.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलनात अडकलेल्या नागपूरच्या 60 विद्यार्थ्यांना अनिल देशमुखांचा मदतीचा हात. सहलीसाठी गेलेले नागपुरातील एका खासगी कॉलेजचे 60 विद्यार्थी जम्मू काश्मीर राज्यातील संगदलन (जि.रामबाण) येथे भुस्खलन झाल्यामुळे अडकून पडले होते. विद्यार्थ्यांनी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख याच्या सोबत संपर्क साधला. अनिल देशमुख यांनी तत्काळ त्या भागातील त्यांचे मित्र, माजी आमदार यावर अहमद मीर यांना संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले.
मुंबईतील अंधेरी, वरळी आणि विक्रोळी येथील तरण तलावांची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ६ मार्च २०२४ पासून सुरू होत आहे. या तरण तलाव मध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना शुल्कामध्ये सवलत असेल तर महिलांसाठी विशेष बॅच असणार आहे.
भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शहा विदर्भ आणि मराठवाड्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सुरुवातीला अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळच्या सत्रात संभाजीनगरमध्ये अमित शहांची जाहीर सभा होणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निलंबित करण्यात आलेल्या सुभाष चौधरी यांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण अंतिम निर्णय मात्र राखून ठेवण्यात आला.सुभाष चौधरी यांच कुलगुरू पदावरून निलंबन झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निलंबनाविरोधात धाव घेतली होती.
राज्यातील सहकारी संस्थांमध्ये सहा महिन्यानंतर अध्यक्षाच्या विरोधात संचालकांना अविश्वास ठराव आणता येत होता. मात्र सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा सहकारी बँकेत अभय देण्यासाठी सरकारने हा कायदा बदलला. किमान दोन वर्ष अविश्वास ठराव आणता येणार नाही असा सरकारने कायदा मंजूर केला. सरकार सत्तेचा असा पाशवी वापर करत आहे, असा खळबळजनक आरोप कराड पाडळी येथे कार्यक्रमात माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला.