Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित, 211 जणांना डिस्चार्ज

| Updated on: Sep 27, 2021 | 1:12 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित, 211 जणांना डिस्चार्ज
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Sep 2021 08:03 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित, 211 जणांना डिस्चार्ज

    पुणे :
    दिवसभरात १३४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
    – दिवसभरात २११ रुग्णांना डिस्चार्ज.
    – पुण्यात करोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.
    – १८२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५००३८५.
    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४७३.
    – एकूण मृत्यू -९०२०.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८९८९२.
    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८६९४.

  • 26 Sep 2021 08:01 PM (IST)

    जळगावात शिक्षक सन्मान सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन

    जळगावात शिक्षक सन्मान सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन

    महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळ्याचे केले होते आयोजन

    सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित, पण कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हते, सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, शासन म्हणते कोरोना नियम पाळा मात्र, शिक्षकांना नाही नियमांचे गांभीर्य


  • 26 Sep 2021 05:56 PM (IST)

    महापालिकेत आपल्याशिवाय कुणाचा महापौर होता कामा नये : संजय राऊत

    संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :

    -ठाकरे सरकार आहे त्यात आमच्या महिला ह्या ठोकरे सरकार आहे

    -मुख्यमंत्री दिल्लीला गेले, अनेकांनी देव पाण्यात ठेवले, काय होतं काय नाही आणि ते पुन्हा आले, अमित शाहांना देखील भेटले, शासकीय चर्चा झाली, हे सरकार आणखी तीन वर्षे चालेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आणि 2024 देखील ते मुख्यमंत्री असतील

    -विरोधीपक्षाने काय काम केलं पाहिजे त्याच्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारू

    -कितीही आपटले तर ठाकरे यांचा बाल भी बाका करू शकत नाही

    -बऱ्याच गोष्टी आहेत पण महापालिकेत 10 नगरसेवक, पण ही परिस्थिती बदलणार ,आपण एक आकडा लावायचा, आपल्या शिवाय कुणाचा महापौर होता कामा नये

    -अजित पवार पालकमंत्री आहेत, शरद पवार त्यांच्याबरोबर रीतसर बोलणी करू, आघाडी झाली तर ठीक नाही तर ऐकला चलो रे

    -आजच्या मेळाव्याला निलम गोऱ्हे आल्या, पुण्यातील गटबाजीवरून टोला

    -चंद्रकांत दादा म्हणाले माजी म्हणून नका, मी नाही म्हणार कारण आमची मैत्री आहे त्या मैत्रीमुळे मी सव्वा रुपयांचा दावा लावलाय, चंद्रकांत दादा म्हणतात तुमची किंमत एवढी कमी कशी, मी एक सांगतो मी सव्वा रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही कारण मी कोर्टात कुठलीही केस हारत नाही

    -गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही होऊ शकत?

    -स्त्री चणचल नाही पण राजकारण चणचल आहे हे लक्षात ठेवा ,बाळासाहेबानी महिलांचा कायम सन्मान केला

  • 26 Sep 2021 05:50 PM (IST)

    भाजप नगरसेवक राम बारोट यांचे निधन

    भाजप नगरसेवक राम बारोट यांचे निधन झाले

    राम बरोट सलग सहा वेळा भाजपकडून नगरसेवक राहिले आहेत, सध्या ते मालाड पूर्व प्रभाग क्रमांक 45 मधूनही नगरसेवक होते, ते मुंबईचे उपमहापौरही राहिले आहेत.

    ते गेल्या दीड दोन वर्षांपासून या आजाराशी झुंज देत होते, आज दुपारी त्यांचे अचानक निधन झाले

  • 26 Sep 2021 05:00 PM (IST)

    दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत दाखल

    दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत दाखल

    अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मुंबईत दाखल

  • 26 Sep 2021 04:49 PM (IST)

    बीडचे माजलगाव धरण 100 टक्के भरले, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    बीड:

    माजलगावचे धरण 100 टक्के भरले

    प्रशासनाकडून धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    धरणाचे 11 दरवाजे उघडले

    67 हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू

    15 वर्षात सलग तिसऱ्यांदा धरण ओव्हरफ्लो

    बीड जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

  • 26 Sep 2021 04:47 PM (IST)

    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप

    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप

    औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले

    रावसाहेब दानवे रस्त्याच्या ठेकेदाराला त्रास देत असल्याचं खुद्द गडकरींनी मला सांगितलं असल्याचा चंद्रकांत खैरे यांचा दावा

    रावसाहेब दानवे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना औरंगाबाद-जळगाव रस्ता होऊ दिला

    भाजप खासदरच रस्त्याचा ठेकेदार होता तरीही रावसाहेब दानवे यांनी त्रास दिला

  • 26 Sep 2021 03:44 PM (IST)

    बीडमध्ये बैलगाडी शर्यत आयोजित करणाऱ्या 11 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

    बीड : बैलगाडी शर्यत आयोजित करणाऱ्या 11 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

    बंदी झुगारून शर्यत आयोजित केल्याने गुन्हा दाखल

    नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल

    शिवसेना आणि भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल नाही

    बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी केले होते

    इमामपुर गावात बैलगाडी शर्यत झाली होती

    राजकीय लोकांची उपस्थिती असतानाही केवळ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य

  • 26 Sep 2021 02:58 PM (IST)

    अज्ञातांनी संगमनेरमध्ये भाजप ओबीसी सेल शहराध्यक्ष संपत गलांडे यांची वाहने पेटवली

    संगमनेर :

    वाहनांना आग लावण्याचे लोण आता ग्रामीण भागात
    घरासमोरील वाहनांना अज्ञात व्यक्तींनी लावली आग
    दोन दुचाकी तर एक चारचाकी गाडी आगीच्या भक्षस्थानी
    संगमनेर शहरातील पहाटेची घटना
    भाजप ओबीसी सेल शहराध्यक्ष संपत गलांडे यांची वाहने पेटवली
    पोलिसांकडून तपास सुरू

  • 26 Sep 2021 01:49 PM (IST)

    सचिन अहिरांना सगळ्यांच्या गमती जमती माहिती आहे : संजय राऊत

    सचिन आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधील गंमती-जमती माहिती आहेत तसेच त्यांना शिवसेनेच्या मधील देखील चांगली माहिती आहेत त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचा फायदा होईल. आपण खुर्च्या अडवून बसलो तर पक्षाचे डबके होते अन डबक्यात बेडक राहतात. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक तरुणांना संधी दिली, सर्वसामान्य शिवसैनिकाला राजकारणाचे केंद्र बिंदू केले, तेच त्यांचे मोठे पण आहे

  • 26 Sep 2021 01:09 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांचे अजित पवार ऐकतात, त्यांना सांगू आमचे ही आयका, नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत?

    -दिल्ली मध्ये मी राहतो लोकांना मी पत्ता सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात,त्यामुळे लोक मलाही ओळखतात हे शिवसेनेचे संजय राऊत ही शिवसेनेची ताकद

    -आता भोसरी मध्ये मेळावा सुरू आहे मात्र भोसरी भागात एकही नगरसेवक आपला निवडणून आला नाही ही खंत

    -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर व्हावा

    -पुणे जिल्ह्यात आपले कोण आयकत नाही असं काही सांगतात,असं कसं , मुख्यमंत्र्यांचे अजित पवार ऐकतात, त्यांना सांगू आमचे ही आयका, नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत?.माझं आयका मुख्यमंत्री हे दिल्लीचा अंदाज घ्याला गेलेत कारण दिल्ली वर आम्हला राज्य करायचं आहे

    -मागील वेळेस 4 च्या प्रभागाचा फटका आपल्याला बसला तसं त्यांना का नाही बसला ,आपल्याला फटका बसला यांचा अर्थ आपलं संघटन कमी पडले

  • 26 Sep 2021 12:44 PM (IST)

    नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा : उद्धव ठाकरे

    केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा

    उद्धव ठाकरे यांची अमित शाहांकडे मागणी

    नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी निधी द्यावा.

    दुर्गम भागात नवीन पोलिस पोस्ट स्थापन करणार

    मोबाईल टॅावर जास्तीत जास्त बसवण्यात येतील.

    नवीन शाळा स्थापन करण्यावर भर दिली जाईल.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहांसमोर केले सादरीकरण.

  • 26 Sep 2021 11:29 AM (IST)

    पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरु

    भाजपाची महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरु…

    आज पुण्यात प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक

    युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कार्यकर्ते राहणार उपस्थित,

    दुपारी 1.30 वाजता महापौर युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक,

    महापालिका निवडणुका आणि पक्षबांधणी संदर्भात बावनकुळे करणार मार्गदर्शन

  • 26 Sep 2021 10:26 AM (IST)

    दिल्लीतील विज्ञान भवनात बैठकीला सुरुवात, अमित शाह यांचं आगमन, 10 मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

  • 26 Sep 2021 10:00 AM (IST)

    सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष 8 एक्सप्रेस रेल्वे 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द

    सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष 8 एक्सप्रेस रेल्वे रद्द

    मध्य रेल्वेने विशेष एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा घेतला होता निर्णय

    मात्र या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रद्द करण्याचा घेतलेला निर्णय

    दादर -पंढरपूर एक्सप्रेस, दादर साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी दादर विशेष एक्सप्रेस या गाड्यांचा समावेष

    31 ऑक्टोबर पर्यंत विशेष एक्सप्रेस रद्द

  • 26 Sep 2021 09:59 AM (IST)

    मध्यरेल्वेवर आज सकाळापासूनच दहा तासांचा मेगा ब्लॉक

    -मध्यरेल्वेवर आज सकाळापासूनच दहा तासांचा मेगा ब्लॉक

    – मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येतोय.

    -यासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे

    – यावेळी अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने जादा बस सेवा देण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे केली आहे.

    – हार्बर मार्गावरील ब्लॉक सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर आणि चुनाभट्टी / वांद्रे ते सीएसएमटी पर्यंत 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत असेल

  • 26 Sep 2021 09:04 AM (IST)

    सोयाबीनचे भाव उतरले, शेतकरी आर्थिक संकटात

    सोयाबीनचे भाव उतरल्यामुळे तब्बल 28 हजार हेक्टरला फटका

    औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल 20 हजार शेतकरी सापडले संकटात

    औरंगाबाद जिल्ह्यात 28 हजार 422 हेक्टरवर झाला होता सोयाबीनचा पेरा

    सोयाबीनचा भाव 9500 वरून थेट 5500 वर

    40 टक्क्यांनी भाव उतरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात

  • 26 Sep 2021 09:03 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढताच

    औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढताच

    रोज दोन ते तीन कोरोना रुग्णांना गमवावा लागतोय जीव

    काल दिवसभरात 17 रुग्णांची वाढ तर तब्बल 3 जणांचा मृत्यू

    सध्या 149 रुग्णांवर उपचार सुरू

    कमी रुग्ण असूनही मृत्यूचा आकडा मात्र मोठा

    मृत्यूचा आकडा वाढल्यामुळे वाढली चिंता

  • 26 Sep 2021 08:54 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात आठवड्यात 8 हत्या

    पिंपरी चिंचवड शहरातील हत्येचे सत्र थांबताना दिसत नाही,गेल्या आठ ते दहा दिवसांत 8 हत्या शहरात झाल्या

    -पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातल्या धावडेवस्ती मध्ये रात्री उशिरा 38 वर्षीय महिलेची हत्या झालीय

    -कलावती धोंडिबा सुरवार असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे

    -शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने तीच्या घरात घुसून धारधार शास्त्राने वार करत तिची हत्या केलीय

    -भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत

  • 26 Sep 2021 08:53 AM (IST)

    सोयाबीनची आवक वाढली, दर पडले!

    सोयाबीन चे दर आले 5 हजारांवर,

    बाजारात सोयाबीन ची आवक वाढल्याने पडले दर,

    तर सोयाबीन पिकाला पावसाचा ही फटका,

    पावसाळ्यापूर्वी सोयाबीन चा दर वाढल्याने पेरा वाढला,

    मात्र आता दर पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • 26 Sep 2021 08:25 AM (IST)

    अमित शहांबरोबरच्या बैठकीत कोणकोणते मुख्यमंत्री सहभागी असणार?

    नवी दिल्ली मधील आजच्या बैठकीत सहभागी होणारे मुख्यमंत्री

    महाराष्ट्र – उद्धव ठाकरे

    उत्तरप्रदेश – योगी आदित्यनाथ

    पश्चिम बंगाल – ममता बॅनर्जी

    आंध्र प्रदेश – जगनमोहन रेड्डी

    झारखंड – भूपेश बघेल

    केरळ – पी विजयन

    बिहार – नितीश कुमार

    ओडिशा – नवीन पटनायक

    मध्यप्रदेश – शिवराजसिंह चौहान

    झारखंड – हेमंत सोरेन

  • 26 Sep 2021 08:12 AM (IST)

    माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

    माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

    पुसरा नदीला आला पूर

    पुसरा, तिगाव, चिंचाळा गावाचा संपर्क तुटला

    मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    शेतीचं ही प्रचंड नुकसान

    वडवणी तालुक्याला ही पावसाने झोडपले

    हरिश्चंद्र पिंपरी, चिंच वडगाव, काडी वडगाव नदीला पूर

  • 26 Sep 2021 07:30 AM (IST)

    जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यास सुरुवात

    जिल्हा परिषद पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यास सुरुवात

    उध्या ला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

    त्यामुळे बंडखोरी कुठे होणार याकडे प्रमुख नेत्यांनी केलं लक्ष केंद्रित

    ओबीसी आरक्षण रद्द झाल्या नंतर जिल्हा परिषद च्या 16 आणि पंचायत समिती च्या 31 जागा साठी होत आहे निवडणूक

    प्रत्येक पक्ष घेत आहे गुप्त बैठका ..

    उद्याला चित्र स्पष्ट होणार , कोण करणार बंडखोरी आणि कोणाला पक्ष देणार न्याय

  • 26 Sep 2021 07:29 AM (IST)

    बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओवरफ्लो, तीस गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार

    सोलापूर– बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण झाले ओवरफ्लो

    नागझरी नदीवरील मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

    सुमारे तीस गावातील शेतकऱ्यांना  होणार फायदा

    पंधरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

  • 26 Sep 2021 06:51 AM (IST)

    केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी आज दिल्लीत बैठक

    केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत होते आहे बैठक.

    राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे.

    गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित असतील.

    सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत ही बैठक चालेल.

    मराठा आरक्षण आणि अन्य महत्वाच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी होते आहे.

    गेल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींशी जवळपास अर्धा तास व्यक्तीगत चर्चा केल्याने त्यांची दिल्ली वारी बरीच चर्चेत राहिली.

    सध्या पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत.

    त्यामुळे गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्याशी उद्धव ठाकरेंचा व्यक्तिगत संवाद होतो का ? याबाबत उत्सुकता असेल.

    मुख्यमंत्री बैठकीनंतर दुपारी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

  • 26 Sep 2021 06:49 AM (IST)

    अमित शहांबरोबरच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानी वर्षाहून विमानतळासाठी निघाले. मुख्यमंत्री हे दिल्लीकरिता रवाना होणार आहे. दिल्लीत दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गृहमंत्री अमित शहा बरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहे. नक्षलवाद क्षेत्राच्या विकासकामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

  • 26 Sep 2021 06:46 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा, अमित शहांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थिती लावणार

    -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

    -नक्षलवादासंबंधी बैठकीस उपस्थित राहणार

    -अमित शहांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

    -वर्षा निवासस्थानावरुन मुंबई विमानतळाकडे रवाना