मुंबई | 22 डिसेंबर 2023 : देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा जे-१ या नव्या व्हेरिएंटचा रूग्ण कोकणात आढळल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यामुळे मुंबईकरांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी मास्कची सक्ती मात्र नाही, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. नागपूरमध्ये सोलर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या 9 कर्मचाऱ्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन आंदोलक सभागृहात घुसले होते. यामुळे आता मंत्रालय आणि विधानभवनात सुूूूरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे. मंत्रालयात कामानिमित्ताने येणाऱ्या अभ्यागतांची संख्या कमी कशी होईल याची चाचपणी या निमित्ताने करण्यात आली. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची पुण्यात ऑनलाईन बैठक सुरू आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक ऑनलाईन माध्यमातून सुरू आहे. कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांची यादी, रुग्णालयातील बेड ची व्यवस्था, औषदांचा साठा यासह इतर आरोग्य यंत्रणांचा आढावा या बैठकीतून घेतला जात आहे. राज्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी,जिल्हा आरोग्य प्रमुख, जिल्हा शल्य चिकित्सक, पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी बैठीकीला उपस्थितीत आहेत. कोरोनाच्या jn1 या नव्या वेरियंटने सध्या राज्याची चिंता वाढवली आहे.
सर्वसामान्य नागरिक सरकारी बँकांवर डोळे झाकून भरवसा ठेवतो. ते विना चिंता त्यांच्या कष्टाचा पैसा बँकांमध्ये बिनधास्तपणे जमा करतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून हिस्सेदारी विक्री करत आहे. तर काही वर्षात काही सरकारी बँक बंद करुन त्या दुसऱ्या बँकेत विलीन करण्यात आल्या आहेत. सुरक्षित बँकेत दीर्घकाळापासून एसबीआयाचा पहिला क्रमांक आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे खासगी बँक एचडीएफसी, आयसीआयसीआय यांचा क्रमांक लागतो.
वसईमध्ये नाताळची धामधूम सुरु झाली आहे. वसईचा पश्चिम पट्ट्यात प्रत्येक घरात येशूच्या जन्माची लगबग पाहायला मिळत आहे. रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने वसईतील बाजार फुलून निघाला आहे. नाताळ सण अवघ्या दोन दिवसावर आल्याने नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. यावर्षी वसईच्या बाजारात विविध प्रकारची सजावट पाहायला मिळत आहे. ख्रिसमस ट्री, स्टारबेल, कपडे, टोप्या, वेगवेगळे स्टॅच्यू, गव्हाणी, येशूचे पोस्टर्स, हॅंगिंग बेल, रंगीबेरंगी बॉल, कागदी तसेच मेटल स्टार, आकर्षक लाईटींग, फुगे, कंदील इत्यादी साहित्य बाजारात उपलब्ध आहे. ख्रिसमसनिमित्त बाजारात गिफ्टचे दालन खुले झाले आहे. खास भेट देण्यासाठी ख्रिसमस ट्रीसह विविध गोष्टी ग्राहक घेत आहेत.
अमरावतीमध्ये छगन भुजबळ ओबीसींची भव्य सभा घेणार होते. मात्र अचानक ही सभा रद्द केल्याने आत्ता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, कार्यकर्त्यांमध्येही असंतोषाची लाट पसरली आहे. छगन भुजबळ यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामगिरी बंगल्यावर भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांना शांत राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री यांना दिल्याचे समोर येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपणही मेळावे, सभा मोर्चे काढणार नाहीत अशी ग्वाही छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची सूत्रांनी माहिती दिली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत संदर्भात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. तीन राज्यातील विजयामुळे पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. लोकसभेची तयारी भाजपने सुरु केलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारी पक्ष लोकशाहीला आग लावण्याचे काम करत आहे. जे तरुण पार्लमेंट मध्ये शिरले ते बेरोजगारीचे एक प्रतीक होते. लोकसभेत प्रश्न विचारला म्हणून 146 खासदारांचे निलंबन केले गेलं, विरोधकांचे काम प्रश्न विचारण्याचे असते मात्र सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. अटल बिहारी वाजपेयी किंवा सुषमा स्वराज यांनी विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली मात्र मोदींच्या बाबतीत ते दिसत नसल्याचे मत त्यांनी मांडले.
सांगली जिल्ह्यातील गेल्या 18 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनाची राज्याचे कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दखल घेतली.
नवी दिल्ली : उद्या आणि परवा दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची रणनीती ठरणार आहे.
गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तूमखेडा खुर्द येथील सरपंच आशिष हत्तीमारे वय 35 वर्ष हे ग्रामपंचायत मध्ये बसून असता आरोपी प्रेमलाल मेंढे वय 55 यांनी सरपंचावर हल्ला केला. मात्र ग्रामपंचायत बसलेल्या इतर सदस्यांनी सतर्क दाखवत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. हा वाद ग्रामपंचायतच्या आत मधून बाहेर पर्यंत येऊन या दोघानांमध्ये फ्रीस्टाइलने हाणामारी सुद्धा झाली. मात्र घटनेचे व्हिडिओ काही लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात बनवले असून संपूर्ण प्रसार माध्यमा वर पसरले. सरपंचांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गोंदिया येथे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सरपंचांनी आरोपीने चाकूने हल्ला केल्याचा असल्याचे सांगितले असून याबाबत आता ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या आरोपीला ग्रामीण पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली आहे.
हिंगोली – सकल मराठा समाजाने विकसित भारत यात्रेचा रथ रोखला आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हा रथ रोखण्यात आला. जिल्ह्यातील समगा गावात मराठा समाजाने मोदी सरकारच्या योजनेची माहिती देणार रथ रोखला आहे.
मुंबई पोलिसांनी एका अश्या डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे, जो मुंबई उपनगरत फिरून घाईघाईत गाडीला चावी ठेवून गेलेल्या चालकांच्या दुचाकी चोरी करीत असे. मंगेश रामचंद्र गुप्ता असे या आरोपीचे नाव आहे.
एकही नेता मराठ्यांच्या बाजूला उभे राहायला तयार नाही. ज्याला मोठ केलं तोच म्हणतो, आरक्षण मिळू देणार नाही, सावध व्हा. जाता जाता पायाला हात लाऊन सांगतो, अशीच एकजूट ठेवा.
आरक्षण कसे देत नाही ते पहतोच असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय,लेकर मोठे झाले पाहिजे. या आरक्षणाने मराठांच्या घात केला, डोक्यावर कर्ज झालं
तुम्हाला आरक्षण द्यावच लागेल, तुमच्या हातात दोन दिवस आहेत. एकजूट फुटू देऊ नका, सगळ्या मराठांच्या फायदा आहे, मराठ्यांना फायदा आहे. 20 किलोमीटर वर जागा नाही मिळाली पाहिजे अशी ताकद उभी करा.
सरकार आरक्षण कसं देत नाही, तेच बघतो. शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज झाला. सरकारच्या नोटीसला घाबरुन मागे फिरणार नाही. नोटीस देणं बंद करा अन्यथा तुमचं फिरणं अवघड होईल… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.
ही सभा नाही तर मराठ्यांच्या पोरांच्या वेदना आहे… मराठ्यांची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण मिळवून देण्याची हीच योग्य वेळ… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.
परभणी याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरु आहे. विराट संख्येने जमल्याबद्दल जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे आभार मानले आहे. आपल्या लेकरांना त्रास होऊ नये यासाठीच लढाई सुरु आहे.. ही सभा नाही तर मराठ्यांच्या पोरांच्या वेदना आहे… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर इच्छुक… पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवणार… धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांच्यासह संपूर्ण देशातील भाजपा बद्दल नाराजी… महाराष्ट्रात पक्ष फोडी बद्दल भाजपात मोठी नाराजी… धुळे लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार… काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांचा दावा…
पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक…. खासदार निलंबनाच्या विरोधात काँग्रेसच आंदोलन… आंदोलनात काँग्रेसकडून अनोखा बॅनर… बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यासह जोडला हिटलरचा फोटो… पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यासह हिटलरचा फोटो जोडत काँग्रेस उतरलं आंदोलनात
कोरोनावर आज दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी ही बैठक बोलावली आहे. सगळे जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य मंत्री अलर्ट मोडवर आहेत.
काहीही झालं तरी आम्ही आरक्षण घेणार. आम्ही मुंबईत येण्याचं जाहीर केलेलं नाही. पण सरकारलाच वाटतं की आम्ही मुंबईला यावं. आमचं आंदोलन शांततेत होणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
नवी दिल्ली- इंडिया आघाडीचं जंतर-मंतरवर थोड्याच वेळात आंदोलन सुरू होणार आहे. खासदारांच्या निलंबनाविरोधात नेते हे आंदोलन करणार आहेत. राहुल गांधीही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. यासाठी जंतर-मंतरवर ‘सेव्ह डेमोक्रसी’ आशयाचं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. काँग्रेससह इतर पक्षांकडून जोरदार पोस्टरबाजीही करण्यात आली आहे. या आंदोलनात शरद पवारदेखील सहभागी होणार असून ते थोडयाच वेळात जंतर-मंतरवर दाखल होणार आहेत.
आमचं आंदोलन शांततेत होणार. आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जागेचा लिलाव होणार आहे. 5 जानेवारी 2024 रोजी दाऊदच्या रत्नागिरीतील जागेचा सरकारकडून लिलाव होणार आहे. खेडच्या मुंबके या गावात दाऊदच्या 20 गुंठ्याहून अधिक 5 शेतजमीनी आहेत.
सलीम कुत्ताने देशद्रोही कृत्य केलं, आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याचं नृत्य. सुधाकर बडगुजर यांच कृत्य देशद्रोही आहे, असे दादा भुस म्हणाले.
अजित पवार गटाची आज संघटनात्मक बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकींबाबत मंथन होणार आहे, तसेच बैठकीत पक्ष संघटनेवरही चर्चा होईल.
आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहोत, त्याबद्दल दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे. काँग्रेस हायकमांडना त्याबद्दल कल्पना आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
भाजपने देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केला आहे. देशाचे जवान इथे मारले जात आहेत आणि सरकार राम मंदिराच्या घंटा वाजवायला जातंय. या घंटा त्यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत, इथे या सरकारला लाज वाटली पाहिजे , असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.
राम मंदिर ही काही कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही. राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेचं मोठं योगदान, पण ज्यांनी योगदान दिलं त्यांनाच उद्घाटनाला बोलावणार नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आपले शत्रू भारताविरोधात कट रचत आहेत आणि सरकारला त्याची माहितीच नाही. सुरक्षेबाबत प्रश्न विचारले तर आम्हाला देशाच्या बाहेर काढतील, संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
सांगली शहरात वयोवृद्धी दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात दिवाळीपूर्वी एक रुग्ण सापडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. शहरातील विश्रामबाग परिसरात दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीतही रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील वयोवृद्ध पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णांना कोणत्या व्हेरियंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.
कोल्हापुरात जेलमधील वायरल व्हीडिओची चर्चा होतेय. जिल्ह्यातील आरोपीच्या समर्थकांचा इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र व्हायरल व्हीडिओ कोल्हापुरातील कळंबा जेलचाकी बाहेरचा याबाबत संभ्रम आहे. दहशत माजवण्याच्या हेतूने व्हिडिओ तयार करत जेलमधील व्हीडिओ भासावण्याचा प्रयत्न असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
अमरावती जिल्ह्यातील 2 हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 6 कोटी रूपयांचा संत्रा फळ पीक विमा मिळालाच नाही. हजारो रुपये भरून मागील वर्षी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा फळांचा नुकसानीचा फळपीक विमा काढला आहे. 10 कोटी 87 लाख पैकी केवळ 4 कोटी 25 लाख रुपये शेतकऱ्यांना परतावा. कृषी विभागाने हात झटकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.. विमा कंपनीने हवामान विभागाच्या आकडेवारीवर आक्षेप घेतला.
गडचिरोलीतील सोडे आश्रम शाळेतील विषबाधा प्रकरणात आणखी 30 मुलींना विषबाधा झाली आहे. डोकं दुखणं आणि पोट तळमळ होणं सुरूच असल्याने अजून 30 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे दाखल करण्यात आलं आहे. सोडे आश्रम विद्यालयातील विषबाधा प्रकरणात 136 विद्यार्थ्यांना एकूण विषबाधा झाल्याचं महिती समोर आली आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सध्या उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती दिलीय.
24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम संपणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा आयोजित करण्यात आलीय. सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंची बारामती लोकसभा मतदारसंघात मोठी खेळी… बारामती लोकसभेसाठी नवनाथ पडळकर यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. बारामतीत ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. धनगर समाज मोठ्या प्रमाणावर मदरसंघात आहेत. त्याचा फायदा भाजपला करून घायचा आहे. नवनाथ पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी निवडणूक लढवली होती. त्यांनी तीन क्रमांकांची मत घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचं भाजपचा प्रयत्न आहे. ओबीसी कार्ड यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे.
लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीला वेग आला आहे. काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर 5 सदस्यीस समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती जागा वाटपाचा निर्णय घेणार आहे. समितीवर प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपाच्या वाटाघाटी करण्याची जबाबदारी देखील असेल.
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची आज एसीबीकडून चौकशी होणार आहे. सुधाकर बडगुजर यांनी चार दिवसांची मुदत मागितली होती, ती मुदत आज संपत आहे. दाऊदचा हस्तक सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टीकेल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येत आहे.
कोविड घोटाळा प्रकरणात इडीने मोठी कारवाई केली आहे. लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालकाची मालमत्ता इडीकडून जप्त करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांची सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे. सोयरे शब्दावर मनोज जरांगे अडून असल्याने ही चर्चा निष्फळ ठरली आहे. मराठा संवाद यात्रेनिमीत्त मनोज जरांगे यांच्या सेलू, सोनपेठ आणि गंगाखेडमध्ये सभा होणार आहेत.
विदर्भात थंडीची लाट परसरी असून पारा 12 अंशाच्या खाली घसरला आहे. अनेक भागात धुक्यांची चादर पसरली आहे. ग्रामीण भागात लोकांना शेकोट्यांचा आधार घेतल्याचे चित्र दिसते.
अजीत पवार गटाच्या आज मॅराथॉन बैठका होणार आहे. यात पक्ष संघटनेपासून ते आगामी निवडणूकांपर्यंतच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना सोनेगाव पोलिसांनी अटक केलीय. गजानन प्रल्हादराव पवाने असं डॉक्टरचं नाव आहे. नागपूरमधील शिवंगाव शिवारात डॉक्टर पवाने यांचा दवाखाना आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र मधील प्रत्येक दुकाने, शोरूमवर मराठी पाट्या असणे अनिवार्य आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थानी याकडे लक्ष देऊन मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांना नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरातील सरसकट सर्वच दुकाने, शोरूम यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. 18 डिसेंबर रोजी निकाल देण्यास न्यायदंडाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबर पर्यंत निकाल जाहीर करण्याची मुभा दिली. त्यावर आज निकाल येण्याची शक्यता आहे.
मुंबई: दिल्लीतील संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन आंदोलक सभागृहापर्यंत पोहोचल्याने राज्यातील मंत्रालय व विधानभवन सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे. मंत्रालयात कामानिमित्ताने येणाऱ्या अभ्यागतांची संख्या कमी कशी होईल याची चाचपणी या निमित्ताने करण्यात आली. उद्यान प्रवेशद्वाराजवळ मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने केवळ निवेदन व अर्ज देण्यास आलेल्या अर्जदारांसाठी ध्वनीक्षेपकद्वारे मार्गदर्शन करण्याची सूचना देण्यात आली आहे.