मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकावरील अविश्वास ठरावाच्या चर्चेवरील आज शेवटचा दिवस आहे. आज या ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील. त्यानंतर ठरावावर मतदान होणार आहे. त्यामुळे ठरावावर कुणाच्या बाजूने किती मते पडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आली आहे. आता पाकमध्ये हंगामी पंतप्रधान नियुक्त करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसाठी आयोजित करण्यात आलेला स्नेह भोजनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. एसटी कर्मचारी आक्रमक, प्रलंबित मागण्यांपासून 11 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार. यासह राज्य, देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.
सबका साथ, सबका विकास हा केवळ नारा नाही तर आमची कमिटमेंट असल्याचे मोठे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभेतील भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या निशाण्यावर राहुल गांधी आहेत. नरेंद्र मोदी राहुल गांधीवर हल्लाबोल करताना दिसले.
मिझोरामच्या हल्ल्याचे सत्य काँग्रेसने देशापासून लपवले असल्याचा गाैप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणामध्ये केला आहे. या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या निशाण्यावर काँग्रेस असल्याचे दिसत आहे.
नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत अविश्वास प्रस्तावविरोधात बोलताना मणिपूरवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मी मणिपूरच्या जनतेला विनंतीपूर्वक आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो, संपूर्ण भारत तुमच्या पाठिशी आहे, सर्व मणिपूरच्या आई-बहिणींच्या पाठिशी भारत आहे.मणिपूर पुन्हा एकदा विकासाच्या रस्त्यावर येईल, पुन्हा मणिपूरमध्ये भरभराटीचे दिवस येतील. मणिपूर हिंसेवर बोलताना पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी ही उत्तर दिलं.
भारतमातेचेच तुकडे केले नाहीत तर वंदे मातरमचे तुकडे केले, यांनीच भारतमातेचे तुकडे केले. मातेचे हात कापले, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टिका केली आहे.
देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे लोकसभेतील भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मणिपूरच्या घटनेनंतर जनतेमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. यावर आता नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.
नरेंद्र मोदी यांचं अविश्वास विरोधात संसदेत भाषण सुरु असताना, विरोधकांनी सभात्याग केला.. यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलं खोटं बोलून निघून जाणं, अफवा पसरवून निघूण जाणं असंच सुरु आहे, निवडणुकीच्या वेळी न पूर्ण होणारी आश्वासन ही विरोधकांकडून दिली जात आहेत. काँग्रेस लूट की दुकान आहे, झूट का बाजार आहे, असंही यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी याचे भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला आहे. विरोधक हे लोकसभेतून निघून गेले आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांकडे ऐकून घेण्याचा संयम नाहीये.
विरोधकांकडे ऐकून घेण्याचा संयम नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लोकसभेत विरोधकांवर जोरदार टिका करताना नरेंद्र मोदी हे दिसत आहेत.
जे जमिनीवर उतरले नाहीत, त्यांनी गाडीतून गरिबी पाहिली असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. लोकसभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिसत आहेत.
२४ तास काँग्रेसच्या स्वप्नात नरेंद्र मोदी, यांचंच काँग्रेस प्रेम मोठं, यांचं मोदी प्रेम आणखी मोठं. ज्याचं डोकं आधुनिक राजासारखं चालतं, त्यांना सर्वसामान्यांचा त्रास – नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल. मी काँग्रेसची चिंता समजू शकतो – नरेंद्र मोदी
लाल बहाद्दूर शास्त्री, चौधरी चरणसिंह यांचे पोट्रेट देखील संसदेत भाजपाने लावले – नरेंद्र मोदी. काँग्रेसने प्रत्येक वेळी एकच फेल प्रॉडक्ट लॉन्च केलं. लंका हनुमानाने नाही जाळली, तर ती रावणाचे अहंकारामुळे जळाली. सरदार वल्लभभाई पटेल यांना डावलण्याचं काम देखील काँग्रेसने केलं. ते जमीनीवर उतरले नाहीत, त्यांनी गाडीतूनच गरीबी पाहिली, नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांना टोला.
भारत यात्रेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी थेट म्हणाले की, राहुल गांधींना गाव काय माहिती आहे का?
लोकसभेतील भाषणामध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान करत म्हटले की, मी काँग्रेसची परेशानी समजू शकतो. पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, एकच प्राॅडक्ट वारंवार लाॅन्च केले जात आहे.
काँग्रेसचे निवडणूक चिन्हं देखील स्वत:चे नाही, असा मोठा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. विरोधकांवर सडकून टिका करताना लोकसभेत नरेंद्र मोदी दिसत आहेत.
विरोधक म्हणजे इंडिया या नव्या विरोधकांच्या आघाडीत एकी राहू शकत नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.घराणेशाही मुळे अनेक बड्या नेत्यांना त्रास झाला, अनेकांनी परिवारवादाला विरोध केला, घराणेशाहीमुळे अनेक बड्या नेत्यांचं नुकसान झालं. परिवारवादामुळे त्यांना बाहेरचा व्यक्ती पंतप्रधान म्हणून यांना चालत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने दोनदा पराभूत केले, असेही नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभेतील भाषणामध्ये म्हटले आहे. विरोधकांवर जोरदार टिका करताना यावेळी नरेंद्र मोदी दिसले.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मोठे भाष्य केले आहे. लोकसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाली की, विरोधकांमध्ये एकी राहू शकत नाही. आता नरेंद्र मोदी यांच्या विधानावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीला नरेंद्र मोदी यांनी टोला लगावला आहे, विरोधकांना आघाडीसाठी एनडीएचीच मदत घ्यावी लागली. केवळ चष्मा बदलून विकास दिसत नाही. विरोधकांच्या आघाडीचं नाव दिसतं, पण काम शोधूनही सापडत नाही, तिरंगा चोरण्याचं काम काँग्रेसने केले, गांधी आडवान देखील असंच आलं.पक्षाची सर्व सुत्र एकाच घरातील लोकांकडे आहेत.
तामिळनाडूत १९६२ मध्ये काँग्रेसचा शेवटचा विजय झाला, उत्तर प्रदेश, उडीशा, गुजरातचे लोक म्हणतात – ते नो कॉन्फीडन्स, दिल्लीची जनताही म्हणते – नो कॉन्फीडन्स, काही दिवसांपूर्वी बंगळुरुत तुम्ही काँग्रेसचा अंतिम संस्कार केला. जनधन योजनेची काँग्रसने खिल्ली उडवली, विरोधकांमध्ये मॅगनेटीक पावर चुकीच्या गोष्टी लगेच पकडते. नागालँडमध्येही २५ वर्षापासून काँग्रेसचा पराभवच. अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी हे उत्तर दिलं
काँग्रेसला भारताच्या सामर्थ्यावर कधीच विश्वास नव्हता, पाकिस्तान खरं बोलत असेल, असं काँग्रेस प्रचार करते, काँग्रेसला पाकिस्तानवर विश्वास आहे. पाकिस्तान भारतावर हल्ले करत असे, तेव्हा ती जबाबदारी झटकण्यात काँग्रेस आघाडीवर असे.
नवी दिल्ली | “गेल्या तीन दिवसांपासून आमच्या विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांनी मनापासून डिक्शनरी खोलून जिवढे अपशब्द वापरता येतील तेवढ्या शब्दांचा प्रयोग केला. त्यांचं मन आता हलकं झालं असेल. ते मला दिवस-रात्र कोसत असतात. त्यांच्यासाठी मोदी तेरी कब्र खुदेगी, हा त्यांचा सर्वात प्रिय नारा आहे. पण माझ्यासाठी यांचे अपशब्द हे टॉनिक आहेत. ते असं का करतात, हे का होतं? आज मी सदनमध्ये काही सिक्रेट सांगणार आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा आपल्या संसदेतील भाषणात समाचार घेताना म्हटलं आहे, देशातील संस्थांचा विरोधक जेव्हा जेव्हा वाईट प्रचार करतात, त्या संस्थाविषयी वाईट बोलतात, तेव्हा त्या संस्था तेवढ्याच वेगाने वर येतात, प्रगतीकडे वाटचाल करतात. एलआयसीचं उदाहरण देताना नरेंद्र मोदी यांनी असंच म्हटलं आहे. एलआयसी आता बुडणार आहे, गरिबांच्या पैशांचं काय होईल असं म्हटलं आणि एलआयसीने उलट प्रगतीकडे वाटचाल केली. राष्ट्रीयकृत बँकांविषयी देखील असंच भाकित आणि गैरप्रचार करतात, तेव्हा त्या संस्था उलट आणखी वाढत गेल्या आणि देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा २ टक्क्यांनी वाढला आहे.
नवी दिल्ली |
जगाच्या विकासासाठी भारत काय करु शकतो याबाबत सर्व जगातील देशांमध्ये विश्वास वाढताना दिसतोय. या दरम्यान आमचे विरोधी पक्षाच्या साथीदारांनी काय केलं? यांनी अविश्वास प्रस्तावच्या माध्यमातून जनतेचा आत्मविश्वास तोडण्याचा अनावश्यक प्रयत्न केला आहे. आज भारताचे तरुण नवे स्टार्टअप करुन देशाला चकीत करत आहेत. देशात आज विदेशी गुंतवणूक येत आहे. आज भारताची कोणतीही चांगली गोष्ट ते ऐकू शकत नाहीत. हीच त्यांची अवस्था आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
आज देशात गरीबी जोरदार वेगाने घटत आहे. गेल्यावर्षी साडे १३ कोटी लोक गरिबीपासून बाहेर आले आहेत, असं नीती आयोगने म्हटलं आहे. आयएमएफने म्हटलं आहे की, भारतात सर्वात जास्त गरीबी संपलं आहे, असा दावा मोदींनी लोकसभेत केला.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे की, जलजीवन योजनेमुळे चार लाख लोकांचा जीव वाचत आहे. जागतिक आरोग्य संघटना स्वच्छ भारत अभियानाचं कौतुक करतं. या योजनेतून तीन लाख लोकांना वाचवण्यात आलं, असं या संघटनेनं म्हटलं आहे, अशी माहिती मोदींनी लोकसभेत दिली.
नवी दिल्ली | कोणत्याही देशाच्या इतिहासात एक वेळ अशी येते तेव्हा तो जुन्या जायबंद झालेल्या गोष्टींना तोडून नव्या ऊर्जेने पुढे जाण्यासाठी पाऊल उचलतो. २१ व्या दशकाचा हा कालखंड आहे जो भारतासाठी प्रत्येक स्वप्न सिद्ध करण्याची संधी आपल्याकडे आहे. आपण सर्व अशा काळात आहोत, ही वेळ खूप महत्त्वाची आहे. या कालखंडात जे घडेल त्याचा प्रभाव या देशावर येणाऱ्या एक हजार वर्षासाठी राहणार आहे. त्यामुळे देशाचा विकास हेच ध्येय असलं पाहिजे. आपल्या तरुण पिढीत मोठं सामर्थ्य आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली | “या अविश्वास प्रस्तावात काही गोष्टी अशा निदर्शनास आल्या की आधी कधी पाहिलं नाही आणि कल्पना केली नाही. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचं नाव बोलण्याच्या पहिल्या सूचित नावच नव्हतं. आधीचे उदाहरण बघा तुम्ही, 1999 मध्ये वाजपेयी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आला. शरद पवार त्यावेळी विरोधी पक्षांचं भाषणाचं नेतृत्व करत होते. 2003 मध्ये अटलजींचं सरकार होतं. सोनिया गांधी यांनी त्यावेळी विरोधी पक्षांचं नेतृत्व केलं होतं. त्यांनी विस्तारात अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर 2018 मध्ये मल्लिकार्जुन खर्गे हे विरोधी पक्षाचे नेते होते. पण यावेळी अधीर बाबू यांचे काय हाल झाले? त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. अमित शाह यांनी काल, चांगलं वाटत नाही आणि अध्यक्षांची उदाहरता होती त्यामुळे त्यांना बोलण्याची संधी दिली. पण गूळचा गोबर कसं करायचं? यात ते माहीर आहेत”, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी अधिर रंजन चौधरी यांच्यावर टोलेबाजी केली.
अधिर बाबूंना का वेगळं केलं? माहिती नाही, कदाचित कोलकातावरुन फोन आला असेल. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करते. त्यांना कधी निवडणुकीच्या नावाने अस्थायी रुपाने फ्लोअर लिस्टमधून हटवलं जातं. आम्ही अधिर बाबू यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
नवी दिल्ली |
मी माझ्या विरोधी पक्षांना आवाहन करतो की, थोडं तयारी करुन या. मी तुम्हाला पाच वर्ष दिले होते. तुमचे काय हाल आहेत, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. देश तुम्हाला पाहतोय हे लक्षात ठेवा, असा इशारा मोदींनी दिला.
नवी दिल्ली | गरीबाच्या भूकेची तुम्हाला चिंता नाही. सत्तेची भूक हीच तुमच्या डोक्यात आहे, असा घणाघात नरेंद्र मोदींना केला. तुम्हाला देशाच्या तरुणांच्या भविष्याची चिंता नाही, तुम्हाला आपल्या राजकीय कारकीर्दीची चिंता आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
नवी दिल्ली | देशाची जनतेने विरोधकांना ज्या कामासाठी इथे पार्लमेंटमध्ये पाठवलं आहे त्या जनतेचा हा विश्वासघात आहे. कारण त्यांना महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची नसते. विरोधी पक्षांच्या आचरणातून त्यांनी हे सिद्ध केलं की, देशापेक्षा त्यांच्यासाठी पक्ष मोठा आहे, असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला.
नवी दिल्ली :
“दोन्ही सभागृहात अनेक महत्त्वाचे विधेयक पार झाले आहेत. हे विधेयक मासेमारांसाठी चांगली होते. केरळच्या मासेमारांसाठीदेखील चांगलं विधेयक होतं. पण ते या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सहभागी झाले नाही”, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत भाषण सुरु झालंय. सभागृहातील सदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव मांडलाय. गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. देशाच्या जनतेने आमच्या सरकारप्रती जो विश्वास वारंवार दाखवला आहे, मी आज देशाच्या कोटी कोटी नागरिकांचे आभार व्यक्त करतो. देव खूप दयाळू आहे, देवाची इच्छा असते की, तो कुणाच्यातरी माध्यमातून आपल्या इच्छाची पूर्ती करतो. मी या गोष्टीला देवाचा आशीर्वाद मानतो की, देवाने विरोधकांना सूचवलं आणि ते प्रस्ताव घेऊन आले, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
२०१८ मध्येही देवाचाच आदेश होता, जेव्हा विरोधक अविश्वासाचा प्रस्ताव घेऊन आले होते. तेव्हा देखील आम्ही सांगितलं होतं की, अविश्वास प्रस्ताव आमची फ्लोअर टेस्ट नाही तर त्यांचीच आहे. जेव्हा मतदान झालं तेव्हा तितके मतंही ते जमा करु शकले नव्हते. जेव्हा आम्ही जनतेत गेलो तेव्हा जनतेने सुद्धा दाखवून दिलं. निवडणुकीत एनडीए आणि भाजपला जास्त जागा मिळाली. आताही तेच होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतही गर्दी झालीय. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल झाले आहेत. अविश्वासाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका मांडणार आहेत. विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यांवर नरेंद्र मोदी आपली भूमिका मांडणार आहेत. नरेंद्र मोदी आज लोकसभेत मणिपूरच्या घटनेवर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर लोकसभेत अविश्वासाच्या प्रस्तावावर मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या साताऱ्या दौऱ्यावर आहेत. ते साताऱ्यातील त्यांच्या मुळ गावी, दरे गावात असतील. हा त्यांचा खासगी दौरा असेल. दोन दिवस ते सातारा जिल्ह्यात असतील.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत येण्यास भाग पाडल्याचे ट्विट काँग्रेस पक्षाने थोड्या वेळापूर्वी केले. पंतप्रधान थोड्याच वेळात अविश्वास ठरावावर उत्तर देतील. मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत मोठी गर्दी झाली आहे.
पालकमंत्र्यांचा घोटाळा सुद्धा आम्ही लवकरच समोर मांडू, आयुक्तांना मी हे सांगितलं आम्ही तुम्हाला आवडो न आवडो लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार, असा इशारा अनिल परब यांनी दिला.
मणिपुर हिंसाचार प्रकरणात संसदेत जोरदार खडाजंगी सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून अवघा भारत संसदेतील हे रणकंदन पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात अविश्वास प्रस्तावावर त्यांचे उत्तर देतील.
मुंबई | लोकसभेत चांगलाच गदारोळ बघायला मिळत आहे. भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचं भाषण सुरु असताना विरोधकांकडून घोषणाबाजी केली जात होती. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहातून बाहेर पडले. त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा बाहेर पडले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी वॉक आऊट केलं. यामध्ये काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांचादेखील समावेश होता. त्यानंतर थोड्या वेळाने विरोधी पक्षांचे खासदार पुन्हा सभागृहात आले.
ज्योतिरादित्य शिंदे बोलत असताना विरोधकांनी सभात्याग केला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत आहेत. विरोधकांनी कामकाज चालू दिलं नसल्याचं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.
विरोधकांना ना देशाची, ना पंतप्रधानांची चिंता त्यांना फक्त स्वत:ची चिंता आहे. विरोधक बोलायला तयार होतात पण ऐकायला नाही,असंही ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नीरव मोदींसोबत तुलना केल्याने भाजप खासदार भडकले. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार गदारोळ
राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
राज्यसभा की कार्यवाही कल सुबह 11 बजे तक के लिए स्थगित की गई। pic.twitter.com/M16vTiktxQ
— ANI_HindiNews (@AHindinews) August 10, 2023
मणिपूर आणि नूहमध्ये हिंसाचार का झाला ? पंतप्रधानांना संसदेत येण्यास काय अडचण आहे ? असा सवाल तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी विचारला. मणिपूरच्या प्रश्नावर सरकार गप्प राहिले, तिथे महिलांवर अत्याचार झाले, सरकारने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्या असा आरोपही त्यांनी केला.
पत्रकाराला मारहाण करणं ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांचे भाषण ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
लोकसभा में नेता प्रतिपक्ष अधीर रंजन चौधरी का भाषण सुनने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मौजूद रहेंगे: भाजपा सूत्र pic.twitter.com/OCCWIAtM6D
— ANI_HindiNews (@AHindinews) August 10, 2023
मुंबईतील व्यावसायीकाच्या अपहरणाप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी विमानतळावरून एकाला ताब्यात घेतले आहे. आदिशक्ती प्रायवेट लिमीटेडच्या मनोज मिश्राला ताब्यात घेतले आहे. विमानतळावरून पळून जाणाऱ्या आणखी दोघांनाही. ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरण प्रकरणी प्रकाश सुर्वे यांच्या चिरंजीवाचेही नाव समोर येत आहे.
वंचीत बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. माझा वंचीत बहुजन आघाडीशी संबंध नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. माझी युती फक्त उद्धव ठाकरेंशी असल्याचेही ते म्हणाले. महा विकास आघाडीला मी ओळखत नाही असेही ते म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना जाहीर करण्यात आलेली आहे. पंतप्रधान, एक कॅबीनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेते अशी समिती असणार आहे.
मोदींमुले नाही तर राहुल गांधींमुळे मदत मिळाली. राहुल गांधींच्या भेटीनंतर मला मदत मिळाली. लोकसभेतील अमित शाह यांचा दावा कलावती बांदूरकरांनी फेटाळून लावला.
अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी खासदारांना व्हीप जारी. लोकसभेत शिंदे गटाकडून खासदारांना व्हीप जारी. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून खासदारांना व्हीप जारी. शरद पवार गटाकडून खासदार मोहम्मद फैजल यांच्याकडून व्हीप जारी. अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांच्या व्हीप जारी.
भिडेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यलयावर मोर्चा घेऊन आंदोलक निघाले.
हनुमान चालिसा पठण प्रकरणी सुनावणी पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी होणार. सुनावणी राणा दाम्पत्याची गैरहजेरी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून औरंगाबाद शहरांमध्ये एका भव्य दिव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. 13 तारखेला सकाळी नऊ वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये तब्बल साडेतीन लाख लोक आपली आरोग्य तपासणी करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
लोकसभा कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब. अविश्वास प्रस्तावाच्या मतदानावेळी खासदारांना व्हीप जारी. लोकसभेत शिंदे गटाकडून व्हीप जारी. गटनेते राहुल शेवाळे आणि खासदार भावना गवळी यांच्याकडून व्हीप जारी
अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोलणार. संध्याकाळी चार वाजता पंतप्रधान बोलणार. पंतप्रधानांच्या भाषणानंतर आजच सभागृहात मतदान होणार. अविश्वास प्रस्तावावर आज आवाजी पद्धतीने होणार मतदान. आजच मतदान होणार.
अविश्वास प्रस्तावावर आज पंतप्रधान बोलणार. पंतप्रधान योग्य ते औषध विरोधकांना देतील. संजय राऊत हतबल आहेत. पॉडकास्टचा भाग येतोय संजय राऊत यांना आदेश बांदेकर यांनी पैठणी दिली असेल. राहुल गांधी थिल्लरपणा करत आहेत, यापूर्वी डोळा मारला आता किस दिला ही संस्कृती आपल्याकडे नाही – खासदार अनिल बोंडे
संसदेत अविश्वास प्रस्तावावर होणार चर्चा. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून व्हीप जारी. खासदार मोहम्मद फैझल यांनी केला व्हीप जारी. अजित पवार गटाच्या खासदारांची भूमिका काय असणार याकडे लक्ष.
MPSC विद्यार्थ्यांचे जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. एमपीएससीच्या 94 मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु. निकाल लागून दीड वर्ष झालेत मात्र अद्याप नियुक्ती दिली नसल्यामुळे आंदोलन सुरु. आंदोलक विद्यार्थ्यांची तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी.
संसदेत राहुल गांधी यांचं काल जे झालं, त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस?
भाजप आमदार नितेश राणे यांचा सवाल
प्रदूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा खंडित
गेल्या 2 दिवसांपासून इरई नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी येत असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेने दाताळातील इंटेक वेल बंद केली
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ‘मान्सून ब्रेक’
आता 20 ऑगस्टनंतरच राज्यात पावसाची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर
पक्षसंघटनात्मक बैठका घेण्याची शक्यता, आज संध्याकाळी पुण्यात दाखल होणार
पुणे मेट्रोची कामे तातडीने मार्गी लावा, पुणे रिंगरोडच्या कामात कुणी अडथळे आणत असेल तर त्याचा मुलाहिजा ठेवू नका, विकासकामात अडथळे ठरत असलेली अतिक्रमणे तात्काळ दूर करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
प्रेमाचे ममत्व उरले नाही, अशा लोकांना फ्लाईंग किसचे महत्व काय मिळणार आहे. द्वेशावर प्रेमाचा उतारा म्हणून राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिले, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
मणिपूरच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांनी मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. मणिपूरचा मुद्दा हा कश्मीरपेक्षाही गंभीर होईल, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत मातेची हत्या झाली, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या भाषणातील हत्या शब्द सभागृहाच्या पटलावरून काढण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात 15 वेळा हत्या हा शब्द वापरला होता.
समृद्धी महामार्गावर ४ हजार ९७५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. नाशिक येथील प्रादेशिक परिवहन विभागकडून शिर्डी ते भरवीर मार्गावर तपासणी करुन कारवाई करण्यात आली. वाहनाचे टायर योग्य नसणे, अतिरिक्त प्रवासी वाहने, चुकीच्या मार्गाने वाहने चालवणे, महामार्गावर अनधिकृत वाहने उभी करणे अशा वाहन चालकांवर कारवाई केली गेली.
मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह इतर काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल. वनराई पोलीसांनी या प्रकरणात मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी व इतर 10ते 12 अनोळखी इसम विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Rahul Gandhi | हवेत फेकलेल्या flying kiss वरुन इतकी आग लागली की, 2 रांगांमागेच….वाचा सविस्तर….
औरंगाबाद महापालिका 12 शाळा बंद करण्याच्या मार्गावर. महानगर पालिकेच्या शाळात विद्यार्थी वाढत नसल्याने शाळा बंद करण्याची वेळ. मागील वर्षी 17 हजारांवर असलेली विद्यार्थी संख्या यंदा 14 हजारांवर. बारा शाळा बंद करण्याची प्रशासनाने सुरू केली तयारी. गरीब विद्यार्थ्यांचे होणार मोठ नुकसान. कमी पट संख्येमुळे मनपाचा निर्णय तर शिक्षण विभागाचा नाकारतेपणा कारणीभूत.
Chandrayaan-3 Update | भारताची अत्यंत जवळच्या मित्र देशाबरोबर स्पर्धा. त्यांच यान सुद्धा 23 ऑगस्टलाच चंद्रावर होणार लँड. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिला कुठला देश पोहोचणार?. चांद्र मोहिमेची स्पर्धा झाली तीव्र. वाचा सविस्तर….
बेस्टचा संप सुरू असतानाच आता एसटी कर्मचारीही आंदोलन करणार आहे. एसटी कर्मचारी येत्या 11 सप्टेंबरपासून आझाद मैदानात निदर्शने आणि धरणे आंदोलन करणार आहेत. विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची आज संसदेत परीक्षा होणार आहे. मोदी सरकारवरील अविश्वास ठरावावर आज मतदान होणार आहे. त्यामुळे मोदी सरकार राहणार की जाणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
पाकिस्तानमध्ये बुधवारी मध्यरात्री संसद बरखास्त करण्यात आली आहे. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे.
औरंगाबादमध्ये पैशाच्या वादातून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारामुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.