मुंबई | 27 डिसेंबर 2023 : आज 27 डिसेंबर… लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर आहे. पण याआधी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. अशातच विविध राजकी. पक्षांच्या बैठका होत आहेत. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होत आहेत. तसंच खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार आहे. या शिवाय आज राज्यात विविध घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात विविध घडामोडी घडू शकतात. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्ससाठी आज दिवसभर या ब्लॉगला फॉलो करा.
सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस दर तोडगा अखेर मिटला आहे. जिल्हा प्रशासन साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा बैठकीत निर्णय झाला. साडे बारा टक्के रिकव्हरीच्यावर आहे. त्या साखर कारखान्यांना विना कपात 3175 रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आलं आहे. यापुढे ऊसाची काठामारी, इथेनॉलची लढाई सुरूच राहणार, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी म्हटलं आहे.
देशात कोविड 19 च्या नवीन प्रकार JN.1 ची एकूण 109 प्रकरणे आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक 36 प्रकरणे आहेत. यानंतर कर्नाटकात 34, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 आहेत.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, शहीदांना विसरता येणार नाही. प्रत्येक सैनिक हा आपल्या कुटुंबातील सदस्यासारखा असतो.अशी घटना खपवून घेतली जाणार नाही. भारतीय सैन्य हे काही सामान्य सैन्य नाही. जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
आरबीआयला मेल पाठवून 11 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या 3 जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले आहे. धमकी मागचा हेतू स्पष्ट झालेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांची माहिती दिली. अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बिहारमधील सोनपूर येथे गंगा नदीवर 4556 मीटर लांब, 6-लेन केबल पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये महामार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यसभा लोकसभा खासदार यांच्या पेक्षा माझा काम आवडलं. मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे.आत्ताच्या खासादरवर लोक नाराज आहेत. आम्ही वचपा काढणार असल्याचं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.
वसई मध्ये एका गिफ्टच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेच्या माणिकपूर पेट्रोल पंपच्याा पाठीमागील विजय गिफ्टोरिअन्स या गिफ्ट स्टोअरच्या पहिल्या मजल्यावरील गोडाऊनला आज दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून गिफ्टच गोडाऊन जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आग कशामुळे लागली होती याचे कारण समजू शकले नाही. मात्र बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने नागरिकांच्या मनात एक भीतीचे वातावर निर्माण झाले होते. वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान आणि माणिकपूर पोलिसांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवला आहे.
नारायणगाव येथे शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी शेतकऱ्यांसाठी स्वतः खासदार अमोल कोल्हे वाडपी झाले. भर उन्हात मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची भूक मिटवण्यासाठी कोल्हे स्वतःचं वाडपी झाले होते. तसेच मोर्चाच्या बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांनाही कोल्हे यांनी जेवन वाढलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने देण्यात येणारा कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्या बद्दल 5 लाख रुपये रोख आणि पुरस्कार आज नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना दिला जाणार आहे. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्ताने 125 रुपयांच्या नान्याचे विमोचन देखील या ठिकाणी केले जाणार आहे.
मागच्या वेळी जी चूक झाली आता पुन्हा होणार नाही. जनतेसाठी आणि पक्षासाठी निवडणूक लढवणार, मी लोकसभा निवडणूकीसाठी इच्छूक आहे. जागा वाटपावर एकमत होण्याची गरज असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांसाठी आता नियमावली तयार करण्यात आलीये. विद्यापीठात वाद टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय. विद्यापिठाने विद्यार्थी संघटानासाठी केली नियमावली तयार. विद्यापीठात कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी विद्यार्थी संघटनांना आता परवानगी घेणे बंधनकारक ठरणार आहे.
माविआचा शेतकरी आक्रोश मोर्चा नारायणगावमध्ये दाखल झालाय. नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात येणार.
नवी मुंबई पोलीस नववर्षाच्या स्वागतसाठी सज्ज झाले आहेत. अडीच हजार पोलीस बंदोबस्तासाठी राहणार तैनात. सीसीटीव्हीची राहणार नजर. अंमली पदार्थ वापर करणाऱ्यांवर पोलिसांची असणार नजर.
जुन्या काळात निवडणुकीला पैसे लागत नव्हते. 1986 साली निवडणूक लढवण्यासाठी घरच्यांच्या विरोध असल्या फालतू नादाला नका लागू असे म्हणायचे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज आणि उद्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात शरद पवार यांचं अमरावतीच्या शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार असून या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे.
आमदार संदीपान भुमरे यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. 20 तारखेच्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट सुरू आहे. सरकार पक्षातर्फे संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आज राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
मावळ तालुक्यातील इंदोरी कुंडमळा गावात माजी आमदार कै. दिगंबर भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येणार आहेत.
मागासवर्गिय आयोगाने मागासपणा सिद्ध करण्यासाठी निकष निश्चित केले आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फक्त मराठ्यांवर अन्याय नको, आम्हाला कठीण निकष लावले तर सगळ्यांनाच लावावे लागतील असं ते म्हणाले.
मागासवर्गांना ओळखण्यासाठी मागासवर्ग आयोगाने निकष ठरले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निकषांवर भारांक निश्चित करण्यात येत आहे. सामाजिक 40, शैक्षणिक 32, आर्थिकसाठी 28 टक्के भारांक निश्चित करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईला जाणार आहेत. किड्या मुंग्यासारखे मराठे घराबाहेर पडतील. सरकारने गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. वेगळे मराठा आरक्षण घेणे म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखे आहे. असं मनोज जरांगे म्हणाले.
मुंबईतील आंदोलनाची सविस्तर माहिती उद्या देणार असं जरांगे पाटील म्हणाले. आंदोलनाबद्दल सर्व माहिती सांगितली जाईल तसेच तसेच आंदोलनाचा मार्गही सांगितला जाईल असं जरांगे पाटील म्हणाले.
अजित पवार यांच्यावर आजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप घेतला आहे. 800 कोटी रूपयांचे काम रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा दिल्याने पुणे जिल्हा नियोजन समितीत नव्या वादाची चिन्ह दिसू लागली आहे.
कोल्हापूर- आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आलेत असे सांगत स्वतःच्या अल्पवयीन मुलाला भगवी कपडे घालून गादीवर बसवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली येथील दाम्पत्याचा कसबा बावडा येथे प्रकार उघडकीस आला. इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादे असे संबंधित संशयित दाम्पत्याचे नाव आहे. दाम्पत्याने कसबा बावडा येथे ‘ श्री बाल स्वामी समर्थ’ नावाने मुलाची ओळख बनवली होती. संबंधित पालकांनी दत्तजयंती निमित्ताने कसबा बावडा येथे भव्य पारायण आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्या 23 दिवसांपासून बंद आहेत. मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचे मागील 23 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र सरकारने कितीही दडपशाही केली तरी अंगणवाड्याच्या चाव्या देणार नाही असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.
मुंबईतील सर्वात महत्त्वाकांशी प्रकल्प असलेला एमटीएचएल ट्रान्सहार्बर लिंकचं काम पूर्ण झालं आहे. हा पूल आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हा पूल रहदारीसाठी पूर्णपणे तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसरा आठवड्यात याचं उद्घाटन करू शकतात.
भाजप हे इतिहासातील कोणत्याही संघर्षात किंवा लढ्यात नव्हतं. त्यांना काय माहित की शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं काय योगदान होतं? दुसऱ्यांच्या इतिहासाबद्दल भाजपला पोटदुखी आहे. बाबरी मस्जिद पाडण्याचं कृत्य शिवसेनेचं, असं भाजप म्हणायचं. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही आस्थेचा विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हा देश 2014 नंतर निर्माण झाल्याचं भाजप म्हणतं. पण देशातल्या कोणत्याही साहसी लढ्यात भाजप नव्हतं. भाजपचा जन्मच 2014 चा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. बैठकीत संभाजीनगरमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली.
उमेदवार दानवे हवेत की खैरे ? अशी विचारणा उद्धव यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली,
पुणे जिल्हा नियोजन समितीत नव्या वादाची चिन्हं दिसत आहेत. अजित पवारांवर भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप आहे. नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त नसताना 800 कोटींची कामं मंजूर करण्यात आली. 800 कोटींची कामं रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार, असा इशारा भाजप आणि शिंदे गटाने अजित पवार गटाला दिला आहे.
चुनाभट्टी गोळीबार प्रकरणी एका ज्वेलरसह दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पिस्तुल आणि गाड्या घेण्यासाठी पैसे देणाऱ्या सराफाला अटक करण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर येणार आहेत. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात दोन्ही नेते मंचावर एकत्र येतील.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील दुसरा आरोपी सौरभ चंद्राकरच्या हालचालींवर दुबई सरकारकडून प्रतिबंध लावण्यात आले आहेत. सौरभ चंद्राकरची 100 कोटींची मालमत्ता दुबईत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
त्रंबकेश्वरच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर सिन्नर तालुक्यात दोन महिला कोरोनासदृश आढळून आल्या आहेत. दोघींचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. नाशिकमध्ये कोरोनाचा धोका वाढू लागल्याचं चित्र दिसून येत आहे. लक्षणे दिसत असल्यास चाचणी करण्याचा डॉक्टरचा सल्ला
उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पहाटेपासून दाट धुकं… हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश मधील महामार्गांवर धुकं… वाहनधारकांनी प्रवास करू नये पोलीस प्रशासनाची सूचना… थंडी वाढत असतानाच धुकं वाढल्याने अपघातांची शक्यता..
राज्यच यंदाचं एफआरपीचं धोरण जाहीर झालं आहे. पुणे आणि नाशिक महसूल विभागात उतारा १०.२५ टक्के नुसार प्रति टन ३ हजार १५० रुपये एवढा भाव, तर राज्यातील अन्य महसुली विभागात ९ .५० टक्क्यास प्रति टन २ हजार ९२० रुपये… २०२३ -२४ चं ऊसदर धोरण राज्य सरकारने जाहीर केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता… स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव यंदा होणार नाशिकमध्ये… या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता.. या महोत्सवात हजारो तरुण-तरुणी हजेरी लावणार…. नाशिकच्या तपोवन परिसरातील कुंभमेळा मैदानावर होणार युवक महोत्सव
पुणे महापालिकची शासकीय कार्यालयांना तंबी… शासकीय कार्यालयाने थकवली पाणी पट्टी…. कंटोनमेंट बोर्डाकडे जवळपास ४० कोटीची थकबाकी… महापालिकेने पाठवल्या नोटीसा 31 जानेवारीपर्यंत पाणीपट्टी भरा… अन्यथा पाणी पुरवठापुरवठा बंद करणार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा थेट इशारा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी लोकसभा निवडणुकीची सूत्र हाती घेतली आहेत. देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी नेमणार तर ४ ते ५ जागांचं क्लस्टर तयार करणार आहेत. ५ क्लस्टर ला मिळुन एक प्रभारी जाणार दिला आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होणार आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंग राहणार उपस्थित देशात १०० क्लस्टर तयार केले जाणार आहेत. प्रत्येक क्लस्टर मध्ये नरेद्र मोदी , अमित शाह, राजनाथ सिंह यांचे दौरे सुरु होणार आहेत.
राज्य मागासवर्ग आयोग या आठवड्यात गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेयरची चाचणी होणार आहे. अंतिम निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार या आठवड्यात होणार सॅम्पल सर्व्हे करण्यात येईल. महिनाभरात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एकूण ८० गुण निकष निश्चितीसाठी असणार आहेत.
विरार मध्ये गुंडांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. विरार पूर्व मनवेल पाडा मोहक सिटी परिसरात मुख्य रस्त्यावर मंगळवारच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास ही मारामारी झाली आहे. मारामारीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लाठ्या काठ्यानी दोन दोन गटांनी एक मेकांना मारतानाचा हा व्हीडिओ असून, यात एकाच्या डोक्याला लोखंडी रॉडचा मार लागला असून तो जखमी झाला आहे. हानामारी एवढी तीव्र होती की पोलिसांना लाठी चार्ज करून जमलेली गर्दी पांगवावी लागली आहे. या हाणामारीचे कारण स्पष्ट झाले नसून, व्हिडीओ वरून पोलीस गुंडांचा शोध घेत आहेत.
मुंबई पुणे हायवेवर शॉर्टसर्किटमुळे गाडीला आग लागलीय. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. शॉर्ट सिर्किटमुळे गाडीने पेट घेतला.
अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाचे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनीच आक्षेप घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कोणतेही इतिवृत्त नसताना ८०० कोटीची काम मंजूर करण्यात आली आहेत. ती काम रद्द करा सदस्यंनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिलं आहे. ८०० कोटीची काम रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार थेट असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीत भाजप एकनाथ शिंदे गट विरुद्ध अजित पवार नव्या वादाला सुरुवात झालीय.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील शेतकरी आक्रोश मोर्चाचा प्रारंभ आज शिवजन्मभूमीत होणार आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी जनआक्रोश मोर्चा निघेल.