मुंबई, दि. 12 जानेवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर येत आहे. पंतप्रधान सकाळी दहा वाजता नाशिक विमानतळावर पोहचणार आहे. नाशिकमध्ये 27 व्हया राष्ट्रीय युवा महोत्सवाचे ते उद्घाटन करणार आहे. मोदी रोड शो, काळाराम मंदिराचे दर्शन, गोदाकाठाची पाहणी करणार आहे. सभेलाही संबोधित करणार आहेत. 21,200 कोटी रुपये खर्च करुन मुंबईत उभारण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे ते उद्घाटन करणार आहे. जळगावात १४ जानेवारी रोजी महायुतीचा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो महिला सक्षमीकरण अभियान सुरू केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आपण समुद्राशीही लढू शकतो. देश बदलेल आणि वाढेल.
इंडिया आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्ष आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत दुसरी बैठक होणार आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या घरी ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली वासनिक यांच्या घरी पोहोचले आहेत. या बैठकीला सलमान खुर्शीदही उपस्थित आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मला माजी मुख्यमंत्री म्हटले जाते, पण मला नाकारले जात नाही. निघून गेल्यावरही मी अशा प्रकारे परत आलो की मला सर्वत्र लोकांची आपुलकी आणि प्रेम मिळाले. आपण जिथे जातो तिथे लोक मामा म्हणतात. हीच आपली खरी संपत्ती आहे. माझे राजकारण हे कोणत्याही पदासाठी नसून मोठ्या ध्येयासाठी आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 18, 19 आणि 20 जानेवारीला गोव्यात येणार आहेत. केजरीवाल यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या तयारीशी संबंधित असेल. यापूर्वी हा दौरा 11 आणि 12 जानेवारीला प्रस्तावित होता.
लोकसभेच्या निकालानंतर देशात राजकीय भूकंप येईल असे भाकीत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवले. तर अहंकारीचा अहंकार मातीत मिसळेल असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी मोदी यांच्यावर स्तूती सुमनं उधळली.
INDIA आघाडीची उद्या बैठक होत आहे. ही बैठक ऑनलाइन होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी बैठकीत सहभागी होणार आहेत. ममता बॅनर्जी, एम के स्टॅलिन सहभागी होतील. उद्या सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.
देशाचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होत आहे असे गौरद्वगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सागरी सेतूच भूमिपूजन आणि उद्धघाटन पंतप्रधान यांच्या हातूनच होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अटल सेतू होऊ शकला असे गौरद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काढले. देशातील सर्वात लांबीच्या सागरी सेतूचं लोकार्पण आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. रायगड आणि मुंबईमधील हा प्रदेश देशाचे आर्थिक हब होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
14 तारखेला महायुतीचा महामेळावा होणार आहे. आम्ही तिन्ही पक्ष ताकदीने समोरची तयारी करत आहोत, असे खासदार भावना गवळी यांनी सांगितले. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यासह सर्व महायुतीमधील सर्व पक्ष काम करणार आहोत, असे त्या म्हणाल्या. या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार अनो तिन्ही पक्षांचे प्रमुख हजर असणार आहेत. आमची मने कधीच जुळलेली आहेत आता एकत्र आलोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अयोध्येत विदर्भाच्या वतीने लावण्यात येणाऱ्या अन्न छत्रासाठी आज नागपुरातून धान्य रवाना झाले. दोन ट्रक भरून धान्य पाठविण्यात आले आहे. एक मुठ्ठी धान्य प्रत्येक घरातून जमा करत हे धान्य आज अयोध्येकडे रवाना होत आहे.विदर्भातील यवतमाळ आणि नागपूर ला अयोध्येत अन्नछत्र लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह आदर्श हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण आले आहे. नाशिक विभागातून सामाजिक कामे करणाऱ्या 10 नामवंतांना या सोहळ्यास निमंत्रण देण्यात आले आहे. अहमदनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक रवींद्र साताळकर आणि नाशिक विभागाचे संपर्कप्रमुख घनश्याम दोडिया यांनी दिले अण्णा हजारे यांना निमंत्रण पत्रिका.
देशातील सर्वात लांब शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.
तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या निमित्ताने शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर परिषदेचे आयोजन. यावेळी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांचीही उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईसाठी प्रवास. पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदे मुंबईला रवाना.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मुंबईसाठी रवाना होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते. परंतु नागरिकांनी मांजाचा वापर करणे टाळावे आणि विक्रेत्यांनी नायलॉन मांजा विक्री करू नये नसता संबंधितावर गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्याबरोबरच आता त्या दुकानावर बुलडोजर चालवून जमीनदोस्त करण्यात येईल असा कडक इशारा मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिलाय.
तरुणांनी मेड इन इंडीया उत्पादनांचा वापर करावा. आयुर्वेद आणि योगाचा प्रचार करावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील आपल्या भाषणात सांगितले.
भारत तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करीत आहे. चांद्रयान आणि आदित्य एल-1 भारतीय तंत्रज्ञानाची कमाल असून जग आपल्या कामगिरीने स्तिमित झाले आहे. आपल्याला जगाची तिसरी सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था बनायचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील भाषणात सांगितले.
भारतातील युवकांना नवीन संधी मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. जगात स्कील फोर्स म्हणून भारताला ओळख मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे भाषण करताना अमृतकाळात भारताला नव्या उंचीवर नेण्याचा काम युवकांना करायचे आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळा मंदिरातील स्वच्छता अभियानाची स्तूती करीत आपल्याला स्वच्छता करण्याचे सौभाग्य लाभल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली आहे.
नाशिकमध्ये युवा महोत्सवास पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती लावली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार आणि प्रात्यक्षिके सादर केली आहेत.
पंतप्रधान मोदी आज नाशिकच्या पवित्र भूमीत आहेत . अयोध्येतील राम मंदिरासाठी हा शुभ संकेत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राम मंदिराचं बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न मोदींनी पूर्ण केलं.
पंतप्रधान आज नाशिकच्या पवित्र भूमीत आले आहेत. जगभरात मोदींच्या नावाचा गौरव होतोय. मोदी है तो मुमकिन है, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा असून सध्या ते नाशिकच्या युवा महोत्सवाला उपस्थित आहेत. त्यांना शाल आणि फोटो फ्रेम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई, नाशिकसह राज्यातील विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा. 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान दाखल. थोड्याच वेळात कार्यक्रमाला होणार सुरूवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते भजनात तल्लीन झाले. हातात टाळ घेऊन ते वारकऱ्यांसह भजन-कीर्तनात सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाच्या चरणी पंतप्रधान मोदी झाले नतमस्तक.
विधानसभेचा अपमान करण्यात आला. त्याच्या फोटोची विटंबना करण्याचा प्रकार काही लोकांनी केला आहे. हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आणि जनतेचा अपमान आहे. विधिमंडळाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून या संबंधी कारवाई झाली पाहिजे, अशी मी मागणी करतो. हा विधिमंडळाचा हक्कभंग आहे आणि तिन्ही पक्ष मिळून हक्कभंगचा प्रस्ताव विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवू, असं दीपक केसरकर म्हणाले.
नाशिक- विकसित भारत या संकल्पनेवर आधारीत २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन इथल्या मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी ते पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतील. मोदी रामकुंडावर गोदावरी पूजनही करणार आहेत. नाशिकमध्ये मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवस उपवास करणार आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi holds a roadshow in Nashik, Maharashtra. pic.twitter.com/WnZi6hPT2B
— ANI (@ANI) January 12, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिक शहरात आगमन झाले आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफा तपोवन परिसरात दाखल झाला आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथक सज्ज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये आगमण झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर पोहचलेले आहेत.
पंतप्रधान मोदी आज नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. त्यानंतर ते गोदावरीचे दर्शन घेतील. गोदावरीची महाआरती ते करणार आहेत. आज त्यांचा भव्य रोड शो देखील होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नाशिक दौरा… नाशिककरांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे… मोदींजींच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे… नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण देश राममय झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नाशिक दौरा… नरेंद्र मोदी पंचवटीतील रामकुंड येथे देणार भेट… इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे देणार… रामकुंड परिसरात फुलांची आकर्षक सजावट… रामकुंड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप… एसपीजी, स्थानिक पोलीस, परजिल्ह्यातून आलेल्या पोलिसांचा बंदोबस्त… पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे रामकुंड परिसराला विशेष महत्त्व प्राप्त
दादा भुसे समर्थकांची मोदींच्या सभेसाठी शोभा यात्रा… शोभा यात्रेत लेझीम पथक, ढोल पथक सहभागी… शोभा यात्रेच्या माध्यमातून होणार पंतप्रधानांचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा,,, पंतप्रधान येत असलेल्या हेलिपॅडवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त… 10.30 च्या सुमारास पंतप्रधान यांचे होणार आगमन… नाशिक मधील निलगिरी बाग परिसरात पंतप्रधानांसाठी हेलिपॅड सज्ज… हेलिपॅड परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद… संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दोन गटात वाद झाल्यानंतर एका गटातील जखमी व्यक्तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी जखमीवर उपचार सुरू असताना दुसऱ्या गटातील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने घाटीत रुग्णालयात जाऊन तुफान मारहाण केली. अचानक सुरू या मारहाणीमुळे रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान या मारहाणीत महिला डॉक्टरला रॉड लागला, त्या गंभीर जखमी झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नाशिक दौरा. नरेंद्र मोदी पंचवटीतील रामकुंड येथे भेट देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार गोदा आरती. रामकुंड परिसरात फुलांची आकर्षक सजावट. इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंडाला भेट. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त
जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र धामणखेल येथे जुन्नर तालुका हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला आहे. नामवंत बैलगाडा मालकांनी आपल्या गाडा बैलांसह शर्यतीत सहभाग घेताल. तीन दिवसांत धावले 450 बैलगाडे धावले. सहभागी बैलगाड्यांना तीन मोटर सायकलसह मिळणार सुमारे पंधरा लाखांचे बक्षिस देण्यात आले.
केंद्र सरकारतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पुणे देशात नववे तर राज्यात दुसरे आले. यंदा पुणे शहराला फाइव्ह स्टार रँकिंग मिळाले पण स्वच्छ शहरांच्या यादीत गेल्यावर्षीप्रमाणे नववा क्रमांक कायम राहिला.
पंतप्रधान मोदी आज ऐतिहासिक काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेणार आहे. काळाराम मंदिराचे दर्शन घेणारे ते पहिले पंतप्रधान ठरणार आहे. त्यामुळे आता मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक आणि मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. या दौऱ्यात मोदी राज्याला 30 हजार 500 कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूचे उद्घाटन करणार आहेत.