LIVE | मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंचं ट्विट

| Updated on: Apr 02, 2021 | 11:32 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंचं ट्विट
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Apr 2021 05:58 PM (IST)

    वसईत कंपनीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी, चोरटे 40 ते 50 लाखांचा मुद्देमाल घेऊन फरार

    वसईतील आदी इंटरप्राइजेस या कंपनीत घरफोडी करून 40 ते 50 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन अज्ञात चोरटे फरार झाले आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत आदी इंटरप्राइजेस ही कंपनीचे गोदाम आहे. या गोदामातून पालघर जिल्ह्यात विविध कंपनीच्या AC, एलईडी टीव्हींचा पुरवठा केला जातो. अज्ञात चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो सारखं वाहन गोदामात लावून त्यात 40 ते 50 लाखांचा मुद्देमाल घेऊन ते फरार झाले आहेत. आज दुपारी ही घटना कळाल्यानंतर वालीव, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. या तपासासाठी वालीव पोलीस ठाण्याचे 3 आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे 3 असे सहा पथक तयार करण्यात आले आहेत.

  • 02 Apr 2021 05:03 PM (IST)

    ‘वर्षा’वर मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरु, बैठकीत मुख्यमंत्र्यांसह टास्क फोर्सचे ज्येष्ठ अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे सचिव आणि आरोग्य अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि प्रत्यक्षपणे उपस्थित


  • 02 Apr 2021 04:29 PM (IST)

    पुणे : कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यावर घरच्यांनी अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णयाला मनसेचा विरोध

    पुणे : कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यावर घरच्यांनी अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णयाला मनसेचा विरोध, पालिकेच्या गेटवर प्रतिकात्मक प्रेतयात्रा आणत मनसेने केलं निषेध आंदोलन, पीपीई किट घालून मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या गेटवर केलं आंदोलन, पालिका जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, मनसेचा इशारा

  • 02 Apr 2021 04:22 PM (IST)

    नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे:

    नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे:

    लॉकडाऊन हा पर्याय नाही. लोकांकडे पैसे नाही. सगळे व्यवसाय कोलमडले आहेत. सरकार फसवाफसवीचे धंदे करतात.

    मुख्यमंत्र्यांचे धोरण चुकीचे

    राज्यात कायदा-सुव्यवस्था नाही. सकाळी माणूस कामावरुन निघाला तर संध्याकाळी जिवंत परत जाईल, याची शाश्वती नाही.

    सचिन वाझे सुरक्षेसाठी की गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी काम करत होते?

  • 02 Apr 2021 04:14 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांना जबाबदारी पेलावली नाही, तुम्ही वर्षभरात बेड उपलब्ध करु शकत नाही? : नारायण राणे

    “मुख्यमंत्री राज्यात लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत. सरकारमधील त्यांचे मित्रपक्ष लॉकडाऊनसाठी उतावीळ नाहीत. कोरोना सुरु झाला त्यावेळी माझे कुटुंब अशी जबाबदारी योजनेची त्यांनी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांना माझी जबाबदारी पेलवली नाही. राज्यात कोरोना वाढण्यामागे सरकारचं धोरण कारणीभूत आहे. तुम्ही वर्षभरात बेड उपलब्ध करु शकले नाहीत. मग तुम्ही काय करु शकले?”, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

  • 02 Apr 2021 02:43 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री साडे 8 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील

  • 02 Apr 2021 12:59 PM (IST)

    कोपरगाव शहर पोलिसांची दंडात्मक कारवाईबरोबर दंडुका कारवाईला सुरुवात

    कोपरगाव शहर पोलिसांची दंडात्मक कारवाईबरोबर दंडुका कारवाईला सुरुवात

    कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ

    प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करत दंडात्मक कारवाई बरोबर दंडुका कारवाईला केली सुरुवात

    रात्री संचारबंदीच्या वेळेत कट्ट्यावर बसलेल्या टवाळखोरांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

  • 02 Apr 2021 12:57 PM (IST)

    धुळ्यात 42 वर्षीय इसमाचा धारधार शस्राने खून

    धुळ्यात 42 वर्षीय इसमाचा खून

    धारधार शस्राने केला खून

    विशाल गरूड असे इसमाचा नाव असून

    या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना संशयित म्हणून घेतलं ताब्यात

    मध्य रात्री टॉवर बगीचा परिसरात झाला खून

  • 02 Apr 2021 12:50 PM (IST)

    दोन आठवडे पीएमपीएलएमची बससेवा बंद करण्याची शक्यता

    दोन आठवडे पीएमपीएलएमची बससेवा बंद करण्याची शक्यता

    खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मात्र विरोध

    दहावी बारावी सोडून 30 एप्रिल पर्यत शाळा महाविद्यालय बंद

    दहावी बारावीची नियोजित परीक्षा होणार

  • 02 Apr 2021 12:50 PM (IST)

    केडीमसीच्या गैरेंज परिसरात आग

    डोंबिवली खंबालपाडा परिसरातील घटना

    केडीमसीच्या गैरेंज परिसरात आग

    आगीत एक टँकर जाळून खाक

    भंगार मध्ये काढण्यात आलेला टँकर

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

    आग विझवण्यात आली

  • 02 Apr 2021 12:28 PM (IST)

    औरंगाबादमध्ये कोरोनामुळे तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

    औरंगाबाद :-

    कोरोनामुळे तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

    सिल्लोड तालुक्यातील घाटशेंद्रा गावातील चिमुरडीचा मृत्यू

    पहाटे पाच वाजता घाटी रुग्णालयात झाला मृत्यू

    कोरोनामुळे तीन वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ

  • 02 Apr 2021 12:27 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात लसींचा साठा संपला, आरोग्य केंद्रांवर 3 हजार लस शिल्लक

    चंद्रपूर जिल्ह्यात लसींचा साठा संपला

    जिल्हास्थानी असलेला लसींचा साठा संपुष्टात,

    जिल्ह्यात तालुकास्थानी असलेल्या आरोग्य केंद्रांवर 3 हजार लसीं शिल्लक

    प्रशासनाने मागणी केलेला साठा न पोचल्यास लसीकरण केंद्रे बंद करावी लागणार

    ऍप नोंदणी झालेल्या व 45 वर्षांवरील व्यक्ती अशा एकूण 14 लाखाहून अधिक नागरिकांना लसीकरण अपेक्षित

    1 लाख 17 हजार लसींचा साठा नोंदवूनही आवक नसल्याने अभियान ठप्प होण्याची स्थिती

  • 02 Apr 2021 12:12 PM (IST)

    पुणे विभागात गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर निघणार 2 हजार घरांची सोडत

    पुणे –

    पुणे विभागात गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर निघणार 2 हजार घरांची सोडत

    म्हाडा गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर काढणार सोडत

    म्हाडानं कोरोना काळात 2020 साली 5 हजार 600 घरांची सोडत काढली होती

    पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात काढणार सोडत

    म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांची माहिती

  • 02 Apr 2021 12:11 PM (IST)

    नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं

    नाशिक –

    – नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं

    – पालकमंत्री छगन भुजबळ यांची कारवाई

    – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं

    – कोरोना उपाययोजनांच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई

    – नाशकात रुग्णसंख्या वाढत असतांनाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपाययोजनांबाबत केलेली दिरंगाई आणि गलथान कारभाराप्रकरणी कारवाई

    – एकीकडे रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळत नसतांना जिल्हा रुग्णालयातील 80 पैकी केवळ 7 व्हेंटिलेटर वापरात

    – आढावा बैठकीत धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे व्यक्त केला संताप

    – त्यानंतर तासाभरातचं जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवण्यात आलं सक्तीच्या रजेवर

  • 02 Apr 2021 11:07 AM (IST)

    भाजपच्या मीडिया सेलच्या प्रमुखांनी शरद पवारांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी – हसन मुश्रीफ

    कोल्हापूर

    हसन मुश्रीफ –

    भाजपच्या मीडिया सेलच्या प्रमुखांनी शरद पवारांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी

    भाजप ने दिलीगीरी व्यक्त करून हे थांबवा

    दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल

  • 02 Apr 2021 10:54 AM (IST)

    नाशकात खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या कैद्यांची कारागृहाबाहेर मिरवणूक

    नाशिक –

    नाशकात खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या कैद्यांची कारागृहाबाहेर मिरवणूक

    कारागृहाबाहेर आलेल्या आठ कैद्यांची कारागृहा बाहेर जल्लोषात स्वागत

    ढोल – ताशा वाजवत काढण्यात आली मिरवणूक

    काल दुपारची घटना

    खुनाच्या गुन्हयातील प्रशांत बागूल, आतिश निकम, निवृत्ती बनकर, आकाश खताळेसह चौघांची निर्दोष मुक्तता

    जल्लोष करणाऱ्या 17 जणांना नाशिक रोड पोलिसांनी केली अटक

    9 वाहने ही घेतली ताब्यात

  • 02 Apr 2021 09:35 AM (IST)

    ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांना कृषीरत्न पुरस्कार

    बारामती :

    ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांना कृषीरत्न पुरस्कार..

    – राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून पुरस्कार जाहिर..

    – कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्काराने होणार राजेंद्र पवार यांचा सन्मान..

    – कृषी क्षेत्रातील कामाची सरकारने घेतली दखल..

  • 02 Apr 2021 09:34 AM (IST)

    औरंगाबाद शहरात कोरोना लसीकरणाला जोरदार प्रतिसाद

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात कोरोना लसीकरणाला जोरदार प्रतिसाद

    एका दिवसात औरंगाबाद शहरात 3297 नागरिकांनी घेतली लस

    46 लसीकरण केंद्रावरून औरंगाबाद शहरात सुरू आहे लसीकरण

    45 वर्षांवरील सर्वच नागरिकांना दिली जात आहे लस

    शहरात आतापर्यंत एक लाखांपेक्षाही अधिक नागरिकांना दिली आहे लस

  • 02 Apr 2021 09:32 AM (IST)

    नागपुरात कोरोना मृत्यूदर वाढला

    नागपूर –

    नागपुरात 27 मार्च पासून कोरोना मृत्यू 50 च्या वर

    काल 24 तासात 60 मृत्यू ने वाढविली चिंता

    नागपुरात मृत्य दर पोहचल 2.24 वर

    मागील वर्षी 17 सप्टेंबर ला एकाच दिवशी झाले होते 64 मृत्यू

    हा आकडा मृत्यूचा सर्वाधिक आकडा होता आता या वर्षी पण हा आकडा गाठला जाणार का

    प्रशासन खडबडून जागे झाले

  • 02 Apr 2021 09:26 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला, शेतीच्या कामावर परिणाम, पिकेही सुकली

    सांगली –

    जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला

    शेतीच्या कामावर परिणाम, पिकेही सुकली

    गेली 8 दिवस सतत होत आहे तापमानात वाढ

    एप्रिलची सुरवात 35 अंशाने

    हळूहळू चाळीशीकडे जात आहे तापमान

    सरासरी तापमानात 37 अंशची नोंद

  • 02 Apr 2021 09:25 AM (IST)

    आँयलाॅग प्रकल्पासाठी प्रस्तावीत जागा रिफायनरीसाठी घ्या, नाट्ये ग्रामपंचायतीचा ठराव आणि मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

    रत्नागिरी-

    नाणार रिफायनरी प्रकल्प प्रकरण

    आँयलाॅग प्रकल्पासाठी प्रस्तावीत जागा रिफायनरीसाठी घ्या

    नाट्ये ग्रामपंचायतीचा ठराव आणि मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

    दिड हजार एकरची जागा आँयलाॅग प्रकल्पासाठी प्रस्तावीत

    त्याशिवाय आणखी जागा धेवून रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्याबाहेर घेवून जावू नका

    रिफायनरीला वाढत्या पाठिंब्यानंतर नाट्ये ग्रामपंतायतीची भुमिका

  • 02 Apr 2021 09:24 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 14 प्रतिष्ठानांनवर केली कारवाई

    नागपूर ब्रेकिंग –

    नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने १४ दूकाने प्रतिष्ठानांनवर केली कारवाई

    ७५ हजार चा दंड वसूल केला.

    पथकानी ५३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

    मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

  • 02 Apr 2021 09:21 AM (IST)

    जिल्ह्यातील पतसंस्थेत अडकल्या 450 कोटींच्या ठेवी

    सांगली –

    जिल्ह्यातील पतसंस्थेत अडकल्या 450 कोटींच्या ठेवी

    जिल्ह्यातील पतसंस्थेची परिस्थिती चिंताजनक

    संस्थाचालक निर्धास्त ,सहकार विभागाचे दुर्लक्ष ठेवीदार हवालदिल

    जिल्ह्यातील सुमारे 250 पत सवस्थेत अडकलेल्या ठेवी

  • 02 Apr 2021 08:47 AM (IST)

    कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये महापारेषणची तार कोसळली

    कोल्हापूर –

    कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये महापारेषणची तार कोसळली

    अतिउच्च दाब वीज वहन करणारी तार तुटल्याने भीतीच वातावरण

    मुख्य चौकातच तार तुटल्याने वाहतूक बंद

    विद्युत पुरवठा बंद असल्याने कोणतीही हानी नाही

  • 02 Apr 2021 07:59 AM (IST)

    ठेकेदार, नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयात ‘नो एन्ट्री’

    पिंपरी चिंचवड

    – ठेकेदार, नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयात ‘नो एन्ट्री’

    – शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक, ठेकेदार यांना महापालिका मुख्यालय, विविध विभागीय कार्यालयात ‘नो-एंट्री’

    – या बंदी मधून नगरसेवक, पदाधिका-यांना वगळले आहे. तसेच बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग, कार्यालय प्रमुख यांनी प्रवेश देण्याची व्यवस्था करावी

    – नागरिकांनी ई-मेलद्वारे त्या-त्या विभागाकडे आपल्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे

  • 02 Apr 2021 07:56 AM (IST)

    गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस, अखेरच्या दिवशी 193 उमेदवारी अर्ज दाखल

    कोल्हापूर :

    गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस

    अखेरच्या दिवशी दाखल झाले तब्बल 193 उमेदवारी अर्ज

    आजअखेर 482 जणांनी दाखल केले अर्ज

    इच्छुकांना मध्ये आजी माजी आमदार यांचाही समावेश

    5 एप्रिल ला होणार अर्जांची छाननी

    विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने दोन्ही आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार

  • 02 Apr 2021 07:55 AM (IST)

    ग्राम पंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही – हायकोर्ट

    मुंबई –

    ग्राम पंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही – हायकोर्ट

    मुंबई उच्च न्यायालायाचा महाविकास आगाडीला दणका

    13 जुलै 2020 च्या अद्यादेशातील विशेष तरतूद रद्द

    जिल्हाधिका-यांना निर्णय स्वातंत्र्या हवं – हायकोर्ट

  • 02 Apr 2021 07:53 AM (IST)

    पैठण येथील एकनाथ महाराजांचे मंदिर चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश

    औरंगाबाद –

    पैठण येथील एकनाथ महाराजांचे मंदिर चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश

    एक तारखेपासून चार तारखेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश

    एक तारीख ते चार तारखेपर्यंत होणारी नाथशष्टी यात्रा झालीय रद्द

    यात्रा काळात गर्दी होऊ नये म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

    मंदिर बंद काळातही संपन्न होणार आहेत धार्मिक विधी

    सलग दुसऱ्या वर्षी रद्द झालीय नाथशष्टी यात्रा

  • 02 Apr 2021 07:52 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

    औरंगाबाद –

    औरंगाबाद महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

    महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडे यांनी जाहीर केला अर्थसंकल्प

    1275 कोटी रुपयांचा जाहीर झाला अर्थसंकल्प

    उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवत जाहीर केला अर्थसंकल्प

    महापालिका निधीतूनच शहरात 100 कोटींचे रस्ते करण्याचीही अर्थसंकल्पात घोषणा

  • 02 Apr 2021 06:48 AM (IST)

    अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पॉझिटिव्ह

    अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पॉझिटिव्ह

    तिने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे

    इन्स्टाग्रामवर तिने ही माहिती दिली

  • 02 Apr 2021 06:45 AM (IST)

    थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी म्हाडाची अभय योजना

    थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी म्हाडाची अभय योजना ,

    सहकारी गृहनिर्माण संस्था, रहिवाश्यांचे व्याज होणार रद्द

    म्हाडाच्या वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था

    रहिवाश्यांकडून थकीत सेवा शुल्कावरील व्याज रद्द करून सेवाशुल्क वसूल करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार अभय योजना सुरु करण्यात आली आहे.

  • 02 Apr 2021 06:32 AM (IST)

    रायगड रोप वे 16 दिवसांसाठी बंद, पर्यटकांची होणार गैरसोय

    रायगड रोप वे 16 दिवसांसाठी बंद, पर्यटकांची होणार गैरसोय

    ३ एप्रिल ते १८ एप्रिल या दरम्यान रायगड रोप वे देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची बातमी मिलेनिय

    प्रॉपर्टीज रायगड रोप वे या कंपनीच्या व्यस्थापनाने दिली आहे.

  • 02 Apr 2021 06:30 AM (IST)

    आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवास पुढील सूचना येईपर्यंत कार्यकर्ते, अभ्यागत यांच्यासाठी बंद

    आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवास पुढील सूचना येईपर्यंत कार्यकर्ते, अभ्यागत यांच्यासाठी बंद

    – आमदार निवासात करोना रुग्ण आढल्याने निर्णय

    – विधिमंडळ सचिवांनी दिले पत्र

    – सर्व आमदारांना दिल्या सूचना