Maharashtra News LIVE Update | “राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा” नवनीत राणा यांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Aug 13, 2021 | 12:13 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा नवनीत राणा यांचा खळबळजनक आरोप
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Aug 2021 09:46 PM (IST)

    “राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा” नवनीत राणा यांचा खळबळजनक आरोप

    अमरावती : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा

    खासदार नवनीत राणा यांचा खळबळजनक आरोप

    नवनीत राणा यांची केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार

    उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या कंत्राटदाराला बालकांच्या पौष्टिक आहाराचा ठेका दिल्याचा आरोप

    महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

    महाराष्ट्राचा आणि अंगनवाडीताईंचा नवनीत राणा यांनी अपमान केल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप

    नवनीत राणा यांच्या आरोपानंतर फेसबुक लाईव्ह करून यशोमती ठाकूर यांचे स्पष्टीकरण

    अमरावतीत यशोमती ठाकूर व नवनीत राणा यांचा वाद पेटण्याची शक्यता

  • 12 Aug 2021 09:05 PM (IST)

    महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद

    जळगाव – महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद

    अल्पवयीन मुलींचा चोरीसाठी केला जायचा वापर

    या अल्पवयीन मुलींची रिमांड होममध्ये रवानगी


  • 12 Aug 2021 09:04 PM (IST)

    पुण्यात यंदा गणपती उत्सव साध्या पद्धतीनेच, महापौराच्या बैठकीत गणपती मंडळांचा एकमताने निर्णय 

    पुणे : पुण्यात यंदा गणपती उत्सव साध्या पद्धतीनेच

    महापौराच्या बैठकीत गणपती मंडळांचा एकमताने निर्णय

    घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन होणार

    फिरत्या हौदाची संख्या150 वर नेणार

    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचा निर्णय

    अखेर गणपती मंडळांच ठरलं

    महापौरांनी मानले आभार

  • 12 Aug 2021 08:28 PM (IST)

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 412 पदांसाठी प्राधान्यक्रम मागवायला सुरुवात 

    मुंबई : राज्यातील रखडलेल्या 413 एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी

    राज्यातील 413 पदांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच मिटणार

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 412 पदांसाठी प्राधान्यक्रम मागवायला सुरुवात

    मुलखातीत पात्र झालेल्या उमेदवारांना निवडता येणार प्राधान्यक्रम

    लोकसेवा आयोगानं परिपत्रक काढत दिली माहिती

    अखेर महिनाभरात 423 पदांच्या नियुक्तीचा मिटणार

    19 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना निवडता येणार प्राधान्यक्रम

    पात्र उमेदवारांची सुधारित यादी लवकरचं आयोग जाहीर करणार

  • 12 Aug 2021 08:27 PM (IST)

    परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी

    मुंबई : परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी

    कोपरी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनने जारी केली नोटीस

    परमबीर यांच्यासोबत याच खंडणी प्रकरणातील इतर मोठ्या आरोपींच्या विरोधातदेखील लूक आऊट नोटीस काढण्याची प्रक्रिया लवकरच ठाणे पोलीस सुरू करणार

    परमबीर सिंग आणि इतर आरोपींच्या अडचणीत वाढ

  • 12 Aug 2021 07:12 PM (IST)

    नागपुरात आज 8 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

    नागपूर कोरोना अपडेट –

    नागपुरात आज 8 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    7 जणांनी केली केली कोरोनावर मात

    तर आठवडा भरानंतर कोरोनामुळे एकाचा मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 492951

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482702

    एकूण मृत्यू – 10118

  • 12 Aug 2021 07:12 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 104

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 144

    नाशिक मनपा- 63

    नाशिक ग्रामीण- 70

    मालेगाव मनपा- 00

    जिल्हा बाह्य- 11

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8543

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02

    नाशिक मनपा- 01

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 01

    जिल्हा बाह्य- 00

  • 12 Aug 2021 06:36 PM (IST)

    अकोला जिल्हात डेल्टा प्लसचा शिरकाव, पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ

    अकोला: जिल्ह्यात एकीकडे कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी होत चालले असताना  डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी माहिती दिली आहे. हा रुग्ण अकोट येथील रहिवासी असून 29 जून रोजी त्याला उपचाराकरिता अकोला कोरोना केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. आरोग्य विभागाचे एक पथक अकोटकडे रवाना झाले असून संबंधित रुग्ण सध्या ठीक आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे नमुने आरोग्य पथकाद्वारे घेण्यात येणार आहेत.

  • 12 Aug 2021 06:21 PM (IST)

    उद्या मार्मिक साप्ताहिकाचा 61 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे वाचकांशी संवाद साधणार

    उद्या ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा 61 वा वर्धापन दिन

    कोरोनामुळे दृक्श्राव्य माध्यमातून संध्याकाळी 5 वाजता वर्धापन दिन साजरा होणार

    मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे समाजमाध्यमावरून मार्मिकच्या वाचकांशी संवाद साधणार आहेत

  • 12 Aug 2021 05:27 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुण्याचा दौरा करणार 

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुण्याचा दौरा करणार

    – उद्यापासून राज ठाकरे दोन दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर

    – दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

    – शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

  • 12 Aug 2021 05:26 PM (IST)

    पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, आयोजित केली नगरसेवकांची बैठक  

    पुणे- आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

    – भाजपने आयोजित केली नगरसेवकांची बैठक

    – पक्षाचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारती करणार नगरसेवकांना मार्गदर्शन

    – समर्थ बूथ अभियानाची माहिती नगरसेवकांना दिली जाणार

    – भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात बैठकीचे आयोजन

  • 12 Aug 2021 05:03 PM (IST)

    साताऱ्यातील वाई तालुक्यात दुहेरी हत्याकांड उघडकीस 

    सातारा : जिल्ह्यातील वाई तालुक्यात व्याजवाडी परिसरात दुहेरी हत्याकांड उघडकीस

    प्रेयसीच्या खुनानंतर एका आठवड्यात पत्नीच्या खुणाचा लागला छडा

    आरोपीने 2019 मध्ये पत्नीचा पुरलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर

    संशयित आरोपी नितीन गोळे यास सातारा पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन घेतले ताब्यात

    संशयित आरोपीने दोन्ही हत्येची दिली कबुली

    व्याजवाडी हद्दीतील ओढ्यात आरोपीसमोर पत्नीच्या मृतदेहाचे अवशेष खोदून काढण्याचे काम सुरू

    भुईंज आणि वाई पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई

  • 12 Aug 2021 04:47 PM (IST)

    पत्रकारांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी याचिका दाखल, पुढील सुनावणी 17 ऑगस्टला

    मुंबई : पत्रकारांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दाखल याचिकेवरील पुढील सुनावणी 17 ऑगस्ट रोजी होणार

    लोकल ट्रेनमध्ये पत्रकारांना प्रवास करण्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे

    राज्य सरकारतर्फे लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या लोकांना 15 ऑगस्टपासून लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी दिली गेली आहे परवानगी

  • 12 Aug 2021 04:11 PM (IST)

    मुंबईत एका कुटुंबाला 4-5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता? – हायकोर्ट

    मुंबई : मुंबई आणि जवळपासच्या परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर होत आहे- हायकोर्ट

    एका कुटुंबाला 4-5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता? – हायकोर्ट

    पार्किंगची जागा असेल तरच नवं वाहन खरेदीची परवानगी द्यायला हवी

    रस्त्यांवर कार पार्किंगमुळे चालायलाही जागा नाही

    हल्ली दोन इमारतींच्या मधल्या जागेत पार्किंग केली जात आहे.

    प्रशासनान अंडरग्राऊंड बहुमजली पार्किंगचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे

    मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले राज्य सरकारला खडे बोल

    नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाचं निरीक्षण

  • 12 Aug 2021 04:06 PM (IST)

    नितीन राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे, हा फक्त ढोंगीपणा आहे : देवेंद्र फडणवीस

    मुंबई : महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होत आहे

    दिल्लीत लहान मुलीवर झालेली घटना खूपच दुखद आहे

    नितीन राऊत यांच्या नेतृत्वात जे आंदोलन होत आहे, हा फक्त ढोंगीपणा आहे

    महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार झाले तिकडे का गेले नाही

    तुमच्या समोर हे अत्याचार होत आहे

    महिलांना जाळले जात आहे

    प्रत्येक दिवशी प्रत्येक महिन्यात अत्याचार होत आहे

    शऱद पवार यांची टीका

  • 12 Aug 2021 12:02 PM (IST)

    17 ऑगस्टपासून शाळा सुरु होणार नाहीत, शालेय शिक्षण विभागाच्या जीआरला स्थगिती

    17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीत, शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरला सरकारने दिली स्थगिती, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय

  • 12 Aug 2021 12:01 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवस पेट्रोल पंपावर दरोडा

    औरंगाबाद –

    औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा

    पिस्तुल आणि चाकू चा धाक दाखवत टाकला दरोडा

    तोंड बांधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी टाकला दरोडा

    पेट्रोल पंपावरील कर्मचारी रक्कम मोजत असताना पडला दरोडा

    मोजणी सुरू असलेली रक्कम घेऊन दरोडेखोर झाले पसार

    भरदिवसा सकाळी साडेदहा वाजता घडली

    भर दिवसा पडलेल्या धाडशी दरोड्यामुळे खळबळ

  • 12 Aug 2021 11:30 AM (IST)

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे यांचा राजीनामा

    सोलापूर –

    कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे यांचा राजीनामा

    तब्बल तीन वर्षानंतर  नरोळेनी दिला राजीनामा

    माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे नरोळे यांनी केली होती सभापती विजयकुमार देशमुख यांच्या  राजीनाम्याची  मागणी

    उपसभापतीच्या राजीनाम्यानंतर विजयकुमार देशमुख यांनी राजीनामा देण्याची भूमिका होती दर्शवली

    विजयकुमार देशमुखानी  अविश्वास  आणण्याचे सिद्धाराम म्हेत्रे, काका साठे, दिलीप माने, सुरेश हसापुरे यांना आवाहन

  • 12 Aug 2021 11:29 AM (IST)

    नाशकात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची आजपासून शिष्यवृत्ती परीक्षा

    नाशिक –

    इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची आजपासून शिष्यवृत्ती परीक्षा..

    दीड वर्षांनंतर मुलं प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी हजर..

    परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्याना मास्क,सानिटायझर आणि तापमान तपासल्यानंतरच प्रवेश..

    दीड वर्षात दोन वेळेस रद्द झालेल्या परीक्षांना अखेर सुरुवात

  • 12 Aug 2021 11:29 AM (IST)

    साईमंदिर खुले करा या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाचे साकड फेरी आंदोलन

    साईमंदिर खुले करा या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाचे साकड फेरी आंदोलन

    साई मंदिराला प्रदिक्षणा घालत मंदिर उघडण्याचे साकडे

    हॉटेल , मॉल्स , मदिरालय सुरू करणा-या ठाकरे सरकारला जागे व्हा

    टाळ , मृदूंगासह आंदोलन

    मंदिर बंद ठेवणाऱ्या ठाकरे सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा

    शिर्डीचे मंदिर बंद असल्याने अर्खकारण ठप्प असल्याने ग्रामस्थ, व्यवसायिकही आंदोलनात सहभागी

    लवकरात लवकर मंदिर खुले केले नाही तर जन आंदोलन उभारणार

    आंदोलकांची भुमिका

  • 12 Aug 2021 11:28 AM (IST)

    पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दौरा

    नवी मुंबई –

    पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दौरा

    बाजार समितीच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दाखल.

    पनणमंत्री बाळासाहेब  पाटील, आमदार शशिकांतजी शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील ,बाजार समिती संचालक, संबंधित अधिकारी वर्ग व बाजार घटक उपस्थित

    नियमनमुक्तीने संपूर्ण व्यापारपद्धती कोलमडली आहेत तसेच मार्केट इमारत २००३ पासून धोकादायक अवस्थेत असून बाजार घटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

  • 12 Aug 2021 11:25 AM (IST)

    काँग्रेसमध्ये घराणेशाही आता बंद झाली पाहिजे – सिद्धाराम म्हेत्रे

    सोलापूर –

    काँग्रेसमध्ये घराणेशाही आता बंद झाली पाहिजे

    नेत्यांच्या मुलांना पद्धत देणे बंद झाले पाहिजे

    काँग्रेस सेवादल जोपर्यंत सक्रीय होती तोपर्यंत काँग्रेसची पाळेमुळे कुणी हलवू शकले नाही

    सेवादलच्या धर्तीवरच आरएसएस तयार झाले

    माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा घराणेशाही करणाऱ्या काँग्रेसने त्यांना टोला

    सेवादलाच्या यंग ब्रिगेड पदी सुदीप चाकोते यांच्या नागरी सत्काराच्या आयोजित कार्यक्रमात सिद्धाराम म्हेत्रे यांनी लगावला टोला

  • 12 Aug 2021 09:54 AM (IST)

    कोरोना काळातील राज्यातील सर्वात मोठ्या स्कॉलरशीप परीक्षेची जोरदार तयारी, औरंगाबाद जिल्ह्यात 254 परीक्षा केंद्रे सज्ज

    औरंगाबाद –

    कोरोना काळातील राज्यातील सर्वात मोठ्या स्कॉलरशीप परीक्षेची जोरदार तयारी

    औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 254 परीक्षा केंद्रे परीक्षेसाठी सज्ज

    कोरोना नियमांचे पालन करून होतेय राज्यातली सर्वात मोठी पहिली परीक्षा

    एका बाकड्यावर एक विद्यार्थी बसवून होणार एक्झाम

    मास्क सॅनिटायझर वापरून गर्दी होऊ न देता होणार परीक्षा

    गेल्या दोन वर्षातली राज्यातली पहिलीच मोठी परीक्षा

  • 12 Aug 2021 08:59 AM (IST)

    नागपूर जिल्हा खुनाच्या घटनांनी हादरला, नरखेड आणि उमरेड तालुक्यात दोघांची हत्या

    – नागपूर जिल्हा खुनाच्या घटनांनी हादरला,

    – नरखेड आणि उमरेड तालुक्यात दोघांची हत्या,

    – नरखेड तालुक्यात बेलोना मार्गावर परसोडी शिवारात हत्या

    – शहजाद अबुल लईक शेख (30) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव

    – पैशाच्या वादातून झाली हत्या

    – या प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

    – दुसरी हत्या उमरेड तालुक्यातील बायपास मार्गावर घडली

    – प्रवीण कठाने असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव

    – मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता

    – पैशाच्या वादातून आशिष गजभिये याने केली हत्या

    – आरोपी पोलिसांच्या ताब्यात

  • 12 Aug 2021 08:35 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा आणखीन एक रुग्ण आढळला, एकूण रुग्णसंख्या 638 वर

    सोलापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा आणखीन एक रुग्ण आढळला

    म्युकर मायकोसीसच्या एकूण रुग्णांची संख्या 638 वर

    आतापर्यंत म्युकरमायकोसिसमुळे 90 जणांचा मृत्यु

    39 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • 12 Aug 2021 08:34 AM (IST)

    नागपूर महापालिकेत 68 मौनीबाबा नगरसेवक, चार वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारला नाही

    – नागपूर महापालिकेत 68 मौनीबाबा नगरसेवक

    – चार वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारला नाही

    – भाजपचे सर्वाधिक 52, काँग्रेसचे 12 तर बसपाचे 4 नगरसेवक मौनीबाबा

    – मौनीबाबा नगरसेवक जनतेचे प्रश्न कशे मांडणार?

    – मनपातील 151 पैकी 68 नगरसेवक मौनीबाब, पक्ष काय कारवाई करणार?

    – दुसऱ्याचं ऐकत धन्यता मानून सभागृहात फक्त बसून राहतात का नगरसेवक?

    – सहा महिन्यांवर मनपा निवडणूक, मौनीबाबा नगरसेवकांची होणार पंचाईत

  • 12 Aug 2021 08:31 AM (IST)

    नाशकात पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात महिलेची लूट

    नाशिक –

    पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात महिलेची लूट..

    सोनसाखळी चोरांनी लांबवले महिलेचे दागिने..

    अंगावरचे दागिने पिशवीत ठेवा अस सांगत , दागिने घेऊन फरार..

    चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद..

    नाशिकच्या हिरावाडी परिसरात दिवसाधवल्या घडलेल्या घटनेने खळबळ..

    सात तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन चोर फरार..

    पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल..

  • 12 Aug 2021 08:30 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील 30 गावातील पाणी साठा वाढविणार

    सोलापूर जिल्ह्यातील 30 गावातील पाणी साठा वाढविणार

    दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणाऱ्या 30 गावात जलसुरक्षेअंतर्गत  भूमीगत पाणी साठा वाढविण्यासाठी विशेष प्रयोग

    भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार

    जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 130 गावात भूजल विकास कार्यक्रम राबविण्याचे नियोजन
    पहिल्या टप्प्यात 30 गावांचा समावेश

  • 12 Aug 2021 08:30 AM (IST)

    नाशकातील लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर अद्याप फरार

    नाशिक –

    लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर अद्याप फरार

    मुख्य आरोपी फरार, मात्र वाहनचालक आणि शिक्षकाला कोठडी..

    वैशाली वीर प्रकरणी एसीबीच्या भूमिका संशयास्पद..

    तक्रारदार नाशिकचा,कारवाई ठाणे एसीबीची

    अटकपूर्व जामीनासाठी झनकर यांच्या नातेवाईकांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा

  • 12 Aug 2021 08:29 AM (IST)

    नागपुरातील 27 वैद्यकीय शिक्षक चंद्रपुरात कार्यरत दाखवण्याचा घाट!

    – नागपुरातील 27 वैद्यकीय शिक्षक चंद्रपुरात कार्यरत दाखवण्याचा घाट!

    – चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या 150 जागा वाचवण्याचे प्रयत्न

    – नागपुरातील मेडिकल 27 शिक्षक चंद्रपूर येथे कार्यरत दाखवण्याचा वैद्यकीय शिक्षण खात्याच्या घाट

    – मेडिकल आणि सुपरस्पेशालिटीतील 27 शिक्षकांची चंद्रपूरात प्रतिनियुक्तीवर बदलीचे आदेश

    – चंद्रपुरातील मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या 100 जागा वाढवून 150 करण्यात आल्या

    – 150 एमबीबीएस जागांनुसार प्राध्यापकांसह इतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली

    – राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेकडून निरीक्षणाच्या आधी शिक्षकांची पदे रिक्त दिसू नयेत म्हणून प्रयत्न

  • 12 Aug 2021 08:28 AM (IST)

    बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरण, नगरसेविका पती कन्नू ताजनेला सशर्त जामीन मंजूर

    नाशिक –

    बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरण..

    नगरसेविका पती कन्नू ताजनेला सशर्त जामीन मंजूर..

    50 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे न्यायालयाचे आदेश

    15 मे रोजी ताजने याने आपली कार बिटको हॉस्पिटल मध्ये घुसवत केली होती तोडफड..

  • 12 Aug 2021 08:28 AM (IST)

    मोठा दिलासा! विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात

    – विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, मोठा दिलासा

    – विदर्भात गेल्या चार दिवसांत एकही मृत्यू नाही, रुग्णसंख्याही घटली

    – विदर्भाचा पॉझिटीव्हीटी रेट ०.३० टक्क्यांपर्यंत आला खाली

    – चांगल्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर पोहोचला

    – विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांत करोनाचा एकही नवा रुग्ण नाही

    – विदर्भात गेल्या २४ तासांत १४ हजार करोना चाचण्या, ३४ नवे रुग्ण

  • 12 Aug 2021 08:27 AM (IST)

    बारामतीत युरीयाच्या टंचाईमुळे शेतकरी चिंताग्रस्त

    बारामती :

    – युरीयाच्या टंचाईमुळे शेतकरी चिंताग्रस्त..

    – खरीप हंगाम सुरु होवून दोन महिने उलटले तरी मिळेना युरीया..

    – हातारली कामे सोडून युरीया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची होतेय धडपड..

    – युरिया टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार मोठी घट..

    – बाजरी, मका, सुर्यफुल पिकांच्या उत्पादनात घटीची शक्यता..

  • 12 Aug 2021 08:27 AM (IST)

    पुण्यात सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सुचनांबाबतची नवी नियमावली तयार केली जाणार

    पुणे

    जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सुचनांबाबतची नवी नियमावली तयार केली जाणार

    ही नियमावली निश्‍चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारने दिला आदेश

    या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा समितीची येत्या शुक्रवारी 13 ऑगस्टला बोलाविली बैठक

    जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) स्मिता गौड आणि अन्य काही शिक्षणतज्ज्ञांचा या समितीत समावेश

    या बैठकीत शाळा सुरु करताना शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी. ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनी काय करावे, याबाबतची मार्गदर्शक नियमावलीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार

  • 12 Aug 2021 08:26 AM (IST)

    पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 हजार 830 शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार

    पुणे

    पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 हजार 830 शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार

    परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित व विनाअनुदानित मिळून 1 हजार 830 प्राथमिक शाळा

    या सर्व शाळांमध्ये इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग

    जिल्हा परिषदेच्या एकूण प्राथमिक शाळांपैकी 69 शाळांमध्ये आठवीचा वर्ग

  • 12 Aug 2021 08:25 AM (IST)

    बारामतीत होणार शासकीय कॅन्सर हॉस्पिटल

    बारामती :

    – बारामतीत होणार शासकीय कॅन्सर हॉस्पिटल..

    – वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कॅन्सर हॉस्पिटलचा प्रस्ताव..

    – मंत्रालयीन स्तरावर हॉस्पिटलबाबत झाली बैठक…

    – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातलं विशेष लक्ष..

    – कागदपत्रांच्या पूर्ततेची प्रक्रिया सुरु..

    – आजूबाजूच्या परिसरालाही होणार फायदा..

  • 12 Aug 2021 08:25 AM (IST)

    दूध उत्पादक शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत

    बारामती :

    – दूध उत्पादक शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत..

    – खासगी दूध प्रकल्पांकडून होतेय लूट..

    – कोरोना काळात दूध व्यवसाय आला होता अडचणीत..

    – मागणी वाढल्यानंतरही दूधाच्या खरेदीदरात वाढ होईना..

    – सध्या मिळतोय २३ रुपये प्रतिलिटर दर..

    – दूध दराबाबत केंद्र शासनाने लक्ष घालण्याची होतेय मागणी..

    – दूध उत्पादकांना शासनाकडून अनुदानाची अपेक्षा..

  • 12 Aug 2021 07:38 AM (IST)

    मालेगावात 10 तलवारींसह चौघांना अटक

    मालेगाव :

    मालेगावात 10 तलवारींसह चौघांना करण्यात आली अटक

    पोलीस उप अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

    शहरात वाढत्या गुन्हेगारी कारवाया पोलिसांनी घेतल्या गांभीर्याने
    आगामी मोहरम व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस खास लक्ष ठेवून

  • 12 Aug 2021 07:15 AM (IST)

    औरंगाबादेत लसींचा काळाबाजार करणारे दोन्ही कर्मचारी निलंबित

    औरंगाबाद –

    लसींचा काळाबाजार करणारे दोन्ही कर्मचारी निलंबित

    शासकीय लसींची चोरी करून छुप्या पद्धतीने सुरू होती विक्री

    पोलिसांनी छापा मारून केला होता लस काळाबाजाराचा पर्दाफाश

    चौकशी अंती दोन्ही कर्मचाऱ्यांचे निलंबन

    गणेश दुराळे आणि सय्यद अमजद अहमद या कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी केले निलंबन

  • 12 Aug 2021 07:14 AM (IST)

    अहमदनगर शहरात दोन दिवसांपासून लसीकरण बंद

    अहमदनगर

    अहमदनगर शहरात दोन दिवसांपासून लसीकरण बंद

    लसींची उपलब्धता न झाल्याने भीषण टंचाई

    आज शहरात एकही लस उपलब्ध

    शहरातील जवळपास 8 लसीकरण केंद्रे राहणार बंद

  • 12 Aug 2021 07:14 AM (IST)

    नागपूर पोलीस कंट्रोल रुमला सर्वाधिक फेक कॅाल महिला छळाचे

    – नागपूर पोलीस कंट्रोल रुमला सर्वाधिक फेक कॅाल महिला छळाचे!

    – पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकाचा होतो दुरुपयोग

    – दररोज कमीत कमी आठ फेक कॅाल येत असल्याची माहिती

    – नियंत्रण कक्षात फेक कॅाल करणाऱ्यांवर पोलीसांचा कारवाईचा बडगा

    – पोलीस नियंत्रण कक्षाला सर्वाधिक फेक कॅाल

  • 12 Aug 2021 07:07 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेतील राजकारण तापलं

    – नागपूर महानगरपालिकेतील राजकारण तापलं

    – काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये फाईलयुद्ध पेटलं

    – निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप

    – मनपा आयुक्तांनी हस्तक्षेप करण्याची काँग्रेसची मागणी

    – स्थायी समितीत फाईल मंजुरीवरुन सुरु झाला काँग्रेस – भाजप वाद

    – निवडणूकीच्या सहा महिन्यापूर्वी दोन्ही पक्ष आमनेसामने

  • 12 Aug 2021 06:43 AM (IST)

    औरंगाबाद महापालिका आयुक्तांनी मोटारसायकलवर फिरुन केली शहराची पाहणी

    औरंगाबाद –

    औरंगाबाद महापालिका आयुक्तांनी मोटारसायकलवर फिरुन केली शहराची पाहणी

    तुंबलेली गटारे, गर्दी, शहरातील अतिक्रमणे, ट्राफिक जॅम याची केली पाहणी

    शहरातील अस्वच्छता आणि दुरवस्था पाहून अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

    महापालिका आयुक्तांच्या अनोख्या सिटी बाईक राईडची शहरात चर्चा

    यापूर्वी सायकल फिरून शहरातील विकास कामांची केली होती पाहणी

    आयुक्त अचानक आणि छुप्या पद्धतीने भेटी देत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे

  • 12 Aug 2021 06:28 AM (IST)

    औरंगाबाद महानगरपालिकेत होणार मेगा भरती

    औरंगाबाद –

    औरंगाबाद महानगरपालिकेत होणार मेगा भरती

    मनपाच्या 4106 जागा भरण्यास मंजुरी..

    नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया राबवण्याचा विचार..

    तिसरी लाट न आल्यासच होईल भरती,अन्यथा भरती जाईल लांबणीवर..

    वर्ग 1,2,3,4 साठी असेल ही भरती..

  • 12 Aug 2021 06:27 AM (IST)

    कोरोनाकाळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी सुरू

    औरंगाबाद –

    कोरोनाकाळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी सुरू

    783 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याचा प्रस्ताव पाठवला जिल्हा प्रशासनाकडे..

    कंत्राटी कामगारांचा मागील पाच महिन्यांपासून पगार ही झालेला नाही..

    पाच महिन्याची पगाराची थकीत रक्कम गेली 13 कोटींवर..

    शासनाकडून निधी न आल्याने मनपाला झाले कोरोना योद्धे जड..

    गरज सरो आणि वैद्य मरो अशी कंत्राटी संघटनांची प्रतिक्रिया..

  • 12 Aug 2021 06:26 AM (IST)

    औरंगाबाद जिल्हा बँकेत लवकरच होणार नोकर भरती

    औरंगाबाद –

    औरंगाबाद जिल्हा बँकेत लवकरच होणार नोकर भरती..

    जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांची कमी असल्याने 200 कर्मचारी भरण्यास मागितली मंजुरी..

    बँक पथकाने पुणे आणि यवतमाळ येथील जिल्हा बँकांना भेटून जाणून घेतली भरती प्रक्रिया..

    पूर्वी बँकेत 1250 कर्मचारी होते मात्र आता 750 कर्मचारी असल्याने भरती करण्याची गरज..

    बँकेचे चेयरमन नितीन पाटील यांनी दिली माहिती..

  • 12 Aug 2021 06:26 AM (IST)

    औरंगाबादेत आज होणार 5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्तीची परीक्षा

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत आज होणार 5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्तीची परीक्षा

    शहर आणि जिल्ह्यात तब्बल 23 हजर 511 विद्यार्थी देणार परीक्षा

    पाचवीचे तब्बल 14 हजार 339 तर 8 वीचे 9 हजार 172 विद्यार्थी देणार परीक्षा

    जिल्ह्यातील 254 केंद्रावर होणार शिष्यवृत्ती परीक्षा

    सकाळी 11 वाजता होणार परीक्षेला सुरुवात

  • 12 Aug 2021 06:25 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा लसींची भीषण टंचाई

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा लसींची भीषण टंचाई

    आज शहरात फक्त 300 लसी उपलब्ध

    फक्त तीन लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण

    शहरातील जवळपास 66 लसीकरण केंद्रे राहणार बंद

    लस टंचाईमुळे औरंगाबाद शहराला तिसऱ्या लाटेचा वाढला धोका