Maharashtra News LIVE Update | सोलापुरात युवासेनेच्या जिल्हा प्रमुखावर शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांकडून हल्ला

| Updated on: Aug 15, 2021 | 12:12 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | सोलापुरात युवासेनेच्या जिल्हा प्रमुखावर शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांकडून हल्ला
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Aug 2021 12:11 AM (IST)

    सोलापुरात युवासेनेच्या जिल्हा प्रमुखावर शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांकडून हल्ला

    सोलापूर – युवासेना जिल्हा प्रमुखावर शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांकडून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

    – युवासेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्यावर जीवघेणा हल्ला

    – देगाव रोड येथील मरीआई चौक येथे झाला हल्ला

    – मनीष काळजे यांच्यावर 14 ते 15 जणांच्या जमावाकडून हल्ला

    – शेतातून परतत असताना रात्री 10 वाजता केला हल्ला

    – ड्रायव्हरवरही केला जीवघेणा हल्ला

  • 14 Aug 2021 10:14 PM (IST)

    उद्यापासून बीड जिल्ह्यातील निर्बंध शिथिल, सर्व प्रकारची दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

    बीड: उद्यापासून बीड जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

    तब्बल दीड वर्षानंतर बीड जिल्हयाचे कुलूप पूर्णतः उघडणार

    सर्व प्रकारची दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

    विविध व्यवसायातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण असणे बंधनकारक

    जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी काढले सुधारित आदेश


  • 14 Aug 2021 08:07 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 116 रुग्ण कोरोनामुक्त, 108 रुग्णांची वाढ

    नाशिक कोरोन अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 116

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 108

    नाशिक मनपा- 50

    नाशिक ग्रामीण- 55

    मालेगाव मनपा- 00

    जिल्हा बाह्य- 03

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8547

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02

    नाशिक मनपा- 01

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 01

    जिल्हा बाह्य- 00

  • 14 Aug 2021 07:06 PM (IST)

    बीएचआर प्रकरणात ठेवीदारांच्या हिताच्या आड लपून विशिष्ट लोकांवर कारवाई, आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप

    जळगाव – बीएचआर प्रकरणात ठेवीदारांच्या हिताच्या आड लपून विशिष्ट लोकांवर कारवाई

    राजकीय सुपारी घेऊन बीएचआर घोटाळ्यात काही ठराविक लोकांना टार्गेट केलं जातं आहे

    तपास यंत्रणा विशिष्ट लोकांवर कारवाई करत असल्याचा आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप

  • 14 Aug 2021 06:45 PM (IST)

    कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली

    कोल्हापूर : कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात आज पुन्हा कोसळली दरड

    दुपारच्या सुमारास कोसळली दरड

    दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक काही काळ झाली होती विस्कळीत

    दोन तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्यात यश

    चार चाकी लहान गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू

  • 14 Aug 2021 06:20 PM (IST)

    15 ऑगस्टला खासदार इम्तियाज जलील दाखवणार काळे झेंडे 

    औरंगाबाद : 15 ऑगस्टला खासदार इम्तियाज जलील दाखवणार काळे झेंडे

    औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ पुण्याला गेल्याने इम्तियाज जलील पालकमंत्र्यांला काळे झेंडे दाखवणार

    15 ऑगस्टला झेंडावंदन करताना सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी जनतेला जलील यांनी केले आवाहन

    पोलिसांनी थांबवल्यास पालकमंत्र्यांच्या मागेच राहून करणार रोष व्यक्त

    खासदार इम्तियाज जलील दाखवणार 15 ऑगस्टला झेंडा फडकवताना पालकमंत्र्यांना काळे झेंडे

    स्वत: खासदार इम्तियाज जलील रस्त्यावर उतरून जनतेलाही करत आहेत रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

  • 14 Aug 2021 06:15 PM (IST)

    सोलापूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी, व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमासाठी गर्दी

    सोलापूर : शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी

    व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमासाठी गर्दी

    कार्यक्रमाला पोलीस परवानगी नाही

    मात्र तरीही काँग्रेस कार्यकर्ते कार्यक्रमासाठी हुतात्मा चौकात

  • 14 Aug 2021 04:51 PM (IST)

    टोकाई सहकारी साखर कारखानाच्या वाद पेटला, चार दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण

    हिंगोली- टोकाई सहकारी साखर कारखानाच्या वाद पेटला

    कारखाण्यातील बॉडीला बाहेर न पडू देण्याचा इशारा

    मागील चार दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण

    कामगारांचा थकीत पगार मिळवण्यासाठी सुरु आहे आमरण उपोषण

  • 14 Aug 2021 04:23 PM (IST)

    वैशाली झनकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

    नाशिक – वैशाली झनकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

    उर्वरित दोघांच्या जामीन अर्जचा प्रस्ताव प्रलंबित

  • 14 Aug 2021 04:22 PM (IST)

    लातूरमध्ये भाजपचा ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचा मेळावा

    लातूर : भारतीय जानता पार्टीचा ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचा मेळावा

    गिरवलकर मंगलकार्यालायत सुरू आहे मेळावा

    मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांची उपस्थिती

    मेळाव्याला ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

     

  • 14 Aug 2021 04:21 PM (IST)

    उल्हासनगरच्या 4 अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

    उल्हासनगर : 4 अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

    इमारत पडण्यापूर्वी वाचवला होता 135 लोकांचा जीव

    लोकांना बाहेर काढताच काही क्षणात कोसळली होती इमारत

     

  • 14 Aug 2021 01:56 PM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत गैरहजर

    – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत गैरहजर

    – नाना पटोलेंच्या नागपूरातील कार्यक्रमात दुसऱ्यांदा नितीन राऊत गैरहजर

    – नागपूरात आज काँग्रेसचा व्यर्थ ना हो बलिदान कार्यक्रम

    – प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार उपस्थितीत

    – काँग्रेसकडून आज स्वातंत्र्य सेनानींचा करण्यात आला सत्कार

    – यापूर्वी नाना पटोलेंच्या सायकल रॅलीतंही नितीन राऊत उपस्थित नव्हते

  • 14 Aug 2021 11:52 AM (IST)

    मंदिरे उघडण्यासाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक, औरंगाबादच्या घृष्णेश्वर मंदिरासमोर सोमवारी करणार आंदोलन

    औरंगाबाद –

    मंदिरे उघडण्यासाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक

    औरंगाबादच्या घृष्णेश्वर मंदिरासमोर सोमवारी करणार आंदोलन

    आचार्य तुषार भोसले यांच्या उपस्थितीत होणार आंदोलन

    श्रावणातील दुसऱ्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिरावर होणार आंदोलन

  • 14 Aug 2021 11:11 AM (IST)

    सोलापूरमध्ये पुन्हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतचा प्रकार

    सोलापूर :

    – सोलापूरमध्ये पुन्हा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम

    – सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतचा प्रकार

    – सोलापूर शहरातील केगांव परिसरात पुन्हा कोरोना नियमांना हरताळ

    – हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी

    – मास्क, सोशल डिस्टंसिंगचा पुन्हा एकदा फज्जा

    – महिनाभरात दुसरी घटना

    – फौजदार चावडी पोलीस स्टेशनचा कार्यक्रमाकडे कानाडोळा

  • 14 Aug 2021 10:46 AM (IST)

    कोल्हापूर महापालिकेच्या हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावर, पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी काढलेल्या खड्यात पडून युवक गंभीर जखमी

    कोल्हापूर महापालिकेच्या हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावर

    पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी काढलेल्या खड्यात पडून युवक गंभीर जखमी

    खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    सौरभ गोमासी असे युवकाचे नाव आहे

    फुलवाडी रिंग रोड परिसरातील घटना

    युवकाच्या अपघातानंतर महापालिका प्रशासनाला जाग, जेसीबीने खड्डा बुजवला

  • 14 Aug 2021 10:45 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर

    बारामती :

    – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर

    – विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना आढावा बैठक

    – बारामतीतील कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

    – अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

  • 14 Aug 2021 10:44 AM (IST)

    नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीने गाठली दिल्ली

    नवी मुंबई

    नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीने गाठली दिल्ली

    प्रकल्पग्रसतांच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल

    केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची कृती समितीला आश्वासन

    विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने सिडको नामकरणाची घाई का?

    ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्ली येथे शिष्टमंडळाच्या बैठकीत केला सवाल

  • 14 Aug 2021 10:44 AM (IST)

    बारामतीकरांची पूरग्रस्तांना मदत, अखिल तांदूळवाडी वेस मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

    बारामती :

    – बारामतीकरांची पूरग्रस्तांना मदत

    – अखिल तांदूळवाडी वेस मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

    – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्त मदत रवाना

    – मदत घेवून महिला जाणार पूरग्रस्त भागात

    – अजित पवार यांनी घेतली मदतीची माहिती; योग्य पद्धतीने वाटप करण्याच्या केल्या सुचना..

  • 14 Aug 2021 10:43 AM (IST)

    कोरियन संस्थेकडून वाशिष्टी नदीचं सर्वेक्षण

    रत्नागिरी- कोरियन संस्थेकडून वाशिष्टी नदीचं सर्वेक्षण

    कोरियन संस्था घेणार महापुराच्या कारणांचा शोध

    वायओओ आय एल संस्था घेतेय महापुराच्या कारणांचा शोध

    आठ दिवसात देणार केंद्राला अहवाल

  • 14 Aug 2021 08:13 AM (IST)

    माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपांची ‘एसआयटी’ कडून चौकशी

    – माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपांची ‘एसआयटी’ कडून चौकशी

    – यवतमाळ पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांनी गाठीत केलं विशेष तपास पथक

    – काल संजय राठोड यांनी केली होती चौकशीची मागणी

    – एसआयटीमध्ये सायबर सेल प्रमुखांचाही समावेश

    – महिलेनं केलेली तक्रार आणि संजय राठोड यांना आलेल्या एसएमएसची चौकशी होणार

    – संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपाचं प्रकरण

    – काल संजय राठोड यांनी केलं आरोपाचं खंडण

  • 14 Aug 2021 08:13 AM (IST)

    पाचोरा तालुक्यात क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची पती-पत्नीला बेदम मारहाण

    जळगाव –

    पाचोरा तालुक्यातील हनुमानवाडीत क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची पती-पत्नीला बेदम मारहाण

    बालचंद राठोड या इसमाने शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीस केली मारहाण

    तीन दिवस उलटल्यानंतर ही देखील पोलिसांनी घेतली नाही दखल

    महिलेला अमानुष मारहाण केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • 14 Aug 2021 08:09 AM (IST)

    औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात औषधींचा ठणठणाट

    औरंगाबाद –

    औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात औषधींचा ठणठणाट

    औषधी आणि सलाईन सुद्धा सरकारी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने परिचारिका आक्रमक

    सामान्य रुग्णांना कोरोनाच्या औषधी उसनवारी वापरण्याच्या सूचना

    नातेवाईकांना औषधींसाठी दाखवला जातो खाजगी मेडिकलचा रस्ता

    झाडूही परिचरिकांना स्वत: खरेदी करून आणावा लागत असल्याने परिचारिका आक्रमक

    बदली धोरण आणि औषधीचा तुटवडा पाहता परिचारिका आक्रमक

  • 14 Aug 2021 07:37 AM (IST)

    लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक हाऊसफुल्ल

    नाशिक –

    लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक हाऊसफुल्ल

    देशभरातील पर्यटकांची पसंती नाशिकला

    पर्यटन आणि तीर्थाटन दोन्ही चा योग साडण्यासाठी अनेकांनी केले रिसॉर्ट्स बुक

    इगतपुरी,भांडारदार,वैतरणा बॅक वॉटर,त्रंबकेश्वर मधले सगळे रिसॉर्टस फुल्ल

    लागून तीन दिवस सुट्ट्या असल्याने पर्यटकांचे महिनाभर आधीच बुकिंग

  • 14 Aug 2021 07:36 AM (IST)

    सोलापुरातील ग्रामीण भागात चोरी आणि घरफोडीचे प्रमाण वाढले

    सोलापूर –

    ग्रामीण भागात चोरी आणि घरफोडीचे प्रमाण वाढले

    ग्रामीण भागातील नागरिक भयभीत

    ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

    रात्रीची गस्त वाढविण्याची होत आहे मागणी

  • 14 Aug 2021 07:35 AM (IST)

    नाशकात 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट

    नाशिक –

    15 ऑगस्ट च्या पार्शवभूमीवर शहरात हाय अलर्ट

    नाशिकमधल्या सगळ्या महत्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढवली

    नाशिकचे इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, आर्टिलरी सेंटर, काळाराम मंदिर परिसरात बंदोबस्त

    नाशिक कायमच अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याचा इतिहास

    शहरात नाकाबंदी वाढवली

  • 14 Aug 2021 07:34 AM (IST)

    सोलापुरात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिलेथेबाबतचा पालिका आयुक्तांचा आदेश निघाला

    सोलापूर –

    सोलापुरात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिलेथेबाबतचा पालिका आयुक्तांचा आदेश निघाला

    आज  सर्व दुकाने बंद राहतील मात्र रविवार पासून सकाळी सात ते रात्री दहापर्यंत दुकानांना मुभा

    धार्मिक स्थळे, सिनेमागृहे बंदच राहणार

    हॉटेल, दुकाने, मॉल्स रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची मिळाली मुभा

    महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढला आदेश

  • 14 Aug 2021 07:33 AM (IST)

    वैशाली झनकर प्रकरणात ठाणे एसीबीच्या कारवाईबाबत संशय

    नाशिक –

    वैशाली झनकर प्रकरणात ठाणे एसीबीच्या कारवाईबाबत संशय

    झनकर यांना न्यायल्याने 1 दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर उलट सुलट चर्चना वेग

    झनकर यांची नक्की शरणागती की अटक ? याबाबत देखील संशय

    झनकर प्रकरणावरून नाशिक एसीबी आणि ठाणे एसीबी मधला बेबनाव समोर

    झनकर यांना आज न्यायालयात पुन्हा करणार हजर

  • 14 Aug 2021 07:32 AM (IST)

    उपळाई खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौकशीसाठी प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती

    सोलापूर – उपळाई खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौकशीसाठी प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती

    माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आढळल्या होत्या अनेक गैरसोयी आणि सुविधांचा अभाव

    डॉक्टरांची गैरहजेरी, वीज कनेक्शन यांची होती वाणवा

    या संदर्भातील चौकशी करून आठवडाभरात अहवाल देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

  • 14 Aug 2021 07:26 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांना अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी

    सुत्रांची माहिती

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी

    आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू- अज्ञात व्यक्तीची धमकी

    नार्वेकर यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

  • 14 Aug 2021 07:25 AM (IST)

    15 ऑगस्ट पासून नाशिकमध्ये नो हेल्मेट नो पेट्रोल

    नाशिक –

    15 ऑगस्ट पासून नाशिकमध्ये नो हेल्मेट नो पेट्रोल

    पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर उद्यापासून होणार अंमलबजावणी

    पेट्रोल मालकांच्या बैठकीत देखील आयुक्तांच्या भूमिकेचं समर्थन

    मात्र नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता

  • 14 Aug 2021 07:24 AM (IST)

    ‘साई शिक्षण संस्थेच्या कारभारात काही गैर नाही’, साई शिक्षण संस्थेचा खुलासा

    – ‘साई शिक्षण संस्थेच्या कारभारात काही गैर नाही’

    – ‘आयकर अधिकारी आणि धर्मदाय आयुक्तांनी वेळेवेळी तपासणी केली’

    – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेचा खुलासा

    – काही दिवसांपूर्वी साई शिक्षण संस्थेच्या NIT वर पडली होती ईडीची रेड

    – साई शिक्षण संस्थेत बेकायदा पद्धतीनं निधी आल्याचा संशय

  • 14 Aug 2021 07:22 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील 687 गावांमध्ये सध्या कोव्हिडचा एकही रुग्ण नाही

    सोलापूर जिल्ह्यातील 687 गावांमध्ये सध्या कोव्हिडचा एकही रुग्ण नाही

    जिल्ह्यातील 1243 पैकी 687 गावामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही

    10 पेक्षा अधिक गुण असलेले 118 गावे

    तर 10 पेक्षा कमी रुग्ण असलेले 560 गावांचा समावेश

    दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक पंढरपूर तालुक्यातील 36 गावांचा समावेश

    ज्या गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण आहेत त्या गावातील सर्व कुटुंबाची तपासणी करण्यात येणार

    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

  • 14 Aug 2021 07:14 AM (IST)

    नागपूर गंगा-जमूना रेड लाईट परिसरातील बार आणि दारुचे दुकानं हटवणार

    – नागपूर गंगा-जमूना रेड लाईट परिसरातील बार आणि दारुचे दुकानं हटवणार

    – गुन्हेगारीस कारणीभूत असल्याने पोलीस हटवणार दारुची दुकाने

    – दारुचे दुकानं हटवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली

    – गंगा जमूना रेड लाईट परिसर सील केल्याने वारांगनांचा आक्रोश

    – आधी पुनर्वसन करुन मग कारवाई करण्याची वारांगनांची मागणी

    – नागपूरातील २०० वर्षे जुना गंगा जमुना रेड साईट परिसर पोलिसांनी केला सील

  • 14 Aug 2021 07:14 AM (IST)

    जुने नाशिक भागात शॉर्ट सर्किट होऊन आग, विजेच्या तारा एकमेकांना लागल्याने शॉर्ट सर्किट

    नाशिक

    – नाशिकच्या जुने नाशिक भागात शॉर्ट सर्किट होऊन आग

    – विजेच्या तारा एकमेकांना लागल्याने शॉर्ट सर्किट

    – सुदैवाने जीवित हानी नाही,मात्र घरातील उपकरनांचे मोठे नुकसान

    – परिसरात शॉर्ट सर्किटचा मोठा आवाज झाल्याने राहिवाश्यान मध्ये भीती

    – शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगेचा थरात मोबाईल मध्ये कैद,बघ्यांची गर्दी

  • 14 Aug 2021 06:46 AM (IST)

    तिरुपती बालाजीला जाण्यासाठी नांदेडहुन थेट विमानसेवा

    नांदेड :

    तिरुपती बालाजीला जाण्यासाठी नांदेडहुन थेट विमानसेवा

    १७ ऑगस्टपासून नांदेडहून तिरुपतीला थेट विमानसेवा

    आठवड्यातील तीन दिवस उपलब्ध होणार विमानसेवा

  • 14 Aug 2021 06:37 AM (IST)

    स्वतंत्रता दिनानिमित्त सीएसटी रेल्वे स्टेशनवर रोषणाई करण्यात आली आहे

    स्वतंत्रता दिनानिमित्त सीएसटी रेल्वे स्टेशनवर रोषणाई करण्यात आली आहे

    त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे आणि लोक येऊन सेल्फी घेत आहे

    सीएसटी रेल्वे स्टेशन एक आकर्षण केंद्र बनलेला आहे

    संपूर्ण बिल्डिंगला रोषणाई करण्यात आली आहे

    सीएसएमटी रेल्वे स्टेशन हेरिटेज बिल्डिंग म्हणून घोषित आहे

    लोक हे पाहाण्यासाठी विविध ठिकाणावरुन सीएसटी रेल्वे स्टेशनला येतात