महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
नारायण राणे कोकण दौऱ्यावर जाणार
राणे 26 ऑगस्टला कोकण दौऱ्यावर
आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून दौरा
राणेंचा मुंबई ते सिंधुदुर्ग झंझावाती दौरा
नाशिक – डेल्टा व्हेरिएंटचे नाशिक जिल्ह्यात 30 रुग्ण आढळल्याने खळबळ
सर्वाधिक रुग्ण सिन्नर तालुक्यात
सर्वच यंत्रणांना हाय अलर्ट
पुणे – पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी
– महापौर मोहोळ यांनी पाठवला आरोग्यमंत्र्यांना प्रस्ताव
– आरोग्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे पुणेकरांचं लक्ष
– शिथिलता देण्यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महापालिकेकडे केली होती प्रस्तावाची मागणी
– उद्या होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत शिथिलतेसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज 6 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद
तर 10 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 492924
बरं होणाऱ्यांची एकूण संख्या – 482615
एकूण मृत्यू संख्या – 10117
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 185 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 237 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 2.
– 206 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 488478
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2391
– एकूण मृत्यू -8802
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 477285
मुंबई : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जाण्याची शक्यता.
फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्याची शक्यता.
चंद्रकांत पाटीलदेखील चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
मुंबई : राज्यात अकरावी प्रवेशाबाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील सुनावणी मंगळवारी
मुंबई हायकोर्टात राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी ठेवली सरकारची बाजू
राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका केली आहे.
आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे याचिका.
याचिकेवर आज न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली
परभणी : विद्यापीठातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जनावरांना चाराच उपलब्ध नाही
राज्यपालांचा दौरा असल्यानं चारा झाला नाही उपलब्ध
विद्यापीठात सुरक्षा कडक असल्यानं कर्मचाऱ्यांना पासेस नाहीत
जनावरांची झाली आबाळ
जिल्हाधिकाऱ्यांकडे पशूवैद्यकीय महाविद्यालयानं नोंदवली तक्रार
मुंबई : भिवंडी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील व माजी आमदार वारीस पठाण आज सायंकाळी 7 .00 वा भिवंडी येथे येत आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी ते येत आहेत. येथे ते पत्रकार परिषद घेतील.
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे. दोन्ही खेळाडू सावधान खेळ करत आहेत. हाजी अलीव 11-5 ने आघाडीवर आहे.
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे. दोन्ही खेळाडू सावधान खेळ करत आहेत. हाजी अलीव 8-1 ने आघाडीवर आहे.
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे. दोन्ही खेळाडू सावधान खेळ करत आहेत. हाजी अलीव 4-1 ने आघाडीवर आहे.
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे.
राज्यपाल यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नरसी नामदेवकडे जात असताना अपघात, अपघातात तीन गाड्यांचं किरकोळ नुकसान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंगोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी राज्यपालांनी मानव विकास निर्देशांक, आदिवासी विकास व वन हक्क कायदा, कोरोना नियंत्रण व लसीकरण, कृषी, जलसिंचन व इतर संबंधित विषयांबाबत माहिती करुन घेतली.
निरा देवघर धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा, दुपारी 12 वाजता निरा देवघर धरण 100 टक्के भरले, धरण परिसरातील पावसाचं प्रमाण व पाण्याची आवक वाढली, पाणीपातळीमध्येही वाढ, त्यामुळे विद्युत गृहातून 750 कुसेक्स व सांडव्यावरून 1482 क्युसेक्स विसर्ग चालू, आज (6 ऑगस्ट) 1482 + 750 = 2233 क्युसेक्स विसर्ग निरा नदीत सोडला. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी. निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा सर्वांना देण्यात आलाय.
“प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, नाशिकला राज ठाकरेही जातात मीही जातो. आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली. राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन. तसंच महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा, यात गैर काय?” असंही चंद्रकात पाटील यांनी नमूद केलं.
चंद्रकातं पाटील म्हणाले, “कुठलीही दोन महाराष्ट्रातील हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना पुन्हा या असं सांगणं असतंच. या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही. विशेषता वहिनी जेव्हा आल्या त्या म्हणाल्या पुढच्यावेळी पत्नीला घेऊन या असं म्हणल्या, मी त्यांना सांगितलं इथून 50 पावलांवर त्यांचं ऑफिस आहे, त्याही येतील.”
पुणे शहरातील मॉलमधील कर्मचारी आज (6 ऑगस्ट) राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार, निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन मॉल सुरु करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी, निर्बंधांमुळे साधारण 40 हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची माहिती, सायंकाळी 4 वाजता अमेनोरा मॉलच्या बाहेर आंदोलन होणार
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची कृष्णकुंजवर भेट, राजकीय चर्चांना उधाण
लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी भाजपचं ठाण्यात आंदोलन, आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरेंसह 50-60 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, ठाणे लोहमार्ग पोलिसांची कारवाई, काही वेळानं समज देऊन सुटका
गोंदियात कोरोनानंतर आता डेंग्यू आणि मलेरीयाचं संकट, मलेरियाचा पहिला बळी, जिल्ह्यात कोरोनाचे सक्रीय 10 रूग्ण, मलेरीयाचे तब्बल 193 रूग्ण, तर डेंग्यूचे 13 रूग्ण, मलेरीयाचे 139 रूग्ण अतिजोखमीचे, गोंदिया जिल्ह्यात आता कोरोनापेक्सा मलेरीयाची दहशत, गावागावात आरोग्य शिबीरे लावण्याची नागरीकांची मागणी
झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक 3 दिवस पुणे दौऱ्यावर, केंद्रीय पथकाच्या राज्य सरकारला सूचना, केंदीय पथकाकडून गावात जाऊन पाहणी, ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवण्याच्या पथकाच्या सूचना, झिकाची लागण झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर, बेलसर आणि त्याच्या 5 किलोमीटर परिसरातून आतापर्यंत 158 सँपल जमा, यामध्ये चिकुन गुनिया बाधित 79 आणि 6 जणांना डेंग्यूची लागण, 19 जणांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाची बाधा
अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं सर्व विरोधी पक्षांना पत्र, संसदेत विविध विषयांवर चर्चा होऊ देण्याची विनंती
पुण्यात मृत गुंडाच्या वाढदिवसाला टोळक्याने तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत उत्सव केला, भावेश कांबळे असं मृत सराईत गुंडाचं नाव, शस्त्रास्त्र दाखवत धिंगाणा घातल्यानं परिसरात टोळक्याची दहशत, पुणे पोलिसांच्या युनिट 2 कडून आरोपींवर कारवाई
वर्धा जिल्ह्यात 1974 मध्ये दारुबंदी झाली असली तरीही शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू आहे. आता पोलिसांनी यावर कारवाई केलीय, वारंवार कारवाई करूनही मुजोर दारू विक्रेते पुन्हा दारूची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. मात्र, जानेवारी ते जून या पाच महिन्याच्या कालावधीत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात तब्बल 1 हजार 671 दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच 3 कोटी 35 लाख 70 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केल्याची माहिती आहे.
पुण्यातील निर्बंध शिथिल करावे यासाठी पुण्यातील अधिकारी प्रस्ताव देणार, शनिवारी (7 ऑगस्ट) होणाऱ्या आढावा बैठकीत अजित पवाराकडे प्रस्ताव जाणार, पुणे शहरातील पॉझिटिव्हीटी रेटचा विचार करता दुकानाची वेळ वाढवून देण्याची शिफारस, अजित पवार सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्थानिक अधिकाऱ्यानी प्रस्ताव द्यावा अस म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव, पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
TV9 मराठीच्या बातमीचा दणका, चिपळूणमधील अलोरे येथे हलवलेल्या दुर्घटनाग्रस्त लोकांच्या इमारतीत वीज सेवा सुरू, पाण्याच्या व्यवस्थेसह जेवणाची व्यवस्था करण्यासाठी चिपळूणचे प्रांत अधिकारी प्रवीण पवार स्वतः अलोरेत दाखल, रात्री उशिरापर्यंत लाईटसह सर्व सुविधा केल्या, सर्व स्थलांतरित लोकांना आवश्यक सोयी प्रशासन पुरवणार, प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांची माहिती
औरंगाबाद जिल्ह्यातील साडेपाच हजार स्वयंसेवी संस्था बरखास्त, धर्मादाय आयुक्त विभागाचा मोठा निर्णय, व्यवहाराचा हिशोब सादर न केल्यानं निर्णय, वर्षानुवर्षे कामाचा हिशोब सादर न केल्यानं संस्था रद्द, केवळ संस्था उघडून कुठलाही व्यवहार किंवा काम न करणाऱ्या संस्थांना जबरदस्त झटका
पुणे रुपी बँकेच्या ठेवीदारांना धक्का, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत रुपी बँकेच्या विलीनीकरणास रिझर्व्ह बँकेचा स्पष्ट शब्दांत नकार, रिझर्व्ह बँकेकडून याबाबतचे पत्रक जारी, गैरव्यवहारामुळे रूपी बँकेवर आर्थिक निर्बंध, रिझर्व्ह बँकेकडून त्याला ऑगस्टअखेर मुदतवाढ, प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून सध्या रूपी बँकेचा कारभार सुरू, सहकार उपनिबंधक आनंद कटके यांची माहिती
पुणे शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस, गुरुवार (5 ऑगस्ट) अखेर पानशेतसह 5 धरणे ओव्हरफ्लो, तर इतर 6 धरणांमध्ये 92 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, धरणं भरण्याच्या मार्गावर, खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये 27.59 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय, खडकवासला प्रकल्पात 27.59 टीएमसी अर्थात 94.64 टक्के पाणीसाठा, गतवर्षी 5 ऑगस्ट अखेरपर्यंत खडकवासला प्रकल्पात 12.07 टीएमसी इतका पाणीसाठा होता, जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान आणि आंद्रा ही 5 धरणे पूर्ण भरली
राज्य मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सीईटीसाठी 11 लाख अर्ज, अन्य मंडळांच्या 36 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी, तर एकूण 10 लाख 98 हजार 318 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले, अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता राज्य मंडळाच्या सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचं समोर, मुदतीमध्ये एकूण 11 लाख 96 हजार 532 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेत, त्यापैकी 76 हजार 86 विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण राहिले, तर 22 हजार 128 विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही तो सादर केला नाही, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांची माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्धवट निर्णय, 50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी : संजय राऊतhttps://t.co/q8Xa2QkV6J@rautsanjay61 @MeNarayanRane @ChDadaPatil @YuvrajSambhaji #MarathaReservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021
गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन, जुहू बीचवर गोल्डमॅन गॅंगचा धिंगाणा https://t.co/xDnegoTiGB #GoldmanGang | #Mumbai | #JuhuBeach
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021
NEET 2021 Exam : कमी ताण घेऊन नीट परीक्षेची तयारी करा; फॉलो करा या टिप्स https://t.co/gDWpxeP9Ni #NEETUG2021 | #NEET
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021
Video | Chandrakant Patil | अनपेक्षित झालेल्या भेटीनं नियोजित भेट घेण्याची वेळ आलीय : चंद्रकांत पाटील @ChDadaPatil #ChandrakantPatil #BJP #MNS #RajThackeray #Politics #Maharashtra
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/WGZ2tbESmu
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021
कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग पुन्हा खचला, रुकडी गावाजवळ ट्रकचा भराव खचला, कोल्हापूर मिरज रेल्वे सेवा पुन्हा काही काळ बंद राहणार, खचलेला मार्ग काही दिवसापूर्वीच दुरुस्त केला होता, वाहतूक सुरळीत होताच अवघ्या 2 दिवसांत पुन्हा मार्ग खचला, कोल्हापूरवरून सुटणाऱ्या एक्सप्रेस पुढचे काही दिवस मिरजेतून सुटणार
कोल्हापूरमध्ये गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, अश्लील फोटो आणि व्हिडिओ करण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी, कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरातला धक्कादायक प्रकार, शाहूपुरी पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक, तर एका संशयिताच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल, इमरान बागवान आणि आरिफ शेख अशी संशयितांची नावं, पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती
बेस्ट’ बससह अन्य सार्वजनिक वाहनांतील गर्दी चालू शकते; मग उपनगरी रेल्वेप्रवासाला मज्जाव का? मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारणा, राज्याच्या निर्बंधांतील विसंगतीवर न्यायालयाकडून बोट, “मुंबईच्या गरजा व प्रश्न इतर शहरांपेक्षा वेगळ्या, रेल्वेप्रवास ही मुंबईकरांची मुख्य गरज, लसीकरण झालेल्यांना प्रवासमुभा देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा”, न्यायालयाची राज्य सरकारला सूचना, उपनगरी रेल्वे प्रवासाच्या मुद्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले
सोलापूरमध्ये वीज बिलांचे 10 हजार धनादेश बाऊन्स, महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या वीज बिल देयक धनादेशाबाबत प्रकार, संबंधित वीजधारकांना दंड म्हणून बिलात विलंब आकार अधिक जीएसटी करासर 885 रुपये भरावे लागणार
नागपूरात 10 लाख नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, शहरातील 4 लाख लोकांना लसीचा दुसरा डोस, नागपूर शहरात 150 पेक्षा जास्त केंद्रांवर लसीकरण सुरू, महानगरपालिकेतर्फे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न, 18 ते 44 वयोगटातील 4 लाख पेक्षा जास्त नागरिकांना पहिला डोस, 45 ते 60 वयोगटातील 1 लाख 94 हजार नागरिकांना पहिला डोस, 60 वर्षांवरील 2 लाख ज्येष्ठ नागरीकांना पहिला डोस
सोलापूरमध्ये उजनी धरणातून सीना जोड कालव्यात 150 क्युसेस पाण्याचा विसर्ग, तल दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्यूसेसने पाणी सोडले, पुणे जिल्ह्यातील बंडगार्डनमधून 1500 तरदौंडमधून 8398 विसर्ग सुरू, त्यामुळे उजनीने 59 टक्क्यांचा पल्ला गाठला, सोलापूर शहरासह शेतीला आवर्तनाची खरीप हंगामात गरज असल्यानं उजनी वरच्या सर्व सिंचन योजनांना पाणी सुटणार
नागपुरात तब्बल 20 हजारपेक्षा जास्त प्लॅाटमालकांचा पत्ताच नाही, महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रण्यासमध्ये नोंदी नाही, अनेक बेनामी प्लॅाटवर भुमाफियांचा कब्जा, बेनामी प्लॅाट विक्रीतून सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता, करवसूलीसाठी शोध घेतला असता 20 हजारपेक्षा जास्त प्लॅाटमालकांच्या नोंदीच नाही
सोलापूरमधील बार्शीत 5 दिवसात कोरोनाचे 96 रुग्ण, गेल्या महिन्यात कमी झालेला बार्शी शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला
सोलापूर शहरातील 16 रुग्णालयांनी 48 तासात अग्निशमन यंत्रणेची उभारणी न केल्यास मान्यता रद्द करणार, गेली 2 महिने मुदत देऊनही कार्यवाही न झाल्यानं पालिकेचा इशारा, राज्यात अलीकडच्या दिवसात नाशिक, विरार, भांडूप, येथील खासगी व शासकीय रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय, राज्य शासनाने सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत, ही यंत्रणा नसेल तर रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याचे राज्य सरकारचे निर्देश
गंगेत नाणं टाकून अंघोळीचा प्रयत्न, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 3 विद्यार्थ्यीनी हरिद्वारमध्ये बुडाल्या, सहलीला जाणाऱ्या 5 जणांमध्ये 4 मुली आणि 1 मुलगा, स्थानिक पोलिसांकडून शोध कार्य, 6 तासानंतही मुली सापडल्या नाहीत, बुडालेल्या मुलींचा अखेरचा व्हिडीओ समोर
महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत सवाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि जस्टिस जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी, डीजीआयपीआर आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस, राज्य सरकार सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश
भाजप महाराष्ट्र सरकारविरोधात आज सकाळी 10 ते 11 दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणार, सामान्य नागरिकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासाची मागणी, ठाणे भाजप अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन