महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
नागपूर कोरोना अपडेट :
नागपुरात आज 5 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
कोरोना मुळे शून्य मृत्यू
तर 14 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्ण संख्या – 492930
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482639
एकूण मृत्यू संख्या – 10117
पुणे :
दिवसभरात २२० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३०४ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.
– २०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८८९०२.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२०६.
– एकूण मृत्यू -८८१३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७७८८३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७६४०.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर दिल्लीत दाखल, लवकरच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता, दिल्लीतील घडामोडींवर राज्याचं लक्ष
पुण्यातील निर्बंध शिथिल, दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती, पुणेकरांना काहिसा दिलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री सध्याच्या कोरोना परिस्थिती, तिसरी लाट, आगामी येणारे उत्सव तसच शाळा, कॉलेज उघडण्याबाबत बोलू शकतात.
नागपूर :
राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र
धनगर समाज संघर्ष समितीने दिला महाराष्ट्र सरकारला अलटीमेटम
एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 650 जागा घोषित करण्यात आल्या
मात्र यात NT क वर्गासाठी फक्त 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या
नियमानुसार 3.5 टक्के म्हणजे किमान 23 जागा NT क वर्गासाठी आरक्षित असायला पाहिजे होत्या
त्यामुळे धनगर समाजात रोष निर्माण झाला असून हा अन्याय दूर झाला नाही तर धनगर समाज संघर्ष समिती राज्यभरात आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला
मराठा समाजाच्या युवकांचा सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकासासाठी सारथी सारखी संस्था उभा राहिली. सारथीमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर केला, भ्रष्टाचार केला. यानंतर सारथीची चौकशी करण्यात आली. आता चौकशी पूर्ण झालेली असून हा चौकशी अहवाल सरकारने जाहीर करावा आणि संबंधित लोकांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सारथी समोर पुन्हा एकदा आंदोलन होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
नाशिकमध्ये युवासेना सचिव वरुण सरदेसाईंच्या कार्यक्रमातील गर्दी आयोजकांना भोवली, 4 आयोजकांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, नगरसेवक दीपक दातीरसह 3 शिवसैनिकांवर कारवाई, शनिवारी (7 ऑगस्ट) संध्याकाळी खुटवड नगर परिसरातील एका बँक्वेट हॉलमध्ये युवासेना संवाद कार्यक्रमाचे आयोजन, आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत आणि कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा, वरुण सरदेसाई, मंत्री दादा भूसे, खासदार हेमंत गोडसेंसह स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित
‘मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस’, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांचा घणाघात https://t.co/Dv9kpCsYsl @AdvYashomatiINC @ikcpadavi @INCMaharashtra @narendramodi @BJP4Maharashtra #YashomatiThakur #KCPadavi #NarendraModi #BJP #Congress #Nandurbar
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला सेना नेत्यांचीच केराची टोपली, ‘कारवाई होणार का?’, नाशिककरांचा सवालhttps://t.co/vH4fWffQBR@mphemantgodse @SardesaiVarun @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
Video | Arvind Sawant | नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद म्हणजे बुडत्याला काडीचा आधार : अरविंद सावंत@AGSawant #ArvindSawant #NarayanRane #ShivSena #BJP #Politics
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/XRRGmJoe7X
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
आबांचा वारसा नातवंडांनी पुढे चालवावा, गणपतराव देशमुखांच्या पत्नींची इच्छा, घरात करमत नाही, त्यांनी कधीच नावानं हाक मारली नसल्याचंही सांगितलं, शरद पवार यांच्याकडून धीर धरुन काळजी घेण्याचं आवाहन, नातांना जनतेत मिसळण्याचाही सल्ला
माजी मंत्री मखराम पवार यांचे निधन, प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’चे महत्त्वाचे शिलेदार, मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते, रात्री दीड वाजता अखेरचा श्वास घेतला
संजय राऊत म्हणाले, “विद्युत विधेयकावर चर्चा झालीय. राज्यातील बरेच लोक दिल्लीत येऊन बसलेत. अचानक बील घेऊन येत आहेत. महाराष्ट्र राज्यात एमएसईबीला याचा फटका बसेल. स्टेट इलेक्ट्रिक कंपन्यांसाठी ही बीलं धोकादायक ठरतील. हे बील देशाच्या हितासाठी नाहीये. वीज कंपन्यांसाठी धोक्याची घंटा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर बोलायला हवं. संसद सुरू नाहीये, त्याचा फायदा घेतला जातोय. पक्षात, देशात चर्चा होत आहे.”
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन, सोमवारी 9 ऑगस्टला मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करणार, संभाजीराजे छत्रपती यांचीही सोमवारी आरक्षणासाठी बैठक, मराठा आरक्षणासाठी एकीकडे चिंतन बैठक तर दूसरीकडे आंदोलन, मराठा संघटनांमध्येच आंदोलन आणि बैठकीवरून स्पर्धा, मराठा क्रांती ठोक मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या मांडणार
त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यात होणारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा बंद राहणार, कोरोनाचा धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाचा निर्णय, त्र्यंबकेश्वर मंदिरांसह प्रदक्षिणा मार्ग बंद, प्रदक्षिणा मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात असणार, नियमांचं पालन करा, कारवाई करण्यास भाग पाडू नका असं ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचं आवाहन
सोलापुरात सहायक कामगार आयुक्तांकडे 10 लाखांची खंडणी मागणारा पोलिसांच्या ताब्यात, वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे निराधार तक्रारी, नोटिसा, विविध अर्ज करून सहायक कामगार आयुक्त सोलापूर निलेश येलगुंडे यांना बदनाम केल्याचा आरोप, सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी, गणेश ज्ञानोबा बोड्डू असे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीचे नाव, फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने बोड्डूकडून थेट राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे हकालपट्टीची मागणी
कोल्हापुरात एनडीआरएफचा कॅम्प होणार, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी एनडीआरएफच्या विशेष कॅम्पचे नियोजन, सतत येणारा महापूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे कायमस्वरूपी कॅम्पसाठी हालचाली, जागा आणि आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे मागील एक आठवड्यापासून बाॅम्बे रुग्णालयात दाखल, युरीन इन्फेक्शनमुळे मागील एका आठवड्यापासून खडसेंवर उपचार सुरू, रुग्णालय प्रशासनाची माहिती, उपचारानंतर प्रकृती स्थिर
नागपूर जिल्ह्यात दीड वर्षानंतर पहिल्यांदाच शुन्य कोरोना रुग्णाची नोंद, नागपूर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं, नागपूर शहर आणि ग्रामीणमध्येही गेल्या 24 तासांत शुन्य कोरोना रुग्ण, 5714 जणांच्या तपासण्या केल्यानंतर एकंही कोरोना पॅाझिटीव्ह रुग्ण नाही, जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 183 वर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर, सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटंबियांना सांत्वनपर भेट देणार, गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्कार कार्यक्रमाला हजर राहू शकले नव्हते, आज सकाळी 11 वाजता सांगोल्यातील हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल, तिथून ते गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील
नाशिक शहरातील खड्डे 8 दिवसात बुजवा, महापौर सतीश कुलकर्णी यांचा शहर अभियंत्यांना अल्टीमेटम, अनेक प्रभागात रस्त्यांची दुरावस्था, लाखो रुपये खर्च करूनही रस्ते खराब असल्याने नागरिकांची नाराजी, दरवर्षी रस्ते डागडुजीवरही मोठ्या प्रमाणात खर्च
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक होणार, आजच्या बैठकीत शहरातील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होणार, व्यापाऱ्यांना दुकानांची वेळ वाढून देण्याचा निर्णय होण्याची शक्यता