कर्नाटक पाठोपाठ गुजरातनंतर महाराष्ट्रातही ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्गा झालाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संप (ST Workers Strike) अजूनही सुरुच आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचं म्हणत मेस्मा लावण्याचा इशारा दिला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) राज्यसभेच्या (Rajya Sabha) बारा खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
शरद पवार
– सावरकरांनी सुरू केलेल्या क्रांती यज्ञात अनेक स्वातंत्रवीर शहीद झाले
– नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी
– साहित्य संमेलन म्हटल्यावर साहित्यिकांचे विचार ऐकायची,वाचायची संधी मिळत
– अलीकडे साहित्य संमेलन म्हटलं की काही तरी वाद झाला पाहिजे असा काही नियम आहे का
– सावरकरांचे स्वातंत्रविषयीच्या योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही
– वाद कशासाठी
– स्वातंत्रवीर यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व
– जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष याचा आनंद
– विज्ञानवादाचा या संमेलनाला लवलेख
– सावरकर हे विज्ञानवादी
– विज्ञानावर आधारीत सावरकरांचे लेख वादग्रस्त
– सावरकरांच्या नावाला विरोध असायचं काम नाशिककर कधी करूच शकत नाहीत
– हा वाद होणं चांगली गोष्ट नाही
– कुसुमाग्रजांचे नाव दिल हे उत्तम केलं
– तात्यासाहेबांनी आदरांजली दिली
– लोकहितवादी मंडळाने हे नाव सुचवलं यासाठी धन्यवाद
परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह!
पुणे शहरात 438 नागरिक परदेशातून नुकतेच परतले असून त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पुणे
ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताचं जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क,
ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांच उद्यापासून केलं जाणार ट्रेसिंग, आणि टेस्टींग !
ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलमधील बेडसंदर्भात पुरेसं नियोजन, काल जिल्हा आरोग्य विभागानं बैठक घेऊन दिल्या सूचना,
उद्यापासून व्यक्तींच्या संपर्कातील मोहिमेला होणार सुरुवात,
आरोग्य विभागाकडून कार्यवाहीला सुरुवात,
जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ . भगवान पवार यांची टीव्ही 9 ला माहिती …
शरद पवार
– सावरकरांनी सुरू केलेल्या क्रांती यज्ञात अनेक स्वातंत्रवीर शहीद झाले
– नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी
– साहित्य संमेलन म्हटल्यावर साहित्यिकांचे विचार ऐकायची,वाचायची संधी मिळत
– अलीकडे साहित्य संमेलन म्हटलं की काही तरी वाद झाला पाहिजे असा काही नियम आहे का
– सावरकरांचे स्वातंत्रविषयीच्या योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही
– वाद कशासाठी
– स्वातंत्रवीर यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व
– जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष याचा आनंद
– विज्ञानवादाचा या संमेलनाला लवलेख
– सावरकर हे विज्ञानवादी
– विज्ञानावर आधारीत सावरकरांचे लेख वादग्रस्त
नरेंद्र चपळगावकर भाषण
– मराठी कडे आपलं काय लक्ष आहे याबाबत काही मुद्दे
– शिक्षण मराठीत, राज्य कारभार मराठीत झालं पाहिजे
– तरच मराठीचा विकास होईल अन्यथा नाही
– मराठी ही मातृभाषा आहे
– मराठी अनिवार्य करणार अस सरकारने म्हटलं
– इच्छा एवढीच की हे लवकर आमलात यावं
– मराठीत चांगलं विज्ञान शिकवता येईल असा आत्मविश्वास आम्हाला का नाही
– सेमी इंग्रजी हा काय प्रकार माहिती नाही
– सरकारने पाठयपुस्तक मंडळ गुंडाळून ठेवलं
– आंध्र मध्ये
बँकेटले सगळे व्यवहार तमिळ मध्ये
– आपल्याकडे का नाही
– बेळगाव मध्ये गेलं की सगळ्या पाटया कन्नड मध्ये
– खाली इंग्रजीत देखील नाव नाही
– मुंबईत दुकांदारांशी आम्हीच हिंदीत बोलतो
– मुंबईतील टॅक्सी वाल्याशी आपण मराठीत बोललो,तर त्याला पण वाटेल आपण मराठी शिकली पाहिजे
भुजबळ भाषण
– 3,4 दिवस थकलो,पण आणखी चांगलं करावंसं वाटत होतं
– कार्यक्रम संपल्यावर चुकल्या सारख वाटेल
– पुढचं साहित्य संमेलन नाशिकला अस मी त्यांना आपल्या वतीने सांगतो
पुढचं संमेलन नाशिकला अस मी त्यांना सांगितलं
– नाशिक साहित्याची नगरी आहे
– पुन्हा या पुन्हा या अस म्हटलं तर गडबड होते
– म्हणून आपण परत या अस मी म्हणेल
– सभामंडपाला कुसुमाग्रज नगरी नाव द्यायचं आधीच ठरलं होतं
– या नावाला का विरोध व्हावा
– सावरकर आमचे सुद्धा आहेत
– माझ्या भाषणात, संमेलन गीतात सावरकरांचे नाव होते
– इथे सुद्धा सावरकरांचे गाणे झाले
– त्यानंतर सुद्धा आदर्शचा अपमान केला अस म्हणणं चुकीचे
– सावरकर,कुसुमाग्रज दोघेही नाशिकचे
– काही लोकांना द्राक्ष आंबट लागतात
– पण नाशिकचे द्राक्ष आंबट नाहीत
– त्यात आता शरद सीडलेस देखील आलं आहे
– कारण नसताना ज्या काँट्रॅव्हरसी झाला त्याबद्दल दुःख
भुजबळ भाषण
– कोरोनामुळे सगळंच थांबलं
– 25 दिवसांपूर्वी संमेलन घ्यायचं ठरलं
– आपण सगळे कामाला लागलो
-अनेक हातांचे सहकार्य
– सफाई कामगारांनी केलेल्या कामाबद्दल आभारी
– जेवणाची व्यवस्था करणाऱ्यांचे आभार
– पोलिसांचे,डॉक्टरांचे देखील आभार
– जर्मन स्ट्रक्चर 4 दिवसात उभा केला त्यांचे आभार
कुणी मायीचे दुध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा- रावसाहेब दानवे
शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची ईडी कडुन चौकशी करण्यात आली होती. रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी गैरकारभार झाल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केल्या नंतर अर्जुन खोतकर यांनी या सर्व प्रकरणात किरीट सोमय्या यांचा बोलवता धनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. या बाबत आज रावसाहेब दानवे यांनी जालना शहरातील विकास कामाच्या उदघाटन कार्यक्रमात खुलासा केलाय…दानवे यांनी मी गरीब मानूस आहे ..माझ्या नावाने बोंबलून काही फायदा नाही…ज्या गावात मतदान बुथ नव्हते, त्या गावचा मी आज केंद्रात मंत्री आहे…मी लच्यांड लोच्या विकत घेत नाही…मी कोणावर कशाचाही आरोप केलेला नाही..आणि माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिटकलेला नाही
…आणि असेल तर कुणी मायीचे दुध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा.
शरद पवार
– गिरीश कुबेर यांच्यावर हल्ला ही घटना निंदनीय
– कोणत्याही प्रकारचे समर्थन नाही
– महाराष्ट्र पुरोगामी
– मी गिरीश कुबेर यांचं पुस्तक वाचलंय
– काही मुद्द्यांवर वाद आहे
– मात्र,त्या खोलात मी गेलो नाही
– भूमिका मान्य नसेल तर वैचारिक चर्चा होऊ शकते
– कोणत्याही संघटनेनं असा हल्ला करणं शोभत नाही
– महाराष्ट्राची ही संस्कृती नाही
अमरावती
– अमरावतीतून धक्कादायक बातमी.. महिलेचा बलात्कार करून आवळला गळा..
-अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
– महिला शौचास गेली असतांना अज्ञात आरोपिकडून महिलेवर बलात्कार.. आरोपीने बलात्कार करून महिलेस जीवानिशी मारले..
– बराच कालावधी झाल्यानंतर महिला घरी न परतल्याने शोधाशोध घेतला असता प्रकार उघडकीस..
– लोणी पोलिसात बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल
नाशिक
शरद पवार संमेलनस्थळी दाखल
थोड्याच वेळात संमेलन समारोप सोहळा पार पडणार
कुबेर प्रकरणावर बोलण्यास पवारांचा नकार
भाषणात पवार बोलतात याकडे लक्ष
नाशिक
-गिरीश कुबेर मुंबईच्या दिशेने रवाना
– पोलीस बंदोबस्तात झाले रवाना
– शाई फेक बाबत विचारण्याचा प्रयत्न केला असता काहीही न बोलता गेले निघून
पुणे
दिवसभरात 81 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 88 रुग्णांना डिस्चार्ज
– पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01, एकूण 02 मृत्यू
– 96 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 507136
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 841
– एकूण मृत्यू -9105
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 497190
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5878
नागपूर
नागपूर विधान परिषद मध्ये मत फुटू नये म्हणून भाजप ने आपले मतदार सहलीला नेले त्यावर काँग्रेस चा आक्षेप
जे सहलीला गेले ते 15 दिवसा नंतर शहरात येतील त्यांची कोरोना चाचणी करायला पाहिजे
एखादी पॉझिटिव्ह आला तर सगळ्या शहरात पसरेल त्यामुळे त्यांची नागपुरात येताच कोरोना चाचणी करावी
अशी मागणी काँग्रेस चे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी केली
आमच्या उमेदवाराने तक्रार केली आहे सहली वरून निवडणूक आयोग कडे तक्रार केली
त्यांनी आपले मतदार सहलीला पाठवून मोठा खर्च केला त्यात आचार साहिता भंग झाली
निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी
जनतेने निवडून दिलेले जन प्रतिनिधी जनतेपासून दूर असेल तर जनतेची गैर सोय होते त्यांचे प्रश्न कोण सोडवणार
त्याचा राजकीय पक्षाने आणि निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे
आमचे काही गट तट नाही आमचे सगळे नेते कामाला लागले आमचा विजय निश्चित होईल
विश्वंभर चौधरी
– भारतीय घटनेनं प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य
– भाषा आणि कृती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या
– अशी घटना घडावी ही परंपरा नाही
– गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी ही संभाजी ब्रिगेडची मागणी अयोग्य
– भाषा न घसरवता वैचारिक लढा द्यावा
– हिंसा न करता अहिंसक मार्गानं बाजू मांडावी
बाळासाहेब थोरात
– आपण लोकशाहीत आहोत
– मला हे काही मान्य नाही
– पोलिसांनी योग्य ती कारवाई केली
– लिखाण चांगलं करून उत्तर दिलं पाहिजे
– विचारला विचाराने उत्तर द्यावे
– आपल्याकडे चांगलं मध्यम आहे
– संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जे मांडायचं ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडायला हवं होतं
– ही पद्धत योग्य नाही
मनीषा कायंदे बाईट
गिरीश कुबेर यांनी संभाजी महाराजांबद्दल पुस्तक लिहिलं आहे यात आक्षेप आहे लिखाण आहे अस समजतं
संभाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत राष्ट्रपुरुषांचे बद्दल लिहिताना जिथे अनेक लोकांच्या श्रद्धेचा विषय असताना इतिहासाचे दाखले देताना खूप सांभाळून लिहिलं बोललं गेलं पाहिजे तसं झालेला दिसत नाहीये जिथे लोकांच्या भावना दुखावल्या जातात आक्षेपार्ह लिहिलं असेल तर त्यांनी तसं लिहिणं चुकीच आहे शाहीर पॅक करणे हे कितपत योग्य आहे याचा विचार केला गेला पाहिजे
भूमिका हीच आहे की राष्ट्र पुरुषाचा बद्दल लिहिताना बोलताना सांभाळून बोलले पाहिजे संभाजी महाराज अनेकांचे श्रद्धांचे स्थान आहे त्यांना आदर्श पुरुष मानतात
शाहीफेक हेही उत्तर नाही
भारतीय जनता पार्टी चा एक ठरलेला फॉर्म्युला आहे त्यांनी केलं तर ते पुण्य दुसऱ्यांनी केलं तर ते पाप उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ मुंबईत येतात आणि बॉलिवूडला उत्तर प्रदेश मध्ये नेण्यासाठी अनेक आमिष दाखवतात
इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गांधीनगरला हलवण्याचा हालचाली केल्या अशा अनेक गोष्टी मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला महाराष्ट्र ताब्यात आला नाही म्हणून मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तिचं महत्त्व कमी करायचं शिवसेनेच्या हातात मुंबईची सत्ता आहे त्यांना भाजप ला खूपत आहे त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत
औरंगाबाद
पळून गेल्याच्या रागातून भावानेच केला बहिणीचा गळा चिरून खून
कोयत्याने वार करत धडावेगळे केलं मुंडकं
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोळेगाव गावातली धक्कादायक घटना
किशोरी मोटे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव
सहा महिन्यापूर्वीच तरुणीने पळून जाऊन केला होता प्रेम विवाह
घरी भेटायला येण्याचे नाटक करून बहिणीवर केले कोयत्याचे सपासप वार
मुंडके धडावेगळे होईपर्यंत बहिणीवर केले सपासप वार
बहिणीचा खून करून आरोपी ने वैजापूर पोलिस ठाण्यात केलं आत्मसमर्पण
विरगाव पोलीस ठाण्याकडून अधिक तपास सुरू
राजेश टोपे
राज्यामध्ये पहिला रुग्ण कल्याण डोंबिवली येथे आढळला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये हाय रिस्क आणि लो रिस्क मध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. बाहेर देशातून आलेल्यांचे त्या मध्ये 6 जण आहेत त्यांचे जिनोमिक सिक्वेन्सीनगचे अजून काही रिपोर्ट आलेले नाहीत. गेल्या एक महिन्यापासून 28 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. परंतु राज्यात एक तर देशात पाच ओमीक्रोन पेशंट आढळले आहेत. कॉन्टॅक्ट टेस्टिंग त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ओमीक्रोनचा संसर्गाचा वेग जास्त आहे परंतु त्याची दाहकता किती आहे त्या बद्दल who कडुन सांगण्यात आले नाही. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या रिपोर्ट बद्दल जे टास्क फोर्स ने संगीतले त्यात दाहकता नाही. तज्ज्ञांच्या माहिती नुसार ज्या आवण दोन लसी दिल्या गेल्या आहेत त्या लसीवर परिणाम करणार नाही. ओमीक्रोनचा तिसऱ्या लाटी बद्दल तज्ज्ञांकडून अजून तरी सूचना आल्या नसल्या तरी सक्तीने मास्क वापरणे, लसीकरनाचा वेग वाढवणे, कोव्हीड नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. या व्हेरियंट बद्दल who आता रिचर्च करून माहिती देतील आणि Icmr जो प्रोटोकॉल तयार करेल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. ओमीक्रोन बद्दल दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवातुन सध्या काळजी करण्याचे कारण नाही.
फीड avi परभणी
छगन भुजबळ
– गिरीश कुबेर यांनी गोल्फकार्ट मधून संमेलन स्थळ पाहणी केली
– सकाळपासून कुणकुण होती
– संभाजी ब्रिगेड काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सि आहे
– मी आणी माझा मुलगा पंकज भुजबळ स्वतः त्यांना घेऊन फिरलो
– पुण्यातुन 2 जण मोटरसायकल वर आले होते
– काळी पावडर त्यांनी कुबेर यांच्या अंगावर फेकली
– व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं आणी त्या दोघांनी काळी पावडर फेकली
– पंकज भुजबळ यानं अडवण्याचा प्रयत्न केला
– सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवली आहे
– संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं
शिर्डी
धुमाकूळ करणारा बिबट्या अखेर जेरबंद….
बिबट्याच्या केले जेरबंद…
श्रीरामपूर येथिल लोकवस्तीत घुसलेला बिबट्या…
तीन तासनंतर बिबट्या जेरबंद…
संगमनेर येथील वनविभागाच्या कर्मचार्यांनी केले बिबट्याला जेरबंद…
बिबट्याला बेशुद्ध करून घेतले ताब्यात….
घरातील बाथरूममध्ये लपून बसला होता बिबट्या …
सात जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी…
एक वनरक्षक देखील जख्मी…
डॉ.बधे हॉस्पिटल येथे सर्व जख्मींवर प्राथमिक उपचार…
जख्मींना पुढील उपचारासाठी नगर ग्रामिण रुग्णालयात हलवले….
नाशिक
-गिरीश कुबेर यांच्यावर संमेलन परिसरात शाई फेक
-संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागे घडली घटना
-संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांकडून करण्यात आली शाई फेक
– संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या पुस्तकावरून वाद
-पोलीस बंदोबस्त वाढवला
राजेश टोपे ऑन ओमिक्रॉन
देशात एकूण ओमीक्रोनचे 5 रुग्ण
महाराष्ट्रात त्या पैकी एक रुग्ण सापडला आहे
ओमीक्रोनला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत
या महामारीत अनुशासन आणि कोरोना संदर्भात घातलेले नियम पाळले पाहिजेत
डेल्टाला रिप्लेस करण्याचे का ओमीक्रोन ने केले आहे
ओमीक्रोनचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे
डेल्टा व्हेरियंटवर आपण मात केली
डेल्टाचे राज्यात पेशंट संख्या कमी झाली आहे.
परंतु ओमीक्रोनला रोखले नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो आणि ओमीक्रोनला रोखण्यासाठी साठी जे जे करता येईल ते करावे लागणार.
ठाणे
पत्नी सोबत झालेल्या भांडणात चिडलेल्या पतीने रागाच्या भरात आपल्याच 7 वर्षीय लहानग्या मुलीचा बाहेर घेऊन जाऊन गळा दाबून हत्या केली..
जुगारा साठी अनेकदा पैसे घेत..
मुलीला मारून स्वतः देखील विष प्राशन करून आरोपीने 100 नंबर ला पोलिसांना फोन करून सर्व हकीकत सांगितली.
अनिस मोहम्मद खान मालदार असे आरोपीचे नाव असून मुंबई येथील जेजे रुग्णालयात अनिस ला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अनिस याच्यावर मुंब्रा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल…
दोन दिवस आधीची घटना…
नागपूर
ओमीक्रॉन सोबत लढण्यासाठी नागपूर महानगरपालिका पूर्णपणे तयार झालेली आहे
नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर पहिलं शारजहा येथून आलेलं पाहिलं विमान उतरलं
या विमानात 99 प्रवाश्यांन सहित क्रू मेंबर ची rtpcr चाचणी केली गेली
रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांना घरी पाठवून विलगिकरण मध्ये ठेवणार ..तर त्यापैकी काही प्रवाशांना नागपूरमधील विलगिकरंन सेंटरला आले पाठवण्यात
आज सकाळी नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट वर सकाळ शारजहा वरून विमान आले
विमानाने आलेल्या सगळ्या प्रवाशांना एअरपोर्टवर थांबवून करण्यात आला rt-pcr चाचणी..
बहुतांश प्रवाशांना एअरपोर्टवरून नागपूरच्या आमदार निवासात पाठवलं
महानगरपालिकेच्या बस या विमानतळावर सज्ज ठेवण्यात आल्या होत्या
शरजहा वरून नागपूर ला आलेल्या प्रवाशांची संख्या क्रू मेम्बर जोडून 104 आहे
नाशिक
साहित्य संमेलनाला आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह
पुण्याहून संमेलनासाठी आले होते नाशिक मध्ये
पालघर
शिवसेनेचे उपशाखा प्रमुख राजेश घुडे (उर्फ बाळा)वर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
307,429,120 ब, एनिमल ऍक्ट 1960,आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल,
उपशाखा प्रमुख राजेश घुडे
फिर्यादी स्वतः निघाला आरोपी
काही महिन्यांपूर्वी राजेश घुडेवर झाली होती फायरिंग,
गोळी कारला लागून राजेश घुडे थोडक्यात बचावले होते,
अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता
ह्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी केली कसून चौकशी
पोलीस तपासात फिर्यादी राजेश घुडे यानेच बनाव करून स्वतःवर गोळी झाडल्याचे झाले उघड
पोलिसांनी आरोपी राजेश घुडेला केली अटक,
आरोपी राजेश घुडेला न्यायालयात केलं हजर
पालघर न्यायालयाने सुनावली 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
कट रचण्यात इतरही आरोपी असल्याची शक्यता
ठाणे
ठाण्यातील वर्तक नगर च्या मिल्ट्री ग्राउंड परिसरातील खड्यात पाण्यात डुबून 11 वर्षीय दोन मुलाचा मृत्यू.
अभिषेक बबलू शर्मा आणि कृष्णा मनोज गौड असे दोन मुलांची नावे..
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिस दाखल…
श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्या…
बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी…
शहरातील मोरगे वस्तीत बिबट्या घुसला…
अचानक आलेल्या बिबट्याने नागरिकांची धावपळ..
बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू….
चारही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल…
पोलीस घटनस्थळी दाखल….
ठाण्यात परदेशातून आलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण
3 जण नेदरलँड वरून आले असून एकाच कुटुंबीयातील आहे
तर एक जण कॅनेडातून आला आहे..
ओमीक्रोन ची लागण आहे का या साठी अहवाल पुण्याला पाठवला आहे..
चारही जणांना पालिकेच्या देखरेखीखाली विलगिकरन केले आहे.
कराडच्या कृष्णा अभिमत वैधकिय विज्ञान विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत सोहळा
कृष्णा सहकारी बँकेच्या 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा संपन्न
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील
दिक्षांत सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचत आहेत
राज ठाकरे उद्या एक दिवसीय पुणे दौऱ्यावर,
उद्या सकाळी 11 वाजता शहर पक्ष कार्यालयात घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक,
आगामी महापालिका निवडणुकासंदर्भात आजी माजी नगरसेवक, शहरप्रमुख, राज्याचे उपाध्यक्ष, महत्वाच्या कार्यकर्त्यांची बोलावली बैठक,
गेल्या महिन्यात राज ठाकरे आजारी पडल्यानं पुणे दौरा पडला होता लांबणीवर,
आज संध्याकाळी पुण्यात येणार,
उद्या दूपारपर्यंत पक्ष कार्यालयात बैठका
राज ठाकरेंच लक्ष्य पुणे महापालिका !
खंडेरायाच्या गडावर “चंपाषष्ठी” यात्रेला सुरवात
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट जयघोष करत यात्रेला सुरुवात
जेजुरी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी,
गडकोट आवाराला विद्युत रोषणाई करण्यात आलीये…मुख्य गाभारा पान फूलांनी सजवण्याता आलाय..
सहा दिवस हा रात्र महोत्सव साजरा केला जातो, त्याला आजपासून सुरूवात झालीय
देवस्थानच्या वतीने म्हाळसा बाणाई अन्नछत्राचंही लोकार्पण करण्यात आलंय..
जेजुरी. गडावर उत्साहाचं वातावरण …
पुण्यातला सवाई गंधर्व महोत्सवावर यंदाही प्रश्नचिन्ह,
मोकळ्या मैदानात कार्यक्रमास राज्य सरकारची 25 टक्के प्रेक्षक क्षमतेला मान्यता,
मात्र 50 टक्के प्रेक्षक क्षमतेला परवानगी मिळावी सवाईच्या आयोजकांची मागणी,
50 टक्के परवानगी मिळाली तरचं आयोजनाचा विचार,
पालकमंत्री अजित पवारांकडे महापौरांच्या माध्यमातून सवाई महोत्सव करणार मागणी,
अजित पवारांनी पुण्यात 100 टक्के क्षमतेला परवानगी दिली होती, मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला ..
त्यामुळे सवाई गंधर्व महोत्सवावर प्रश्नचिन्ह आहे….
संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट..
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर विभागीय आस्थापना आदेशानुसार करण्यात आली बदली..
बस कर्मचाऱ्यांवर आता उगारले बदली चे हत्यार..
वीस कर्मचाऱ्यांची प्राथमिक केली बदली..
प्रशासनाने केलेली बदली ही संपात सहभागी झालेल्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केला असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप..
नाशिक: शरद पवार कुसुमाग्रज साहित्य नगरीत दाखल
संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केलं शरद पवार यांचे स्वागत
साहित्य संमेलनाचा आज समारोप
शरद पवार यांच्या हस्ते होणार समारोप
अहमदनगरला बिग मी इंडिया या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरुद्ध गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तब्बल 7 कोटी 68 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
फंड पे नावाच्या ॲप द्वारे फसवणूक
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील सतीश बाबूराव खोडवे यांनी याप्रकरणी केली फिर्याद दाखल
महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. शनिवार 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे.
आरोग्य विभागातील परीक्षेच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली
आरोग्य विभागातील परीक्षा घोटाळा प्रकरणी जालना जिल्ह्यातील आणखी दोघांना अटक
औरंगाबाद मधील एक तर जालन्यातील तिघांचा समावेश..
तीनही आरोपींना 7 डिसेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी..
आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
भिवंडी शहरातील नवीबस्ती गौतम कंपाऊंड येथे प्लास्टिक मणी बनविणाऱ्या कारखान्यास पहाटे आग
घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
लसीकरण सक्तीच्या विरोधात याचिका दाखल..
लसीकरण न करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने लावलेल्या नियमांच्या विरोधात खंडपीठात याचिका दाखल..
लस न घेणाऱ्यांना प्रवासबंदी आणि निर्बंध लादल्याने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी खंडपीठात केली याचिका दाखल..
प्रभारी सरकारी अभियोक्त्यास याबाबत माहिती घेण्याचे दिले आदेश..
याचिकाकर्त्यांनी लस घेण्याची सक्ती योग्य नसल्याचे आणून दिले निदर्शनास..
16 डिसेंबर रोजी होणार पुढील सुनावणी..
पुणे: दाट धुक्याचा आजही विमान वाहतुकीला फटका
धुक्यामुळे दृष्यता कमी झाल्याने विमान उड्डाणाला होणार उशीर
नगरसेवकांच्या सहली विरोधात निवडणूक आयोगा कडे तक्रार
विधान परिषदचे काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांनी केली तक्रार
कारवाई ची करण्यात आली मागणी
भाजप चे ने आपले प्रतिनिधी फुटू नये किंवा दगाफटका होऊ नये म्हणून नगर सेवकांना सहलीला पाठविले
नागपुरात भाजप चे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेस चे छोटू भोयर यांच्या आहे सामना
यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव निर्बंधाच्या कचाट्यात
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची यंदा जन्मशताब्दी असल्याने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव व्हावा, अशी सर्व शास्त्रीय संगीतप्रेमींची इच्छा
परंतु सध्या राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार मोकळ्या मैदानात होणाऱ्या कार्यक्रमांना २५ टक्के प्रेक्षकमर्यादेचे बंधन
महोत्सवासाठी किमान ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांची माहिती
पुण्यात महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रितपणे पोलिस विभागाला मागे टाकले असून, या संस्था लाचखोरीत दुसऱ्या क्रमांकावर
यावर्षी ‘एसीबी’च्या पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या 33 विभागांत 102 प्रकरणामध्ये कारवाई
त्यात महसूल विभागातील 26 प्रकरणांमध्ये कारवाई झाली. यात 1 प्रथमश्रेणी अधिकारी, 19 तृतीय श्रेणी व 1 चतुर्थ श्रेणी अधिकाऱ्याचा समावेश
त्यापाठोपाठ पोलिस विभागासंबंधी दाखल तक्रारींवरून 17 प्रकरणांमध्ये कारवाई
त्यात 10 प्रथमश्रेणी, 3 द्वितीय श्रेणी व 18 तृतीय श्रेणी अधिकाऱ्यांचा समावेश
नागपूर विद्यापीठाच्या इमारतीत मनपाचे अत्याधुनिक कोव्हिड हॉस्पिटल सज्ज
‘ओमायक्रॉन’च्या संभाव्य धोक्यात ठरणार उपयुक्त
कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आरोग्य सुविधा बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत केले
यात नागपूर विध्यपीठाचा मोठा सहयोग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये मनपाचे अत्याधुनिक १९९ बेड्सचे कोव्हिड हॉस्पीटल उभारण्यात आले
हे हॉस्पीटल संभाव्य धोक्यामध्ये उपचारासाठी सज्ज झाले आहे.
बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली
आफ्रिकेव्यतिरिक्त अन्य जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांच्या गृहविलगीकरणावर आता पालिकेचा करोना नियंत्रण कक्ष लक्ष ठेवणार
नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
या प्रवाशांच्या गृहविलगीकरणासाठी नवी नियमावली पालिकेने शनिवारी जाहीर केली आहे.
केंद्र आणि राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आफ्रिकेव्यतिरिक्त ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत त्या जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांचे सात दिवस गृहविलगीकरण करणे बंधनकारक केले आहे.
या प्रवाशांचे गृहविलगीकरण काटेकोरपणे केले जावे आणि संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी आता पालिकेने करोना नियंत्रण कक्ष सज्ज केले आहेत.
अंबरनाथकरांना काहीसा दिलासा देणारी बातमी
रशियाहून परतल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या ७ वर्षीय मुलीच्या आईचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह
आई दोन दिवस ऑफिसला जाऊन आल्यानं होतं काहीसं भीतीचं वातावरण
यापूर्वी या मुलीचे वडील सुद्धा आले होते कोरोना निगेटिव्ह
मुलीचे नमुने ओमायक्रॉनच्या जनुकीय तपासणीसाठी पाठवले असून त्याचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी