Maharashtra Nagar Panchayat Election Voting 2021 : महाराष्ट्रात आज 32 जिल्ह्यातील 105 नगर पंचायतीसाठी मतदान पार पडत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारं ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतलाय. यावर दिवसभरात राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 54 वर पोहोचली आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संपातील (ST Workers Strike) अजय गुजर यांच्या संघटनेनं संप मागं घेतला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
मुंबई
आज राज्यभरात नवीन 11 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद,
यापैकी 8 रुग्ण हे मुंबई विमानतळ सर्वेक्षण क्षेत्रातील 1 पिंपरी चिंचवड ,1उस्मानाबाद तर 1 नवी मुंबई येथील
राज्यात आतापर्यंत 65 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद,
तर आतापर्यंत 34 जणांना मिळाला डिस्चार्ज
नागपूर
नायलॉन मांजावर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना
कडक कारवाई व धाडसत्र सुरू करणार
राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे.
मात्र तरीही शहरात हा धागा वापरला जात असल्याचे दिसून येते.
आता यासंदर्भात कठोर निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका समितीची घोषणा केली आहे. निर्मितीच्या ठिकाणी धाडी टाकण्यापासून तर जनजागृती करण्यापर्यंत ही समिती कारवाई करणार आहे.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी या संदर्भात आज एक निर्देश काढून समिती घोषित केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्देश देताना न्यायालयाने विदर्भातील प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश दिला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे
बुलडाणा
जिल्ह्यातील एकमेव ओमीक्रोन रुग्ण बरा होऊन घरी परतला,
दुबई वरून परतला होता बुलडाणा मध्ये 55 वर्षीय व्यक्ती ,
बुलडाणा मध्ये परतल्यावर ओमीक्रोन तपासणी पोजीटिव्ह आली होती,
तर 14 दिवसाच्या उपचारानंतर आज ओमीक्रोन रुग्ण बरा झाला
पुणे
– टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण
– सुखदेव डेरे आणि अश्विनीकुमार यांना पोलीस कोठडी
– दोघांनाही 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
– सहा दिवसाच्या पोलीस कोठडीत आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता
– डेरे परीक्षा परिषदेचा आयुक्त तर अश्विनकुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र प्रमुख
अजित पवार
हे अधीवेशन नागपूरला व्हावे या मताचे हे सरकार होते
मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे आम्ही हे अधिवेशन मुंबईत घेतले
पुढचे अधिवेशन नागपुरात होण्यासाठी निश्चित विचार होणार आहे
अधिवेशन कमी होते अशी टीका होत आहे कोरोनाचे सावट असल्याने आम्ही इतर राज्यातील अधिवेशनात बाबत देखील माहिती घेतली
पहिल्या आठवड्यात पुन्हा आम्ही कामकाज सल्लागार समितीची बैठक घेणार आहोत
सर्वच चर्चाना उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे
ओबीसी, वीजबिल असे अनेक विषय येतील त्यावर आम्ही चर्चा करू शकतो
पाच प्रलंबित बिले आम्ही घेत आहोत
26 विधेयके आम्ही घेत आहोत
शक्ती बिल गृहमंत्री आणण्याच्या मानसिकेत आहोत ते देखील येईल
कृषी विषयक तीनही देयके मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
आजवर कधी सातत्याने इतका चहापानावर बहिष्कार कुणी टाकला नव्हता
प्रत्येक वेळेस काहींना काही मुद्दा काढून बहिष्कार टाकायचा हे योग्य नाही
चहापानातून चर्चा होत असते
पण कुठला ना कुठला मुद्दा काढून हे बहिष्कार टाकत आहेत
नेहमीच्या प्रथेप्रामाणे कॅबिनेट देखील झालेली आहे
आमदारांचे निलंबन कुठलाही विषय डोक्यात ठेवून केलेले नाही
काहींनी असा समज केला की राज्यपालांनी 12 नावं केली नाहीत म्हणून या 12 जणांचे निलंबन केले
अजित पवार
ओबीसी आरक्षणाबाबत सरकार कुठेही कमी पडलेले नाही
केंद्र सरकार राज्याच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतंय हे असे चालत नाही
ओबीसी बाबत आम्ही विस्तृत भूमिका सभागृहात मांडू
कायदा सुव्यवस्था, परीक्षा याबबत देखील चर्चा करू
कुलगुरूंचा अधिकार कमी करण्याचा कायदा वेगळा केला असे समजण्याचे कारण नाही
सातत्याने भ्रस्ताचार भ्रस्ताचार असा मुद्दा काढायचा असा प्रयत्न विरोधकांचा आहे
सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे काम हे सरकार करत आहे
अजित पवार ऑन परीक्षा
चौकशीमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही
आमचे सरकार येण्याआधी त्यांना दोन ते तीन वर्ष आधी अधिकार दिल्याचे समोर येते
पण सर्व सत्य समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे
राज्य सरकारचे पोलीस खाते सक्षम आहे. सीबीआय कशाला हवा
पोलिसांचा निकाल आल्यानंतर भरती केली जाईल
जर चुकीचा झाले असा अहवाल आला तर भरती रद्द केली जाईल
मुंबई
मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का – अजित पवार
मुख्यमंत्री यांनी तब्येत चांगली आहे
त्यांनी मला, थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील यांना उद्या 9 वाजता बैठक घ्यायला लावली आहे
मुख्यमंत्री कुठल्याही वेळी विधिमंडळ मध्ये येतील
आज त्यांनी आम्हाला वर्षावर देखील बोलावलं होतं
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात आणखी एक ओमीक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
-हा रुग्ण युरोपियन देशातून दुबईत आणि मग भारतात आला.12 डिसेंबरला मुंबईत आल्यानंतर 17 डिसेंम्बरला त्याला कोरोनाची लागण झाली तर आज ओमीक्रोन पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं
-सुदैवाची बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील इतर पाच ही निगेटिव्ह आहेत
-शहरातील ओमीक्रोन पॉझिटिव्हची संख्या 12 वर पोहचली असून,आतापर्यंत दहा जणांनी ओमीक्रोन वर मात केलेली आहे
पुणे
पुण्यातील छत्रपती संभाजी पुलावरील मेट्रो बांधकामाची उंची वाढवावी म्हणून पुणे महानगरपालिकेत गणेश मंडळ आणि महाविकास आघाडीसह मनसे आक्रमक
गणेश मंडळ कार्यकर्ता व महामेट्रो अधिकारी यांच्यात शिवीगाळ पर्यंत वाद….
महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा महाविकास आघाडीचा आरोप…
कार्यकर्त्यांनी घातला सभागृहाच्या बाहेर गोंधळ…
सभागृहात नगरसेवकांचा गोंधळ…
महाविकास आघाडी व कार्यकर्ते आक्रमक…
मुंबई
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची तातडीची आणि अत्यंत महत्वाची बैठक
उद्या सकाळी 9 वाजता विधानभवनात होणार बैठक
अधिवेधनात राज्य सरकारची व्यूहरचना ठरवली जाणार
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते बैठकीत सहभागी होणार
नवी दिल्ली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांना दिल्लीत बोलावलं
नागपूर विधान परिषदेत झालेल्या गोंधळाच्या मुद्यावर काँग्रेस हाय कमांडने दिला समन्स.
सर्व नेते दिल्लीत दाखल
तिन्ही नेत्यांमध्ये एकमत नसल्यामुळे खुलासा करण्यासाठी केलं पाचारण
संध्याकाळी 7 वाजता सोनिया गांधी यांच्या घरी होणार बैठक
अस्लम शेख बाईट
आशिष शेलारांनी आरोप केल्याप्रमाणे सेलेब्रिटी पार्टीत एक कॅबिनेट मिनीस्टर होता तर त्या मंत्र्याचं नाव शेलारांनी जाहिर करावं…आणि कॅबिनेट मिनीस्टरनं लोकांच्या कार्यक्रमाला जाऊ नये का?,जर काही चूकीचं झालं असेल तर शेलारांनी थेट नाव घ्यावं…शेलारही मंत्री होते ते लोकांच्या कार्यक्रमाला जात नव्हते का?
अस्लम शेख ऑन इयर एन्ड
ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर च्या वेळी मुंबई शहरात मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया,चौपाट्या याठिकाणी प्रशासनाकडून गर्दी होऊ दिली जाणार नाही…
मोकळ्या जागी फटाके फोडण्यावरही निर्बंध असणार आहेत…
इयर एन्ड आणि ख्रिसमसकरता कोणताही मोठा कन्सर्ट, कार्यक्रम मुंबई शहरात करता येणार नाही
लहान-मोठ्या कार्यक्रमांकरता प्रशासनाच्या गाईडलाईन लागू आहेत…
प्रशासनाच्या गाईडलाईन राजकिय पक्षांसह सर्वांनाच लागू आहेत…
अस्लम शेख ऑन आपत्कालीन निधी
जेव्हा गुजरातला निधी दिला तेव्हा केंद्र सरकारनं महाराष्ट्राला निधी दिला नाही…
आपातकालिन निधी खरिच झाला की नाही बे जाऊन बघा…लोकांसाठी हा निधी आहे तो लोकांसाठीच खर्च होतो
अस्लम शेख ऑन वॉटर ट्रान्सपोर्ट
मुंबईत वॉटर ट्रान्सपोर्टला उत्तेजना मिळणार…
ट्रॅफिक आणि रेल्वे, बसवरचा भार कमी करण्याकरता बेलापूर करता वॉटर टॅक्सी सुरु करणार..
रो रो जेट्टीला चांगला प्रतिसाद मिळालाय…
संपूर्ण महाराष्ट्रात वॉटर कनेक्टिव्हीटी कशी करता येईल याबाबत विचार सुरु आहे
अस्लम शेख ऑन आमदार निलंबन
जर 12 आमदारांचं निलंबन चूकीच असतं तर कोर्टानं त्यांना न्याय दिला असता पणकोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही
अस्लम शेख ऑन शिवभोजन थाळी
इतर राज्यात कोरोना काळात लोकांचेहालझाले मात्र शिवऊोजन थाळी महाराष्ट्रात सुरु झाली…जर कोणी त्यात चूक करत असेलतर कारवाई होईल
पुणे
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021 जाहिरात आणि पदे .
उद्योग निरीक्षक :- 103 पदे
दुय्यम निरीक्षक :- 114 पदे
तांत्रिक सहाय्यक :- 14 पदे
कर सहाय्यक :- 117 पदे
लिपिक टंकलेखक :- मराठी :- 473 पदे आणि इंग्रजी :- 79 पदे
परळी
उपजिल्हा रुग्णालयातील एक्सरे टेक्निशियनची रुग्णालयातच आत्महत्या
सिद्धार्थ जाधव असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव
रुग्णालयातच फाशी घेतल्याने खळबळ
सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात मृत्यूचं गूढ
शेतकऱ्यांप्रति हे सरकार असंवेदनशील आहे. कोणती मदत नाही, पीक विमा कंपनीच्या घशात घातला. महाराष्ट्र हे एकमेव राज्य जे पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करीत नाही, आणि दारूचे दर कमी करते.कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महिला अत्याचार प्रचंड वाढले. परीक्षांचे घोळ इतके आहेत की त्याची सीबीआय चौकशी व्हायला हवी, तरच खरे सूत्रधार बाहेर येतील. कुलगुरूंचे अधिकार कमी करणारा कायद्याला आम्ही कडाडून विरोध करू. विद्यापीठ ताब्यात घेणारा कायदा देशात कोणत्याही राज्याने केलेला नाही: देवेंद्र फडणवीस
या सरकारनं लोकशाही बंद केलीय. या सरकारनं रोखशाही सुरु केली आहे. भ्रष्टाचारानं बरबटलेला अशा प्रकारचा कारभार महाराष्ट्राच्या जनतेनं यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. स्थगिती, वसुली, खंडणीचे प्रकार यापूर्वी कधी पाहिले नाहीत. विरोधकांनी बोलू नये म्हणून विरोधकांची तोडं बंद करण्यासाठी विरोधी आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करुन लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या सरकारनं केलं. ज्या घटना घडल्या नाहीत त्या सांगून आमच्या आमदारांना निलंबित केलंय. आपल्या आमदारांवर विश्वास नाही, म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सरकारनं राबवला आहे. आम्हाला असं पेपरमध्ये वाचायला मिळालं की अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. बारा आमदार बाहेर ठेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानपद्धतीनं झाली असताना नियम समितीत नियमाच्या बाहेर जाऊन घाट घातला जातोय याचा अर्थ 170 आमदारांचा पाठिंबा पोकळ आहे हे यातून लक्षातं आलं आहे. आमदारांवर विश्वास नसल्यानं गुप्त मतदान पद्धत बदलण्यात आली आहे, असं फडणवीस म्हणाले.
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021
मतदान आकडेवारी
वेळ – सकाळी 7.30 ते 1.30
पुरुष – 3425
स्त्री – 3082
इतर -. ०
एकूण – 6507
टक्केवारी -45 %
वाशिम : मानोरा नगर पंचायत निवडणूक मतदान अपडेट…
7.30 ते 01.30 दरम्यान 37.97 टक्के मतदान…
– निफाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत 7.30 ते 01.30 या सहा तासात 34.01 टक्के मतदान
– 13709 पैकी 4771 मतदारांनी 11.30 वाजेपर्यंत बजावला मतदानाचा हक्क
– 14 प्रभागासाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
लखीमपूर खेरी प्रकरण आणि 12 खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. उद्या संसदेचं अधिवेशन संपणार आहे. भारतासह संपूर्ण जगानं पाहिलं आहे की केंद्रीय मंत्र्याच्या नेत्याच्या मुलानं शेतकऱ्यांना चिरडलं, मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पाहिलं नाही. त्यांनीच नेमलेल्या एसआयटीच्या अहवालाला ते मान्य करण्यास तयार नाहीत.
आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे आभार मानतो. तुम्ही तिथं पोहोचला नसता तर हे प्रकरण दाबलं गेलं असतं. मी तुमचे सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं आभार मानतो, असं संजय राऊत म्हणाले.
मी याबाबत अगोदर बोललो आहे. माझी स्वत:ची संपत्ती 4 कोटी रुपयांची आहे. माझी सर्व संपत्ती नवाब मलिक यांना देतो. त्यांनीचं आम्हाला नंतर रक्कम द्यावी. ईडी वगैरे इतक्या लांब कशाला घेऊन जात आहात. नवाब मलिक यांनी कोणाच्या सांगण्यावरुन अशा प्रकारचे आरोप करणं दुर्दैवी आहे. राजकारणाशिवाय यामध्ये दुसरं काही नाही. कुठं पुरावे आहेत, काय आहेत, हडप काय काय, असे जे शब्द वापरत आहात त्याला काही रेकॉर्ड आहे का. कालपर्यंत माझं नाव देखील घेत नव्हते. आता माझं नाव घेतलंय तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा लागेल, असा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.
सामान्य माणूस, माहितीचा अधिकार वाला, लोक औरंगाबादला प्रेस घेत होते. नवाब मलिक बेजबाबदार पणानं आरोप करत आहेत, असं सुरेश धस म्हणाले.
2018 च्या टीईटी परीक्षेतही घोळ, कोरे ओएमआर रंगवायचे, बनावट प्रमाणपत्रही दिली: अमिताभ गुप्ता
2018 मध्ये टीईटी परीक्षा झाली होती त्यामध्ये गैरप्रकार झाला होता.आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता. 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळची परीक्षा नियंत्रक होते डेरे त्यांना अटक केली आहे. जी ए टेक्नॉलॉजीचे आश्विनकुमार होते, त्यांना अटक केली आहे. प्रीतिश देशमुख, हरकळचे दोन्ही भाऊ आणि सावरीकर यांना अटक केली होती. ओएमआरमध्ये बदल करायचे, ओएमआर कोरं ठेवायला लावायचे. त्यावर गोल रंगवायचे. यातून कोणी सुटून गेल्यास नापासला पास दाखवायचे. असा प्रकार 500 लोकांबद्दल झाला आहे. काही जणांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं होतं.
2018 ला देखील या प्रकरणी तक्रार झाली होती. मात्र प्रकरण लॉजिकल एंडला गेले नव्हते. सुखदेव डेरे त्यावेळी प्रमुख होते. त्यानंतर तुकाराम सुपेकडे काही वेळ चार्ज होता.
आता झालेल्या तक्रारीचा तपास करताना हे समोर आलं आहे. काल आम्ही रात्री सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही ज्यांना अटक केली आहे त्यातून लॅपटॉप मिळाला त्यातून ही लिंक पुढे आली आहे. तुकाराम सुपे आणि प्रीतिश देशमुख यांच्याकडे केलेल्या तपासात हे समोर आलं आहे.
प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार 5 कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे. सुखदेव डेरे दोन ते तीन वर्ष निवृत्त झालेले होते. 2018 च्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे.
आरोग्य भरतीतसंदर्भात संजय सानपला अटक केली होती. संजय सानप हा दलाल म्हणून काम करत होता. भरपूर दलाल आहेत आम्ही चौकशी करत आहोत. सर्व गोष्टी सांगू शकत नाही, कोर्टाला माहिती देऊ, असं अमिताभ गुप्ता म्हणाले.
पुण्यातील एक ट्रस्ट एंडोवमेंट ताबूत ट्रस्ट प्रकरणात जे एफआयआर वक्फ बोर्डाच्यावतीनं तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणी ईडीनं चौकशी सुरु केली आहे. त्यानिमित्तानं त्यांचं स्वागत करतो. मी सांगू इच्छितो की बोर्डाकडून आम्ही 11 एफआयआर दाखल केल्या आहेत.
दर्गा हजरत जियाऊद्दीन रफाई, देगलूर
दर्गा हजरत मौलानासाहेब पैठण, औरंगाबाद
दर्गा बुराणशाह वली इदगाह, जिंतूर रोड परभणी
दर्गा बुराणशाह वली इदगाह व कब्रस्तान, परभणी
दर्गा बुराणशाह वली इदगाह व कब्रस्तान, परभणी
जालना, पुणे, औरंगाबाद, आष्टी बीड येथील, येथील प्रकरणात वक्फ बोर्डाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
– टीईटी परीक्षा गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे देण्यास राष्ट्रवादीचा विरोध,
– देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील प्रकरणं दाबण्यासाठी तपास सीबीआयकडे चौकशी देण्याची भाजपची मागणी, राष्ट्रवादीचा आरोप,
– या प्रकरणात केलेल्या कारवाईबद्दल राष्ट्रवादीकडून पुणे पोलिसांचे कौतुक,
– तपास महाराष्ट्र पोलिसांकडे ठेवण्याची राष्ट्रवादीची मागणी,
– राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट
नाशिक – 6 नगरपंचायती साठी मतदान प्रक्रिया शांततेत
थंडीमुळे मतदारांचा देखील सकाळच्या सत्रात मतदानाला थंड प्रतिसाद
दिंडोरी नगरपंचायती साठी सकाळी 9.30 पर्यंत 13 टक्के मतदान
तर निफाड नगरपंचायतीसाठी सकाळी 9.30 पर्यंत 5.84 टक्के मतदान
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता. सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांना अटक केलीय. यापूर्वी डेरेंना निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.
पुण्यात आज खडकी लष्कर कँम्पात बिमस्टेक परिषदेचं आयोजन,
सात देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित,
आपत्ती व्यवस्थापन आणि सामंजस्य परिषदेचं आयोजन,
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख एम एम नरवणे राहणार उपस्थित,
आपत्ती काळात रेस्क्यू कसं केलं जातं याचं केलं जाणार प्रात्यक्षिक
महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज संघर्ष याचं प्रतिनिधीत्त्व गेल्या 70 वर्षांपासून करत आहे. त्यांनी साठी आंदोलन केलं आहे. समितीनं त्यासाठी रक्त सांडलं आहे, बलिदान दिलं आहे. बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरात त्याचा निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं या घटनेचा लोकशाही मार्गानं निषेध केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी जबरदस्ती करुन अटक केली आहे. यावर महाराष्ट्रातील भाजपच्या संवेदनशील नेत्यांनी काही भाष्य केलं नाही.
केंद्राची भूमिका यासंदर्भात ढोंगी आणि दुटप्पीपणाची आहे. वारणासीला जाऊन हिंदू मतदारांना भावनिक करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी किंवा पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. शिवाजी महाराज मोगलाई विरुद्ध तळपले याची माहिती त्यांनी दिली. मात्र, कर्नाटकातील घटनेवर भाजपचे नेते तोंड उघडण्यास तयार नाहीत, हे ढोंग आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुंबईतील एनसीबीची गाजलेले अधिकारी आहेत. आर्यन खानला अटक करुन तमाशा करणारे, नवाब मलिकांच्या जावयांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना गुजरातचा जिम्मा दिला पाहिजे. गुजरात हे अमली पदार्थाच्या वाहतुकीचं पोर्ट झालेलं दिसतंय ही धक्कादायक बाब आहे. नरेंद्र मोदींनी याकडे लक्ष द्यावं, असं संजय राऊत म्हणाले.
लखीमपूर खेरीत भाजपच्या नेत्याच्या जागी काँग्रेसचा मंत्री असता तर भाजपनं तांडव केलं असतं, असं संजय राऊत म्हणाले.
ओबीसींच्या राष्ट्रीय बैठकीसाठी छगन भुजबळ दिल्लीत
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी नेत्यांची महत्वाची बैठक…
भुजबळांसह शरद यादव,लालूप्रसाद यादव सीताराम येचुरी इत्यादी नेते राहणार उपस्थित
– थंडी मुळे मतदार राजाने फिरवली पाठ..
1322 मतदान केंद्रावर होत आहे निवडणुका
– उमेदवाराच्यां समर्थकांची गर्दी आहे मात्र मतदार राज्याची गर्दी मतदान केंद्रावर दिसून येत नाही
– जसजसा तापमानात वाढ होईल तसतसा मतदारांची गर्दी वाढुन टक्केवारी वाढनार असल्यांचे चित्र उभे ठाकले आहे।
नागपुरात आज च तापमान 7.6 एवढं नोंदविण्यात आलं
नागपूर आणखी गारठले,
पारा 7.6 अंशावर, राज्यात सर्वात कमी तापमान ?
रात्री आणि दिवसाही हुडहुडी,
उत्तरेकडील येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीची लाट,
आणखी तीन-चार दिवस थंडी कायम राहणार
अहमदनगर-कर्जत
कर्जत नगरपंचायतसाठी मतदानाला सुरुवात
उमेदवारांनी केली ईव्हीएम मशीनची पूजा
17 पैकी 13 जागेंसाठी मतदान तर राष्ट्रवादीची एक बिनविरोध
आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या सामना
रोहित पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई तर राम शिंदे यांच्या अस्तिवाची लढाई
देशात एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने चिंता वाढवली असताना महाराष्ट्रासाठी मात्र आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे.
राज्यात आज एकाही नव्या ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णाची नोंद करण्यात आलेली नाही.
सध्या राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या 54 रूग्ण आहेत. त्यापैकी 31 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे.
दरम्यान, आज 544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 515 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
तर आज 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर…
मागण्या मान्य न झाल्याने उद्यापासून काम बंद…
संपामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर होणार परिणाम
संपामध्ये जवळपास आठशे कर्मचारी होणार सहभागी
अकृषी विद्यापीठातील पदाना सातवा वेतन आयोग लागू करावा
राज्यातील अकृषि विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची 58 महिन्यांची थकबाकी द्यावी
अश्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही दखल न घेतल्याने जाणार संपावर
रत्नागिरी- अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या आंबा बागांचे सर्वेक्षण सुरु
कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरु
जिल्ह्यात अवकाळी पावसानं आंब्याचे मोठं नुकसान
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणाच्या सुचना
जिल्हा प्रशासनाला सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात येणार
नुकसानीचे पंचनामे करण्याची आंबा बागायतदारांनी केली होती मागणी
राज्यातील 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आज मतदान प्रक्रिया पार पडेल.