मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिमध्ये जर अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून मोकळे होतील, अशी घणाघाती टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली – प्रियांका गांधी पत्रकार परिषद
राम मंदिरसाठी देशातून देणगी गोळा केली, दलितांच्या जमिनी हडपल्या गेल्या, देणगीच्या पैशामध्ये मोठा घोटाळा झालाय – प्रियांका यांचा आरोप
राम मंदिराजवळची 2.3 हेक्टर जमीन 2 कोटी रुपयांची होती ती एका व्यक्तीने – रवी मोहन तिवारी याने – विकत घेतली आणि ती जमीन व्यवहार झाल्यावर , 5 मिनिटे झाल्यावर 8 कोटी रुपयांना ट्रस्ट ला विकली गेली, यात अयोध्याचे महापौर आणि RSS चे पदाधिकारी साक्षीदार आहेत
उच्च न्यायालयामार्फत याची चौकशी व्हावी – प्रियांका
जळगाव ब्रेकिंग
जळगाव जिल्ह्यातील जामनेर पहूर रस्त्यावर अज्ञात वाहनाची कारला धडक
अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
जखमींना जामनेर येथील जी एम रुग्णालयात केले दाखल
सक्तीच्या लसीकरणाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
सक्तीच्या लसीकरण प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने बजावली राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस
औरंगाबादच्या जिल्हाधिकार्यांसह मनपा प्रशासकांनाही नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश..
उत्तरप्रदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर
870 कोटी रुपयांच्या विकासकामांची यूपीला भेट
22 योजनांचे पंतप्रधान करणार भूमिपूजन
नवी दिल्ली
देशात 18 वर्षावरील 60 टक्के नागरिकांचे लसीकरण
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती
लसीकरणाबाबत देशातील पॉजीटीव्ह बातमी
राज्यासाठी दिलासादायक बातमी !
राज्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग अजून नाही
केलेल्या सर्वेक्षणात डेल्टाचाच राज्यात समुह संसर्ग,
जिनोमिक सिक्वेंसिगंच्या अहवालातून माहिती आली समोर,
पुण्यातील बी जे मेडीकल कॉलेजकडे देण्यात आली राज्य समन्वयाची जबाबदारी,
गोपीचंद पडळकरांच्या अजित पवारांच्या टिकेवरती राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक,
बारामतीमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त मताने पराभव झालेल्या दीडदमडीच्या व्यक्तीनं अजित दादांवर बोलू नये
अजित दादांवर बोलण्याआधी 70 वर्षात कष्टाने उभ्या केलेल्या सरकारी संस्था आणि सार्वजनिक उद्योग नरेंद्र मोदींनी 7 वर्षात कशा विकल्या? याचे उत्तर आधी द्यावं
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोपीचंद पडळकरांचा दीडदमडीचा व्यक्ती म्हणून उल्लेख
ओमिक्रॉन व्हेरीयंटची लागण झाल्यावर अँण्टीबॉडीज नैसर्गिक लस म्हणून काम करतात भारतातील तज्ञांचा दावा,
मात्र हा दावा तथ्यहीन आणि शास्त्रीय आधार नसल्याची आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवेंची माहिती,
आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरीयंटचं संशोधन डब्ल्यूएच ओकडून प्रसिद्ध झालेलं नाहीये,
त्यामुळे चुकीच्या व्हायरल होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय,
लसीकरणाशिवाय अँण्टीबॉडीज तयार होणं शक्य नाही,
तज्ञांनी केलेला दावा चुकीचा
मुलूंड टोल नाका वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आज राज्यभरातून वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता सामील होणार मुलुड टोल नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आले आहे
ओबीसी जातीनिहाय जंगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा आज मोर्चा थेट विधानभवनावर निघणार आहे या मोर्चाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार आहेत
मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. व्हॉट्सअॅपवर लिहिलेल्या संदेशामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचे म्हटले होते.
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या आपल्या मुख्य मागणीसाठी गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपामुळे एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज 23 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. आज रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे रस्त्यावर उतरणार असून, ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते राज्यभरातून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.