मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
ब्रिटननं यूरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी व्यापारी करार केल्याची माहिती रीट्रस या वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये चेतन शर्मा, अबेय कुरुविल्ला, देबाशिष मोहंती यांचा समावेश करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
BCCI’s Cricket Advisory Committee recommends Chetan Sharma, Abey Kuruvilla and Debashish Mohanty as the new members to the senior men’s selection committee panel pic.twitter.com/sSe2xWMzG8
— ANI (@ANI) December 24, 2020
आज दिवसभरात राज्यात 3580 नवे करोनाबाधित आढळले, तर 89 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय, 3171जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 19लाख 9 हजार 951 झाली आहे. तर, सध्या राज्यात 54 हजार 891 अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या 18 लाख 4 हजार 871जणांना डिस्चार्जही मिळालेला आहे.
कोथरूडमधील एआरएआय टेकडीवर आग लागली आहे. आगीचा आवाका मोठा आहे. त्यात डोंगर उताराचा भाग असल्याने अग्निशमन दल पोहचणे अवघड आहे. त्यामुळे येथील वृक्ष संपदेला व जैव विविधतेला धोका निर्माण झाला आहे. या भागात मोर, ससे व पक्ष्यांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे.
नागपूर कोरोना अपडेट :
नागपुरात आज 353 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय.तर, 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 336 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
नागपूरची एकूण कोरोना संख्या
एकूण रुग्ण संख्या – 121346
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 113307
एकूण मृत्यू संख्या – 3878
कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही. मीडियातील बातम्यांवरुन कोरोना संकटाचा अंदाज आला. रुग्णालयांची गरज पडणार असं वाटलं. कोरोना काळात बाहेर पडलो नाही म्हणून टीका झाली. पहाटेपर्यंत जागं राहून कामं केले:उद्धव ठाकरे
इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात 7 डिसेंबर पासून विविध ठिकाणी इंग्लंडहून 11 जण आल्याची माहिती समोर आलीय. 11 पैकी 9 जण नगरला आले तर 2 जण मुबंईत थांबले आहेत. पाच वेगवेगळ्या कुटुंबातील या व्यक्ती असून,कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत, अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
ठाण्यातील वर्तकनगर येथील सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या अनधिकृत बांधकामा विरोधात ठाणे महानगपालिका अधिकारी व प्रताप सरनाईक यांची चौकशी करावी या संदर्भात पालिका आयुक्तांना भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी निवेदन दिले.
शासकीय कामात अडथळा प्रकरणी कुरुंदवाड पोलिसात बुधवारी रात्री उशिरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर क्षेत्र अधिकारी सचिन हरभड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन हरभड हे बुधवारी तेरवाड बंधारा इथे मृत मासे, दूषित पाण्याचे नमुने घेण्यास गेले असता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांच्यासह इतर तीन जणांनी हरभड याना बांधून घातले होते.
फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता, 5 महापालिकांसह तब्बल 96 नगरपालिकांसाठी फेब्रुवारीत निवडणुका होण्याचे संकेत, कोरोनामुळे पुढे ढकललेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार महापालिकेसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता, नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठीही याच कालावधीत निवडणूक होण्याची शक्यता,
96 नगरपालिकांच्या निवडणुकाही याच काळात होण्याची चिन्हं
राज्यातील 5 महापालिकांसह तब्बल 96 नगरपालिकांसाठी फेब्रुवारीत निवडणुका होऊ शकतात. कोरोनामुळे पुढे ढकललेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार महापालिकेसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठीही याच कालावधीत निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २७ तारखेच्या पेठ येथील होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांना सांगली जिल्ह्यातील कासेगांव पोलिसांकडून अटक, कडकनाथ घोटाळा फसवणूक प्रकरणातील शेतकरी न्याय मागण्यासाठी फडणवीसांच्या सभेत येणार असल्याने पोलिसांकडून तीन दिवस आधीच धरपकड
ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाच्या आरक्षणावरून सरकार पक्षीय राजकारण केलं जातंय, ग्रामपंचायतीवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला – माधव भांडारी
सरकार वीजबिल कमी करत नाही, मात्र दारु विक्रेत्यांना सूट देते. बिल्डरांचा प्रिमीयम कमी करण्यासाठीचा वाद जनहितासाठी की स्वहितासाठी..? बिल्डरांच्या फायद्यासाठी सरकारमध्ये चढाओढ.. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप..
आशिष शेलार यांच्या हातातून सत्तासुंदरी गेल्यामुळे त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्ट सारखी झाली आहे. भाजप नेत्यांना ध्यानीमनी नुसता सत्ता दिसत असते, स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचे आशिष शेलारांना प्रत्युत्तर
गोरेगाव पूर्वच्या दिंडोशी भागात वागेश्वारी मंदिर परिसरात चित्रीकरणाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला आग लागली आहे.
अमंली पदार्थ विरोधी पथकाने 27 लाख रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केले आहे. पथकाने 275 ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहमद नवाज मोहम्मद एजाज शेख असं आहे.
मराठा समाजाला EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारन घेतलाय. या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग आणि राज्य सरकारच्या इतर विभागात नोकर भरती खोळंबली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात ऊर्जा मंत्री नितीन राऊत ओबीसी समाजाचे मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या EWS निर्णयावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारची वर्षा बंगल्यावर बैठक सुरू
2022 पासून IPL मध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत, BCCI च्या वार्षिक बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू औरंगाबादमध्ये दाखल, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या परिसरात कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन सुरू आङे. रिजिजू स्विमिंग पूल, ऑडिटोरियम आणि मैदानांचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरुन 10 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून मिळाली. तात्काळ या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला असून यापैकी 7 जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर 3 जण संगमेश्वर तालुक्यातील आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील 7 जणांपैकी एकजण मद्रास येथे तर दुसरा रायगड येथे गेला आहे. उरलेले पाच जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची स्वॅब टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
यूके मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कार्यपद्धती जारी करण्यात आली आहे. राज्यात येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये सशुल्क क्वारंटाईन करण्यात येईल. त्यानंतर 5 व्या आणि 7 व्या दिवशी RTPCR टेस्ट केली जाईल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास 7 दिवसात घरी सोडण्यात येईल. मात्र, घरात क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
सिंधुदुर्ग: कृषी कायद्यांच्या समर्थनात 7 जानेवारीला कणकवलीत भव्य शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन. भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. कणकवली शहरातून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.
सातारा: EWSबाबत धोक्याची शक्यता वाटते,या बाबत न्यायालयात विचारणा केली का?, असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. राज्य शासनाच्या भूमिके बाबत संशय वाटतो आहे.राज्य सरकार हतबल झाले आहे. मराठा उमेदवारांना EWSचा लाभ देण्याचा घेतलेला निर्णय हा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न, आहे अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
बीड: वैद्यनाथ कारखान्यातील चोरीचे प्रकरण, राष्ट्रवादीच्या नगरसेविकाचा पतीच निघाला चोर, अजीज इस्माईल शेख उर्फ मंगलदादा याच्यावर गुन्हा दाखल, कारखान्यातील 38 लाखांचं साहित्य केलं होतं लंपास, मंगलदादा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, मंगलदादा अद्याप फरार
रेल्वेत नोकरी लावून देण्याचं अमिश दाखवून नाशिकमध्ये मामा भाच्याला 18 लाखांना घातला गंडा, मामा बाबाजी केदारे आणि भाचा स्वप्नील पगारेंची झाली फसवणूक, नाशिक शहर वाहतूक शाखेतीलच दोन संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रेल्वेतील नोकरिची बनावट ऑर्डर तयार करून केली फसवणूक
नाशिक – महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 118 जण कोरोना बाधित, यात पोलीस प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचारयांची समावेश, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी दिले जाते प्रशिक्षण, सर्व कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी नाशिकच्या ठक्कर डोम कोव्हिड सेंटरमध्ये दाखल, नाशिक जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट, अण्णांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर भेट घेतल्याची माहिती
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी, कोकण झाले हाऊसफुल्ल, कोकणातील (रत्नागिरी/ सिंधुदुर्ग मधील) एमटीडीसीचे सर्व रिसॉर्ट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल. गेल्या काही वर्षांपासून नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात मोठया संख्येने पर्यटक येत असतात. रिसॉर्ट उपलब्ध व्हावे म्हणून काही पर्यटक 20 तारखेपासूनच बुकिंग करून राहिले आहेत. कोकणात आलेल्या पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटन व्यावसायिकही सज्ज. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून होणार नाताळ आणि नववर्षाचे स्वागत.
नव वर्षाच्या पूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, बनावट दारू बनवन्याचं मोठं रॅकेट केलं उध्वस्त, परदेशी ब्रँडच्या दारूच्या बाटलीमध्ये देशी दारू भरुन मोठ्या किमतींवर विकत होते. पनवेल आणि मानखुर्दमध्ये धाड़ी टाकून केली गेली कार्रवाई, जवळपास 22.57 लाखाचा मुद्देमाल केला जप्त
वाढीव विज बिल विरोधात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. वीज बिले पाण्यात बुडवून निषेध व्यक्त केला गेला. अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज बिले कमी करण्याची मागणी करण्यात आली. पंधरा दिवसात वाढीव संदर्भात सरकारने काही निर्णय नाही घेतला तर शहरात उग्र आंदोलन होईल अशा इशारा यावेळी देण्यात आला.
पुणे-बंगळुरू महामार्गावर एक तास मोठी वाहतुक कोंडी, वाकड परिसरात डंपरचा टायर फुटल्याने डंपर झाला पलटी, सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. हिंजवडी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, डंपर बाजूला घेतले. तासाभराने वाहतूक पूर्ववत झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोरोना लसीचा काळाबाजार होऊ शकतो, लोकांनी सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन, चीन आणि कोरियाचे सायबर हॅकर कोरोना लसीचा काळाबाजार करू शकतात, लोकांनी बळी पडू नये, मुंबई पोलिसांचं आवाहन. डार्क नेटच्या माध्यमातून होऊ शकतो काळाबाजार, लोकांनी सतर्क राहून बळी पडू नये असे आवाहन. कोरोना लस बनवणाऱ्या विविध कंपन्यांचा डाटा सायबर हॅकिंगच्या माध्यमातून चोरी करून बनावट लस बनवली जाऊ शकते असा पोलिसांचा अंदाज. इंटरपोलने याबाबात अलर्ट जारी केला असून सगळ्यांनी सावधानता बाळगावी, पोलीस महानिरीक्षक, (VIP Security) यशस्वी यादव यांची माहिती
बीड: जमिनीच्या वादातून दोन गटात जुंपली, एका गटाने केला हवेत गोळीबार, पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील घटना, हवेत तीन वेळा झाला गोळीबार, दोन्ही गटातील सात जनाविरिद्ध गुन्हा दाखल, चार आरोपींना पोलिसांनी केली अटक, डीवायएसपी विजय लगारे यांची माहिती
छगन भुजबळांची काँग्रेसच्या मोर्चावरून विरोधकांवर टीका
– खासदार, नेते राष्ट्रपतींना भेटायला जात असतील तर त्यांना का अडवलं जातं
– आता सगळे नियम, कायदे गुंडाळून ठेवले जातायत
– विरोधी पक्षाचे तुम्ही ऐकायला तयार नाहीत
शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना भाजपचे आमदार नितेश राणेंचे निमंत्रण. नाणारच्या घेतलेल्या भूमिकेवरून राजन साळवी यांना अगर शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व भाजपात यावं.नाणार समर्थनाचा आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू.
एंटी सीएएबाबत ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश
– ३१.१२.२०२९ पर्यंत दाखल खटले मागे घेण्याचे आदेश…
– तात्कालीन मा. मंत्री वित्त आणि नियोजन सुधिर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समितीही बरखास्त करण्याचे आदेश…
– प्रकाश रेड्डी, फिरोझ मिठिबोरवाला, अमोल मडामे, अपर्णा दळवी यांना गृहमंत्र्यांनी दिलं आश्वासन
मुंबई लोकल ट्रेनबाबत फार लवकर निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री हे थांबलेली मुंबई सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे.
“दोन्ही बाजूने बोलणारी लोकं आहेत, निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा, काही मंडळींचा हा राजकीय खेळ सुरू आहे. यापूर्वी EWS च्या सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, तेव्हा संभाजीराजे, मेटे आणि काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय स्थगित ठेवला. मात्र SEBC च्या उमेदवारांना EWS चा लाभ मिळावा म्हणून काही जण कोर्टात गेले. हायकोर्टाने १२ ते १३ प्रकरणात EWS चे आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत आणि याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. EWS आरक्षणाचा कायदा आहे त्याचा फायदा घेण्यापासून कसे रोखू शकतो. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मराठा आरक्षण टिकले पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी पुढील सुनावणीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे” – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
प्रियंका गांधींसहित काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मोर्चाला रोखलं असतानाही आंदोलन केल्यामुळे ताब्यात घेतल्याची माहिती
राहुल गांधी म्हणतात की हा कसला बिल आहे. अरे राहुल गांधी तुमच्या आजोबांनी आमची कबर बांधली. तुझ्या आज्जीने शेतकऱ्यांना जेलमध्ये ठेवले होते. त्या शेतकऱ्यांना जेलमधून काढण्याचे काम मोदींनी या बिलच्या माधमातून केले आहे – सदाभाऊ खोत
धुळे शहरातील जय हिंद चौकमधील रस्त्यावर जीव घेणे खुड्डे पडल्याने मनसेच्यावतीने रस्त्यात बसून आंदोलन, शहरातील रस्ते डागडुजी करण्याची पालिकेकडे मागणी
प्रियंका गांधी सरकारच्या विरोधात रोडवर आंदोलनला बसल्या
कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा, पोलिसांनी रोखला मोर्चा
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले इथं चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या तिहेरी हत्या प्रकरणात सीआयडीने 24 आरोपींना अटक केली असून यात 5 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींना डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले असता, डहाणू न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एम.व्ही. जावळे यांनी 19 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच 5 अल्पवयीनांना भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
अर्जुन रामपालच एनसीबी विरोधात दावा करण्याच्या तयारित, आपल्या घरी सापडलेली दोन्ही औषधं डॉक्टरांनी दिलेली असल्याचा अर्जुनचा दावा, एनसीबीने छाप्यात आपल्या बहिणीची औषधे जप्त केली असल्याचं अर्जुनचं म्हणणं, तर दुसरीकडे NCB अर्जुनच्या विरोधात कार्रवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा
नाशिक – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त चेन स्नाचिंगच्या घटना, लॉकडाऊन असताना देखील वाढल्या मंगळसूत्र हिसकावून घेण्याच्या घटना, यंदाच्या वर्षात तब्बल 96 चेन स्नाचिंग, 96 पैकी फक्त 32 गुन्हे उघडकीस, मात्र फक्त 34 टक्के गुन्हे उघडकीस आल्याने पोलिसांच्या तपासाबाबत संशय
ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले, पनवेलमध्ये शेकाप विरोधात बॅनरबाजी, बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चेला उधाण, कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे परत करा आणि मग मत मागायला या, अनामिक बॅनरबाजी करून विरोधी पक्षाला डिवचण्याचे प्रकार, एकेकाळी तालुक्यातील राजकारणावर मजबूत पकड असलेला शेकाप शहरी भागातील राजकारणात काही प्रमाणात कमजोर, शेकापचे उरलेले हे वर्चस्व नष्ट करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रयत्नशील
पुण्याजवळील नऱ्हे गावातील सेल्फी पॉईंटची अज्ञानातांकडून तोडफोड, नऱ्हे गावातील भुमकर वस्ती चौकात सेल्फी पॉईंट, रात्री 12:15 वाजताची घटना, घटनास्थळी नऱ्हे पोलीस दाखल, पुणे महापालिकेत 23 समाविष्ट गावांमध्ये नऱ्हे गाव, काल रात्री या 23 गावांची सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटून सारथीविषयी संपूर्ण माहिती दिली, शरद पवारांच्या कानावरही विषय घातला, नाहीतर गुंडाळून बंद करा संस्था, शाहू महाराजांच्या नावावर संस्था कशाला सुरु? : छत्रपती संभाजीराजे
सरकार आधीच हतबल, मराठा आरक्षणाच्या सुनावणीवेळी 25 तारखेला धोका झाला, तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहणार, माझं जीवन मराठा समाजासाठी, सकल मराठा समाजाच्या भूमिकेशी सहमत : छत्रपती संभाजीराजे
सरकारने जाहीर केलेलं EWS आरक्षण फक्त मराठा समाजासाठी नाही, यामध्ये ब्राह्मण, जैन, लिंगायत अशा सर्व जातींचा समावेश, माझा वैयक्तिक विरोध नाही, पण एसईबीसीला धोका होऊ शकतो का, याची चिंता : छत्रपती संभाजीराजे
बीडमधील रासप आ. रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत वाढ, शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेणं भोवलं, अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ईडीने केले जप्त, शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेऊन आपल्या विविध कंपन्यात गुंतवणूक, गंगाखेड मध्ये झाला होता गुन्हा दाखल, याप्रकरणी आ. गुट्टे यांना झाली होती अटक, बीडमधील पाच कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त
शिवाजीनगर 9.9
पाषाण. 10.5
लोहगाव 11.7
शिर्डीतील संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण, गावठान हद्दीत बिबटया दिसल्याने खळबळ, सदर बिबटयाला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
नागपूर तापमान
किमान- 9
कमाल- 29
आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला यश अनेक ग्रामपंचायत होणार बिनविरोध, आतापर्यंत तब्बल 30 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय तर आणखी 10 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विश्वास, एकूण 40 ग्रामपंचायत बिनविरोध करणार
उस्मानाबादमध्ये कोरोना लसीकरणाची तयारी आढावा, लसीकरण केल्यावर संबंधित व्यक्तीला 30 मिनिटे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार, उस्मानाबाद जिल्ह्यात 57 शितसाखळी केंद्र, 78 डीप फ्रिजर, 96 कोल्ड बॉक्स व 1748 व्हॅक्सिन करिअर उपलब्ध, जिल्हा कृती दलाची स्थापना, प्रशासन सज्ज
कडाक्याच्या थंडीने निफाडचा किमान पारा घसरला, 8.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांकडून आज घुग्घुस शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काल घुग्घुस शहरातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत 15 जानेवारी ला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचा एक भाग म्हणून आजचा हा बंद पुकारण्यात आला आहे आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. घुग्घुस शहरातील सर्व दुकानं, बाजारपेठ आणि व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
नागपूरमध्ये इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह, हा युवक पुणे इथल्या एका कंपनीत कार्यरत, कंपनीच्या कामानिमित्त गेला होता इंग्लंडला, 29 नोव्हेंबरला तो नागपुरात आला, त्यानंतर तो गोंदियला गेला, काही दिवसानंतर टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील 10 जण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्य यंत्रणेची वाढली चिंता
– 30 तारखेपासून 1 तारखेपर्यंत प्रवेश नाही
– हुल्लडबाजी टाळण्यासाठी निर्णय
– राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणावरदेखील 5 दिवस प्रवेश नाही
– 27 तारखेपासून 1 तारखेपर्यंत या तीन धरणावर एन्ट्री नाही
– वन्यजीव विभागाचे विशाल माळी यांनी काढले आदेश
– नियम तोडल्यास पोलीस कारवाई केली जाणार
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चं 66 व राष्ट्रीय अधिवेशन 25 व 26 डिसेंबरला नागपुरात, या अधिवेशनाला प्रत्येक्ष स्वरूवात देशभरातील 80 पदाधिकारी उपस्थित राहणार, तर देशभरातील 4 हजार ठिकाणावरून 15 हजार कार्यकर्ते ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार, 25 डिसेंबरला या अधिवेशनच उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार, या अधिवेशनात महत्वाचे चार प्रस्ताव येणार आहेत त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, राष्ट्रीय स्थिती, आत्मनिर्भर भारत, कोरोना आणि भारत यांचा समावेश आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या कारखान्यातील चोरी प्रकरण, चार संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई, वैद्यनाथ कारखान्यात 38 लाखांची झाली होती चोरी
नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेसने नेमले निरीक्षक, विदर्भातील नेत्यांवर जबाबदारी, 2021 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी काँग्रेस लागली कामाला, अनुभवी व युवा नेत्यांवर जबाबदारी
केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आज औरंगाबाद दौऱ्यावर, दुपारी एक वाजल्यापासून होणार दौऱ्याला सुरुवात, स्पोर्ट ओथोरिटी ऑफ इंडियाच्या विविध विकास कामांचे करणार उद्घाटन, स्विमिंग पूल ओडिटोरियम आणि मैदानांनचे करणार उदघाटन
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू, 10 दिवसांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी 31 प्रभागात घेणार बैठक, संभाव्य उमेदवारांची होणार चाचपणी, स्वबळावर लढण्याचे मंत्री छगन भुजबळण्यांनी दिले होते आधीच संकेत, 10 दिवसात राष्ट्रवादी काढणार संपूर्ण शहर पिंजून
नाशिक – कालिदास कलामंदिरचा पडदा रविवारी उघडणार, ज्योतिबा फुलेंवर आधारित क्रांती सूर्य नाटकाने होणार शुभारंभ, लॉकडाऊनपासून कालिदास क्लामंदिर अद्याप बंदच, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी निम्मं भाडं करण्याचा स्थायी समितीचा निर्णय
– ऑगस्ट महिन्यात तसेच त्यानंतर झालेल्या पिकहानीचा केंद्रीय पथक घेणार अंदाज, आज पहिले पथक नागपूर जिल्ह्याची तर दुसरे पथक गडचिरोली जिल्ह्याची पाहणी करणार
– यामध्ये पहिले पथक सकाळी सव्वानऊ ते दहा या कालावधीत कामठी, साडेअकराला पारशिवनी तर दुपारी एकला मौदा तालुक्याची पाहणी करणार आहे.
– पाहणी आटोपून दुपारी साडेचार वाजता हे पथक भंडारा जिल्ह्याकडे प्रस्थान करेल.
– शुक्रवारी हे पथक चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काही गावांना भेट देईल.
– शनिवारी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात येईल.
काँग्रेसच्या पुरातनकालीन अध्यक्ष निवडची प्रक्रियाला लवकरच सुरुवात होणार आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीने निवडणूक प्रक्रियाची सर्व माहिती सोनिया गांधींकडे सादर केली. CWC च्या बैठकीचे आयोजनची केली शिफारस.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची खासदारांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेणार आहेत. सकाळी 11:30 वाजता राहुल गांधी संसद भवन ते राष्ट्रपती भवन मार्च करणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात 2 कोटी शेतकरीचे सहीचे पत्र राष्ट्रपतीला देणार.
दिंडोशी पाठोपाठ आज सांताक्रुझ विमानतळ व विलेपार्ले हायवे परिसरात ॲमेझॉनचे फलक काळे करत पोस्टर फाडले. मनसेची नो मराठी, नो अॅमेझॉन मोहीम तीव्र, अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मनसे आक्रमक
न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणार्या टोळ्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एकावेळी छापे घालून पोलिसांनी १३ जणांना अटक केली. तसेच २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आलेत.
पंढरपुर येथे सायंकाळी 6 वाजता भारत भालके यांच्या कुटुंबीयांची घेणार फडणवीस भेट
आज राष्ट्रवादीच्या जनता दरबारात अजित पवार, बड्या नेत्यांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
राहुल गांधी आज राष्ट्रपतींची घेणार भेट, कृषी कायद्याविषयी चर्चा करण्याची शक्यता
मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांची आज पत्रकार परिषद
केंद्राच्या कृषी कायद्याची माहिती शेतकऱ्यांना समजावी म्हणून रयत क्रांती संघटना आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमानने 24 डिसेंबरपासून सांगलीतून किसान आत्मनिभर यात्रा सुरु करणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ सकाळी 10 वासता होणार आहे.
छत्रपती संभाजीराजे यांची आज सकाळी १० वाजता पत्रकार भवन नविपेठ पुणे इथं पत्रकार परिषद
भाजप नेते हाजी अरफात शेख यांनी रिक्षा व टॅक्सीची भाडे वाढ न झाल्यास मातोश्री इथे 25 तारखेला चक्का जाम करू असा कडकडीत इशारा दिल्यानंतर परिवहन आयुक्तांनी बोलावली तातडीने बैठक
चिरनेर खिंडीत गॅस टँकरची गळती, गॅस गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू, तीन अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु, गॅस गळती टँकरवर पाण्याची फवारणी करुन कुलीगं करण्याच्या प्रयत्नात यत्रंणा, उरणमधील BPCL कपंनीची केमीकल एक्सपर्ट टीम घटनास्थळी गॅस गळती, अद्याप वाहतुक रोखण्यात आली आहे.