महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 167 वर पोहोचली आहे. सोमवारी 26 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 72 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपून गेली तरी संप सुरुचं आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस असेल. विधिमंडळात ठाकरे सरकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परवानगी न देताही विधानसभा अध्यक्षांची निवड (Maharashtra Assembly Speaker Election live) करण्याची शक्यता आहे. भाजप यावर आक्रमक होताना दिसून येईल, अशी शक्यता आहे. (Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Winter Session Live ) महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
आजचा युक्तिवाद संपला
कोर्टातला आजचा युक्तीवाद संपला
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंची अटकपूर्व जामिनाची मागणी
मीडिया असो किंवा पोलीस असो कायद्यानं वागायचं असा मी प्रयत्न करतो. नितेश राणे टीका करतो म्हणून त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. पायरीवर बोलण हा असंसदीय नाही. कोण अजित पवार, मी त्यांना ओळखत नाही. राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारांचा आरोप त्यांच्यावर आहे. एका आमदारांसाठी इतकी व्यवस्था का लावली जातेय, असा सवाल नारायण राणे यांनी केला. मांजराचा आवाज कोण काढतं? आदित्य ठाकरेंचा मांजराचा काही संबंध आहे का? वाघाचं मांजर कधी झालं? आदित्य ठाकरेंचा आवाज तसा नाहीय. त्यांना राग का यावा?
Narayan Rane : नितेश राणे यांचा त्या प्रकरणाशी संबंध नाही, जिल्हा बँकेतील गैरप्रकार समोर येऊ नये म्हणून अडकवलं जातंय, नारायण राणे म्हणाले.
आमदार नितेश राणे यांचा पोलिसांकडून शोध सुरू
सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांच्या टीम गोव्यात दाखल
आमदार नितेश राणे गोव्यात असण्याची शक्यता
पोलिसांकडून जोरदार शोधकार्य सुरू
बीड जिल्ह्यातील 6 नागरपालिकेवर प्रशासक नियुक्त
कार्यकाळाची मुदत समाप्ती झाल्याने प्रशासक नियुक्त
बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी नागरपालिकेवर प्रशासक
आजपासून सर्वच नागरपलिकेवर प्रशासक रुजू
पुण्यातील नवले पुलावर अपघात,
टेम्पोचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती,
टेम्पो धडकला तीन चार गाड्यांना
नवले पुलावर अपघाताच्या घटना सुरुच,
तीन जणांचा अपघतात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती …
टेम्पोनं पादचाऱ्यांना चिरडल्याची माहिती
सकाळी 8 च्या सुमारास झाला होता अपघात !
– टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण,
– पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आज नवा खुलासा करण्याची शक्यता,
– सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त घेणार पत्रकार परिषद,
– टीईटी, म्हाडा आरोग्य परीक्षेतील आरोपींची संख्या आतापर्यंत 25 वर गेलीय,
– शिवाय पुणे पोलिसांनी आतापर्यंत 5 कोटींपर्यंत रोकड आणि मुद्देमाल जप्त केलाय.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळशी येथील कापूस खरेदी केंद्रात कापसाला विक्रमी दर मिळत आहे.कापसाच्या बाजारपेठेत तेजी पाहण्यास मिळत आहे .कापसाला विक्रमी ९ हजार प्रति क्विंटल दर मिळत आसल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे
नाशिक – प्रज्ञा शोध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
16 जानेवारीला घेण्यात येणार होत्या परीक्षा
प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती
आता प्रज्ञा शोध परीक्षा होणार 12 जून रोजी
अचानक परीक्षा पुढे ढकलल्या मुळे विद्यार्थ्यांचे हाल
सोलापूर– ग्रामीण भागात सभा, मिरवणुका घेण्यास बंदी
ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सर्वत्र शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून 11 जानेवारी सभा, मिरवणुका, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी
आज पासून आदेश लागू
या आदेशानुसार तलवारी, भाले, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्याण्यावर होणार कारवाई
अपर जिल्हाधिकारी शमा पवार यांनी काढले आदेश
नागपूरसह विदर्भात आज आणि उद्या पावसाचा इशारा
– विदर्भात तापमान घट होणार असून, थंडीत वाढ होणार
– नागपूर हवामान विभागाने जारी केला ॲारेंज अलर्ट
– नागपूरात गेल्या २४ तासांत १४.४ कमाल तापमानाची नोंद
– शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
– नागपुरात मुलांना शाळेतच देणार कोरोनाची लस
– नागपूर मनपाने सुरु केली मुलांच्या लसीकरणाची तयारी
– नागपूरात १५ ते १८ वर्षांच्या वयोगटातील साधारण एक लाख मुलं
– १ जानेवारीपासून नोंदणी, दहावीचे ओळखपत्र ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य
– नागपूरात शाळेतंच होणार मुलांची नोंदणी
– नागपुरात ओमिक्रॅानचे 18 संशयित रुग्ण
– जनुकीय चाचण्यांच्या अहवालाकडे यर्वांचे लक्ष
– नागपूरात ओमिक्रॅानचा तिसरा रुग्ण, चिंता वाढली
– गेल्या २४ तासांत नागपूर जिल्हयात कोरोनाचे १२ नवे रुग्ण
– जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली १०९ वर
नव्या वर्षात पुणेकरांवर पडणार मिळक कराचा भार,
11 टक्के मिळकत करात वाढ करण्याचा प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला प्रस्ताव
निवडणूकीच्या तोंडावर मिळकत करात स्थायी वाढ करणार का ? याकडे लक्ष,
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं कारण पुढे करत प्रशासनाची करवाढ पालिकेनं फेटाळली होती
वाशिम जिल्ह्यातील तीन नगर परिषद कार्यकाळ संपणार असून प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकाऱ्याची होणार निवड…
वाशिम न प चा 30 डिसेंबर 2021 रोजी कार्यकाळ होणार पूर्ण..
कारंजा न प चा 3 जानेवारी 2022 रोजी कार्यकाळ होणार पूर्ण…
मंगरुळपिर न प चा 7 जानेवारी 2022 रोजी कार्यकाळ होणार पूर्ण..
मुक्ताईनगरमध्ये महिल्या चांगल्या प्रकारे काम करते
भ्याड हल्याचा निषेध करतो
मी निषेध करतो
शासन दरबारी उद्या मागणी करणार
हल्ला केला कोणी
हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उद्या विधानसेभत करणार
कोरोना रुग्णांबरोबरच ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही ठाणे शहरात वाढत असल्यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. ठाण्यात ओमायक्रोन रुग्णांची संख्या 7 वर गेली आहे. त्यातील तीन रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर चार जणांवर ठाण्यातील पार्कींग प्लाझा रुग्णालयात उपचार सुरु आहेत… तर गेल्या काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या ही पन्नाशी च्या आता होती ती आता शंभरीच्या आसपास येऊ लागली आहे… याच पाश्वभूमीवर पोलिसांसहित ठाणे पालिकेची 31 डिसेंबरच्या पार्टीवर करडी नजर असणार आहे.