महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 167 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 91 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपून गेली तरी संप सुरुचं आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अधिवेशनाचं सूप वाजलं आहे. संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अंतरिम जामीनाचा अर्ज फेटाळला गेला आहे. आज दुपारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
नितेश राणेंना बेल की जेल? हे काही वेळातच समोर येण्याची शक्यता आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा चागल्या प्रकारे करत आहे-विनायक राऊत
चौकशी करत असताना पोलिसांचे दिल्लीपर्यंत हात गेले-विनायक राऊत
कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले हे त्यांचे दुर्दैव-विनायक राऊत
तीन वाजून गेल्यानंतरही राणे पोलीस स्टेशनला हजर नाहीत
नितेश राणे यांचे सचिव राकेश परब यांनादेखील कणकवली पोलिसांची नोटीस
वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी यांनादेखील कणकवली पोलिसांची नोटीस
राकेश परब आणि मनीष दळवी दोघेही बेपत्ता
संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचे पोलिसांच्या हाती पुरावे
ही सत्तेची मस्ती आहे, हा सत्तेचा अहंकार सरकारला बुडवले, अशी टीका राणेंना नोटीस बजावल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. महाविकास आघाडीवर सर्वच भाजप नेते सध्या जोरदार टीका करत आहेत
पोलीस त्यांचे काम करत आहेत, राणे प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप नाही, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.
नितेश राणेंचा ठाव ठिकाणा सांगण्यासाठी नारायण राणेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
नितेश राणे कुठे आहेत सांगायला, मुर्ख आहोत का? असे वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केले होते.
राणेंना कणकवली पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस
राज्यपाल हे सदगृहस्थ आहेत. ते अनेक वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी अनेक वर्ष संघात काम केलं आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. मी त्यांना कार्यक्रमात भेटलो होतो. महाराष्ट्रात ते आले तेव्हापासून आम्ही त्यांचा आदर करत आहोत. राज्यपालांचा अनादर व्हावा म्हणून सरकार, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून कोणी देखील काम केलेलं नाही. राजभवनावर गेल्यानं ते स्वागत करतात. दबाव कोण आणतंय ते त्यांनी सांगायला हवं होतं.
विधानपरिषदेच्या 12 जागांवरुन पहिली ठिणगी पडली. महाराष्ट्राच्या राज्यपालांवर केंद्रातून कोणी दबाव आणतंय का? 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन केंद्रातून कोणी दबाव आणत असेल तर आम्ही राज्यपालांच्या पाठिशी आहोत.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी आम्ही राज्यपालांकडे परवागनी मागितली मात्र त्यांनी दिली नाही त्यामुळं निवडणूक थाबंली. आमच्याविषयी नाराजी असण्याची गरज नाही. 12 आमदारांची नियुक्ती करण्याचं राज्यपालांच्या मनात मात्र केंद्राचा दबाव
मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र हा राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील प्रेमपत्राचा भाग आहे.
महाराष्ट्रात आपण दिवसाला 8 लाख लसीकरण करत होतो, आता आपण 5 लाख लसीकरण करत आहोत. हे आपल्याला भूषणावह नाही. त्यामुळं आमदार, सर्वपक्षीय नेते, संघटना यांनी पुढाकार घेऊन लसीकरण न करण्याची मानसिकता असणाऱ्याचं प्रबोध करण्याची गरज आहे. देशाच्या लसीकरणाच्या दरापेक्षा महाराष्ट्राचं लसीकरणाचं प्रमाण थोडं कमी आहे. महाराष्ट्रात 13 कोटी लोकांचा लसीकरण झालंय. ही चांगली बाब आहे. मात्र, 8 कोटी लोकांनी पहिला डोस घेतलाय. 9 कोटीचं टार्गेट आहे. मात्र, दुसऱ्या डोसचं लसीकरण 57 टक्के झालंय. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 5.5 कोटी आहे.
हायरिस्क देशातून आलेल्यांची चाचणी करुन त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं आता नवीन घोषणा केली. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीनं सज्ज आहोत. या संदर्भात मी विधानसभेत बोललो आहे. भारत सरकारनं कोवॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं कोवॅक्सिन देण्यात येणार आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरनं माहिती दिलेली नाही. बुस्टर डोसचं लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्यानं तोपर्यंत आम्ही वाट पाहू, असं राजेश टोपे म्हणाले.
मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट नक्कीच चागंला नाही. 4 टक्के पॉझिटीव्हीटी रेट असेल तर काळजी करण्याची गरज आहे. दिल्लीत सर्व प्रतिबंधित करण्यात आलं आहे. लग्न आणि इतर गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. आपण जर निष्काळजीपणा केला तर आपल्याला धोका होऊ शकतो.
कोरोना नियम पाळणार नसू तर निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल. वाढत असलेली रुग्णसंख्या, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची तातडीनं बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 167 वर पोहोचलीय, त्यापैकी जमेची बाजू 91 जण बरे झाले आहेत ही आहे.
आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार निर्बंध वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. लग्न आणि इतर कार्यक्रमात निर्बंध पाळले जात नाहीत. पोलीस आणि प्रशासनाचा वापर करावा लागेल.
राज्यपाल राजी होतील, अनुमती देतील तेव्हा निवडणूक होईल. आम्हाला, सरकारला असं अपेक्षित आहे की राज्यापालांनी राज्य घटनेप्रमाणं निर्णय घेतले पाहिजेत. विधानपरिषदेच्या 12 जागांच्या बाबत राज्यपालांना भेटलो, पत्र दिली गेली, मात्र त्यांच्याकडून निर्णय घेतला गेला नाही. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अशी शंका व्यक्त केलीय की विरोधी पक्ष भाजपचे जे धोरण असेल त्यांच्या मागण्याचा पाठपुरावा राजभवन करतंय की काय. भारतीय राज्यघटनेनं स्पष्टपणे नमूद केलं आहे की सरकार सल्ला देईल त्याप्रमाणं राज्यपालांनी निर्णय घेतला पाहिजे. विधिमंडळ सर्वोच्च आहे. त्यात सुप्रीम कोर्टही हस्तक्षेप करत नाही, असं सुभाष देसाई म्हणाले.
हसन मुश्रीफ ऑन राज्यपाल
मुख्यमंत्र्यांनी पत्रात नेमके पणा मांडला होता
राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घ्यावी असे पत्र दिल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले
पत्रात विधानसभेच्या अधिकारात हस्तक्षेप करता अशी भाषा होती
बीड: जुगार अड्यावरील छापा प्रकरण
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर गुन्हा दाखल
मस्के यांच्यासह 51 जणांवर गुन्हा दाखल
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजेंद्र मस्के यांच्या जागेत सुरू होता जुगार अड्डा
अकबर इलाहाबादी इंग्रजांच्या काळातील कवी, शहरांचं नाव बदलल्यानंतर व्यक्तींचं नाव बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला… व्यक्तींचे नाव बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला…
– पुन्हा कोविडचा प्रादुर्भाव , मार्केटमध्ये गर्दी, धोका आहे, मोठ्या लाटेचे संकेत, गाईडलान्सचे पालक करा अन्यथा जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात मोठी लाट, मुंबई पुणे आसपासच्या शहरांना मोठा फटका बसेल…
राजकारणात आज काल सर्व लोक रक्कम घरी ठेवतात, मात्र दुसऱ्याच्या घरी मिळाली की चर्चा होती. लखनऊ, कनोज येथे 180 कोटींचं अत्तर मिळालं आहे. या अत्तराचा उपयोग करुन तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? राजकारणामध्ये हमाम मे सब नंगे है, असं संजय राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या 71 व्यापाऱ्यांकडे 180 कोटी रुपयांचं घबाड सापडल्यानं देशात प्रत्येकाला अत्तर विकावं असं वाटतंय. कुणी किती काही म्हणलं तरी त्या अत्तराशिवाय राजकारण करु शकत नाही. राजकारणाच्याच म्हणजेच हमाम मे सब नंगे असतात. जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे. विधानसभेचं कामकाज सुरळीत पार पडलं. अजित पवार यांच्यावर जबाबदारी होती. टोले देत टोले घेत दोन देत चार घेत अधिवेशन पार पडलं, असं संजय राऊत म्हणाले.
सोलापूर शहरातील काही निर्बंध झाले पुन्हा कडक
ओमायक्रोन संसर्गाचा राज्यातील धोका लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी काढले आदेश
मंगल कार्यालय ,सभागृहात लग्न किंवा कार्यक्रमावेळी 100 जणांना परवानगी
सर्व खुल्या जागेत क्षमतेच्या 25 टक्केच पाहुणे नागरिक उपस्थित राहू शकणार
याचे पालन झाले नाही तर 10 हजार रुपयांपर्यंत दंड व तिसऱ्यांदा नियमावलीचा भंग झाल्यास आस्थापना करण्यात येणार सील
बेस्टचा प्रवास आत्ता आणखी बेस्ट हेणार आहे… बेस्टच्या चलो अॅपमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसओएस सिस्टम जानेवारीपासून सुरू होणार…
चलो अॅपमध्ये अलार्म बटन उपलब्ध करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.
नाशिक – जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
जिल्ह्यात सापडले कोरोनाचे 47 रुग्ण पॉझिटिव्ह
जिल्हा आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
नाशिक मनपा हद्दीत सर्वाधिक 34 रुग्ण आढळल्याने चिंता वाढली
संख्या सध्या कमी असली तरी रुग्ण वाढीत सातत्य राहिल्यास धोका वाढण्याची शक्यता
भीमा कोरेगाव 1 जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण,
भीमा कोरेगाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी केला गेला ड्राय डे घोषित
22ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तर 260 पीएमपीसह इतर बसेसची व्यवस्था करण्यात आलीये,
5 रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र आणि खाजगी रुग्णालयात 10 टक्के बेड राखीव ठेवण्यात आलेत,
तर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गातही बदल करण्यात आलाय….
मराठवाड्यात निर्माण पुन्हा बँकेचे जाळे..
मराठवाड्यात 654 बँक शाखांची आवश्यकता..
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी 117 शाखा उघडण्याचे दिले आश्वासन..
लोकसंख्येच्या निकषानुसार मराठवाड्यात 654 बँक शाखांची आहे आवश्यकता..
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराडांचे महिनाभराच्या आत सर्वेक्षण करून बँकांचे जाळे वाढविण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ..
बँका कमी असणे ही अडचण मराठवाड्यात असल्यानेच प्रादेशिक स्तरावरील घेण्यात आली बैठक..
सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये झाला जेरबंद
पहाटे 5 वाजता मार्केट यार्ड मध्ये आलेला गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले
गव्याला बेशुद्ध न करता वन विभागाच्या एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये गवत टाकून तो व्हॅन मध्ये नेण्यात वन विभागाला यश
गव्याची मेडिकल तपासणी करून पुन्हा गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार