LIVE : अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी, नागपूर पालिका आयुक्तांकडून गाईडलाईन्स जारी

| Updated on: Feb 19, 2021 | 11:50 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स....

LIVE : अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी, नागपूर पालिका आयुक्तांकडून गाईडलाईन्स जारी
Follow us on

पुणे : शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे लाईव्ह अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Feb 2021 03:00 PM (IST)

    नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरातील ATM अज्ञात चोरट्यानी फोडले

    नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरातील ATM अज्ञात चोरट्यानी फोडले
    – रक्कम निघत नसल्याने ATM मशीनची केली तोडफोड
    – cctv कॅमेरे देखील फोडल्याने चोरट्याला पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान
    – अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू

  • 19 Feb 2021 02:59 PM (IST)

    वीज कनेक्शन कट करणाऱ्या महावितरण विभाग आणि आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचं आंदोलन.

    सांगली – वीज कनेक्शन कट करणाऱ्या महावितरण विभाग आणि महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात भाजपने केले आंदोलन.
    वीज बिलाची करत केली होळी. सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन. तर गोपीचंद पडळकर यांच्या शेतात केली शिव जयंती साजरी.

  • 19 Feb 2021 02:59 PM (IST)

    राज्यात ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश

    मालेगाव- राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले..अहवाल प्राप्त होताच कॅबिनेट मध्ये ठेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल..असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले त्यांनी आज नाशिकच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची केली पाहणी

  • 19 Feb 2021 02:32 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातील जनता दरबार दोन आठवडे स्थगित

    – कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता मंत्र्यांचे जनता दरबार स्थगित
    – सोमवार ते शुक्रवार राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात आयोजित केला जातो मंत्र्यांचा जनता दरबार
    – जनता दरबारला गर्दी होत असल्याने जनता दरबार दोन आठवडे स्थगित करण्याचा निर्णय

  • 19 Feb 2021 02:32 PM (IST)

    मनी लॉंडरिंग प्रतिबंधक अधिनियमच्या तरतुदीनुसार नागपूर ईडीने तीन जणांना केली अटक

    नागपूर ईडीने नाशिकमधून तीन जणांना केली अटक

    संपत नामदेव घोरपडे , अरुण नामदेव घोरपडे आणि विस्वास नामदेव घोरपडे याना केली अटक

    मनी लॉंडरिंग प्रतिबंधक अधिनियमच्या तरतुदीनुसार केली अटक

    177 कोटीचा रेशन धान्य घोटाळा असल्याची माहिती

    शासकीय कोटा रेशन धान्याची काळी विक्री करण्याच्या प्रकरणात केली अटक

  • 19 Feb 2021 02:31 PM (IST)

    नागपुरातील वाढत्या कोरोना प्रकोपावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा आयुक्तांची गाईडलाईन्स

    नागपुरातील वाढत्या कोरोना प्रकोपावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा आयुक्तांची गाईडलाईन्स

    अंत्यसंस्कार साठी फक्त 20 लोकांनाच परवानगी

    होम आयसोलेट रुग्णांच्या डाव्या हातावर असणार आयसोलशन चा शिक्का

    रेस्ट्रोरेंट, हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू ठेण्याचे आदेश

    आवश्यक तेथे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे आदेश

     

  • 19 Feb 2021 02:08 PM (IST)

    आज बुलडाण्यामध्ये तब्बल 271 रुग्ण पोझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 15630 वर

    आज बुलडाण्यामध्ये तब्बल 271 रुग्ण पोझिटिव्ह, जिल्ह्यात आज अखेर 15630 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 183 कोरोना रुग्णचा मृत्यू झालेला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती

  • 19 Feb 2021 01:32 PM (IST)

    10 मुलांच्या मृत्यूसाठी केवळ 2 लोक जबाबदार कसे ? भाजप खासदारांचा अनिल देशमुखांना सवाल

    भाजप खासदार मनोज कोटक यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निषाणा…
    – १० मुलांच्या मृत्यूसाठी केवळ २ लोक जबाबदार कसे ?, असा केला सवाल…
    – या घटनेत जबाबदार असेलल्यांना का वाचवलं जातंय…
    – सरकारने तपासाच्या नावाखाली थट्टा करतेय…
    – फीड हाॅटलाईनला

  • 19 Feb 2021 01:07 PM (IST)

    पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे किमती आणि मौल्यवान मुद्देमाल फिर्यादिस पुन:प्रदान कार्यक्रम

    पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे किमती आणि मौल्यवान मुद्देमाल फिर्यादिस पुन:प्रदान कार्यक्रम,

    – उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रम,

    – थोड्याच वेळात होणार कार्यक्रमाला सुरुवात,

    – एव्हीआयवरून लाईव्ह फ्रेम चेक करा

  • 19 Feb 2021 01:01 PM (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचीही चौकशी करणार, पुणे पोलिसांची माहिती

     

    – आवश्यकता असल्यास मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी करणार,

    – पुणे पोलिसांची माहिती,

    – या प्रकरणात आम्ही सर्वच अँगलने तपास करत आहोत,

    – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांकडून कमालीची गुप्तता,

    – घटनेच्या 12 दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही.

  • 19 Feb 2021 12:58 PM (IST)

    विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनत जास्तीत जास्त आमदारांनी सहभागी व्हावे

    विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनत जास्तीत जास्त आमदारांनी सहभागी व्हावे त्यासाठी अधिवेशन आधी आमदारांना लस उपलब्ध करून द्यावी

    विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारला लिहिले पत्र

    लसीकरण कार्यक्रमात लोकप्रतिनिधी ना लस मिळवून असे पत्र

  • 19 Feb 2021 12:56 PM (IST)

    जिल्ह्याचे शाळा महाविद्याल पुन्हा बंद

     

    – जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निर्णय

    – वर्ग ५ ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

    – शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज सुरू ठेवत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा

    – पुढील आदेशापर्यंत शाळा राहणार बंद

    – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे आदेश

  • 19 Feb 2021 12:55 PM (IST)

    नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मधील त्या मुलीची हत्याच

    – तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव नजीक आहेर गावच्या पाण्याच्या पाटात दीपिका ताकाटे या मुलीचा आढळला होता मृतदेह
    – कॉलेजला जाते अस सांगून मुलगी पडली होती घरा बाहेर
    – चलुत भावानेच दिपीकाचा गळा आवळून खुन केल्याच पोलीस तपासा निष्पन्न
    – हत्यच कारण मात्र अस्पष्ट पोलिसांचा अधिक तपास सुरू

  • 19 Feb 2021 11:28 AM (IST)

    नाना पटोले यांच्या मुंबई घरातील 2 जण कोरोना पाॅझिटिव्ह

    – नाना पटोले यांच्या मुंबई घरातील 2 जण कोरोना पाॅझिटिव्ह

    – नाना पटोले यांनी स्वतालाही विलगिकरणात ठेवलं

  • 19 Feb 2021 11:20 AM (IST)

    किल्ले शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

    किल्ले शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

    – राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांना किल्ले शिवनेरी गडावर विनाशर्त परवानगी

    -मोठ्या संख्येने शिवभक्त निघाले गडावर.

    -किल्ले शिवनेरी गडावर रात्रीपासुन केली होती बंदी,सरकारी कार्यक्रम संपल्यावर शिवभक्तांना शिवनेरी किल्ल्यावर सोडण्यास सुरुवात

    -शिवभक्तां मध्ये आनंदाचे वातावरण

  • 19 Feb 2021 11:20 AM (IST)

    देशाचा अर्थसंकल्प सादर झालं त्याचं स्वागत अर्थतज्ज्ञ लोकांनी सुद्धा केलं – सुरेश प्रभू

    देशाचा अर्थसंकल्प सादर झालं त्याच स्वागत अर्थतज्ज्ञ लोकांनी सुद्धा केलं – सुरेश प्रभू

    – कारण हा अर्थसंकल्प देशाला अर्थशक्ती कडे घेऊन जाणार पाहिलं पाऊल आहे

    – पब्लिक हेल्थ वर मोठा खर्च यात करण्यात आला

    – पायाभूत सुविधांचा या अर्थसंकल्पात उल्लेख आहे . गावे , गरीब , शेतकरी , मिहला , जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यासर्वांचा विचार करण्यात आला आहे,

  • 19 Feb 2021 11:19 AM (IST)

    कुत्र्यांची दहशतीमुळे 8 दिवसांत दोघांचा मृत्यू तर काही शेतकरी गंभीर जखमी

    – शिरोळ तालुक्यातील दतवाड गावामध्ये कुत्र्यांची दहशत आठ दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू तर काही शेतकरी गंभीर जखमी

    – शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावातील घटना शेतकऱ्यावर कुत्र्यांचा हल्ला सातगोंडा आन्नू नुले वय वर्षे अंदाजे ५६ राहणार दतवाड.

    – शेतकरी गंभीर जखमी सकाळी आठ वाजता ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर चार कुत्र्यांचा हल्ला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी

    – शेतकऱ्यांने मोठमोठ्याने ओरडून बोंबलून नागरिकाला जमा करण्याचा प्रयत्न केला.

  • 19 Feb 2021 10:59 AM (IST)

    बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबूर परिसरातून केली

    मुंबईच्या आर सी एफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा छापणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबूर परिसरातून अटक केली आहे. फकीयान आयुब खान हा 35 वर्षे तरुण कर्जबाजारी झाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरू केले होते. मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की एक युवक चबुर येथे बाजारात बनावट नोटा वाटण्यासाठी येणार आहे. बातमी मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने सापळा रचत फकीयानला हटकले आणि त्याच्या अंग झडतीत बनवत नोटा सापडून आल्या. अधिक तपास करता त्याच्या घरातून प्रिंटर शाही आणि नोटा छापण्यासाठी लागणारा कागद हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून 500 , 200  , 50 रुपयाच्या नोटा छापत असे. फकीयान याने यु ट्यूब वरून नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र, या मागे आणखी कोण कोण आहे आणि त्याने आतापर्यंत किती नोटा बाजारात आणल्या याचा तपास पोलीस करत आहेत तर फकीयान ला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
  • 19 Feb 2021 10:33 AM (IST)

    शिवनेरीगड उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

    – शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हायला शिवजयंतीच पाहीजे असं नाही
    – कोणतेही पावित्र्य काम करायला आठवतात
    – कारण ते आमच्या धमन्यात आणि रक्तात आहे

    – आत्ता सगळं छान आहे, पण तोंडावर मास्क आहे
    ( -एका महिलेला बोलले ताई तुम्ही मास्क नाही लावला )
    – छत्रपतीनी लढा दिला तो आता सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना ठाऊक आहे
    – पण आता कोरोना सारखा दुष्मन आहे, त्यावर आपण मात करू
    – छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत कायम राहणार
    – साप तसे अजूनही आहे
    – काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असत-

  • 19 Feb 2021 10:28 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

    – सगळं काही छान पण तोंडावर मास्क आहे.

    – आमच्या धमण्यांमध्ये रक्तामध्ये शिवराय

    – कोरोनासोबत आपलं युद्ध सुरू आहे

    – कोरोनाच्या लढाईत मास्क आपली ढाल आहे

    – वार करायचा तेव्हा करू पण आता ढाल पाहिजे

    – राजकारण बाजुला पण आमच्या सगळ्यांच्या मनात शिवप्रेम आहे

  • 19 Feb 2021 10:25 AM (IST)

    शिवनेरीगडावर संभाजीराजे छत्रपतींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

    – दिल्लीच्या ठिकाणी राजकारण विरहित शिवजयंती साजरी केली
    – राष्ट्रपती, अनेक देशांचे राजदूत दिल्लीत दिल्लीत शिवजयंतीला होते
    – यावर्षी मात्र मी शिवनेरीवर आलोय
    – राजाराम महाराजांनी पाहिले शिवाजी महाराजांचे मंदिर सिंधुदुर्ग येथे बांधलेय
    – मी ही त्याच वाटेवर चाललोय
    – गड संवर्धन साठी काम करतोय
    – ठाकरे सरकारने पहिला निर्णय घेतलाय, २० कोटी रायगड प्राधिकरण दिला
    – जगात कुठेही नाही असं सी फोर्ड करत आहे
    – दिल्लीनंतर महाराष्ट्र राजधानी करणार
    – फंड ही आलाय, मात्र परवानग्या बाकी आहे त्या लवकरात लवकर द्याव्यात

  • 19 Feb 2021 10:16 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीच्या विकासासाठी दिलेला निधी पोहचला आहे – अजित पवार

    – गेली वर्षभर सगळे सण उत्सव कोरोनामुळे कमी लोकात साजरे केले, पण त्यामुळं बऱ्यापैकी कोरोना रोखता आला

    – लोकांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

    शिवनेरी पावित्र्य, महत्व आणि शिवनेरीचा विकासासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे
    – अधिकाऱ्यांनी भान ठेवूनच काम करावं
    – कामात उंनिसबिस चालणार नाही, हे मी ठणकावून सांगतोय
    आजची शिवजयंती महाराष्ट्राच्या घरा घरात आणि प्रत्येकाच्या मनात साजरी होऊ देत

     

  • 19 Feb 2021 10:13 AM (IST)

    शिवनेरीवर अजित पवारांच्या भाषणाला सुरुवात

    – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे नतमस्तक होतो

    – प्रथेप्रमाणे शिवजयंती साजरी करतो, पण यंदा कोरोनाचा सावट आहे, त्यामुळं मर्यादा आहे

    – शिवजयंती उत्साहातच साजरी करायची असते, पण नाईलाजाने निर्णय घ्यावा लागला

    – छत्रपती शिवाजी महाराज असते तरी त्यांनी लोकांना जीव धोक्यात घातला नसता

    – महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा रयतेला डोळ्यासमोर ठेऊन घेतला होता

    – शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते

  • 19 Feb 2021 10:02 AM (IST)

    शिवजयंती सोहळा LIVE

  • 19 Feb 2021 09:53 AM (IST)

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण तर शिवयोग या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन

  • 19 Feb 2021 09:43 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत लोखंडाच्या स्क्रॅपचा काळाबाजार?

    नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत लोखंडाच्या स्क्रॅपचा काळाबाजार?

    – बुटीबोरी एमआयडीसीत एकाच नंबरचे दोन ट्रक पोलिसांनी केले जप्त

    – जप्त केलेल्या दोन्ही ट्रकवर के १३ ए – ४८०८ हा एकंच नंबर

    – दोन्ही ट्रकमध्ये लोखंडाचं स्क्रॅप असल्याची माहिती

    – सारख्या रंगाचे आणि एकाच नंबरचे ट्रक वापरुन काळाजार करण्याचा प्रयत्न

    – बुटीबोरी पोलीस करत आहेत प्रकरणाचा तपास

  • 19 Feb 2021 09:35 AM (IST)

    शिवनेरीवर शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात

    – शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त पोलिसांनीही दिली सलामी

    – मुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात

    – ढोल आणि लेझिमच्या पारंपारिक खेळाला सुरुवात

     

  • 19 Feb 2021 09:25 AM (IST)

    विलेपार्ले आंतर्राष्ट्रीय विमानतळ इथे शिवजयंतीची जय्यत तयारी

    विलेपार्ले आंतर्राष्ट्रीय विमानतळ इथे शिवजयंतीची जय्यत तयारी..
    – फुलांनी सजवला पाळणा…
    – पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात…
    – फिड हाॅटलाईनला

  • 19 Feb 2021 09:25 AM (IST)

    खासदार अमोल कोल्हे, छत्रपती संभाजीराजे शिवनेरी गडावर पोहोचले

    खासदार अमोल कोल्हे, छत्रपती संभाजीराजे शिवनेरी गडावर पोहोचले

  • 19 Feb 2021 09:18 AM (IST)

    शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळा लाईव्ह

  • 19 Feb 2021 09:16 AM (IST)

    रत्नागिरी- कचरा प्रश्नावरून रत्नागिरी नगरपालिका अडचणीत

    रत्नागिरी- कचरा प्रश्नावरून रत्नागिरी नगरपालिका अडचणीत, अशास्त्रीय पद्धतीने डपिंग ग्राऊंडवर जाळला जातोय कचरा, कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण, प्रदुषण थांबवा अन्यथा नगरपालिकेवर गुन्हा दाखल करू, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून निर्वाणीचा इशारा, शहरातून तयार होतो रोज २२ टन कचरा

  • 19 Feb 2021 09:15 AM (IST)

    सोलापुरमध्ये पालेभाज्यांचे दर वाढण्याची शक्यता

    सोलापुर – महापालिका प्रशासनाने भाजी मंडईतील ओट्यांचे दर दुपटीपेक्षा अधिक सुचवले, शनिवारी होणाऱ्या पालिकेच्या सभेत होणार निर्णय, यावर निर्णय झाल्यात पालेभाज्यांचे दर वाढण्याची शक्यता, गेल्या अनेक वर्षापासून मंडळीतल्या सेवांमध्ये दरवाढ झाली नाही

  • 19 Feb 2021 08:40 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात २०० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस

    पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात २०० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला, या कर्मचाऱ्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात लस देण्यात येत आहे, येत्या आठवडाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण होणार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची माहिती, झेडपी मुख्यालयाकडून कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याची जिल्हा परिषदेच्यावतीने वाहनाची सोय करण्यात आली आहे.

  • 19 Feb 2021 08:32 AM (IST)

    शिवनेरी किल्ल्यावर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडणार शिवजन्म उत्सव सोहळा

    शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार शिवजन्म उत्सव सोहळा

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते किल्ल्यावर करण्यात येणार 391 वृक्षांचे वृक्षारोपण

    तसेच शिवयोग या विशेष टपाल तिकीट असते प्रकाशनही यावेळी करण्यात येणार

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा होतोय साजरा

    शिवनेरी किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय पुजा संपन्न

  • 19 Feb 2021 08:16 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात रब्बी पिकाचे मोठे नुकसान

    अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात रब्बी पिकाचे मोठे नुकसान, दुपारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे मौदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले, अनेक शेतकऱ्याच्या शेतातील गहू चना मिरची आणि अन्य पिकाला त्याचा फटका बसला आहे, तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

  • 19 Feb 2021 08:12 AM (IST)

    नागपुरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता 4 कार्यालयांवर कारवाई करत 38 हजार दंड वसूल

    नागपुरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता, लग्न समारंभात नियमांचं पालन न करणाऱ्या चार मंगल कार्यालय वर कारवाई करत 38 हजार दंड वसूल करण्यात आला, तर 88 सभागृहाची केली तपासणी, महापालिकेच्या शोध उपद्रव पथकाने केली कारवाई

  • 19 Feb 2021 08:02 AM (IST)

    नाशिक – शहरात अनेक भागांना उद्या पाणीपुरवठा नाही

    नाशिक – शहरात अनेक भागांना उद्या पाणीपुरवठा नाही, गंगाळूर धरणातील वॉलच्या कामामुळे राहणार पाणीपूरवठा बंद, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी नाही, तर पंचवटी, नाशिकरोड,  सातपुरला कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

  • 19 Feb 2021 07:53 AM (IST)

    नागपुरातील लक्ष्मीनगर येथील पिझ्झा हट याला पुढच्या सात दिवसांसाठी सील

    नागपुरातील लक्ष्मीनगर येथील पिझ्झा हट याला पुढच्या सात दिवसांसाठी सील करण्यात आलं, या पिझ्झा हट मधला एक कुक कोरोना पॉसिटीव्ह निघाला होता. मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार कारवाई केली. मनपा आयुक्तांनी मंगल कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. नागपुरात कोरोना बाधिततांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासन अलर्टवर आहे आणि तपासणीसुद्धा वादवण्याचे निर्देश निर्गमित करण्यात आले आहे.

  • 19 Feb 2021 07:52 AM (IST)

    शिवजयंतीनिमित्त नाशिक शहर भगवेमय, मिरवणुकीला परवानगी नाहीच

    नाशिक – शिवजयंती निमित्त शहर भगवेमय

    शहरात शिवजयंती मिरवणुकीला परवानगी नाहीच

    नियमांचं पालन करण्याचे प्रशासनाचे आदेश

    पंचवटीत मिरवणूक न काढता रक्तदान शिभिराचे आयोजन

    शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात खडा पहारा

  • 19 Feb 2021 07:52 AM (IST)

    कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच – रविकिरण इंगवले

    कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच, शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता आरोप,  शिवसेनेला रोखण्यासाठी रडीचा डाव खेळला जातोय, सत्तेचा दुरुपयोग केल्याची इंगवले यांची टीका,  याद्या तात्काळ दुरुस्त करा अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला शिवसेना काळ फासणार, शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांचा इशारा

  • 19 Feb 2021 07:50 AM (IST)

    नाशिक – कोरोना च्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे भरारी पथक तैनात

    नाशिक- कोरोना च्या  वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे भरारी पथक तैनात,

    लग्न सोहळे,हॉटेल,बार, रेस्टॉरंटमध्ये जाऊन करणार तपासणी

    फिजिकल डिस्टनसिंग, मास्क न वापरल्यास थेट कारवाईचा बडगा

    शहरात एकाच दिवसात 297 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले

  • 19 Feb 2021 07:48 AM (IST)

    शिवजयंतीनिमित्त रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद

    शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खा.संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे.

    या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आज (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत.

  • 19 Feb 2021 07:31 AM (IST)

    राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर वीजबिल माफ करू – नाना पटोले

    राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर वीजबिल माफ करू – नाना पटोले

    – वीज बिल माफीवरुन काँग्रेसचा भाजपच्या सुरात सुर

    – ‘लॅाकडाऊनमध्ये आलेलं वीज बिल माफ व्हावं, ही काँग्रेसची भुमीका’

    – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य

    – काँग्रेसच्या एकहाती सत्तेसाठी नाना पटोलेंचं शेतकऱ्यांना आश्वासन

  • 19 Feb 2021 07:31 AM (IST)

    नाशिक विमानतळावरून सुरू होणार नाशिक – कोलकाता विमान सेवा

    नाशिक – कोकाता साठी आता नाशिकहून विमानसेवा

    नाशिक विमानतळावरून सुरू होणार नाशिक – कोलकाता विमान

    28 फेब्रुवारी पासून ही सेवा सुरू होणार असल्याची सूत्रांची माहिती

    उडान योजने व्यतिरिक्त ही विमानसेवा होणार सुरू

    नाशिक-दिल्ली विमान आठवड्याचे सातही दिवस सुरू करण्याचा स्पाईस जेटचा प्रयत्न

    नाशिक- दिल्ली कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार असल्याने समाधान

  • 19 Feb 2021 07:30 AM (IST)

    ठाण्यातील मानपाडा इथे कोठारी कंपाउंड परिसरातील गोदामाला लागली आग

    – ठाण्यातील मानपाडा येथील कोठारी कंपाउंड परिसरातील पेप्सी आणि लेस वेफर्स च्या गोदामाला पहाटे 2:30 च्या सुमारास अचानक पणे लागली आग.

    – घटनास्थळी स्थळी अग्निशमन ,आपतीव्यस्थापन कक्ष यांनी शर्तीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

    – यात कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे…

    – घटनास्थळी 12 लोडिंग केलेल्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या.

    – परिस्थिती नियंत्रणात असून कूलिंग चे काम सुरू आहे..

  • 19 Feb 2021 07:28 AM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरी परिसरात संचारबंदीचे काटेकोर पालन

    जुन्नर,पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरी परिसरात संचारबंदीचे काटेकोर पालन, गर्दी कमी करण्याचे शिवभक्तांना पुणे ग्रामीण पोलीसांकडुन आवाहन,  कोरोनाची पाश्वभुमी असली तरी शिवभक्तांचा गडाच्या पायथ्याशीच उत्साह कायम

  • 19 Feb 2021 07:19 AM (IST)

    नाशिक – गारपीट, वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपले

    लासलगाव , निफाड , मनमाड , सिन्नर , दिंडोरी ला तडाखा, गहू, कांदा, हरभरा पिकं आडवी तर अवकाळीचा द्राक्षाला देखील मोठा फटका, त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची उडाली तारांबळ

  • 19 Feb 2021 07:13 AM (IST)

    जिल्ह्यातील सहा तालुक्यातील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा

    करवीर,पन्हाळा, गडहिंग्लज,शिरोळ शाहूवाडी,भुदरगड या तालुक्यातील 236 गावांची सरपंच निवड 25 फेब्रुवारी ला होणार, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला कार्यक्रम, सरपंच आरक्षणावरील हरकतीमूळे रखडल्या होत्या सरपंच निवडी, जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी नंतर निर्णय

  • 19 Feb 2021 07:12 AM (IST)

    चार महिन्यानंतर नागपुरात सहाशेवर कोरोना रुग्णसंख्या

    – २४ तासांत जिल्ह्यात ६४४ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

    – कुक पॅाझीटीव्ह निघाल्याने मनपाने लक्ष्मीनगर पिझा हट सील

    – लक्ष्मीनगर पिझा हटचा पिझा खाणाऱ्यांची धाकधूक वाढली

    – कार्यक्रमासाठी आता आठ दिवसांपूर्वी परमिशन घ्यावी लागेल

    – रुग्णसंख्येच्या स्फोटामुळे नागपूर जिल्ह्यात संचारबंदीची वाढती मागणी

  • 19 Feb 2021 07:11 AM (IST)

    मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्या मोहिते-पाटील गटाच्या सहा बंडखोर सदस्यांची सुनावणी आता जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार आहे. अपात्रतेबाबत होत असलेल्या कारवाईवर उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

  • 19 Feb 2021 06:41 AM (IST)

    शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळ्याची तयारी पूर्ण

    शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजन्म सोहळा साजरा होतोय. शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण आकर्षक अश्या फुलांनी सजविण्यात आलं आहे.

  • 19 Feb 2021 06:40 AM (IST)

    भंडारा आग दुर्घटनेत अखेर गुन्हा दाखल

    परिचारिका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल, भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता, अखेर या प्रकरणात पोलिसांनी दोन परीचारीकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची माहिती,  सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला होता. ज्यामध्ये दोन्ही परिचरिकांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याचं समोर आल्याने गुन्हा दाखल

  • 19 Feb 2021 06:38 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्याला गरपीठीचा मोठा फटका

    औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात गरपीठ, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दिला तडाखा, अवकाळी पावसामुळे तीन ते चार तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, गरपीठीमुळे तूर हरभरा गहू ज्वारी भाजीपाला आणि फळपिकांचे मोठे नुकसान, अवकाळी पाऊस आणि गरपीठीमुळे शेतकरी हवालदिल

  • 19 Feb 2021 06:37 AM (IST)

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना पॉझिटिव्ह, ट्वीट करून दिली माहिती

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना पॉझिटिव्ह

    राजेश टोपे यांनी ट्विटर अकाउंट वरून दिली माहिती

    डॉक्टरांच्या संपर्कात असून उपचार घेत असल्याची माहिती

    संपर्कातील लोकांनी तपासणी करण्याचे आवाहन