महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
रायगड :
अलिबाग मुरुड रस्त्यावरील छोटा पूल कोसळला.
काशीद येथील नाल्यावरील पूल कोसळला.
अडकलेली दोन्ही वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू.
एक कार आणि मोटार सायकल अडकली.
सर्व 6 प्रवाशाना बाहेर काढण्यात यश , एक प्रवासी किरकोळ जखमी.
मुरुडकडे जाणारी वाहने रोहा सुपेगाव मार्गे वळवली.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन.
नवी मुंबई : अखेर 8 तासांनंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे दाखले घेतले मागे
पालकांनी सकाळी दहा वाजल्यापासून खारघरच्या विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल समोर मांडला होता ठिय्या
अखेर खारघरचे विश्वजीत इंटरनॅशनल स्कूल पालकांसमोर झुकले
पालकांसाठी युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेना राजकारण दूर सोडून आले एकत्र
राजकीय दबावानंतर शाळा प्रशासन पालकांना विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट घेतले मागे
शाळेची वाढीव फी संदर्भात एक महिन्यांपासून पालक आणि शाळा यामध्ये सुरू होता वाद
कल्याण डोंबिवलीत पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन
नियमांचे उल्लंघन करणा:यांच्या विरोधात कारवाई
कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त
विना मास्क फिरणारे नागरीक रात्री सुरू असलेले हॉटेल बारच्या विरोधात कारवाई सुरु
100 पोलीस अधिकारी आणि 300 पोलीस कर्मचारी हे तैनात
अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने कारवाई
कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांची माहिती
कोल्हापूर :
व्यापाऱ्यांमुळे कोल्हापुरातील कोरोना वाढत नाही हे सिद्ध झालं आहे
पाच दिवस दिलेल्या परवानगीमध्ये जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढली नाही
राज्य सरकारने व्यापाऱ्यांची परीक्षा न बघता लवकरात लवकर आदेश काढावेत
व्यापाऱ्यांची उद्यापासून दुकाने सुरू करण्याची सर्व तयारी झाली आहे
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांचं आवाहन
रत्नागिरीतील परशुराम घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, परशुराम घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बघायला मिळत आहेत.
मावळ (पुणे) :
-वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा पवना धरणात बुडून मृत्यू
-शुभम दुधाळ असं बुडालेल्या युवकाच नाव
-पवना धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू
-तब्ब्ल दोन तासांनी बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश
-शुभम आणि त्याचे सहा मित्र हे मावळ परिसरात वर्षाविहारासाठी आले होते,दुपारच्या सुमारास पवना धरण परिसरातील वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते दर्शन झाल्यानंतर ते पवना धरणातील बॅकवॉटर मध्ये पोहण्यासाठी उतरेल असता शुभम दुधाळ याला पाण्याचा अंदाज न आल्याने दम लागून मृत्यू झाला
मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहे. त्यामुळे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
अकोला :
अकोला जिल्हातल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीला आला पूर
पुलाच्या चार फूट खाली पाणी
अमरावती जिल्हात झालेल्या जोरदार पावसामुळे आला नदीला पूर
पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
या पावसाळ्यातला पहिला पूर पूर्णा नदीला
पाण्यात होत आहे झपाट्याने वाढ, काही तासात अकोला ते अकोट मार्ग होऊ शकतो बंद
कोकणाला पुढील दोन दिवस रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईला चार दिवस ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
गडचिरोली : देशासह राज्यात आणि जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस चे दिवसेंदिवस दरवाढ होत आहे. या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून यावर युवक काँग्रेस ने अनोखा आंदोलन गडचिरोलीच्या बट्टूवार पेट्रोल पंपावर करण्यात आले आहे. चक्क पंपावर स्टॉल लावून पेट्रोल डिझेल भरणाऱ्या ग्राहकांचे स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहे. सोबतच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करम्यात आली. यावेळी युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कल्याणमधील प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांच्या विरोधात वीज वितरण कंपनीने वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीच्या आरोप त्यांचा वर आहे नुकतीच संजय गायकवाड यांनी आठ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेऊन चर्चेत आले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस पुढील तपास करीत आहे. मात्र या प्रकणात संजय गायकवाड यांचे म्हणणे आहे की, माङयावर चुकीचा आरोप केलेला आहे. जो काही दंड असेल भरण्यास तयार आहे. उद्या प्रकरणी प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे. कारण मराठा समाजाचं आरक्षण फडणवीस सरकारने दिले. त्यानंतर उच्च न्यायालयात तत्कालीन सरकारने मुद्दे मांडले आरक्षण टिकले. मात्र सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीने आपली बाजू का मांडली नाही? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आयोग नेमला पाहिजे तरच आरक्षण टिकाव धरेल.
हिंगोली :
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात
उगवण शक्ति झालेल्या पिकांना दिलासा
अंतर मशागतिच्या कामांना व्यत्यय
पिंपरी चिंचवड :
-पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील म्हेत्रेवस्ती येथे 27 वर्षीय तरुणांची दिवसाढवळ्या धारधार शस्त्राने केली हत्या
-कानिफनाथ क्षीरसागर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव
-म्हेत्रेवस्ती साने चौक येथे कानिफनाथ क्षीरसागर हे थांबले असता हल्लेखोरांनी केला हल्ला या हल्ल्यात क्षीरसागर हे जागीच मृत
-भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे
भाजप नेत्या पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे पंतप्रधान मोदींना भेटणार, प्रितम मुंडेंना मंत्रिपद नाकारल्यानंतर पंकजा यांच्या नाराजीची चर्चा, त्यामुळे या घडामोडींकडे महाराष्ट्राचे लक्ष
नांदेड: हिंगोली, यवतमाळसह नांदेड जिल्ह्यातील पावसाने पैनगंगा दुथडी भरून प्रवाहित, सहस्त्रकुंड धबधब्याचे अक्राळविक्राळ रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी, रविवारच्या सुट्टीमुळे सहस्त्रकुंड धबधब्याला आलय जत्रेच स्वरूप.
औरंगाबाद :-
विद्युत रोहित्राला भीषण आग
वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथील विद्युत रोहित्राला आग
अचानक पणे रोहित्राने घेतला पेट
पडणाऱ्या ऑईलमुळे पसरली आग
जवळपास असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र रोहित्राचे मोठे नुकसान
कराड :
अशिष शेलार, भाजप पदाधिकारी बैठकीसाठी कराडमध्ये पोहचले
डॉ अतुल भोसले यांनी केले स्वागत
कराड सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु
बैठकीनंतर होणार पत्रकार परिषद
नवी मुंबई :
खारघरच्या विश्वज्योत शाळेत पालकांनी मांडला ठिय्या
दाखले मागे घेण्यासाठी पालकांचा आक्रमक पवित्रा
फी भरली नाही म्हणून पाठविले होते विद्यार्थ्यांचे दाखले
जो पर्यंत दाखले देत नाही तो पर्यंत शाळेतून हलणार नाही
शाळेत पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक
विद्यार्थ्यांना या शाळेने शाळा सोडल्याचा 27 विद्यार्थ्यांना दाखले थेट मेलद्वारे पाठवले होते
लॉकडाऊन काळात शाळे मार्फत ऑनलाईन शिक्षण सुरु असताना वाढीव फी भरण्यास पालकांचा नकार
युवासेनेच्या रुपेश पाटील यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार
त्यांनतर वर्षा गायकवाड यांनी शाळेची चौकशी करण्याची दिले होते आदेश
मात्र तरीही शाळा बेकायदेशीर दिलेले दाखले मागे घेत नाही
गडचिरोलीत सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे हत्या प्रकरण
राजकीय वैमनस्यातून काढला काटा
पंधरा दिवसात मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक
मुख्य आरोपी गडचिरोली नगर परिषदेचा सभापती प्रशांत खोब्रागडे
24 जूनच्या रात्री रायपुरे यांची झाली होती हत्या
पाचही आरोपींना झाली अटक
अहमदनगर :
मुंडे भगिनींच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच
पाथर्डी तालुका भाजपा कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे
केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात खासदार प्रतिम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने आज तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे
जिल्ह्याध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे केले सुपूर्त
सोलापूर :
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील निर्बंध सुरूच राहणार
पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांना मुदतवाढ
दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार सर्वप्रकारच्या आस्थापना
दर शनिवार-रविवारी राहणार विकेंड लॉकडाऊन,
रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा मात्र सुरूच राहणार
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
महाराष्ट्र व्यापारी असोसिएशनचा सरकारला अल्टिमेट
– एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांचं मोठं वक्तव्य
– राज्यात दुकाने उशिरापर्यंत सुरू करण्यास परवानगी द्या, अन्यथा येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू
– इतर राज्यात पाॅझिटिव्हिटी दर कमी, तिथे दुकाने रात्री 9 वाजेपर्यंत सुरू, मग महाराष्ट्रात पाॅझिटिव्हिटी दर कमी असतानाही दुजाभाव का ? असा सवाल
– चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवून व्यापाऱ्यांचं मोठ्ठं नुकसान, मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील असा पवित्रा
मनमाड :- शेतकऱ्यांना चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात व्यक्तीने टाकला युरिया
नांदगाव तालुक्यातील मांडवडच्या आझाद नगर येथील घटना
भगवान पाटील या शेतकऱ्याच्या सुमारे 600 क्विंटल कांदा झाला खराब होऊन सुमारे 10 लाखांचे नुकसान
नांदगाव पोलीस स्थानकात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
सोलापूर- कासव विक्रीसाठी येणाऱ्या आठ जणांना पोलीस घेतले ताब्यात
1 वन्यजीव कासव आणि 3 गाड्यासह साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
शहर गुन्हे शाखेची कामगिरी
वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल
पुणे :
पुण्यात 84 टक्के पालक म्हणतात शाळा सुरु करा
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सुरु केलं ऑनलाइन सर्वेक्षण
या सर्वेक्षणात आतापर्यंत सव्वा दोन लाख पालकांनी मते नोंदविली असून त्यातील जवळपास 84 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची दर्शवली तयारी
हे सर्वेक्षण येत्या 12 जुलैपर्यत सुरू राहणार
पुणे –
– आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा,
– राज ठाकरे आज आणि उद्या असे दोन दिवस ते पुण्यात असणार आहेत,
– मनसेच्या शहर कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे,
– त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत, अशी माहिती,
– तसेच यानंतर पुढील आठवड्यात राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.
– १६ ते १८ जुलै या कालावधीत ते नाशिक येथे असतील.
पुणे –
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेशप्रक्रिया सुरू,
– पीएचडी प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत,
– पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार,
– परीक्षेसाठी लॉग-इन केल्यानंतर विद्यार्थी २ तास परीक्षा देऊ शकतील,
– विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २२ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल २४ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार,
– नेट, सेट, गेट, सीएसआयआर, आयसीएआर, डीबीटी आणि परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी सवलत देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड
-गुटख्याची अवैध वाहतूक करणारे तिघे जेरबंद, 52 लाखांचा मुद्देमाल जप्त,वाकड पोलिसांची कारवाई
-गाडीला बनावट नंबर टाकून अवैध गुटखा व पानमसाला पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तिघाजणांना अटक करण्यात आलीय
-त्यांच्याकडून 100 पोती विमल पानमसाला व त्यासाठी लागणारी तंबाखू 100 पोती ,चारचाकी, मोबाईल फोन, असा एकूण 52.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय
-गणेश वंजी साबळे,संदीप गुलाब ठाकरे व विशाल पांडुरंग लवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
नाशिक
– नाशिक शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा मनपाचा इशारा
– कोरोना काळात घरपट्टी,पाणीपट्टी थकवल्याने मनपाच्या तिजोरीत मोठी घट
– तब्बल 400 कोटिपर्यंत थकबाकी
– पाणीपट्टी 20 हजार पेक्षा अधिक थकबाकीदार शहरात 7 हजार आहेत
– यांना 7 दिवसात थकीत पाणीपट्टी भरण्याचा दिला अल्टीमेटम,अन्यथा नळ कनेक्शन तोडणार
औरंगाबाद :-
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर झड पावसाला सुरुवात
मध्यरात्रीपासून हलक्या स्वरूपाच्या झड पावसाला सुरुवात
झड पाऊस पिकाच्या वाढीसाठी मानला जातो चांगला
दोन ते तीन दिवस झड पाऊस कायम राहण्याची शक्यता
सर्वत्र आभाळ दाटून आलेय आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू
नाशिक
– कोरोनाचा धोका आणि त्यात पर्यटकांचा अति उत्साह बघता पर्यटन स्थळांकडे जाण्यास अद्याप बंदीच
– पर्यटन स्थळांवर गर्दी केल्यास दंडात्मक कारवाईसह सह थेट गुन्हे दाखल होणार
– नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा इशारा
– विकेंडला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचं धोका अधिक होतोय गडद
पिंपरी चिंचवड
-विनापरवाना वृक्षतोड केल्यास आता 50 हजार रुपये दंड
-प्राधिकरण समितीच्या बैठकीत ठराव मंजूर
– शहरात होणा-या विनापरवाना वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मोठा निर्णय
-विनापरवाना वृक्षतोडीचे छायाचित्र, व्हिडीओसह माहिती देणा-यालाही बक्षीस दिले जाणार आहे.
-यापूर्वी विनापरवाना वृक्षतोडल्यास केवळ 10 हजार रुपये दंड आकारला जात होता
मुंबईत अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर चोरी करणारी टोळीचा पर्दाफाश
एकूण तीन आरोपीना पोलिसांनी केलीय अटक
अटक आरोपी हे टेम्पोसह गैस सिलेंडरची करत होते चोरी
चोरी केलेला गैस सिलेंडर ब्लैक मध्ये विकत होते आरोपी
पोलिसानी एक टेम्पो आणि 28 गैस सिलेंडर केलाय ज्प्त
सदरआरोपीनी मुंबईत बऱ्याच ठिकाणी गुन्हे केल्याची दाट शक्यता असून या प्रकरणी पुढील तपास करत आहे एनएम जोशी मार्ग पोलिस
सायन पनवेल हायवेवर एक भाजी भरलेला टेम्पो पलटी
मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला अडथळा
ट्राफिक पोलीस घटनास्थळी दाखल