महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 14 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening
ठाणे : महापालिका वैद्यकीय अधिकारी उपायुक्त डॉ. विश्वानाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा कापूरबावडी पोलास ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
करोना रुग्णालयातील 38 वर्षीय माजी महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भाजप महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेऊन पोलिसात केली होती तक्रार.
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ पावशी येथील भंगसाळ पुलाजवळ रात्री 8.35 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार कर्ली नदीची पातळी 9 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 9.910 मीटर असून धोका पातळी 10.910 मीटर आहे. तरी नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे सांगण्यात आले आहे.
सांगली : राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून वाळवा, पलूस, कडेगावची पाहणी
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पथक दाखल
मुंबई : शाळा फी वाढीसंदर्भात आज कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली
पण कुठलाही निर्णय घेतला गेला नाही
शाळा फी दरवाढीबाबत खासगी शाळेत हस्तक्षेप करावा की नको अशीही चर्चा झाली
सूत्रांनी दिली माहिती
शुल्क दरनियमनाबाबतच्या अध्यादेशाबाबत आज चर्चा झाली
चंद्रपूर : लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला अटक
चंद्रपूर लाचलुचपत विभागाची कारवाई
उमेश पोटावी असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव
जुगार व्यावसायकाने केली ACB कडे तक्रार
अवैध धंद्यावर कारवाई न करण्यासाठी 15 हजाराची घेतली लाच
आरोपी पोलीस कर्मचारी पाथरी पोलीस ठाण्यात आहे कार्यरत
बीड: अभिनेत्री करीना कपूरविरोधात पोलिसात तक्रार
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची तक्रार
प्रेग्नेंसी बायबल पुस्तकाविरुद्ध आक्षेप
बायबल नावाने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्याचा आरोप
बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार
अभिनेत्री करीना कपूर, आदिती शहासह प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजेश टोपे माध्यम प्रतिनिधींशी बोलत आहेत. यावेळी ते कोरोना लसीकरणावर भाष्य करत आहेत. राज्यात रोजची रुग्णसंख्या सात ते नऊ हजार आहे. 92 टक्के रुग्ण हे 10 जिल्ह्यातील आहेत. दुकानदारसुद्धा आम्हाला जास्त वेळ दुकान सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भाने केंद्राने सांगितलं आहे. विदेशात तिसरी लाट आलेली दिसते. कोरोना लसीकरणासंदर्भात अधिक लसी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.
आपल्या राज्यामध्ये खासगी हॉस्पीटल्स, मोठे उद्योजक यांच्या माध्यमातूनन 25 टक्के लसींचा वाटा राज्याला कसा मिळवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे, याविषयी मी आजच्या बैठकीत सांगितलं.
साडेचार कोटी लस ही ऑगस्टमध्ये मिळण्याची आशा आहे. देशाला एकूण 42 कोटी लस देशाला मिळणार आहे. खासगी दवाखान्यांना ज्या लसी मिळणार आहेत. त्या आपल्याला जास्तीत जास्त कशा मिळतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
रोज पाच सहा लाख लसी मिळतात पुन्हा मिळत नाहीत. आपल्याला ज्या लसी मिळतात त्या लगेच देण्याचा आपण प्रयत्न करतो. कोणत्याही जिल्ह्यात लसी पडून नसतता. आपली कार्यक्षमता मोठी आहे. लोकांमध्ये जागृती झाली आहे. गर्दी होत आहे. रांगा लागत आहेत. त्यामुळे केंद्राने लस लवकरात लवकर द्याव्यात. त्यासाठी मी नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
भाईंदर: भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्कमधील श्याम कुंज बिल्डिंगच्या 304 रूममध्ये अचानक आग लागली. घरात असलेल्या फ्रीजच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी मीरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. घरात दोन वयोवृद्ध व्यक्ती होते. मात्र जीवितहानी झाली नाही.
कॅबिनेट बैठकीतील महत्वाचे मुद्दे
राज्यातील पीक-पाणी परिस्थितीचा आढावा
कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविणेबाबत.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश निर्गमित करणेबाबत
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्याबाबत.
राज्य सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याकरीता निकष निश्चित करण्याबाबत
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
राज्यात विविध विभागांत 15 हजार पदांची होणार भरती
गट अ ते क गटापर्यंतची सगळी पदं एमपीएससीमार्फत भरली जाणार
एमपीएससी परीक्षांच वेळापत्रकही जाहीर करण्याचे आदेश राज्य सरकारने एमपीएससी आयोगाला दिले
एमपीएससी आयोगातील सदस्यांची संख्याही वाढणार
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत निर्णय
15 हजार पदं भरण्यासाठी वित्त विभागाकडून मान्यता ….
नागपूर : नागपूरहून साकोलीला जाणाऱ्या एसटी बसला झाला अपघात
नागपूर भंडारा महामार्गावर दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला अपघात
भंडारा महामार्गावरील सावळी फाटायेथील घटना
समोर कंटेनर होता, कंटेनरच्या ड्रायव्हरचा तोल गेला
मागे असलेल्या एसटी बसने कंटेनरला दिली धडक
एसटीमध्ये सुमारे 20 प्रवासी होते
एसटीचा ड्रायव्हर गंभीर जखमी
प्रवाशांना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु
महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन
खालील मंत्र्यांची उपस्थिती
१) मा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार
२) मा गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील
३) मा मंत्री श्री नितीन राऊत
४)मा मंत्री श्री बाळासाहेब थोरात
५)मा मंत्री श्री छगन भुजबळ
६)मा मंत्री श्री विजय वडेट्टीवार
७)मा मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड
८)मा मंत्री श्री अनिल परब
९)मा मंत्री श्री हसन मुश्रीफ
१०)मा मंत्री श्री धनंजय मुंडे
११)मा मंत्री श्री सुनील केदार
)मा मंत्री श्री राजेश टोपे
१३)मा मंत्री श्री जितेंद्र आव्हाड
१४)मा मंत्री श्री दादा भुसे
१५)मा मंत्री श्री संजय बनसोडे
१६)मा मंत्री श्री जयंत पाटील
१७)मा मंत्री श्री सुभाष देसाई
१८)मा मंत्री श्री गुलाबराव पाटील
१९)मा मंत्री श्री बाळासाहेब पाटील
२०)मा मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर
सिंधुदुर्ग : दुपारनंतर पावसाचा जोर वाढला
जिल्ह्यात मुसळधार पाऊस
कुडाळ येथील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला आला मोठा पूर.
पुरामुळे आंबेरी पुलावर पाणी आल्यामुळे पुढील 27 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला
अनेक ठीकाणी सकल भागातील रस्त्यावरदेखील आले पाणी
दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
प्रेमाच्या आड आली म्हणून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या आईची केली हत्या
ही धक्कादायक घटना टिटवाळ्य़ात घडली आहे
या प्रकरणी आरोपी समीर दळवी याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे
10 दिवसानंतर पोलिसांनी हत्येचे गूढ उकलले आहे
मनमाड –
इंधन दरवाढीविरोधात मनमाड ला काँग्रेस च्या वतीने काढण्यात आला मोर्चा
मोर्च्या काँग्रेस नगरसेवक सायकल चालवत झाले सामील
काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार च्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी
भुपेश बघेल –
– भाजपचं हृदय दिल्लीसाठी धडकतेय, पण त्यांचं डोकं नागपुरातून चालते म्हणून नागपूरातून बोलतोय
– मोदी सरकारमुळे लोकांचा स्वास कोंडतोय.
– युवकांना रोजगार, व्यापाऱ्यांना जीएसटी आणि इतरांना महागाईने मारलंय
– सर्वात जास्त महागाई पेट्रोल डिझेल आणि वीजेची आहे
– खाद्य तेलाचे दर गगनाला भिडलेय
– गेल्या वर्षभरात किराना सामान ४० टक्के महागलंय
– केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलीय
– भाजपला सरकार चालवता येत नाही, असंच दिसतंय
– महागाईमुळे लोकांचं जगणं कठीण झालंय
वरळी मनसेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला फेरबदल.
आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभेची जबाबदारी मनसेचे स्थानिक संजय जामदार यांच्याकडे.
माजी नगरसेवक संतोष धुरी यांना विभाग अध्यक्ष पदावरून हटवले.
संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणुक लढवली होती.
नाशिक –
सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये दाखल
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर झाले दाखल
थोड्या वेळात कुर्टकोटी सभागृहात होणार कार्यक्रम
वसई-विरार –
वसई-विरारमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाच्या हलक्या सरी
मागच्या 24 तासात वसई ताल्युक्यात 56 मिलिमीटर पावसाची नोंद
अचानक भरलेले आभाळ आणि मध्येच पडलेले ऊन या ऊन सकावलीच्या खेळात सुरु आहे पाऊस
यवतमाळ –
गेल्या 2, 3 दिवसात धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने बेंबला धरणात अधिक पाण्याचा संचय झाल्याने धरणाची पातळी वाढल्याने आज या प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेमी ने उघडण्यात आले
त्यातून 20 घन मिटर प्रति सेकंड इतका विसर्ग पाण्याचा करण्यात आला
जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या 4 तालुक्यांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे
सिंधुदुर्ग –
जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच
अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी
मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी १०९ मिमी पाऊस पडला असून तीन दिवसात जिल्ह्यात सरासरी ३७१ मिमी पावसाची नोंद
मागील २४ तासात जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस मालवण व दोडामार्ग तालुक्यात लागला
मालवणमध्ये १५७ तर दोडामार्गमध्ये १५० मिमी पाऊस पडला
तर सर्वात कमी पाऊस ६५ मिमी देवगड तालुक्यात लागला आहे
भिवंडीत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात झोपलेल्या मुलांच्या अंगावर स्लॅबचा प्लॅस्टर कोसळल्याने तीन मुले जखमी
भिवंडी शहरातील फंडोलेनगर येथील घटना
सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून जखमी मुलांना उपचारा करीता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे
पुणे –
– नवीन समाविष्ठ २३ गावांमधील पथदिवे, पाणीपुरवठा आणि विविध शासकीय कार्यालयांची थकीत वीज बिलाची रक्कम महापािलका भरणार,
– त्यासाठी स्थायी समितीकडून ४ कोटी २७ लाख २८ हजार ६१२ रुपये खर्च करण्यास मंजुरी,
– पालिकेला २३ ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या सर्व रकमा मिळणार आहेत.
– याशिवाय गायरान जमिनी, ऍमिनिटी स्पेस देखील उपलब्ध होणार आहे.
औरंगाबाद –
साध्या ड्रेसवरील पोलिसांची तरुणाला बेदम मारहाण
औरंगाबाद शहरातील जकात नाका परिसरातील घटना
गाडी बाजूला घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून झाली मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
जिंसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली मारहाण
मारहाण करणाऱ्या पोलिसांची पोलीस आयुक्तांनी केली बदली
तब्बल अर्धा तास सुरू होता रस्त्यावर गोंधळ
गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी तरुणाला सोडून काढला पाय
मुक्ताईनगर –
मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु
20 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती आज पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला या भागात जीवनदान मिळणा
हिंगोली
जिल्ह्यात सर्वदूरवर दमदार पावसाला सुरुवात
सकाळ पासून पावसाच्या भुर -भूरी आता जोरदार पावसाला सुरुवात
बोरवेल-विहिरींची पाणी पातळी वाढत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
– भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
– नागपूरातील दिव्यांग मनोज ठवकर मृत्यू प्रकरणात कारवाईची मागणी
– मनोज यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबीत करण्याची केली मागणी
– ‘संबंधीत पोलीसांना निलंबीत करण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं’
– भाजप नेते आ. कृष्णा खोपडे यांची माहिती
– मनोज यांच्या पत्नीला पोलीस खात्यात नोकरी, ५० लाख्यांच्या मदतीची मागणी
– मुख्यमंत्र्यांना भेटून आ. कृष्णा खोपडे यांनी केली मागणी
नाशिक –
डॉ. जगन्नाथ दीक्षित नाशिक महापालिकेच्या मदतीला
पालिके तर्फे सिरो सर्वेक्षण करून संसर्ग झालेल्यांचा घेतला जाणार शोध
मोहिमेसाठी डॉ.जगन्नाथ दीक्षित यांची घेतली जाणार मदत
पाच हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन अँटी बॉडीज तपासणार
शहरात हार्ड इम्युनिटी तयार झाली की नाही याचा तयार होणार अहवाल
पहिल्या सिरो सर्वेक्षणात नागरिकांमध्ये आढळल्या होत्या 39.50 टक्के अँटीबॉडीज
तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर महापालिकेचे दुसऱ्यांदा सिरो सर्वेक्षण
नाशिक –
घरपट्टी थकबाकीदारांना पालिकेच्या जप्तीच्या नोटीस
सुमारे 10 हजार मिळकतीना मनपा ची नोटीस
25 हजार ते 1 लाखांपर्यंत थकबाकी असलेल्यांना नोटीस
पाणीपट्टी पाठोपाठ घरपट्टी थकबाकीदार मनपाच्या रडारवर
मनपाच्या अंदाजपत्रकात 300 कोटींची तूट असल्याने मनपाकडून नोटीस
मनपाची पाणीपट्टी थकबाकी 100 कोटींच्या, तर घरपट्टी 300 कोटींच्या घरात
रायगड
रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र रिमझीम पाऊस.
सर्व नद्या ईशारा पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत
रत्नागिरी –
चिपळूण, गुहागर परिसरात रात्रभर सर्वत्र रिमझीम पाऊस
सर्व नद्या पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत.
तर पालशेत- नरवन मार्गावतील पूल आज पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला
सोलापूर –
भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे विकासाला फटका
50 कोटीचा निधी शासनाकडे परत गेला
शहरासाठी अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजनेअंतर्गत 39 कोटी निधी तसेच नगरोत्थान योजनेचे 11 कोटी निधी गेले परत
महापालिका सभागृहात वेळेत ठराव आणून पाठवणे आवश्यक असताना ठराव वेळेत आणला नाही
औरंगाबाद –
बँक कर्ज थकबाकीनंतर आता व्हिडीओकॉनसमोर आता आणखी एक संकट
वस्तू सेवा कराचे व्हिडीओकॉनकडे तब्बल एक हजार एकोणपन्नास कोटी रुपये थकले
हजारो कोटी रुपये वसुलीसाठी व्हिडीओकॉन कंपनीला जीएसटीच्या अनेक नोटीस
व्हिडीओकॉन कडून मात्र नोटिसांना दाखवली जातेय केराची टोपली
नोटिसांना उत्तर न दिल्यास वस्तू व सेवा कर विभाग टाकू शकते
धाडी टाकून थकबाकी होऊ शकते वसूल
जीएसटी थकबाकीमुळे व्हिडीओकॉन कंपनी पुन्हा एकदा अडचणीत
पुणे –
– इंदुरीकर महाराज कीर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा कुठे होता?
– अभिनेत्री हेमांगी कवीला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईचा सवाल
– सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही
– प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी सध्या तिच्या बाई, बुब्स आणि ब्रा’ या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय.
सोलापूर –
जिल्ह्यातील 80 गावातील पाणी पिण्यासाठी दूषित
जिल्हा परिषदेकडून अनुजैविक पाणी तपासणी मोहीम सुरु
आतापर्यंत साडेचार हजार गावातील जलस्रोतांची करण्यात आली आहे तपासणी
यापैकी 80 गावातील पाणी दूषित असल्याचे अतएव आढळून
80 गावातील लोकांना पाणी उकळून पिण्याच्या जिल्हा परिषदेच्या सूचना
नागपूर –
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी दोन प्रभाग पद्धतीसाठी हालचाली सुरु
काही पक्ष उत्सुक तर काहीचा विरोध
नागपूरात सध्या चार चा प्रभाग आहे , 2017 मध्ये अध्यादेश कडून करण्यात आला होता चार चा प्रभाग
राज्यात महापालिकेसाठी एक चा प्रभाग करण्याचा कायदा मंजूर करण्यात आला असला तरी त्याला काहीचा विरोध
त्यामुळे चाचपणी सुरु
मात्र एकच्या ऐवजी दोन चा प्रभाग होणार का याकडे लागलं आहे लक्ष
नाशिक –
सरसंघचालक मोहन भागवत आज नाशिकमध्ये
दोन दिवस नाशिकमध्ये असणार मोहन भागवत..
आयुर्वेद कार्यालयाचं भागवतांच्या हस्ते उद्घाटन..
मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त..
आज दुपारी होणाऱ्या भागवतांच्या भाषणाकडे लक्ष..
नाशिक – जिल्ह्यात पावसाची पुन्हा हुलकावणी..
काही भागात तुरळक हजेरी..
उर्वरित जिल्ह्या मात्र अद्याप कोरडाच ..
अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या संकटात..
तर अनेकांच्या पेरण्या लांबणीवर..
हवामान खात्याचा मात्र पुढच्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज..
नाशिक –
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांना ईडी कडून धमकी
शिवाजी चुंभळे यांना ईडी कार्यलयातून फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
ईडी च्या नावे करण्यात आलेला फोन कॉल खरा की खोटा शोध सुरू
चुंबळे दांपत्य पोलिसात तक्रार करण्याच्या तयारीत
यापूर्वी देखील नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याला ईडी च्या नावे आला होता धमकीचा फोन
पुणे –
– महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश,
– ग्रामसेवकांना हवेली आणि मुळशी तालुक्यांच्या बाहेरील तालुक्यांमध्ये समुपदेशन करून नेमणुका देण्याच्या सरकारच्या सूचना,
– २३ गावांचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे या गावांमधील ग्रामसेवक हवेली आणि मुळशी तालुक्यामध्ये अतिरिक्त झाले आहेत,
– ३१ जुलैपूर्वी या बदल्या करायच्या आहेत.
नागपूर जिल्हा परिषदेत ९४ लाखांचा गैरव्यवहार
– बनावट ठेवीच्या आधारावर कंत्राटदाराने दीड कोटींचं कंत्राट मिळवलं
– नानक कंस्ट्रक्शन कंपनीचे रोशन पाटील सह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
– नागपूरातील सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
– कंत्राट मिळवण्यासाठी अभियंत्यांची बनावट यादी दिली
– जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारवाईनंतर गुन्हा दाखल
कोल्हापूर :
कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरील धोकादायक इमारत उतरवताना एकजण थोडक्यात बचावला
इमारतीवरील भाग खाली पडतानाची भयानक दृष्य
पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा वरच्या मजल्यावरील भाग पाडला
– विद्यार्थ्यांचे 75 टक्के परिक्षा शुल्क होणार माफ
– लायब्ररी आणि प्राक्टीकलसाठी ५० टक्केच शुल्क आकारणार
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वेगाने हालचाली
– कोरोनामुळे ॲानलाईन परिक्षा होत असल्याने शुल्कमाफी
– शुल्कमाफीच्या निर्णयाने हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा
– विविध विद्यार्थी संघटनांच्या मागणीवरुन नेमण्यात आली होती समिती
– समितीचा अहवाल मंजुरीसाठी व्यवस्थापन परिषदेकडे
वाशिम :
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु
सततच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त शेतात पाणी साचल्याने अतोनात नुकसान शेतीसह पिकाचे होत आहे नुकसान
– नागपूर जिल्हा बॅंकेतील रोखे घोटाळ्याचा खटला निकाली काढा
– चार महिन्यात घोटाळ्याचा खटला निकाली काढण्याचे आदेश
– मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायदंडाधीकाऱ्यांचे न्यायालयाला आदेश
– १२५.६० कोटी रुपयांचा घोटाळा १९ वर्षांपासून आहे प्रलंबित
– खटल्याच्या प्रगतीचा अहवाल दर महिन्याला न्यायालयात सादर करण्याचे आदेश
– मंत्री सुनिल केदार यांच्यावर आहेत जिल्हा बॅंकेतील घोटाळ्याचे आरोप
– १२५.६० कोटी रुपयांचा घोटाळा झाला तेव्हा सुनील केदार बॅंकेचे अध्यक्ष होते
मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून गेल्या 1 तासापासून मुंबई आणि मुंबईतील आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे
हिंदमाता रोडवर मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस, सर्वत्र पाणी साचले
येथे गुडघ्यापर्यंत पाणी जमले आहे आणि गाड्यांचे टायर सुद्धा पाण्याखाली गेली आहेत
जर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर अंधेरी सबवे, मलाड सबवे आणि मिलन सबवेमध्ये पाणी भरु शकते