Maharashtra News LIVE Update |म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक

| Updated on: Jul 20, 2021 | 12:24 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update |म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jul 2021 06:12 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या अडचणीत वाढ, दोषारोपपत्र दाखल 

    अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या अडचणीत वाढ

    श्रीपाद छिंदम याच्या विरोधात आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले

    यावेळी फोनवरून शिवीगाळ करण्याचा आवाज श्रीपाद छिंदम याचाच असल्याचे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल

    त्यामुळे श्रीपाद छिंदमच्या अडचणीत वाढ, फेब्रुवारी 2018 मध्ये घडला होता प्रकार

  • 19 Jul 2021 04:53 PM (IST)

    आशिष शेलार उभे राहिले तर ठाकरेंना बोलताना विचार करावा लागतो : चंद्रकांत पाटील

    मुंबई : छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील मंत्री खोटं बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत

    Obc समाजाबद्दल भाजपच्या मनात खोट असती तर मराठा आरक्षणवेळी तस बोलता आलं असतं

    आशिष शेलार हे उभे राहिले तर मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलताना विचार करावा लागतो, अशी ते तोफ आहेत

    12 आमदारांना निलंबित केलं, त्यांना वर्षभर काही करता येणार नाही

    यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही काळ अस्वस्थता होती

    Obc च राजकीय आरक्षण रद्द केलं तरी त्या ठिकाणी आम्ही obc उमेदवार उभे करणार हे ठरलं होतं


  • 19 Jul 2021 04:51 PM (IST)

    म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक

    – म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आता राज्य सरकारची परवानगी बंधनकारक

    – म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची सर्व कागदपत्रे राज्य सरकारला सादर करावी लागणार

    – म्हाडाचे भूखंड वितरित करण्यासाठीही शासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक

    – यापूर्वी म्हाडाच्या स्तरावर असे पुनर्विकास प्रकल्प राबवले जात होते

    – त्यामुळे त्याची कोणतीही माहिती शासनाकडे उपलब्ध नसायची

    – काही प्रकरणात अनियमितता झाल्यानंतर त्याची तक्रार राज्य सरकारकडे झाली

    – मात्र याबाबतची कोणतीच कागदपत्रे शासनाकडे उपलब्ध नसल्याने शासनाला यात काहीही करता आले नाही

    – अधिवेशनातही अशी प्रकरणे उपस्थित झाल्यानंतर शासनाकडे कागदपत्रेच नसल्याने उत्तर देण्यात अडचणी निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं

    त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 19 Jul 2021 04:10 PM (IST)

    एनसीबीकडून कुर्ला भागात छापा, ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड, 3 जणांना अटक

    मुंबई : एनसीबीने काल रात्री कुर्ला भागात छापा टाकला आणि मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड केला

    एनसीबीने या प्रकरणात 3 जणांना अटक केली.

    त्यांच्याकडून एनसीबीने 500 ग्राम सोने, 80 लाख कैश आणि 11 लाखांची एमडी ड्रग्स जप्त केली आहेत.

    हा ड्रग कारखाना 2 महिला चालवतात आणि या महिला अल्पवाईंन मुलं आणि महिलाकडूंन काम करून घेत होत्या

    एनसीबीने या 2 महिलांचा शोध सुरू केला आहे

  • 19 Jul 2021 12:08 PM (IST)

    सांगलीत 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणी भाजपा नगरसेवक महासभेत घुसले

    सांगली –

    87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणी भाजपा नगरसेवक महासभेत घुसले

    आयुक्तांसह आरोग्य अधिकारयांची चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी

    भाजपा नगरसेवकांनी प्रतिकात्मक तिरडी महासभेत ठेवत केले आंदोलन

    तर पालिकेच्या दारात भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत केले आंदोलन

  • 19 Jul 2021 12:02 PM (IST)

    अहमदनगरच्या संत निळोबारायांच्या पालखीच पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान

    अहमदनगरच्या संत निळोबारायांच्या पालखीच पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान

    पिंपळनेर येथील संत निळोबाराय मंदिरात पालखीचे पूजन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले , पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते

    त्यानंतर ही पालखी पंढरपूर कडे प्रस्थान

    यावर्षी मोजक्याच 40 वारकऱ्यांना घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये निळोबारायांच्या पादुका पंढरपूरला

  • 19 Jul 2021 12:01 PM (IST)

    रिफायनरीच्या मुद्यावरुन बालेकिल्ल्यात शिवसेनेला आणखी एक धक्का, रिफायनरी समर्थनार्थ शिवसैनिकांचं शिवसेनेला ‘सोडसत्र’ सुरुच

    रत्नागिरी –

    रिफायनरीच्या मुद्यावरुन बालेकिल्ल्यात शिवसेनेला आणखी एक धक्का

    रिफायनरी समर्थनार्थ शिवसैनिकांचं शिवसेनेला ‘सोडसत्र’ सुरुच

    शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर, माजी चार शाखा प्रमुख याच्यासह 100 कार्यकर्त्यांचा शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश

    राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायत शिवसेनेतून करणार भाजपमध्ये प्रवेश

    मंदा शिवलकर यांची रिफायनरी ला समर्थन केल्यामुळे शिवसेनेतून झाली होती हकालपट्टी

    थोड्याच वेळात होणार पक्षप्रवेश

  • 19 Jul 2021 12:00 PM (IST)

    शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेने एसी कॉलेजमध्ये केले आंदोलन

    इचलकरंजी –

    शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेने एसी कॉलेजमध्ये केले आंदोलन

    कॉलेज विद्यार्थ्यांना मधील फीमध्ये सवलत मिळाली पाहिजे स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने केले कॉलेजमध्ये  प्राचार्यांच्या केबिन बाहेर केले ठिय्या आंदोलन

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सौरभ शेट्टी यांनी केलेले आंदोलन

    फीमध्ये जोपर्यंत सवलत मिळत नाही तोपर्यंत करणार कॉलेजमध्ये किती आंदोलन यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी आक्रमक

  • 19 Jul 2021 08:51 AM (IST)

    संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूर कडे निघण्यासाठी एसटी बसमध्ये आल्या

    देहू ,पुणे

    संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरामधून निघाल्या

    -संत तुकाराम महाराजांच्या पादुका आजोळ घरी इनामदार वाड्यात आल्यात

    संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूर कडे निघण्यासाठी एसटी बसमध्ये आल्या

  • 19 Jul 2021 07:53 AM (IST)

    मुंबईमध्ये मागील काही महिन्यात 36.5 कोटींची ड्रग जप्त

    मुंबईमध्ये मागील काही महिन्यात 36.5 कोटींची ड्रग जप्त

    ड्रग विकणाऱ्या परदेशी नागरिक ठरत आहेत मोठी डोकेदुखी

    ड्रग विकणार्या २९ परदेशी नागरिकांना केलीय गेली अटक

    ANC नी १० तर NCB केलाय १९ परदेशी नागरिकांना अटक

    अटक आरोपीं पैकी बहुतांश आहेत नागिरीयन नागरिक

    परदेशी नागरिकांच ड्रग विक्रीचा मोठा आहे सिंडिकेट

    आपापला एरिया वाटप करून हे करतात ड्रग्सची विक्री

  • 19 Jul 2021 07:53 AM (IST)

    हुतात्मा एक्सप्रेस 31 ऑगस्टपर्यंत रद्द

    सोलापूर – हुतात्मा एक्सप्रेस 31 ऑगस्टपर्यंत रद्द

    दुहेरीकरण्याच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे ब्लॉकचा घेतला निर्णय

    या ब्लॉकमुळे सोलापूर -पुणे- सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 31 ऑगस्टपर्यंत रद्द

    मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भालवणी -भिगवण सिंगल लाईन सेक्शनमध्ये सुरू आहे दुहेरीकरणाचे  काम

  • 19 Jul 2021 07:51 AM (IST)

    एकनाथ महाराज पालखीचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान

    औरंगाबाद –

    एकनाथ महाराज पालखीचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान

    आज सकाळी साडेआठ वाजता होणार पालखीचे प्रस्थान

    रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत होणार प्रस्थान

    40 मानकऱ्यांना सोबत पालखी होणार पंढरपूरला रवाना

    शिवशाही बस मधून पालखी जाणार पंढरपूरला

    काही वेळात सुरू होणार पालखी प्रस्थान सोहळा

  • 19 Jul 2021 07:51 AM (IST)

    आजपासून होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याला सुरवात

    पुणे

    आजपासून होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याला सुरवात

    सकाळी नऊ पासून सुरु होणार ‘राजसंवादाला’ सुरवात

    पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ऍक्शन मोड मध्ये

  • 19 Jul 2021 07:48 AM (IST)

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड

    पुणे :

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड

    विश्‍वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम यांची निवड करण्यात आली असून कार्यकारी विश्‍वस्त म्हणून डॉ. पी. डी. पाटील आणि विश्‍वस्त म्हणून यशवंतराव गडाख यांची निवड

    परिषदेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ आणि लेखक डॉ. तानाजीराव चोरगे आणि ज्येष्ठ प्रकाशक राजीव बर्वे यांची निवड

  • 19 Jul 2021 07:47 AM (IST)

    नागपुरातील दिव्यांग मनोज ठवकर मृत्यू प्रकरण, पीएसआयसह तीन पोलीस कर्मचारी निलंबित

    – नागपुरातील दिव्यांग मनोज ठवकर मृत्यू प्रकरण

    – पीएसआयसह तीन पोलीस कर्मचारी निलंबित

    – पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे निलंबीत

    – नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली गंभीर दखल

    – मास्क न घातल्यामुळे तीन पोलिसांनी मनोज ठवकरला केली होती मारहाण

    – भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती कारवाईची मागणी

    – मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा सीआयडी कडून सुरु आहे तपास

    – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही केली होती कारवाईची मागणी

  • 19 Jul 2021 07:45 AM (IST)

    नाशिक मनपाच्या सहा प्रभाग समिती सभापतींचा आज फैसला

    नाशिक – मनपाच्या सहा प्रभाग समिती सभापतींचा आज फैसला..

    पंचवटी आणि नशिरोड विभागात आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

    पश्चिम विभागात मनसे भाजप एकत्र येण्याची शक्यता

  • 19 Jul 2021 07:41 AM (IST)

    संत तुकाराम महाराजाच्या पादुका आज एसटी बस ने पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत

    पुणे

    -संत तुकाराम महाराजाच्या पादुका आज एसटी बस ने पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत

    -कोरोनाच्या निर्बन्ध मध्ये हा सोहळा पार पडत आहे

    -ज्या एसटी बस मधून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला जानार आहे त्या एसटी बस ला देहू संस्थान कडून फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे

  • 19 Jul 2021 07:40 AM (IST)

    नागपुरात कोरोनानंतर डेंग्यूने वाढवली चिंता

    – नागपुरात कोरोनानंतर डेंग्यूने वाढवली चिंता

    – १४ दिवसांत डेंग्यूच्या ९६ रुग्यूची नोंद, प्रशासनाची चिंता वाढली

    – जानेवारीपासून आतापर्यंत १९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – चार संशयित डेंग्यू रुग्णांचा मृत्यू

    – डेंग्यूला नियंत्रणात ठेवण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरु

    – डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांचा सहभागंही आवश्यक

  • 19 Jul 2021 06:39 AM (IST)

    भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे केमिकल गोदामास भीषण आग 

    भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे केमिकल गोदामास भीषण आग

    गोदामात केमिकल साठविलेले असल्याने पाण्याच्या संपर्कात येण्याने आग भडकत आहे

    घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी हजर

    पाऊस सुरू असल्याने आग विझविण्यात येत आहेत अडचणी

  • 19 Jul 2021 06:37 AM (IST)

    मुंबईमध्ये रिमझिम पाऊस

    मुंबईमध्ये रिमझिम पाऊस

    रेल्वेसेवा सुरळीत सुरु

    तिन्ही मार्गावर आतापर्यंत कुठेही पाणी साचलेलं नाही

  • 19 Jul 2021 06:36 AM (IST)

    संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

    नाशिक –

    संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

    शिवशाही बस मध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका

    मानाच्या 40 दिंडीकरी,विणेकरी आणि वारकऱ्यांसोबत निघाली निवृत्तीनाथांची पालखी

    तत्पूर्वी मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष

    कुशावर्त तीर्थावर स्नान करून पादुका आणि पालखीचं बस मधून प्रस्थान

    निर्बंध असले तरी वारकऱ्यांचा उत्साह मात्र कायम