महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
सातारा: पत्नीला दारूचे व्यसन असल्याच्या कारणातून पतीने केला पत्नीचा खून
आरोपी पती बोरगाव पोलिसांच्या ताब्यात
सातारा तालुका हद्दीतील नागठाणे गावातील घटना
उस्मानाबाद – शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकात वाद
झालेल्या राड्यात शिवसेना परंडा तालुकाप्रमुख अण्णा जाधव जखमी
शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर पाटील यांचा फोटो न टाकल्याने मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.
अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही
यवतमाळ- भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर
मुंबईत राष्ट्रवादी नेत्याची भेट घेऊन प्रवेशाबाबत झाली चर्चा
पुढील काही दिवसात आर्णी मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये आदिवासी नेतृत्वाची पोकळी राजू तोडसाम यांच्या प्रवेशाने भरली जाणार
भाजपला धक्का
आमदार असताना वादग्रस्त राहले राजू तोडसाम त्या कारणाने भाजपने तिकीट कापत डॉ संदीप धुर्वे यांना तिकीट दिलं होतं
त्या निवडणुकीत तोडसाम यांनी बंडखोरी करत अपक्ष उभा राहून तिसऱ्या क्रमांकाची मते घेतले होती
तोडसाम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राखीव मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा
पनवेल : तळोजा येथील कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू
काल तिघांनी मारल्या होत्या पाण्यात उड्या
अद्याप मृतदेह मिळाले नाही
पडघा गावातील तिघे जण पोहण्यासाठी गेले होते
यात दोघांचा मृत्यू तर एक जण वाचला
बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम अग्निशमन विभागाकडून सुरू
काल तिघांनी मारल्या होत्या पाण्यात उड्या
अद्याप मृतदेह मिळाले नाही
उड्या मारताना व्हिडिओ वायरल, तरुणांच्या शोधासाठी पूर्ण गाव
प्रल्हाद भरत ठाकूर, भाऊ नामा बन्सारी दोघांचा शोध सुरू
भिवंडी : बकरी ईदनिमित्त भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या 38 तात्पुरत्या कुर्बानी सेंटरच्या उभारणीला उच्च न्यायालयाने केली मनाई.
जीव मैत्री ट्रस्टचे विनोद कोठारी यांनी केली होती उच्च न्यायालयात याचिका
दिल्ली : राहुल गांधीच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा
मुंबई महापालिकेसह स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार
प्रभारी एच के पाटील यांचे म्हणणे की लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र लढवल्या जातील
स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महापालिकेसह कशा लढवायच्या यांचे अधिकार प्रदेशातील नेते मिळून निर्णय घेतील.
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात घेणार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट
– बाबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी पर्वती परिसरातील निवासस्थानी घेणार भेट
– राज ठाकरे दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर
– उद्या सकाळी राज मुंबईकडे रवाना होणार
– राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
– शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
– महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार
– दोन वर्षानंतर होणार परीक्षा
– २०१८-१९ मध्ये झाली होती शेवटची परीक्षा
– दरवर्षी ७ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात
– दोन वर्षाच्या गॅपमुळे १० लाख विद्यार्थी यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज
१ ली ते ४ थी आणि ५ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य
– जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी ४० हजार
शिक्षकांची पदे रिक्त
– शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार
पुणे — छावणी परिसरात एम जी रोड वंडरलँड बिल्डिंग येथे बेसमेंटमध्ये आग
पुणे छावणी व पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल.
आग विझवण्याचे काम सुरू
दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी AICC तून निघाले.
AICC त पक्षाचे नेते मुकुल वासनिक यांची घेतली आधी भेट
वासनिक यांना भेटून पटोले आता राहुल गांधी यांना देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी
पनवेल
तळोजा येथील कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू
पडघा गावातील तिघे जण पोहण्यासाठी गेले होते
यात दोघांचा मृत्यू तर एक जण वाचला
डुबलेल्या दोघांचे मृत्यदेह शोधण्याचे काम अग्निशमन विभागाकडून सुरू
काल तिघांनी मारल्या होत्या पाण्यात उड्या अद्याप मृतदेह मिळाले नाही
उड्या मारताना व्हिडिओ वायरल, तरुणांच्या शोधासाठी पूर्ण गाव
प्रल्हाद भरत ठाकूर, भाऊ नामा बन्सारी दोघांचा शोध सुरू
अभिनेता शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा आणि रायन थार्प यांना 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे
अभिनेत्री शिल्पा शेट्टी के पति और व्यवसायी राज कुंद्रा और रयान थारप को 23 जुलाई तक पुलिस हिरासत में भेजा गया। https://t.co/CM2J0l2hnj
— ANI_HindiNews (@AHindinews) July 20, 2021
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले AICC मध्ये दाखल
पक्षचे महासचिव मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा
दुपारी 3:30 वाजता राहुल गांधी यांची घेणार भेट
बैठकीला के सी वेणूगोपाल, एच के पाटील हे सुद्धा उपस्थित असणार
संघटनात्मक विषयांवर होणार चर्चा
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडी कोठडी वाढवली..
26 जुलैपर्यंत गिरीश चौधरी यांनी ईडी कोठडीत पाठवण्यात आल.
ईडीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्याने ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली..
न्यायाधीश एस एच गवलानी यांनी सुनावणी कोठडी..
पुणे
खडकवासला धरण साखळीत यावर्षी हंगामातील सर्वाधिक पाऊस
खडकवासला धरण साखळीत पाणीपातळीत दोन टीएमसीने वाढ
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात मिळून 11.3 टीएमसी पाणीसाठा
मागच्या वर्षी आजच्याच दिवशी धरणात होता 9.47 टीएमसी पाणीसाठा
– नाशिकमध्ये सुवर्णकार समाजाच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू विरोधात आंदोलन
– सराफ बाजारातील सोन्या मारुती चौक परिसरात केलं आंदोलन
– राजीनामा द्या..राजीनामा द्या बच्चू कडू राजीनामा द्या.. जोरदार घोषणाबाजी
– बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी आडगावकर कुटुंबियांची घेतली होती भेट ,रसिका अडगावकर आणि आसिफ खान यांच्या लग्नाला दर्शवला होता पाठिंबा
– आसिफ मुस्लिम समाजातील तर रसिका हिंदू समाजातील असल्याने दोघांच्या लग्नाला काही हिंदू संघटना विरोध करत असल्याचं समोर आल्यान कुटुंबीयांनी लग्न सोहळा केला होता रद्द
– मात्र या लग्नाला बच्चू कडूनी पाठिंबा देत हिंदू सुवर्णकार समाजा बद्दल खालच्या थरावर जाऊन वक्तव्य केले असल्याचा सुवर्णकार समाजाचा आरोप
– मुंबईच्या विलेपार्ले परीसरात पूलाचं काम सुरु असल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु
– ४ किलोमीटर वाहनाच्या लागल्या रांगा
– ३० मिनिटं वाहतूक धिम्या गतीने सुरु
– कांदिवली ग्रोवल्स माॅल इथे ट्रॅफिकचा खोळंबा
सिंधुदुर्ग –
भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत
दरड हटविण्याचे काम युद्धपातीवर सुरू
घाटातून एकेरी वाहतूक सुरू
गेल्या चार दिवसात चार वेळा या घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली आहे
लगतचा करूळ घाट खचल्याने तेथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे त्यामुळे भुईबावडा घाटातून वाहनांची वर्दळ वाढली होती
मात्र सतत दरड कोसळून वाहतूक विस्कळित होत असल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे
कोल्हापूर
कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप
मात्र जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम कायम
पंचगंगा नदीच्या पाणी पातळी देखील वाढ
पंचगंगा नदीची पाणीपातळी 27 फुटांवर
कल्याण डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण होते
अधून मधून रिमझिम पाऊस सुरू होता
आता जोरदार पाऊस सुरु झाला
खोपोलीतील नाल्यात वाहून गेलेल्या दोन चिमुकल्यांपैकी मुलीचा मृतदेह सापडला
निलभ्भां श्रीकांत हचंलीकर (7) या मुलीचा म्रुतदेह खालापुर तालुक्यातील महड येथील पातळगगां नदीच्या पुलाजवळ रेस्क्यु टिम ला म्रुतदेह सापडला.
खोपोलीतील क्रांतीनगर लगतच्या नाल्यातुन काल दुपारी सख्खें भाऊ बहीण वाहुन गेले होते.
काल दिवसभर शोधमोहीम राबवुन आज पुन्हा सकाळ पासुन खोपोली पोलीसांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली.
अद्याप ही बाबु श्रीकांत हचंलीकर (7) सदर मुलीचा भाऊ हा बेपत्ता आहे. शोध मोहीम सुरुच आहे.
सिंधुदुर्ग –
कालपासून जिल्ह्यात पावसाचा वेग मंदावला,
आज पहाटेपासून ही रिपरिप पाऊस,
मात्र अधून मधून मोठी सर
आज सकाळ पर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 57 मिमी पावसाची नोंद
देवगड आणि कणकवली तालुक्यात सर्वात जास्त 87 मिमी पाऊस पडला
जळगाव – हतनूर धरणाचे 10 दरवाजे पूर्णपणे उघडले
धरणातून 18 हजार 928 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
पंढरपूर –
मानाच्या दहा पालख्यांच्या नगर प्रदक्षिणेला सुरुवात,
मानाची पहिली पालखी संत निळोबाराय यांची नगरप्रदक्षिणा सुरु,
चंद्रभागा स्नान करून पालखी नगर प्रदक्षिणा करतीये,
आता मानाचे दहा पालख्या एकामागे एक येतील
सिंधुदुर्ग –
निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर वाळूत साकारलं विठ्ठलाचं मनमोहक रूप.
कुडाळ पाट येथील यूवा चिञकार अल्पेश घारे याची कलाकृती.
वेंगुर्ल्यातील निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किना-यावर फक्त रांगोळी व वाळूच्या सहाय्याने
हातांच्या बोटांनी 30 फुट आकाराची साकारली विठ्ठलाची रांगोळी.
बंडातात्या कराडकर आज पंढरपुरात येण्याची शक्यता
मात्र पोलीसांची बंडातात्यावर नजर
पोलिसांना चकवा देत आळंदी ते पंढरपूर पायी वारी काढण्याचा बंडातात्यानी केला होता प्रयत्न
मात्र आज पंढरपूरात दर्शनासाठी बंडातात्या कराडकर येण्याची शक्यता
आजही बंडातात्या पोलिसांना चकवा देणार का?
पंढरपूरात बंडातात्या पोहोचण्यासाठी कराडवरून निघणार
नागपूर –
नागपूर जिल्ह्यात वाढत आहे डेंगू रुग्ण
जिल्ह्यात आढळून आले 205 रुग्ण
ग्रामीण भागात 118 तर शहरात 87 रुग्ण आढळून आले
जिल्ह्यात कोरोना विषयी लोकजागृती राबवून कोरडा दिवस पाळण्याच आवाहन
पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा बैठक घेऊन केलं आवाहन
तर कोरोना परिस्थिती चा सुद्धा आढावा घेण्यात आला
नाशिक –
भाविकांविनाच यंदाची आषाढी..
विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासून महापूजेला सुरुवात..
हुंडीवाला लेन मधील ज्ञानेश्वर मंदिरात अभिषेकाला सुरुवात..
कोल्हापूर
गर्भलिंगनिदान करणार्या टोळीचा करवीर पोलिसांकडून पर्दाफाश
करवीर तालुक्यातील परिते इथे रिकाम्या घरात सुरू होत गर्भलिंग निदान
पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना केली अटक तर कथित महिला डॉक्टर पसार
सोनोग्राफी मशीनसह व अन्य साहित्य जप्त
आतापर्यंत जवळपास 45 महिलांच्या गर्भलिंग तपासणी केल्याची प्राथमिक माहिती
एजंटांना दहा ते बारा हजार रुपयांच कमिशन देऊन सुरू होता गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा
करवीर पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ
गर्भलिंग निदानाचा मोठ रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
मात्र जिल्ह्यात सरासरी 28 टक्केच पाऊस..
गतवर्षीच्या तुलनेत 9 टक्के पाऊस कमीच..
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 48 टक्केच पेरणी
मराठवाड्याची भिस्त असलेल्या दारणा समूहात गतवर्षीपेक्षा 3 टक्के कमी साठा
नालासोपारा:- वसई विरार नालासोपाऱ्यात मध्यरात्री पासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
आज सकाळ च्या वेळेत शहरातील सर्व व्यवहार, लोकल सेवा, सुरळीत सुरू आहेत..
सकल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला आहे मात्र रस्त्यावर काचारा मोठ्या प्रमाणात साचालया
वसई विरार महापालिकेचे स्वच्छता दूत सकाळ पासूनच कचरा उचलत आहे
– नागपूर जिल्ह्याच्या जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयस्तंभ चौकात अपघात,
ट्रकने दुचाकीला उडवलं,
अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
ट्रक भरधाव वेगात असल्यानं अपघात झाल्याची।प्राथमिक।माहिती,
24 वर्षीय वैभव शंभरकर आणि 19 वर्षीय मोहिनी तिवारी अशी मृतकांची नावे,
आरोपी ट्रक चालक सोनू सहारे याला पोलिसांकडून केली अटक
पेण
कळवे गावातील गणतींच्या कारखान्याला पावसाचा फटका
मोठ्या प्रमाणात गणपती मुर्तींचे नुकसान
सध्या पावसाचा जोर ओसरला
पण काल पर्यंत कारखाने गेले होते पाण्याखाली
जवळपास एका कारखान्यात १० ते १५ हजार मुर्त्या मुर्तीकार बनवतो
या सर्व मूर्तीकारांच मोठ्या प्रमाणात नुकसान
कळवे गावा जवळीक दादर खाडी मुळे गावाला बसतो दरवर्षी फटका
३ संप्टेंबर २०१९ ला ही झाले होते नुकसान
गोवा- कोकण रेल्वे मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक अखेर सुरू
वाहतुकीसाठी मार्ग खुला मात्र अजूनही कोकण रेल्वेच्या गाड्या धावत आहेत उशिरानं
निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस तीन तास उशिरा, मत्स्यगंधा अप अँड डाऊन ट्रेन तब्बल चार तास उशिरा
कालची रात्रीची कोकणकन्या आणि आजची मांडवी एक्सप्रेस कोकण रेल्वे प्रशासनाने केलीये रद्द
काल रात्री बसून वाहतूक सुरु झाल्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा दावा
रात्री ट्रॅक्टर फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाल्याची कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांची माहिती
गोव्यातील थिविम आणि करमाळी दरम्यानच्या ओल्ड गोवा बोगद्यात चिखल आणि माती आली होती रेल्वे रुळावरती
पुणे :
राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे वेळापत्रक केलं जाहीर
विद्यार्थ्यांना सीईटीसाठी २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार
तर सीईटी परीक्षा२१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाणार
इंग्रजी, गणित (भाग १ व २), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व २ ) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार
कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विषयनिहाय २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जाणार
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही
मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागणार
सोलापूर
मोहोळ येथील घटनेत जखमी असलेल्या दुसऱ्या शिवसैनिकाचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू
14 जुलै रोजी राजकीय वैमन्यासातून दोघांवर टेम्पोद्वारे धडक दिल्याचा होता नातेवाईकांचा आरोप
घटनेत सतीश क्षीरसागर या शिवसैनिकाचा जागीच झाला होता मृत्यू तर विजय सरवदे हा गंभीर जखमी होता
सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान विजय सरवदे यांचा देखील मृत्यू
माथेरान
माथेरान घाटात वाँटरपाईप स्टेशन जवळ अतिव्रुष्टीमुळे दरड कोसळुन रस्ता बदं झाला होता.
तसेच बराज वेळ या ठिकाणी भुसख्खंल पहायला मिळाले.
नेरळ माथेरान घाट रस्त्यात नेरळ पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्या माध्यमातून दरड हटवण्याचे प्रयत्न केले गेले.
तर नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सदस्यांनी गाडी जाण्याएवढा रस्ता मोकळा केला.
तरीही दरड पडण्याचा धोका मात्र कायम आहे. अद्याप कोणतीही जिवीतहानी नाही.
पुणे
पुणे शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या 18 दिवसातच डेंग्यूच्या तब्बल 86 रुग्णांची नोंद
महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागात या आकडेवारीची नोंद झाली असून, क्षेत्रीय कार्यालयाद्वारे जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनाही वाढविण्यात आल्या
सिंधुदुर्ग –
जिल्ह्यात हलका हलका पाऊस.मुसळधार पावसाचा जोर ओसरला.पावसाने केले होते जनजीवन विस्कळीत.पावसाचा फटका सखल भागासह घाट मार्गांना.खचल्याने करूळ घाट मार्गावरील वाहतूक अजून ही बंद तर दरड पडल्याने भुईबावडा घाटातील वाहतूक ही विस्कळीत झाली होती.या दोन्ही घाटातील सर्व वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.
रायगड –
काल दुपारी खोपोलीतील क्रांतीनगर येथील नाल्यातुन वाहुन गेलेल्या दोन चिमुकले अद्याप बेपत्ता. रात्री पर्यंत शोधमोहीम चालु होती. काळोख झाल्याने शोध मोहीम थाबंविण्यात आली होती ती आज ती आज सकाळी पुन्हा सुरु करण्यात येईल.
रायगड
रात्रीपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी झाला आहे.
कुडंलिका, आबां व पातळगंगा नदी ईशारा पातळी पेक्षा जास्त ने वाहत आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर रात्री खालापुर टोलनाका नतंर घाट चढतानाच्या दरम्यान दरड कोसळली.
खोपोली हद्दीत त्याठिकाणी हायवे एक्स्टेंशन चे सुरू आहे काम. जीवित हानी नाही.
बोरघाट पोलीस व आय आर.बी यत्रंणेने दरड हटवुन काम युद्ध पातळीवर. ट्रॅफिकचा अडथळा दुर केला.
मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून 4 घरांचे नुकसान झाले होते त्याठिकाणी दरडीमधील भेगा रुंदावल्या असल्याचे पहायला मिळाले.
तिथे संरक्षक भितं बाधंण्याची मागणी होत आहे.
काल रात्री पासुन पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरले. पाली खोपोली व खुरावले भैरव रस्ता रहदारीकरिता खुला करण्यात आला आहे.
– प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथे अभिषेक आणि पूजन संपन्न
– विठ्ठल-रुक्मिणी मन्दिर राहणार सलग दुसऱ्या वर्षी भाविकांच्या दर्शनासाठी बन्द
– एक ते दीड लाख भविकांचे होणार हिरमोड
– शासनाच्या नियमांचे पालन करतात अभिषेक व पूजन पहाटे शेतकरी व सरपंच यांच्या हस्ते संपन्न
आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.
यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. pic.twitter.com/LRZfzJvzKU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2021