महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates
बदलापूर :
गॅस लिकेज प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई
नोबेल इंटरमिडीएट्स कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश
कंपनीत ज्या रसायनांची निर्मिती सुरू होती, त्याच्या उत्पादनाची परवानगीच कंपनीकडे नव्हती
एमपीसीबीच्या पाहणीत धक्कादायक बाब आली समोर
काल लिक झालेला गॅस आरोग्यासाठी धोकादायक असल्याचीही एमपीसीबीची माहिती
कराड :
कराडच्या जुन्या तहसील कार्यालयासमोरच्या झाडांची कत्तल
पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येलाच झाडे तोडली
कराड नगरपालिकेच्या हद्दीतील झाडे विना परवानगी घेता तोडल्याने खळबळ
पर्यावरण प्रेमींच्याकडून नाराजी
नागपूर –
– राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर अध्यक्षांचा राजीनामा
– अनिल अहिरकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला राजीनामा
– दुनेश्वर पेठे आणि प्रशांत पवार राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत
– महानगरपालिका निवडणूकीपूर्वी नागपूर राष्ट्रवादीत होणार मोठे फेरबदल
जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे:
स्थानिक पातळीवर काही वाद झाला असेल तर समन्वयातून मार्ग काढू
कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही
स्थानिक राजकारणात तीन पक्ष असल्यानं भांड्याला भांड लागतं
पण आम्ही त्याबाबत चर्चेतून मार्ग काढू
संजय राऊत काय बोलले हे मला माहिती नाही
मराठा समाजाला न्याय द्यायची आमची भूमिका आहे
आरक्षणाबरोबर निकालाविरोधात कोर्टात जायचं का हे तिन्ही पक्ष चर्चा करुन निर्णय घेतील
वडेट्टीवार आणि मुख्यमंत्र्यांचं काय बोलणं झालं हे माहिती नाही
पण आमच्यात कुठलाही असमन्वय नाही
मालेगाव : वादळी वाऱ्यामुळे मोठं झाड कोसळलं
आझाद नगर कोहिनुर मस्जिद जवळ कोसळलं झाड
झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूक झाली बंद
सुदैवाने कोणती ही जीवितहानी नाही
मालेगाव अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून झाड हटविण्याचे काम सुरू
बीड :
शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्याकडून छत्रपती शिवाजी स्टेडीयमची पाहणी
मोर्चाला प्रशासनाकडे परवानगी मागितली असती तर लॉकडाऊनमुळे परवानगी दिली नसती,
त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली नाही,
मात्र जरी परवानगी नाकारली असली तरी आम्ही मोर्चा काढणार,
मोर्चा काढणार आहोत हे आम्ही मुख्यमंत्री , गृहमंत्री यांना सांगितलं आहे
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर तरुण तरुणीमध्ये आक्रोश वाढलाय,
उद्या जर प्रशासनाची कारवाई झाली तर मी सामोरं जायला तयार
बाळासाहेब थोरात यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
– मविआ सरकार काॅमन मिनिमम प्रोग्रामवर चालतं. त्याचं भान ठेवणं गरजेचं, म्हणजे वाद होणार नाहीत.
– आमच्यात वाद होतात. पण ते कुणात होत नाहीत. तीन पक्षाचं सरकार आहे, तीन वेगळ्या विचार धारेवर चालतं.
– बीडमध्ये आंदोलन करू नये, अशी सरकारची भूमिका. अजूनही कोरोना संपला नाहीय. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार आग्रही आहे. ते लागू व्हावं ही आमचीही इच्छा
– मुख्यमंत्री काम करतात, तसंच काम सगळे मंत्री करत आहेत. त्यांचं सरकार नसल्याने देवेंद्र फडणवीस असं बोलले असतील.
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगाव फाट्याजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात 3 ठार एक जखमी. पहिला अपघातात आयशर ट्रकने मोटार सायकलला जबर धडक दिल्याने त्यात बाप-लेकीचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात मोटारसायकल आणि मोटरसायकलचा होऊन त्यात आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे
धुळे महापालिकाच्या महापौर चंद्रकांत सोनार याच्या वाहनाला अपघात
मोराने गावं नजीक झाला अपघात
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
महापौर सोनार देखील होते गाडीत
मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने ११ मे २०२१ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विधी तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल आज राज्य सरकारला सोपवला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित होते.
पुणे :
पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात
सकाळपासून शहरात होतं ढगाळ वातावरण
हवामान विभागाने पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला
इंदापूर :
देशातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय
1 एप्रिल पासून 20 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित होणार
यापूर्वी 10 टक्के इथेनॉल पेट्रोल मिश्रित निर्णय होता, तो अधिक 10 टक्क्याने केंद्राने वाढविला
आजच तशे राजपत्र घोषित झाले, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती
देशातील उस कारखाने व उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासादायक केंद्राचा निर्णय
या निर्णयामुळे साखर उद्योगाला व देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊसउत्पादन बायो-प्रोडक्टच्या माध्यमातून आर्थिक बळकटी मिळणार, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग:
केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा, तौक्ते चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या कोकण किणारपट्टीच्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथका दौऱ्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची केंद्र सरकारवर टीका, सवतीचं पोर’ या भावनेतून केंद्र सरकार महाराष्ट्राकडे पाहत असल्याची टीका, केंद्र सरकार महाराष्ट्राकडे अत्यंत कलूशीत नजरेने पाहात असून निसर्ग चक्रिवादळाच्या वेळी सुद्धा केंद्रीय पथक उशीरा आलं आणि आताही हे पथक उशीराने येत आहे. या पथकाला झालेलं नुकसान तेव्हाही दिसलं नाही आणि आताही दिसणार नाही. बैल गेला आणि झोपा काढल्या सारखाचं हा पाहणी दौरा असल्याची खरमरीत टीका
मुक्ताईनगरच्या आदिशक्ती मुक्ताईआईचा 724 वा अंतरधान समाधी सोहळ्यानिमित्त मुक्ताई मंदिरात आंब्याची आरस सजविण्यात आले. कोरोना काळ असल्यामुळे साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला.
जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकमसह 20 ते 25 कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल.
एक वर्षाच्या मुदतवाढ मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात काढली होती ढोल ताशांची मिरवणूक.
जिल्हा शल्य चिकित्सक निकम यांनी कोरोना नियमांचा उडवला फज्जा..
अमरावती शहर सिटी पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा51(ब) व 188 कलम अनव्ये गुन्हे दाखल..
आदर्श भाडेकरू कायद्याला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर शिवसेनेतर्फे आज शिवसेना भवन येथे त्याचा निषेध करण्यात आला आहे…सेना आमदार सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडत असून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकवटले होते….या कायद्याचा मुंबईला मोठ्या प्रमाणात फटका बसणार असून त्यात सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने एक प्रकारे पागडी मालक आहेत त्यांच्या बाजूने हा कायदा केला आहे त्यामुळे केंद्र सरकारचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला
सई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव 2 दिवसापासून बेपत्ता
वसई विरार महापालिकेत मागच्या एक वर्षांपासून कोव्हिडं च्या बॉडी ची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार जाधव कडे होता…
प्रेमसिंग जाधव यांनी सहाय्यक आयुक्त पदावरून वसई विरार शहरातील अनेक अनाधिकृत बांधकाम ही भुईसपाट केलेली आहेत
2 जून रोजी कामावारून सुटल्या नंतर ते घरी परत गेलेच नाहीत..
याबाबत विरार पोलीस ठाण्यात जाधव बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
प्रेमसिंग जाधव अचानक बेपत्ता झाल्याने, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे..
यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले याविषयी आता पोलीस तपास करीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपुर्व रिमझिम पावसाला सुरुवात
सकाळपासून ढगाळ वातावरणा नंतर रिमझिम पावसाला सुरुवात
वातावरणात गारवा, नागरिकांना उकड्यापासून दिलासा..
या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत
– पॅालीसी डीसीजन घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं असतं
– पण या सरकारमध्ये अनेक मंत्री बोलतात
– प्रत्येक गोष्टीचं श्रेय्य घेण्याचा प्रयत्न आहे
– मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावायला हवी
– लोकांमध्ये संभ्रम आहे
– सात ते दोन हा निर्बंध चुकीचा वाटतो
– मागासवर्गीय आयोग नेमने म्हणजे उशीरा आलेलं शहाणपण
– हा आयोग आधीच यायला हवा होता
– राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्यामुळे वेगवेगळे बहाने सांगीतले जात आहेत
– कनव्हीन्स करता येत नाही, त्यामुळे हे सरकार गोंधळाचं वातावरण निर्माण केले जात आहे
मराठा आरक्षणाची सत्यता या विषयावर काँग्रेसचे प्रवक्ते राज्यभरात घेणार पत्रकार परिषदा,
नाना पटोलेंच्या सर्व प्रवक्त्यांना आदेश, मराठा आरक्षणाची सत्यता समाजापर्यंत पोहोचवण्याचे आदेश,
उद्या बीडमध्ये मराठा संघर्ष मोर्चाचा मोर्चा होतोय,
त्या आधी मराठा आरक्षणाची सत्यता सांगण्याठी बीड जिल्हा काँग्रेसची पत्रकार परिषद,
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय लाखे घेणार पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेची सुरुवात आज मराठवाड्यातून करणार …
राज्यभरात होणार पत्रकार परिषदा…
श्रीवर्धनच्या निकासासाठी ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या वतीने ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
श्रीवर्धनचं गत वैभव पुन्हा अधोरेखित करू… निसर्गाने नटलेल्या परिसराचा विकास करणार…
त्यासाठी कोकणाला अजित दादांकडून भरभरून मदत मिळेल, – रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचं वक्तव्य…
यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत – आचार्य तुषार भोसले
– समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी
– मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी.
– मात्र यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत, भाजप आध्यात्मिक आघाडी ची भूमिका
बारामती शहरातील CCTV प्रकल्प रखडला..
– 320 अत्याधुनिक कॅमेरांद्वारे ठेवली जाणार होती शहरावर नजर..
– CCTV प्रकल्प रखडल्यानं पोलिस यंत्रणेची होतेय अडचण..
– CCTV फुटेजसाठी पोलिसांना घ्यावा लागतोय बाजारपेठेतील दुकानदारांचा आधार..
– CCTV प्रकल्पाचे काम हाती घेण्याची नागरीकांची मागणी
लॉकडाऊनमुळे टोमॅटो उत्पादकांचं मोठं नुकसान…
– दिड ते दोन रुपये किलो दराने होतेय टोमॅटोची विक्री..
– टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हैराण..
– विषाणूजन्य रोगाचाही टोमॅटोवर परिणाम…
– टोमॅटो उत्पादकांचं कोट्यावधी रुपयांचं झालंय नुकसान
माळशेज रस्त्यावर मोटार सायकल व ट्रकचा भीषण अपघात
अपघातात डोंबिवली येथील 38 वर्षीय तरुण जागेवर ठार
कल्याण, मुरबाड, माळशेजघाट या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते व या रस्त्याची रुंदी कमी असल्याने वारंवार असे अपघात घडत असतात.
त्यामुळे या रस्त्यावर अपघातात अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. म्हणून या रस्ता रुंदीकरणाची मागणी नागरिक करतायत.
बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून काढणार मोर्चा,
मोर्चाची तयारी पुर्ण विनायक मेटेंची माहिती,
प्रशासनं प्रशासनाचं काम करतंय आम्ही आमचं काम करतोय, उद्या मोर्चा निघणार,
बीडचा मोर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे मोर्चे निघतील,
पुढच्या आंदोलनाची दिशा उद्याच्या मोर्चात जाहीर करणार,
सरकारला अल्टीमेटम द्यायची वेळ संपलीये, आम्ही काय निर्णय घ्यायचा ते ठरवू,…
मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील,
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडीयम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार विराट मोर्चा
विनायक मेटेंची माहिती
शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार किती बहुजनद्वेष्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, अशी जोरदार टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार वर केली आहे
-लॉकडाऊन मुळे बंद असलेला कांदा मार्केट 70 दिवसानंतर सुरु
-पहिल्याच दिवशी 19 हजार 760 कांदा गोण्यांची आवक
-कांद्याला अठराशे ते एकवीसशेचा भाव
-कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
एकच प्लॉट 3 जणांना विकला, शेगांव येथील प्रकार, 3 आरोपींवर गुन्हा दाखल,
प्लॉट खरेदी विक्री प्रकरणात महसूलचे काही अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सहभागी,
पोलिसांनी प्लॉट विक्री प्रकरण गांभीर्याने घेतलं असून खरेदी विक्रीत प्रचंड अनियमितता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले…
नाशिक -परिवहन विभागात भ्रष्टाचार आरोप प्रकरण
नाशिक पोलिसांकडून आणखी 4 अधिकाऱ्यांची चौकशी
काही खासगी लोकांचे देखील नोंदवण्यात आले जवाब
गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या प्रकरणाची चौकशी
निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं केला आहे आरोप
मंत्री अनिल परब सह अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांवर पाटील यांनी केला आहे गंभीर आरोप
कळंबा कारागृहाच्या आवारात पुन्हा आढळला मोबाईल आणि सिम कार्ड
सर्कल एक बाहेर असलेल्या हौदाजवळ बेवारसपणे पडलेल्या पॅन्ट मध्ये सापडल्या वस्तू
अज्ञात व्यक्तीविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू
कारागृहात मोबाईल आणि सिम कार्ड सत्र मिळण्याचं आजून ही सुरूच असल्यावर शिक्कामोर्तब
नाशिक – उद्योगांना 20 टक्के ऑक्सिजन देण्यास परवानगी
ऑक्सिजनचा तुटवडा सहन करणाऱ्या उद्योगांना मोठा दिलासा
रुग्ण वाढळयाने उद्योगांना होणार ऑक्सिजन पुरवठा 100 टक्के बंद करण्याचा घेण्यात आला होता निर्णय
स्टील,फेब्रिकेशन कंपन्यांना यामुळे बसला होता मोठा फटका
अनेकांनी कंपनी बंद करण्याचा घेतला होता निर्णय
आयमा संघटनेने ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी केला पाठपुरावा
गोकुळ दूध संघाला मिळणार मुंबईत सिडकोची पाच एकर जागा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी नवी मुंबई तसेच वाशी इथं जागा निश्चित करण्याचे अजित पवार यांचे सिडकोला आदेश
सत्तांतरानंतर गोकुळ संचालक मंडळाने घेतलेल्या भेटी वेळी अजित पवार यांनी केली जागेची घोषणा
नव्या जागेमुळे मुंबईत गोकुळचे प्रस्थ वाढणार
संचालक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री बाळासाहेब थोरात यांचीदेखील घेतली भेट
कोरोनाप्रतिबंधक लशीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हैद्राबाद येथील लस उत्पादक कंपनी बायोलोजिकल ई या कंपनीसोबत करार केला आहे.
३० कोटी मात्रा तयार केल्या जाणार आहेत…
-भिवंडीत खंडू पाडा येथील भंगार च्या गोदामास रात्रीच्या सुमारास भीषण आग
-आगीचे कारण अस्पष्ट परंतु गोदामात साठविलेले धाग्याचे कोम, कापडाचे तागे, लोचन जळून खाक
-अग्निशमन दलाच्या आणि पाण्याचे दोन टँकर गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळविले नियंत्रण
-कोणतीही जीवित हानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान…
सलग चौथा दिवस मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दहिसर टोल नाक्या पासून घोडबंदर वसईच्या दिशेनी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे . टाळेबंदी मध्ये शिथिलता मिळाल्याने नागरिक वाहन घेऊन मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेनी प्रवास करत आहे. दहिसर चेकनाकावर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे त्यामुळेच वाहनांचा मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहे.
शहापूर
आसनगाव रेल्वे स्टेशन तिकीट बुकिंग ऑफिसला रात्री साधारण 11 वाजता अचानक आग लागली
आगीमध्ये आत मधील सुचनफळक, इलेक्ट्रिक बोर्ड जळून खाक झाले आहेत
आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज
घटनास्थळी रेल्वे कर्मचारी पोहचले
एका तासानंतर फायर बंब मार्फत आग विझवण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले आहे
सध्या स्थितीत आग आटोक्यात आली असून कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चक्रीवादळग्रस्त गावांची पाहणी करण्याची शक्यता
वाशिम :
वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मानसूनपूर्व पाऊस
या पावसामुळे शेती मशागतीला वेग
शहापूर : शहापूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी,
सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची जोरदार सुरुवात,
हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा
लसीकरणाचा बोजवारा उडाल्यामुळे भारतातील अनेक भागांत शवांचे ढिगारे पडलेले जगाने पाहिले. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः पुढे होऊन या गंभीर प्रकरणात लक्ष घातले. सरकारच्या धोरणात्मक व कार्यकारी निर्णयापासून न्यायालयाने दूर असावे, परंतु जेव्हा नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येते तेव्हा न्यायालय मूक साक्षीदार बनून गप्प बसू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले आहे. न्यायसंस्थेचा कणा ठिसूळ झाला आहे व सर्वोच्च न्यायालयातही सरकारी हुकूम चालतो असे वातावरण निर्माण झालेच होते. न्या. चंद्रचूड, न्या. राव व न्या. भट यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचा कणा मोडला नाही हे दाखवून दिले. हा कणा असाच ताठ राहो! अशी खोचक टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.