महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
सातारा : उद्या जलमंदिर पॅलेस येथे सकाळी 10:30 वाजता शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार
सांगली : वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे पत्रे गेले उडून
भटवाडी गावात अनेक घरे पडली. संसार उपयोगी वस्तू आणि घराचे नुकसान
काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
चंद्रपूर : ताडोबाच्या बफर क्षेत्रातील डोनी गावाच्या जंगलात मृतावस्थेत आढळली वाघीण
याच वाघिणीने काल उपचारासाठी गेलेले पशुवैद्यक अधिकाऱ्याला केले होते जबर जखमी
आज पुन्हा एकदा वनपथकाने परिसराची पाहणी केल्यावर शरीरावर जखमा असलेली 3 वर्षे वयाची वाघीण आढळली मृतावस्थेत
वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करत वाघिणीचे शव पोस्टमोर्टमसाठी केले रवाना
नांदेड : नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरण बनले अल्हाददायक
पुणे- कोरोनाच्या नियमांचे पालन करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रत्येक महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार
– पुढच्या वर्षापासून शिवज्योत रॅली काढली जाणार
– त्याचा शुभारंभ उद्या पुण्यातील सीओईपी महाविद्यालयात केला जाणार
मंत्री उदय सामंत यांची घोषणा
– दरवर्षी आम्ही रायगड चढतो, आमची पंरपरा -संभाजी छत्रपती
राज्यभरातून कोनाकोपऱ्यातून शिवभक्त येतात
मात्र एकटं जावं लागतंय
– माझी ओळख ही शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे, हाच माझा खरा ब्रँड आहे
– उद्या मराठा आरक्षणाबद्दल काय घोषणा होणार याबाबत माझ्याही मनात ऊत्सुकता
– सगळ्यांना लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे
माझी त्यांना शुभेच्छा आहे, मी माझी भूमिका उद्या मांडेन- संभाजी छत्रपती
ठाणे : मुरबाडमध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
वाढदिवसानिमित्त 2500 गरजू शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप
ठाण्यात पावसाने लावली हजेरी
ढगाळ वातावरण असून हवेत गारवा
उकाड्याने हैराण ठाणेकर सुखावले
मुंबई : हेल्थ सायन्स अभ्यासक्राच्या ॲाफलाईन परीक्षा होणार
– विद्यार्थी, परीक्षा घेणाऱ्यांनी RTPCR चाचणी करायची आहे
– ॲानलाईन परीक्षा घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
– परीक्षेच्या काळापर्यॅत RTPCR चा रिपोर्ट अनिवार्य
वाशिम :वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस
मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात
-उद्या रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला नाशिक मधून मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रवाना
– संभाजी महाराज यांच्यासोबत रायगडावर उद्या राहणार उपस्थित
– मराठा आरक्षण मुद्द्यावर संभाजी महाराज गेल्या काही दिवसांपासून झाले आहेत आक्रमक
– उद्या संभाजी महाराज रायगडावरून आरक्षण संदर्भात काय ठोस भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष
नवी मुंबई विमानतळ वाद चिघळणार
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर शिवसेनेची बॅनरबाजी
विमानतळावरून प्रकल्पग्रस्त विरुद्ध शिवसेना रंगला सामना
पनवेल मध्ये शिवसेना बाळासाहेबांच्या नावावर ठाम
“नाव तर आम्ही साहेबांचेच देणार, मराठी अस्मिता जगभर होणार” या आशयाचे बॅनर
सर्व प्रकल्पग्रस्त ‘दिबां’च्या नावावर ठाम असताना शिवसेना मात्र बाळासाहेबांच्या नावावर ठाम
शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झाली बैठक
खारघर मधील बैठकीला खा, श्रीरंग बारणे, खा, राजन विचारे , जिल्हा प्रमुख शिरीष घरत सुद्धा उपस्थित
भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यलयावर टोळक्याचा भीषण हल्ला
– कार्यलयाची नासधूस करत,दहशद माजवण्याचा प्रयत्न
– दगड काठ्यांनी केला हल्ला
– या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना घेतलं ताब्यात
– हल्ल्याचं कारण अस्पष्ट
– नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– घटना cctv मध्ये कैद…
विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीला सुरुवात,
मोर्चातील पुढची रुपरेषा ठरवून राज्यभर आंदोलनाची दिशा करणार जाहीर,
राज्यभरातून आलेल्या संघटनांच्या प्रतिनिधीसोंबत बैठक सुरू,
विनायक मेटे आज राज्याच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार,
मोर्चा यशस्वी होणारंच विनायक मेटेंना विश्वास,
ठाणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री,माजी खासदार शंकर सखाराम नम यांचे दुःखद निधन
पहाटे ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने ज्युपिटर हाँस्पीटल ठाणे येथे घेतला अखेरचा श्वास..
डहाणू तालुक्यातील तवा या मूळ गावी संध्याकाळी चार वाजता होणार अंत्यसंस्कार
विनायक मेटे नारायण गडावरून दर्शन घेऊन शिवसंग्राम कार्यालयात पोहोचले,
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील घेणार बैठक करणार चर्चा,
जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनात मुद्दे काय असावे यावर होणार चर्चा,
थोड्या वेळात मोर्चाला होणार सुरुवात,
कार्यकर्ते जमायला सुरुवात झालीये
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलिसांची मोठी कारवाई
स्वस्त धान्य दुकानात वाटप केलेले तांदूळ आणि गहू अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टर ला पोलिसांनी पकडले
या कारवाईमुळे अवैध व्यवसायिक यांचे धाबे दणाणले
तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात पकडले ट्रॅक्टर
महाराष्ट्र राज्यातून तेलंगणा राज्यात तांदूळ आणि गेहुची होती तस्करी
ट्रॅक्टर्स साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
अहेरी येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केली कारवाई
विनायक मेटेंनी घेतलं नारायणगडाचं दर्शन,
मुख्यमंत्री आणि सरकारला सद्बुद्धी देण्याचं घातलं साकडं,
बीडमधला मोर्चा निघणारचं,
कितीही हजार पोलीसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा निघणार,
कार्यकर्ते यायला सुरुवात झालीये,
पोलिसांनी पोलीसांचं काम करावं, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी
विनायक मेटेंचा इशारा,
मोर्चा यशस्वी करणार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदित्य ठाकरेंचं जनतेला संबोधन
शुभेच्छा देत असताना व्यक्त केली चिंता
दोन वर्ष होतील चेहऱ्यावरचा मास्क काही निघत नाही
कोविड असताना सुद्धा लाँकडाउन असताना आकाश स्वच्छ दिसत प्रदूषण कमी होत
आपण नकळत करत असलेल प्रदुषण कमी होते
प्रदुषणावर आपण वेग कमी करु शकतो
कारण प्रदुषणाला वेग देणारे आपणच
वातावरण बदलणारे आपणच
आजपासुन आपण प्रयत्न करु
-शिवस्वराज्य दिनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय
-सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी सातत्याने मराठा विरोधी काम करत आहेत
-त्यांचे आणि भाजप चे काही संबंध आहेत का हे तपासण्याची गरज
-छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचा धाडस या राज्यात कोण करू शकतो?
-मंत्री हसन मुश्रीफ यांची सदावर्ते आणि भाजपवर टीका
भाजपमधे कुणीच विचारत नाही म्हणूनच नितेश राणेंचे अनिल परबांवर दररोज आरोप
परबानू मंञी पदाचो राजीनामो आजचं देऊन टाका. उगाच उद्या इज्जत जावूक नको. आजचं उरली सुरली लाज वाचवा…. अशा प्रकारचं टविट् करून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
नितेश राणेंच्या टविट्ला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचं प्रत्युत्तर.
छत्रपती शीवाजी महाराज स्टेडियमवर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त
मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा बंदोबस्त
छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून निघतोय संघर्ष मोर्चा
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त
विनायक मेटे गडावर पोहोचले…
15 ताफांच्या गाड्यांसह गडावर दाखल
नगद नारायण महाराजांचं घेणार दर्शन…
जादा दराने खताची विक्री केल्याने तीन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित
कृष्णा एजन्सी तुळजापूर, लक्ष्मी कृषी सेवा केंद्र,उमरगा, विशाल कृषी एजन्सी, उमरगा या खत दुकानाचे परवाने निलंबित
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांची माहिती
शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
सांगली
तासगाव पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले
गावातील ग्रामसेवक शासकीय वेळेत हजर राहत नसलेचा
आणि ग्रामस्थ ,याची कामे होत नसलेचा केला आरोप
भाजप चे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाला ठोकले कुलूप
विनायक मेटे नारायण गडाकडे निघाले, 15 वाहनांचा ताफा घेऊन गडाकडे प्रस्थान,
बीडमध्ये मोर्चा काढण्यावर ठाम
प्रशासनाने परवानगी नाकारली आहे…
तासगाव पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले
गावातील ग्रामसेवक शासकीय वेळेत हजर राहत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
भाजपचे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाला ठोकले कुलूप
मार्केटयार्ड मधील बेदाणा सौदा सुरू
शेतकरी व्यापाऱ्यांना मिळाला दिलासा
बेदाण्याला मिळाला 200 रुपये उचाक्की दर
तब्बल 55 दिवसांनी बेदाणा सौदा झाला सुरु
60 टन बेदाण्याची झाली आवक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बेदाणा सौदा झाला होता बंद
मात्र आता शासनाचे सर्व नियम पाळून बेदाणा सौदा सुरु
शासनाचे नियम मोडल्यास कारवाई करणार
मार्केट कमिटी सभापती दिनकर पाटील यांची माहिती
वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात पर्यावरण स्वच्छता राखत, निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया, अशा शब्दात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
महाड MIDC लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीच्या युनिट दोन मध्ये भीषण आग…
आगीवर नियत्रंण आणण्यात अग्निशमन यत्रंणेला यश, कोणत्याही जिवीतहानी नाही…
रात्री लागलेल्या आगीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.
आसनपोई गावच्या हद्दीमध्ये असणा-या कारखान्यातील आगीच्या घटनेनंतर कंपनी प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असून घटनास्थळी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
बीडमध्ये आज मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचा निघणार विराट मोर्चा
शहराला भगव्याचं स्वरुप, भगव्या पतकांनी शहर सजलं,
11 वाजता मोर्चाला होणार सुरुवात,
छत्रपती शिवाजी चौकात मोर्चाची जय्यत तयारी,
मात्र मोर्चाला परवानगी नाकारली, मोर्चा होतो का हे पाहणं महत्त्वाचं..
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या धक्यातून सावरत नाही तोच दुसऱ्या लाटेच्या जबर तडाख्याने भारताच्या अर्थचक्राला परत मोडता घातला. या सर्व आर्थिक अनिश्चिततेचे सावट रिझर्व बँकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या द्विमासिक पतधोरणात दिसले आहे. उद्या कोरोना नियंत्रणात येईलही, पण केंद्रसरकारच्या आर्थिक धोरणावरही बराच काही अवलंबून असेल. कारण आर्थिक आघाडीवरचा विद्यमान सरकारचा पूर्वानुभव फारसा उत्साहवर्धक नाही. अर्थात चांगल्याची अपेक्षा करायला काय हरकत आहे? तूर्त तरी रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरणाने देशाच्या अर्थव्यवस्थेवरील अनिश्चितेचे सावट गडद असल्याचे आणि आर्थिक आव्हाने अद्यापि कायमच असल्याचे संकेत दिले आहेत एवढेच म्हणता येईल
-उड्डाण पुलावरून नाशकात भाजप सेनेची तू तू… मै मै…
– 250 कोटी रुपयांच्या या पुलावरून रस्सीखेच
– शहरातील वर्दळीच ठिकाण असलेल्या त्रिमूर्ती चौकात होणार होता उड्डाणपूल
– महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलेत स्थगितीचे आदेश
– शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी पूल होणारच अस आवाहन दिल्याने भाजप आक्रमक
– भाजप सोमवारी आयुक्तांच्या दालनासमोर करणार आंदोलन
नाशिक
– उड्डाणपुलावरून नाशकात भाजप सेनेची तू तू… मै मै…
– 250 कोटी रुपयांच्या या पुलावरून रस्सीखेच
– शहरातील वर्दळीच ठिकाण असलेल्या त्रिमूर्ती चौकात होणार होता उड्डाणपूल
– महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलेत स्थगितीचे आदेश
– शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी पूल होणारच अस आवाहन दिल्याने भाजप आक्रमक
– भाजप सोमवारी आयुक्तांच्या दालनासमोर करणार आंदोलन
वसई-विरार नालासोपा-यात पावसाची हजेरी.
दुपारपासूनच आभाळ पूर्णत: भरून आलं होतं.
हलक्याशा वाऱ्यासह पाऊस पडला आहे.
विरार पूर्व विवा जहागिड परिसरातील पावसाच्या सरी
– पर्यावरण दिनानिमित्त आज भाजप कार्यकर्ते करणार नंदिनी नदीची सफाई
– मानवी साखळी करत करणार स्वच्छता
– नंदिनी नदी ही नाशिकमधील प्रमुख नदी
– मात्र वाढत्या प्रदूषणामुळे नंदिनी नदीचा अडकलाय श्वास
– भाजप कार्यकर्त्यांचा आजपासून नदी संवर्धनचा शुभारंभ
– माझी वसुंधरा अभियानात नाशिक महापालिकेचा डंका
– सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश
– आज दुपारी 12:30 वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार सन्मान सोहळा
– नाशिक कितव्या क्रमांकावर येणार सर्वांनाच उत्सुकता