Maharashtra News LIVE Update | मुंबई एनसीबीसीची मोठी कारवाई, ठाणे परिसरातून एका कुख्यात औषध विक्रेत्याला अटक

| Updated on: Jun 06, 2021 | 10:56 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मुंबई एनसीबीसीची मोठी कारवाई, ठाणे परिसरातून एका कुख्यात औषध विक्रेत्याला अटक
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jun 2021 10:56 PM (IST)

    सांगलीत ओढ्यात तीन भाऊ वाहून गेले

    सांगली :
    ओढ्यातुन दोन सख्खी भावंडे आणि एक चुलत भाऊ अशी तीन भाऊंडे गेली वाहून, आटपाडीच्या जांभूळणी नजीकच्या घाणद येथील घटना, मासे आणि कुत्रे धुण्यासाठी गेले असता घडली घटना, वैभव लक्ष्मण व्हनमाने (वय 14) , आनंदा लक्ष्मण व्हनमाने (वय 16), विजय लक्ष्मण व्हनमाने (वय 17) असे वाहून गेलेल्या भावंडांची नावे, तिघा मुलांचा शोध सुरू, कुत्र्याचा मृतदेह सापडला

  • 06 Jun 2021 09:04 PM (IST)

    मुंबई एनसीबीसीची मोठी कारवाई, ठाणे परिसरातून एका कुख्यात औषध विक्रेत्याला अटक

    मुंबई एनसीबीसीने ठाणे परिसरातून एक कुख्यात औषध विक्रेत्याला अटक केली आहे.

    पेडलर्सकडून 12 किलो गांजा जप्त, आरोपी  गांजा आंध्र प्रदेशातून घेऊन येत होता

    सुनील भंडारी असे आरोपीचे नाव असून तो तडीपार आरोपी आहे

    त्याच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात 9  गुन्हे दाखल आहेत, हप्ता वसुली, खून, हाफ मर्डर असे  अनेक गुन्हे दाखल आहेत


  • 06 Jun 2021 06:38 PM (IST)

    नवी मुंबई महानगरपालिका अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर जमा करणार 1 हजार रूपये

    नवी मुंबई :

    अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर महानगरपालिका जमा करणार 1 हजार रूपये

    नेटच्या अनलिमिटेड डाटा पॅकसाठी 1000 रूपये विद्यार्थ्याच्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा निर्णय

    ऑनलाईन शिक्षणात खंड पडू नये म्हणून विद्यार्थीहिताय निर्णय

    पहिल्या सहामाहीत शाळा प्रत्यक्ष वर्गात न भरवता विद्यमान ऑनलाईन शिक्षण पध्दत

    विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष

    शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होण्याकरिता पुढाकार

    विद्यार्थीहिताय निर्णयामुळे 35 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.

  • 06 Jun 2021 05:45 PM (IST)

    मान्सून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात दाखल, हवामान विभागाची माहिती

    मान्सून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात दाखल
    रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्यात मान्सून दाखल
    हवामान विभागाची माहिती

  • 06 Jun 2021 05:42 PM (IST)

    संभाजी छत्रपती यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो : चंद्रकांत पाटील

    पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    ऑन रिक्षाचालक मदत
    – मुख्यमंत्री यांच्या बैठकीत मी मागणी केली होती त्यावेळी अजित दादांनी उदार होऊन २० घटकांना मदत करायला हवी होती पण त्यातील फक्त ०४ जणांना प्रत्येकी १५०० रूपये मदत केली होती, ती अजून पोहचली नाही
    – तीन हजार रिक्षा चालकांना एक हजार रुपयाचे कुपण, पेट्रोल पंपावर पेट्रोल, लसींचे पैसे देणार आणि त्यांच्या १ हजार मुलींना ड्रेस शिवून देणार आहे

    ऑन संभाजी राजे
    – आज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, काही लोकांना मात्र हिंदवी शब्द आवडत नाही
    – श्रीमंत संभाजी छत्रपती यांच्या भूमिकेचे मी स्वागत
    – जे जे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील त्यांना आमचा पाठिंबा आहे
    – शरद पवार असले तरी आम्ही त्यांच्या माघे उभे राहणार
    – संभाजी राजेंना सहकार्य हवं असल्यास आम्ही तयार आहे
    – आम्ही आल्यामुळे राजकिय रंग लागेल असं कुणी म्हणले तर आम्ही येणार नाही
    – जे कोणी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, त्यात आम्ही सहभागी होऊ
    – संभाजीराजे यांचं नेतृत्व आम्हाला मान्य

    ऑन ( अजित दादा ) मराठा आरक्षण
    – अजित पवारांच्या वाक्यात किती दांभिक पणा आहे
    – प्रयत्न करतोय म्हणजे काय ?
    – सुप्रीम कोर्टात सरकार कमी पडले असे सर्वच जण म्हणताय
    – आरक्षण रद्द झाले त्या दिवसापासून रिव्हीव पिटीशन दाखल करा म्हणालो होतो पण हे दुसरंच दळण दळत बसले
    – आता रिटायर्ड जज ची समिती केलीय त्यांनीही तेच सांगितलं जे आम्ही सांगितलं होतं

    ऑन अजित दादा आरोप
    – अरे व्हा ! जुनं झालं तरी ते खोटय ते खोटंच आहे ना
    – आमच्याशी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला का ?
    – पवार साहेबांच्या ड्रॉवर मधून यादी चोरून-चोरून सत्तेत बसलात ना ? कुठल्या नैतिकता आहे
    – वार केला की प्रतीवार करायचाच असतो, शिवरायांनी शिकवलंय
    – दुसऱ्याने आपल्याला त्रास देऊ नये यासाठी आपण नीट राहायचं असतं

    ऑन पालिका वार्ड
    – आमच्या काळात बदल केला तेव्हा समिती नेमली होती
    – वार्ड रचना बदलण्यासाठीआताही समिती नेमा

  • 06 Jun 2021 04:27 PM (IST)

    संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

    सांगली :

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत, आणि भविष्यातीही टाकली जातील. कायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आंदोलन हा वेगळा विषय, पण सर्वांनी राज्य सरकार सोबत चर्चा चालू ठेवून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.

  • 06 Jun 2021 04:24 PM (IST)

    मेळघाटात अंधश्रद्धेतून बाळाचा बळी, दोन वर्षीय बालकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

    अमरावती :

    -मेळघाटातील दोन वर्षीय बालकाचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू

    -बाळ आजारी असल्याने आजीने बाळाच्या पोटावर अंधश्रद्धेतून दिले होते चटके

    मेळघाटातील खटकाली गावातील राजरत्न जमूनकार या बाळाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

  • 06 Jun 2021 04:22 PM (IST)

    बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

    बीड: बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

    गेवराई, माजलगाव परिसरात धुव्वादार पाऊस

    मशागत केलेल्या शेतात साचले पाणी

    अर्धा तासापासून पावसाला सुरुवात

  • 06 Jun 2021 03:36 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

    अहमदनगर :

    अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी,

    सकाळ पासून होते ढगाळ वातावरण,

    तर उकड्यापासून नागरिकांची सुटका,

    पावसामुळे सखोल भागात पाणी साचले,

  • 06 Jun 2021 03:36 PM (IST)

    राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने, आंदोलन कोणाच्या विरोधात? अरविंद सावंत यांचा सवाल

    अरविंद सावंत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे आंदोलन कोणाच्या विरोधात आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का ?

    छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. कोणाविरुद्ध लढतो कशासाठी लढतोय ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे पण संभाजी राजेंचा आम्ही आदर करतो. भाजपचा छुपा पाठिंबा असू शकतो. हे आंदोलन केंद्र सरकार विरोधात सुप्रीम कोर्टा विरोधात राज्य सरकार विरोधात आहे त्याने सांगितलं पाहिजे

    आदित्य ठाकरे यांना टार्गेट करणे हास्यास्पद आहे. सबंध पर्यावरण चळवळीचे प्रणेते आदित्य ठाकरे हे नामदार नसताना त्यांनी समुद्र स्वच्छ करणे ही मोहीम हाती घेतली. प्लास्टिकच्या विरोधात आंदोलन करणे, राज्य सरकारला का प्लास्टिक विरोधात कायदा करावा लागला? ठाकरे घराण निसर्गप्रेमी आहे.

  • 06 Jun 2021 03:01 PM (IST)

    राजेश टोपे म्हणजे विकासाच्या बाबतीत वांझोटे मंत्री, बबनराव लोणीकर यांची गंभीर टीका

    माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली आहे. लोणीकर पालकमंत्री असताना मंजूर झालेला 132 के.व्ही. चे केंद्र टोपे यांनी त्यांच्या मतदारसंघात हलवले. राजेश टोपे म्हणजे विकासाच्या बाबतीत वांझोटे मंत्री आहेत, अशी टीका लोणीकर यांनी केली आहे.

  • 06 Jun 2021 01:25 PM (IST)

    वाढत्या इंधनदरवाढीचा निषेध, मनसेकडून पेढे वाटप करत अनोखे आंदोलन

    पुणे

    पुण्याजवळील शिरूर शहरात मनसेकडून इंधनदरवाढीच्या निषधार्थ अनोखे आंदोलन

    मनसेकडून वाढत्या पेट्रोल-डिझेल इंधनदरवाढीच्या निषधार्थ आज शहरातील पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन

    पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मनसे कार्यकर्त्यांकडून पेढे वाटप

    केंद्र सरकारकडून जोरदार निषेध

  • 06 Jun 2021 01:19 PM (IST)

    नाशकात पावसाची रिमझिम बरसात, सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

    नाशकात पावसाची रिमझिम बरसात
    – सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
    – सकाळ पासूनच होत ढगाळ वातावरण

  • 06 Jun 2021 01:19 PM (IST)

    नाशकात पावसाची रिमझिम

    – नाशकात पावसाची रिमझिम बरसात
    – सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
    – सकाळ पासूनच होत ढगाळ वातावरण

  • 06 Jun 2021 12:22 PM (IST)

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, मान्सून पुण्यात दाखल

    पुणे

    – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

    – मान्सून पुण्यात दाखल

    – मान्सूनची वेगाने आगेकूच

    – अलिबागपर्यंत पोहोचला मान्सून

  • 06 Jun 2021 11:43 AM (IST)

    अजित पवार आणि नरेंद्र पाटील यांचा समाचार घेतल्यानंतर नरेंद्र पाटील यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

    अजित पवार आणि नरेंद्र पाटील यांचा समाचार घेतल्यानंतर नरेंद्र पाटील यांचा अजित पवारांना प्रत्युत्तर

    अजित पवार तुम्हीही उपमुख्यमंत्री आहात आपण व्यक्तिशः माझे दादा आहात

    नरेंद्र पाटील म्हणतात अजित दादा तुम्ही शांत का?

    रायगडावर निघणाऱ्या मावळ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहेत त्यांच्या गाड्या अडवल्या जातात हे कितपत योग्य आहे?

    मंत्री मंडळातील त्यांच्या समाजावर अन्याय होत असल्यास ओबिसे नेते एकत्र येतात मग आपले मंत्री काहीच का बोलत नाही?

  • 06 Jun 2021 11:37 AM (IST)

    परा एकादशीचे औचित्य साधत आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय

    पुणे –

    -पुण्याजवळील देवाची आळंदी येथे अपरा एकादशीचे औचित्य साधत आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय

    -मोगरा, झेंडू फुले, तुळस यांचा वापर करत समाधी स्थळ, गाभारा यांना आकर्षक सजवण्यात आलंय.

    -कोरोना मुळे मंदिर भक्तांसाठी बंद असले तरी मंदिर प्रशासनाकडून प्रत्येक सणाचे औचित्य साधत विधीवत धार्मिक कार्य मोठ्या उत्साहात केले जात आहे

  • 06 Jun 2021 11:10 AM (IST)

    वर्ध्यात सलून ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी अडवला पालकमंत्र्यांचा ताफा

    वर्धा

    – पालकमंत्री सुनील केदार यांचा ताफा अडवला

    – सलून ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी अडवला पालकमंत्र्यांचा ताफा

    – नागपूर येथून वर्धेला येत असताना पवनार जवळ अडवला ताफा

    – आंदोलकांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री यांनी वाहनातून उतरत केली चर्चा

    – आर्थिक मदतीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

    – पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

    – आंदोलनावेळी घोषणाबाजी

  • 06 Jun 2021 10:52 AM (IST)

    उदयनराजे सोहळ्यासाठी हजर, थोड्याच वेळात करणार अभिषेक

    सातारा

    उदयनराजे सोहळ्यासाठी हजर,

    थोड्याच वेळात करणार अभिषेक,

    त्यानंतर पोवई नाक्यावर करणार पुष्पहार अर्पण,

    अत्यंत साध्या पद्धतीने होणार कार्यक्रम

  • 06 Jun 2021 10:11 AM (IST)

    छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवरही होणार छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा

    सातारा –

    छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवरही होणार छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा,

    सोहळ्याच्या तयारीला सुरुवात,

    छत्रपती शिवरायांचा पुतळा मध्यवर्ती भागात ठेवण्यात आलाय,

    सकाळी 11 वाजता सोहळ्याला सुरुवात होईल,

    उदयनराजे सोहळ्याआधी देवीचं दर्शन घेतील, त्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होईल,

    शिवाजी महाराजांना जलाभिषेक घातला जाईल आणि राज्याभिषेक उरकून उदयनराजे पोवई नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जातील

    त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे

  • 06 Jun 2021 10:10 AM (IST)

    हिंदी चित्रपट सृष्टीचे जेष्ठ नायक दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात दाखल

    हिंदी चित्रपट सृष्टीचे जेष्ठ नायक दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात दाखल

    आज सकाळी हिंदुजा रुग्णालयात त्यांना सायरा बानू आणि दाखल केलय

    डॉक्टर जलील परकार त्यांच्यावर उपचार करत आहेत

  • 06 Jun 2021 09:40 AM (IST)

    बीडमध्ये आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

    बीड: आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

    विना परवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी प्रमुख 21 जणांवर गुन्हा दाखल

    बीड शहर पोलिसांत गुन्हा दाखल

    मोर्चात सहभागी झालेल्या इतर अडीच ते तीन हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल

  • 06 Jun 2021 09:20 AM (IST)

    मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विलेपार्ले एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच शिवराज्याभिषेक सोहळा

    मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विलेपार्ले एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच शिवराज्याभिषेक सोहळा

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव पूजन करून मराठा क्रांती मोर्चाची भूमिका संभाजी राजे रायगडावर हरवणार आहे

    कोरोनाच्या संकटामुळे रायगडावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाता आलं नाही त्यामुळे तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या इथं शिवपूजन करून पुढच्या आंदोलनाला तयारी

  • 06 Jun 2021 09:19 AM (IST)

    चित्रकार अल्पेश घारे यांची आगळ्यावेगळ्या कलाकृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

    सिंधुदुर्ग –

    चित्रकार अल्पेश घारे यांची आगळ्यावेगळ्या कलाकृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

    वेंगुर्ले खवणे येथील विस्तीर्ण समुद्रकिना-यावर आकर्षक रांगोळी व वाळूच्या सहाय्याने 25 फूट व्यासाच्या वर्तुळामध्ये शिवारायांचे चित्र साकारून आगळी वेगळी मानवंदना

    कोणत्याही साधनांचा वापर न करता फक्त हाताच्या बोटांनी किणा-यावरील वाळूमधे चिञ साकारून शिवाजी महाराजांना मानवंदना.

  • 06 Jun 2021 09:18 AM (IST)

    नाशिकच्या सातपूर परिसरात जबरी चोरी, 65 तोळे सोने आणि 42 हजार रुपये रोख लंपास

    – नाशिकच्या सातपूर परिसरात जबरी चोरी

    – साहेबराव नेमणार हे आपल्या कुटुंबा सोबत बाहेर गावी गेले असता काल सायंकाळच्या सुमारास चोरट्यानी मारला डल्ला

    – तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रुपये रोख रक्कम घरातून केली लंपास

    – सातपूर पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू

  • 06 Jun 2021 08:29 AM (IST)

    नाशिकच्या दिंडोरी वणी रोडवर काल सायंकाळी तासाभरात रस्त्यावरुन घसरुन 9 वाहनांचा अपघात

    – नाशिकच्या दिंडोरी वणी रोडवर काल सायंकाळी तासाभरात रस्त्यावरुन घसरुन 9 वाहनांचा अपघात

    – मात्र कोणतीही जीवितहानी नाही

    – रोडच्या निकृष्ट कामावर नागरिकांनकडून प्रश्न उपस्थित

  • 06 Jun 2021 08:16 AM (IST)

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार उभारणार शिवस्वराज्य गुढी

    पुणे

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार उभारणार शिवस्वराज्य गुढी

    पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलाय शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम

  • 06 Jun 2021 08:00 AM (IST)

    छत्रपती शिवाजी राजे यांचं राजदरबार मेघडंबरी इथे शिवराज्याभिषेकाची जैयत तयारी सुरू

    रायगड –

    – छत्रपती शिवाजी राजे यांचं राजदरबार मेघडंबरी इथे शिवराज्याभिषेकाची जैयत तयारी सुरू

    – सिंहासनावर आरूढ शिवाजी महाराजांच्या आसनाला फूलांची आरस

    – गडावर मावळे पोहचले, पलिसांचा मोठा बंदोबस्त

    – ३४८ वा सोहळा मोजक्या लोकांच्या ऊपस्थितीत साजरा होणार

  • 06 Jun 2021 07:55 AM (IST)

    रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत

    रायगड –

    आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळ्याचा दिवस आहे

    एकीकडे मराठा आरक्षण मुळे समाजात आक्रोश आहे

    मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा आज छत्रपती संभाजीराजे रायगडावरुन जाहीर करणार आहेत

    कोरोनाच्या स्थितीमुळे निवडक लोकांना रायगडावर सोडलं आहे

    रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत

  • 06 Jun 2021 07:45 AM (IST)

    नागपुरात आज शिवराज्यभिषेक सोहळा साध्या पद्धतीने

    नागपूर –

    नागपुरात आज शिवराज्यभिषेक सोहळा साध्या पद्धतीने पडला पार

    महाल परिसरातील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळा ला दुग्धाभिषेक करण्यात आला

    कोरोना मुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पनाने पार पडला सोहळा

  • 06 Jun 2021 07:17 AM (IST)

    अभिनेता संजय दत्तची राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत कुटुंबियांची सदिच्छा भेट

    नागपूर –

    बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांनी आज राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली.

    ही भेट नागपूर येथील निवासस्थानी झाली.

    डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा २१ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित विवाह स्वागत समारंभ कोविड प्रादुर्भावामुळे रद्द झाल्याने त्यावेळेस कुणालाही येणे शक्य झाले नव्हते,

    आज अचानक संजय दत्त यांनी नागपूर येथे नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षाला विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या.

    संजय दत्त यांच्या छोटेखानी भेटीत त्याने राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या.

    संजय दत्त यांची नागपूर भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

  • 06 Jun 2021 06:35 AM (IST)

    मुंबईच्या अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस

    मुंबईमध्ये रात्री दीडनंतर विजेच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली

    काल संध्याकाळ पासून काही ठिकाणी ढगाड वातावरण पाहायला मिळत होते

    रात्री दीडनंतर पावसाला सुरुवात झाली

    मुंबईच्या अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरु होता.

  • 06 Jun 2021 06:34 AM (IST)

    सांगलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे पत्रे उडाले

    सांगली : वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे पत्रे गेले उडून

    भटवाडी गावात अनेक घरे पडली. संसार उपयोगी वस्तू आणि घराचे नुकसान

    काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

  • 06 Jun 2021 06:33 AM (IST)

    साताऱ्यात उद्या जलमंदिर पॅलेस येथे सकाळी 10:30 वाजता शिवराज्याभिषेक दिन

    सातारा : जलमंदिर पॅलेस येथे सकाळी 10:30 वाजता शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार

    छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार