Maharashtra News LIVE Update | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूर

| Updated on: Jun 17, 2021 | 12:13 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

Maharashtra News LIVE Update | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूर
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 16 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jun 2021 09:56 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूूूर 

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूूूर

    पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले

    बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला

    काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले

  • 16 Jun 2021 08:11 PM (IST)

    भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात जोरदार पाऊस, पुलावरून पाली वाहत असल्याने रस्ते बंद

    जालना : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले होते. ओढ्यांना पूर आला होता. काही गावातील सखल भागात या पावसामुळे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे पुलावरून पाली वाहत असल्याने रस्ते बंद पडले आहेत.


  • 16 Jun 2021 08:10 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील शिरपूर परिसरात जोरदार पाऊस

    वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर परिसरात जोरदार पाऊस

    सलग चौथ्यादिवशी जोरदार पाऊस

    आतापर्यंत परिसरात 200 मीमी पाऊस

  • 16 Jun 2021 07:23 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, सकाळपासून संततधार

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरुच असून संध्याकाळ नंतर पावसाचा जोर वाढला आहे.

    कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून माणगाव खोऱ्यातील निर्मला नदिला पूर आला आहे.

    त्यामुळे येथील आंबेरी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे तर पुढील  27 गावांचा तालूक्याशी संपर्क तूटला आहे.

    मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही भागात सकाळ पासून वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

  • 16 Jun 2021 07:07 PM (IST)

    छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात उद्या बैठक 

    मुंबई : छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात उद्या बैठक

    उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण राहणार उपस्थित

    सतेज पाटलांनी आज संभाजीराजेंना दिलं होत भेटीचं निमंत्रण

    उद्या 5 वाजता वर्षा बंगल्यावर होणार बैठक

    राज्यातील मराठा समन्वयकांना भेटीचं निमंत्रण

  • 16 Jun 2021 07:06 PM (IST)

    नाशिकच्या भद्रकाली परिसरात झालेल्या घरफोडीतील आरोपींना अखेर अटक

    नाशिक – नाशिकच्या भद्रकाली परिसरात झालेल्या घरफोडीतील आरोपींना अखेर ठोकल्या बेड्या

    – भद्रकाली परिसरातील नाव दरवाजा येथील जुन्या वाड्यातून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेसह जवजवळ 9 लाख 81 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी मध्यरात्री केला होता लंपास.

    – 7 आरोपींना बेड्या , 2 अल्पवयीन गुन्हेगारांचाही सहभाग

    – 5 लाख 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त, सोने चांदीच्या दागिन्यांसह घरफोडीसाठी वापरलेले गॅस कटरही केले जप्त

    – भद्रकाली पोलिसांचा अधिक तपास सुरू

  • 16 Jun 2021 06:12 PM (IST)

    हल्ला करणाऱ्यांवर अटकेची कार्यवाही होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार: विक्रांत पाटील

    नवी मुंबई : हल्ला करणाऱ्यांवर अटकेची कार्यवाही होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार: विक्रांत पाटील

    भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा जाहीर निषेध

    भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नोंदवला निषेध

  • 16 Jun 2021 06:11 PM (IST)

    महापौर मुरलीधर मोहोळ यांची नालेसफाईच्या कामांची पाहणी म्हणजे वराती मागून घोडे, माजी महापौर प्रशांत जगताप यांची टीका

    पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांची नालेसफाईच्या कामांची पाहणी म्हणजे वराती मागून घोडे

    राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांचा आरोप

    15 मे पूर्वीच शहरातील पावसाळा पूर्व कामे पूर्ण होणं आवश्यक होतं

    पावसाळा सुरु झाल्यावर महापौर करतायेत नालेसफाईच्या कामाची पाहणी

    अद्यापही 10 टक्के काम अपूर्ण

  • 16 Jun 2021 05:31 PM (IST)

    दारू पिऊन झालेल्या वादात एकाची हत्या, अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    अहमदनगर  : दारू पिऊन झालेल्या वादात एकाची हत्या

    मासे आणि खेकडा पकडण्यासाठी आष्टी तालुक्यात गेले होते तिघेजण

    कचरू कांबळे या 45 वर्षीय व्यक्तीची केली हत्या

    तोफखाना पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

    युनूस शेख आणि योगेश अरुणे या दोघांना पोलिसांनी केली अटक

  • 16 Jun 2021 05:28 PM (IST)

    तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का? अंगावर याल तर शिंगावर घेऊच : महापौर किशोरी पेडणेकर

    अंगावर याल तर शिंगावर घेऊच- महापौर किशोरी पेडणेकर

    शिवसेना भवनवर मोर्चा काढणं कितपत योग्य याचंही उत्तर द्यावं

    शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय…

    तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का??

  • 16 Jun 2021 05:10 PM (IST)

    भाजप कार्यकर्ते माहीम पोलीस ठाण्यात पोहोचले, कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची तक्रार देणार

    मुंबई : भाजप कार्यकर्ते माहीम पोलीस ठाण्यात पोहोचले

    विलास आंबेकर, अक्षता तेंडुलकर, सनी साठे, ऋषी शेळमकर या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्ते माहीम पोलीस ठाण्यात दाखल

    भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा माहीम पोलीस ठाण्यात दाखल

  • 16 Jun 2021 04:40 PM (IST)

    मालाड, गोरेगाव भागात पोलिसांचा छापा, 3 जणांना अटक, 95 लिटर भेसळयुक्त दूधही जप्त

    मुंबई : गुन्हे शाखेने मुंबईतील मालाड व गोरेगाव भागात छापा टाकून 3 जणांना अटक केली असून या छाप्यात सुमारे 95 लिटर भेसळयुक्त दूधही जप्त करण्यात आले आहे.

    अटक केलेले आरोपी नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमधून दूध काढत असत. त्यात समान प्रमाणात पाणी मिसळत असत आणि नंतर मेणबत्ती आणि स्टोव्ह पिनच्या सहाय्याने सील बंद करुन विक्री करीत असत. बघितल्यानंतर असे वाटत नव्हते की ही भेसळयुक्त दुधाची पिशवी असेल.

    पिशव्यामधून काढलेल्या दुधात पाणी मिसळणे, त्या रिकाम्या पिशव्यांमध्ये भरणे आणि ते सील करून दुधाची पिसवी तयार करत होते.

    गोकुळ, अमूल या नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांमधून दूध काढून पाणी भरण्याची प्रक्रिया बर्‍याच दिवसांपासून सुरू होती

  • 16 Jun 2021 04:10 PM (IST)

    पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जायला आता जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी

    पुणे: जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जायला आता जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी

    पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद आणि पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेतला हा निर्णय

    जिह्यातील कोरोना परिस्थिती अद्याप आटोक्यात नसल्याने घेतला निर्णय

  • 16 Jun 2021 04:09 PM (IST)

    आंध्रप्रदेशात चकमकीत सहा माओवादी ठार  

    आंध्रप्रदेशात चकमकीत सहा माओवादी ठार

    ग्रेहाऊंडस या माओवादविरोधी पथकाची मोठी कारवाई

    विशाखापट्टणम जिल्ह्य़ात थेंगलमट्टाच्या जंगलात झाली कारवाई

    मृतक माओवाद्याभध्ये दोन डीवीसीएम स्तरावरच्या लाखो रुपये बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा समावेश

    घटनास्थळावरुन एके 47 एसएलआर आणि कारबाईन या अत्याधुनिक बंदुकीसह शस्ञसाठा जप्त

  • 16 Jun 2021 02:08 PM (IST)

    नाशिक उद्या जिल्ह्यासह राज्यभर रस्ता रोको आंदोलन

    नाशिक – उद्या जिल्ह्यासह राज्यभर रस्ता रोको आंदोलन

    बैठकीनंतर समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांची माहिती

    उद्या सकाळी नाशिकच्या द्वारका परिसरात रास्ता रोको आंदोलन

    छगन भुजबळ आणि समीर भुजबळ न्यायालयीन लढाई लढणार, तर आम्ही रस्त्यावर लढणार – दिलीप खैरे यांची माहिती

  • 16 Jun 2021 02:08 PM (IST)

    वांगणी रेल्वे स्थानकात लोकलचे ब्रेक जॅम झाल्याने कर्जतकडे जाणारी लोकल तासभर रखडली होती

    वांगणी :

    रेल्वे अपडेट

    वांगणी रेल्वे स्थानकात लोकलचे ब्रेक जॅम झाल्याने कर्जतकडे जाणारी लोकल तासभर रखडली होती

    सव्वा अकरा तर सव्वा बारा या कालावधीत ही लोकल रखडली होती

    या कालावधीत इतर लोकल्स लूप लाईनवरून रवाना करण्यात आल्या

    अखेर सव्वा बारा वाजता ही लोकल कर्जतच्या दिशेने रवाना करण्यात आली

  • 16 Jun 2021 12:43 PM (IST)

    सोलापुरात राँग साईडने येऊन ट्रकवाल्याने मोटारसायकल स्वारास दिली धडक, दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने मोटरसायकलस्वार वाचला

    सोलापुर – राँग साईडने येऊन ट्रकवाल्याने मोटारसायकल स्वारास दिली धडक

    दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने मोटरसायकलस्वार वाचला

    शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील प्रकार

    संपूर्ण माहिती संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद

  • 16 Jun 2021 12:01 PM (IST)

    अवैध वाळू उपशा विरोधात नागरिक आक्रमक, संगमनेर शहरातील नदी पात्रात केलं आंदोलन

    अवैध वाळू उपशा विरोधात नागरिक आक्रमक

    संगमनेर शहरातील नदी पात्रात केलं आंदोलन

    प्रवरानदी पात्रात झोपून केला प्रशासनचा निषेध

    महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच्या शहरात वाळू विरोधात आंदोलन

    अवैध वाळू उपसा बंद न केल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा

    आतापर्यंत खड्डयात गेले अनेक लोकांचे प्राण

    वारंवार निवेदन देऊन कार्यवाही होत नसल्याने नागरिकांचे आंदोलन

    आंदोलनात व्यापारी व सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी

  • 16 Jun 2021 11:27 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 143 मिमी

    सिंधुदुर्ग – जिल्ह्यात काल थोडीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पासून पुन्हा जोर धरला. सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार तर अन्य भागात थांबून थांबून पाऊस पडतोय.सर्व नदी नाले दुथडी भरून वाहता आहेत.नद्यांनी पात्रे ओलांडली.शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे ही नुकसान.आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 143 मिमी पाऊस पडला.तर मागील तीन दिवसात जिल्ह्यात सरासरी 324 मिमी पावसाची नोंद.तसेच 1 जून पासून जिल्ह्यात सरासरी 766 मिमी पाऊस पडला.पहाटेपासून जोर धरलेला पाऊस सध्या थोडा विसावला आहे.

  • 16 Jun 2021 09:24 AM (IST)

    मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग करायला

    काल पावसाने पावसाने उसंती घेतल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग सुरु

    रस्ते वाहतूक आणि ट्रेन्स तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरू आहे

    हिंदमाता, सायन किंग सरकलं , दादर , माटुंगा मध्ये जोरदार पाऊस

    आयएमडीने वर्तवल्याप्रमाणे बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे

    मुंबई ठाणे पालघरला आज ग्रीन अलर्ट आहे

    रत्नागिरी सिंधुदुर्ग ला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

  • 16 Jun 2021 08:23 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस

    रत्नागिरी –

    जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस

    तर जिल्ह्याच्या चिपळूण , गुहागर, दापोली तालुक्यात सखल भागात पाणी साचले

    सकाळ पासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण

    तसेच मुसळधार पाऊसाची शक्यता

  • 16 Jun 2021 08:22 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस

    सिंधुदुर्ग –

    जिल्ह्यात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस

    तर जिल्ह्याच्या काही भागात पावसाची रीपरीप

    तर सकाळ पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि काळोखी वातावरण
    मुसळधार पाऊसाची शक्यता
    पावसाला सुरुवात झाली असून सर्वञ काळोख पसरला आहे
  • 16 Jun 2021 08:18 AM (IST)

    कोल्हापूर शाहू समाधी स्थळाला पोलीस छावणीचे स्वरुप

    कोल्हापूर

    शाहू समाधी स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप

    मराठा मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नर्सरी बागेच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त

    नर्सरी बागेकडे येणारे सगळे रस्ते वाहतुकीसाठी बंद

  • 16 Jun 2021 07:59 AM (IST)

    कोल्हापूरच्या मराठा क्रांती मुक आंदोलनावर पावसाचे सावट

    कोल्हापूरच्या मराठा क्रांती मुक आंदोलनावर पावसाचे सावट

    सकाळपासून कोल्हापूरमध्ये पावसाची रिपरिप सुरू

    दाट ढगांची गर्दी, पावसाचा जोर वाढू शकतो

  • 16 Jun 2021 07:39 AM (IST)

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात समाज एकवटणार

    कोल्हापूर :

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात समाज एकवटणार

    खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं मूक आंदोलन

    नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळाचे ठिकाणी होणारे आंदोलन

    आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त

    नर्सरी बागेकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी केले बंद

    आंदोलनावर पावसाचं सावट

    शहर परिसरात पहाटेपासून कोसळतोय मुसळधार पाऊस

  • 16 Jun 2021 07:38 AM (IST)

    आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले

    औरंगाबाद –

    आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले

    विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात

    पहिली ते 12 वी पर्यंतच्या ऑनलाइन शिक्षणाला झाली सुरुवात

    पहिली ते 9 वी पर्यंत शिक्षकांची राहणार 50 टक्के उपस्थिती

    तर 10 वी आणि 12 वीच्या शिक्षकांची राहणार 100 टक्के उपस्थिती

    औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

  • 16 Jun 2021 07:37 AM (IST)

    नागपुरातील किन्नरचं स्वप्न झालं पूर्ण, भर रस्त्यात कापला वाढदिवसाचा केक 

    – नागपूरातील किन्नरचं स्वप्न झालं पूर्ण

    – भर रस्त्यात कापला वाढदिवसाचा केक
    – अनेकांच्या साथीने झाला किन्नरचा वाढविवस साजरा
    – रस्त्यात केक कापन्याचा व्हीडीओ व्हायरल
    – सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर किन्नरचा बर्थडे केला साजरा
    – रस्त्यावरून जाणारेही सहभागी झाले या अनोख्या सेलीब्रेशनमध्ये
  • 16 Jun 2021 07:35 AM (IST)

    मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचाही संभाजीराजेंना पाठिंबा

    औरंगाबाद –

    मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचाही संभाजीराजेंना पाठिंबा

    आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विनोद पाटील पोहोचणार कोल्हापुरात

    संभाजीराजेंच्या आंदोलनात विनोद पाटील घेणार सहभाग

    संभाजीराजे यांच्या विनंतीनंतर विनोद पाटील कोल्हापूरला रवाना

    मराठा आरक्षणासाठी याचिका टाकून विनोद पाटील यांनी लढली होती न्यायालयीन लढाई

  • 16 Jun 2021 07:34 AM (IST)

    मुसळधार पावसाने येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामातील 30 हजार साखरेचे पोते पाण्यात

    बीड – मुसळधार पावसाने येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामातील 30 हजार साखरेचे पोते पाण्यात

    15 हजार क्विंटल साखर भिजल्यानं लाखोंचं नुकसान

    40 ते 50 कामगारांच्या मदतीने पाणी बाहेर काढण्याच काम सुरू

    दोन दिवसात झालेल्या पावसाने गोदामातील साखर पाण्यात

  • 16 Jun 2021 07:31 AM (IST)

    मुसळधार पावसाचा येडेश्वरी साखर कारखान्याला जबरदस्त फटका

    बीड –

    मुसळधार पावसाचा येडेश्वरी साखर कारखान्याला जबरदस्त फटका

    येडेश्वरी साखर कारखान्याची तब्बल 15 हजार क्विंटल साखर भिजली

    येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामात घुसले पावसाचे पाणी

    गोदामात होती 1 लाख 73 हजार 208 क्विंटल साखर

    15 हजार क्विंटल साखर भिजल्यामुळे करखान्याचे मोठे नुकसान

  • 16 Jun 2021 07:19 AM (IST)

    नाशकात विना परवानगी कार्यक्रम केल्याने मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

    नाशिक – विना परवानगी कार्यक्रम केल्याने मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

    मनसे अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त केला होता जेष्ठांना छत्रीवाटपाचा कार्यक्रम

    सातपूर आणि अंबड च्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

    सातपुरच्या 6 तर सिडकोच्या 10 जणांवर गुन्हे दाखल

    सत्तेचा गैरवापर होत असल्याचा मनसेचा आरोप

  • 16 Jun 2021 06:43 AM (IST)

    आटपाडी तालुक्यातील करगणीच्या सरपंचाला लाच घेताना अटक

    – आटपाडी तालुक्यातील करगणीच्या सरपंचाला लाच घेताना अटक
    ४० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
    सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
  • 16 Jun 2021 06:33 AM (IST)

    छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा

    कोल्हापूर

    प्रकाश आंबेडकर पुण्यातून निघाले,

    छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलाय …

    10 वाजता कोल्हापूरमध्ये आंदोलनस्थळावर पोहोचणार,

    प्रकाश आंबेडकर आंदोलनात सहभागी होत असल्यानं सगळ्यांनाच प्रकाश आंबेडकरांच्या आगमनाची उत्सुकता,

  • 16 Jun 2021 06:31 AM (IST)

    विवेक पाटील यांच्यावर ईडीची कारवाई, प्रशांत ठाकूर यांच्याकडून समाधान व्यक्त

    प्रशांत ठाकूर यांनी ईडीच्या कारवाई वर व्यक्त केलं समाधान

    विवेक पाटील यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या इतरांवर सुद्धा कारवाई करावी

    प्रशांत ठाकूर यांनी टीव्ही नाईन शी बोलताना केली मागणी