Maharashtra News LIVE Update | मालाडमध्ये प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही  

| Updated on: Jun 21, 2021 | 12:25 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

Maharashtra News LIVE Update | मालाडमध्ये प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही  
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jun 2021 12:23 AM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये वाहन चालकाने दिली तीन जणांना धडक, चिमुकली जखमी

    मीरा भाईंदर: भाईंदर पूर्वेच्या नवघर हद्दीत एका मद्यपी वाहन चालकाने दिली तीन जणांना धडक

    पळून जात असताना नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले

    अपघातात एका चिमुकलीला डोक्याला दुखापत

    वाहन चालक नवघर पोलिसांच्या ताब्यात

  • 20 Jun 2021 10:52 PM (IST)

    मालाडमध्ये प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही  

    मालाड,  मालवणी येथील चीकू वाड़ी येथे असलेल्या एका प्लास्टिकच्या निर्मिती करणाऱ्या कंपनीला आग

    घटनास्थळी अग्नशमन दलाच्या गाड्या दाखल,

    आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर पुन्हा आाग भडकली

    मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या ठिकाणी गोदामामध्ये लाकडाचे सामान ठेवले होते.

    सध्यातरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


  • 20 Jun 2021 09:07 PM (IST)

    ठाण्यात दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा बुडून मृत्यू

    ठाणे : दिवसभरात तीन जणांचा तीन वेगवेगळ्या घटनामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचा मृत्यू एकाच ठिकाणी येऊर इथे असलेल्या तलावात झालेला आहे. तर एकाचा मृत्यू लोकमान्य नगर भागातील पाणी साचलेली खड्ड्यात बुडून झाला आहे.

    सकळी येऊर येथील तलवात मृत्यू झाला त्याचे नाव प्रसाद पावसकर आहे वय 16 वर्ष

    दुपारी लोकमान्य नगर येथे  मृत्यू झालेल्या माणसाचे नाव सुतेश करावडे असे आहे. वय 33वर्ष

     

  • 20 Jun 2021 07:27 PM (IST)

    दोन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर गोंदिया शहरासह काही तालुक्यांत पाऊस

    गोंदिया :  दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असताना आज सायंकाळी पावसाच्या हजेरीने दिलासा

    गोंदिया शहरासह काही तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

    विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे

  • 20 Jun 2021 07:25 PM (IST)

    समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या दोन कंपन्यांना 77 कोटींचा दंड

    जालना : समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या दोन कंपन्यांना 77 कोटींचा दंड

    जालना तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांची कारवाई

    गौण खनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ठोठावला दंड

  • 20 Jun 2021 07:25 PM (IST)

    पोहण्यासाठी भीमा नदीत दोघांनी मारली उडी, एकाचा मृत्यू

    पंढरपूर : भीमा नदीत एक वीस वर्षीय तरुण बुडाला

    होडीतून नदीत फिरायला गेलेल्या चौघांपैकी एक जण बुडाला

    पोहण्यासाठी नदीत दोन तरुणांनी मारली होती उडी

    पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण बुडाला

    एकाला वाचवण्यात यश
    प्रथमेश कुलकर्णी  असे बुडालेल्या मुलाचे नाव

    नदीपात्रात शोध मोहीम सुरु

  • 20 Jun 2021 06:54 PM (IST)

    नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झाली हाणामारी, एक कैदी जखमी  

    नागपूर : मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झाली हाणामारी

    एक कैदी जखमी तर हाणामारी सोडवायला गेलेले दोन किरकोळ जखमी

    राजू वर्मा असे जखमी कैदीचे नाव

    तर विवेक पालटकर असे हल्ला करणाऱ्या कैद्यांचं नाव

    पालटकर हा कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्याच्या आरोपात कारागृहात आहे

    शनिवारी रात्री घडली घटना

  • 20 Jun 2021 06:53 PM (IST)

    वारीच्या शासन निर्णयावरून आळंदी आणि देहू संस्थानात वेगवेगळे निर्णय

    मुंबई : वारीच्या शासन निर्णयावरून आळंदी आणि देहू संस्थानात वेगवेगळे निर्णय

    शासनाचा निर्णय देहू संस्थानला मान्य

    आमची कोणतीही मागणी शासनाकडे नसल्याचं देहू संस्थानचं म्हणणं

    तर वारीला अश्वासाठी परवानगी द्या आळंदी देवस्थानची मागणी

    उद्याच्या राज्यपालांना भेटायला जाणाऱ्या वारकरी शिष्टमंडळात देहू संस्थांन सहभागी होणार नाही

    शासनाचा निर्णय मान्य, देहू संस्थानची वारीची तयारी सुरू

    मात्र आळंदी देवस्थानची भूमिका अजूनही ठरेना

     

  • 20 Jun 2021 06:38 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत दाखल

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत

    दुपारच्या विमानाने दिल्लीला रवाना, आज सायंकाळी दिल्लीत दाखल झाले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीनंतर शरद पवार पहिल्यांदा दिल्लीत दाखल

    शरद पवार यांच्या दिल्लीवारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता

    शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर सर्वांचे लक्ष

  • 20 Jun 2021 06:27 PM (IST)

    पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सांगलीमध्ये “जयंत रेस्क्यू फोर्स”ची स्थापना

    सांगली – संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी “जयंत रेस्क्यू फोर्स”ची स्थापना

    जयंत पाटील यांनी बोटीतून कृष्णा नदीच्या पात्रात फेरफटका मारला

  • 20 Jun 2021 06:01 PM (IST)

    भिवंडी शहरातील रामनगर परिसरात घराची भिंत कोसळली, एकाचा मृत्यू

    भिवंडी : भिवंडी शहरातील रामनगर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे घराची भिंत कोसळली

    भिंत शेजारच्या घरावर कोसळल्याने एकाचा मृत्यू

    अरविंद सिंग असे मृतकाचे नाव आहे

    पहिल्या मजल्यावर सुरू होतं अनधिकृत बांधकाम

    महापालिका आपत्ती व्यवस्थापक घटनास्थळी दाखल

  • 20 Jun 2021 05:59 PM (IST)

    उद्याच्या नाशिक मूक मोर्चासाठी संभाजी छत्रपती नाशिककडे रवाना

    पुणे  : उद्याच्या नाशिक मूक मोर्चासाठी छत्रपती संभाजीराजें नाशिककडे रवाना

    रस्त्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून संभाजीराजेंचं स्वागत

    उद्याच्या मूक मोर्चाकडे महाराष्ट्राचं लक्ष

    छत्रपती संभाजीराजें उद्या नाशिकमध्ये ठरवणार पुढील आंदोलनाची दिशा

    पुण्यातून आजच कार्यकर्ते नाशिककडे रवाना

  • 20 Jun 2021 05:57 PM (IST)

    साताऱ्यातील कास तलाव मुसळधार पाऊसामुळे ओव्हरफ्लो

    सातारा : महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव ओव्हरफ्लो

    मुसळधार पाऊसामुळे कास तलाव ओव्हरफ्लो

     

  • 20 Jun 2021 05:11 PM (IST)

    विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पूर्णकाळ चालवा, भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र  

    मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पूर्णकाळ चालवा

    पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    महाराष्ट्रातील सर्व आमदार व कर्मचाऱ्यांचं लसीकरण तातडीनं पूर्ण करण्याची मागणी

    केंद्र सरकारने 400 खासदारांचं लसीकरण पूर्ण केलंय

    महाराष्ट्रातील आमदारांचही लसीकरण करा

    पावसाळी अधिवेशन लवकर उरकू नका

    राज्यात शेती, औद्योगिक, आरोग्य आणि शिक्षणाची समस्या गंभीर बनल्यानं पूर्णवेळ अधिवेशन घेण्याची मागणी

  • 20 Jun 2021 04:55 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

    पुणे  : शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. याची दखल आता पोलिसांनी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे. माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासह शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 20 Jun 2021 03:53 PM (IST)

    ठाण्यात चारचाकी गाडीत 46 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला

    ठाणे : टिकुजिनी वाडी या ठिकाणी एका चारचाकी गाडीत 46 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला

    सुनील आस्थाना असे मृत व्यक्तीचे नाव

    मानपाडा चितळसर पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबची टीम घटस्थळी दाखल

    मयत व्यक्तीच्या गळ्याला जखम आहे

    पुढच्या चालक सीटवर मृतदेह होता

    सध्या तरी मानपाडा चितळसर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केलेली आहे

    मृत व्यक्ती हा ओला उबेर ड्रायव्हर असून त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे

    तपास सुरू असून सध्या पोलिसांनी यावर बोलणे टाळले आहे

  • 20 Jun 2021 03:50 PM (IST)

    अकोला शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी

    अकोला शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी

    सकाळपासून आहे जिल्हात ढगाळ वातावरण

    या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा

    पाउस पडल्याने शेतकरी आनंदीत झाला असून जिल्ह्यात पेरणीला सुरुवात झाली आहे

  • 20 Jun 2021 02:03 PM (IST)

    माजी मंत्री सदाभाऊ खोत अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर

    अहमदनगर

    माजी मंत्री सदाभाऊ खोत अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर

    तर पारनेर वरून संगमनेर कडे जात असतांना थेट शेतकऱ्याच्या शेतात

    शेतकरी नितीन भाऊसाहेब तराळ शेतामध्ये वाटाण्याची पेरणी करताना सदाभाऊंना दिसले

    त्यांनी तात्काळ गाडी थांबवुन शेतात गेले आणि पेरणी यंत्रावर बसुन एक पेरणीचा फेरा मारला

    त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांच्या शेतीमालाची, विक्रिव्यवस्थेचे, मार्केटची इत्यादी चौकशी केली

  • 20 Jun 2021 12:14 PM (IST)

    कोल्हापूरनंतर मराठा आरक्षणाचे वादळ सोलापुरात, 4 जुलैला उग्र मोर्चा निघणार

    कोल्हापूरनंतर मराठा आरक्षणाचे वादळ सोलापुरात

    सोलापुरात 4 जुलैला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा निघणार

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती

    मोर्चासाठी सर्व नेत्यांना निमंत्रित करणार

    कोल्हापुरात मूक मोर्चा झालेला असला तरी सोलापुरात मात्र उग्र मोर्चा होणार

    मोर्चाच्या तयारीसाठी नरेंद्र पाटील स्वतः सोलापूर जिल्ह्यात 5 दिवसांचा दौरा करणार

    सोलापुरातील पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांची माहिती

  • 20 Jun 2021 12:05 PM (IST)

    वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातून चक्क रुग्णवाहिकेची चोरी, गुन्हा दाखल

    वर्धा

    – जिल्हा सामान्य रुग्णालयातून चक्क रुग्णवाहिकेची चोरी

    – मेल सर्जरी वॉर्ड पुढे उभी होती रुग्णवाहिका

    – अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

    – रुग्णवाहिकेवरील चालक कर्तव्यावर आला असता निदर्शनास आली बाब

    – स्नेहलनगर परिसरात मिळाली रुग्णवाहिका

    – रुग्णवाहिका पोलिसांनी जप्त केली असून चोरट्याचा शोध सुरू आहे

  • 20 Jun 2021 09:59 AM (IST)

    सांगलीतील पूर परिस्थितीवर महापालिकेचा वॉच, सरकारी घाटावरील पाणीपातळीची आयुक्तांकडून पाहणी

    सांगली –

    सरकारी घाटावरील पाणीपातळीची आयुक्त कापडणीस यांनी केली पाहणी ,

    सर्व आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची घेतली माहिती,

    पूर परिस्थितीवर महापालिकेचा वॉच

  • 20 Jun 2021 09:55 AM (IST)

    पर्यटनस्थळी बंदी असतानाही लोणावळ्यामधील भुशी डॅमजवळ पर्यटकांची गर्दी

    लोणावळा,पुणे

    -पर्यटन स्थळ बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामधील भुशी धरण परिसरात  गर्दी

    -काल लोणावळा पोलिसांकडून अनेक पर्यटकांवर कारवाई

    मात्र आज पुन्हा पर्यटक लोणावळ्यात दाखल

  • 20 Jun 2021 08:58 AM (IST)

    राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंसह मनपा आयुक्त शंकर गोरेना नोटीस

    अहमदनगर

    राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंसह मनपा आयुक्त शंकर गोरेना नोटीस

    मनपा उपअभियंता कल्याण बल्लाळ यांचे पदावनत प्रकरण

    ओव्हरसीअर पदावर पदावनत करण्यात दिलेल्या स्थगिती प्रकरणात राज्यमंत्री तनपुरेंना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बजावल्या नोटीस

    16 जुलैला पुढील सुनावणी

  • 20 Jun 2021 08:57 AM (IST)

    सांगलीत विनाकारण बोटी पात्रात बोट आणल्यास जप्त केली जाणार, महापालिकेचे स्पष्टीकरण

    सांगली –

    आयर्विन पुलावरून उड्या मारल्यास गुन्हे दाखल करु,

    विनाकारण बोटी पात्रात आणल्यास बोट जप्त करणार,

    मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी इशारा दिला आहे

  • 20 Jun 2021 07:18 AM (IST)

    नाशकात परप्रांतियांनी शेतकऱ्याला फसवलं, चांगला भाव मिळतोय सांगून शेतमाल गहाळ

    नाशिक

    – परप्रांतीय शेतकऱ्याला फसवलं..
    – नाशकात चांगला भाव मिळतोय अस सांगून परस्पर शेतमाल केला गहाळ
    – अंबड पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
    – शेतकऱ्यांच्या फसवणुकीत होतीये वाढ
    – अमिशाला बळी पडू नका,पोलिसांच शेतकऱ्यांना आवाहन

  • 20 Jun 2021 07:16 AM (IST)

    छत्रपती संभाजी राजेंच्या उपस्थितीत उद्या नाशिकमध्ये मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलन

    नाशिक

    – छत्रपती संभाजी राजेंच्या उपस्थितीत उद्या नाशिकमध्ये मूक आंदोलन होणार
    – मराठा आरक्षण मुद्द्यावर होणार आंदोलन
    – आंदोलनाची तयारी पूर्ण
    – काळे शर्ट,काळी पॅन्ट,काळी टोपी घालून निषेध नोंदवणार
    – सकल मराठा समाजाने आंदोलनात सहभागी होण्याच आवाहन

  • 20 Jun 2021 07:15 AM (IST)

    वाहन चालकांकडून नियमांचा भंग, दंडवसुलीसाठी नाशिक पोलीस थेट घरीच धडकणार

    नाशिक : वाहन चालकांनी नियमांचा भंग केल्यास दंडवसुलीसाठी नाशिक पोलीस थेट घरीच धडकणार
    – नियम पायदळी तुडवनाऱ्या 1670 चालकांना नोटिसा
    – तब्बल 1 कोटींचा दंड प्रलंबित
    – दंड भरून पोलीस प्रशासनास सहकार्य करा,कारवाई करण्यास भाग पाडू नका,पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच आवाहन