महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 22 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening
सांगली : जत तालुका येथील संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे आणि तलाठी विशाल उदगीरे लाचलुचपतच्या जाळ्यात
मातीची वाहतूक करण्याऱ्यांकडून केली अडीच लाखाची मागणी
पैकी 2 लाख 30 हजारची लाच घेताना रंगेहाथ अटक
तर अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे फरार
सांगली लाच लुचपत विभागाची कारवाई
अहमदनगर : अहमदनगरला महापालिका महापौर पदासाठी लवकरच निवडणूक
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झाली बैठक
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापदेखील उपस्थित
महापौरपदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावरही एकमत झाल्याची चर्चा
30 जून रोजी संपतेय मुदत, त्यामुळे कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते
मुंबई : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मागासवर्गीय आयोगाची उद्या मुंबईत बैठक
बैठकीला मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि 9 सदस्य राहणार उपस्थित
उद्या नव्या आयोगाची पहिलीच होतीये बैठक
राज्यातील विविध मान्यवरांची मागासवर्गीय आयोगात लागलीये वर्णी
विविध विषयावर उद्या आयोगाची चर्चा होण्याची शक्यता
मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त सदस्य लक्ष्मण हाके यांची माहिती
सकाळी 11.30 वाजता होणार बैठक
अहमदनगर : शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद अखेर राष्ट्रवादीला
विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात
शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला होता
आजच्या बैठकीत शिर्डीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
तर पंढरपूर काँग्रेसकडे जाण्याचा निर्णय
रत्नागिरी : मासे पकडायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
गुहागर तालुक्यातील आरे या गावातील घटना
पाचमाड परिसरातील समुद्रावर दोघे गेले होते
सिद्धांत साटले आणि प्रतीक नावले अशी या दोन तरुणांची नावे
मुंबई : रिव्ह्यू पिटीशन हे 99 ते 100 टक्के फेटाळलं जातं
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला एक पावित्र्य असतं, उठसूट कोर्टाचा निर्णय बदलता येणार नाही
रिव्ह्यू पिटीशन आणि क्यूरेटीव्ह पिटीशनमध्ये यश येण्याची शक्यता कमी
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच मोठं विधान
50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा बदलता येत नाही
आता आरक्षणाबाबतीत समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारच्या हातात आहे
मराठा समाज आणि सरकारचं हे फक्त समाधान आहे या विषयावर बोलणं टाळलं
दिल्ली : शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावरील विरोधी पक्षांची बैठक संपली आहे. ही बैठक अडीच तास चालली. बैठक संपल्यानंतर सर्व नेते पवारांच्या निवासस्थानाबाहेर आले आहेत. यातील काही नेते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत.
“राष्ट्रमंचाची बैठक भाजपविरोधात शरद पवार यांनी बोलावल्याची माहिती चुकीची. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती. पवारांच्या निवासस्थानी शरद पवारांकडून या माध्यमातून मोठी राजकीय घडामोड घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात काँग्रेसचा समावेश नाही, ही बातमीही चुकीची आहे. काँग्रेस नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. पण ते कुठल्यातरी कारणामुळे येऊ शकले नाहीत. काँग्रेसला वगळून काही सुरु आहे हे चुकीचं आहे,” असं घनश्याम तिवारी म्हणाले.
औरंगाबाद : वाळूज औधोगिक वासहतीत के. सेक्टरमध्ये असलेल्या पुठ्ठ्याचे बॉक्स बनविणाऱ्या कंपनीला दुपारी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये कंपनीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन बंबाच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवांनानी अथक परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातल्या वाकी येथे चार तरुण बुडल्याची माहिती
सहलीसाठी गेले होते मित्र
कन्हान नदीमध्ये पाण्यात गेल्यावर अंदाज न आल्यानं बुडल्याची माहिती
एकाचा मृतदेह सापडला
मुंबई: सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर, पालघर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजगकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : सिडको घेराव आंदोलन करू नये यासाठी कृती समितीला पोलिसांनी बैठकीला बोलावलं
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, यांच्यासह कृती समितीचे सदस्य बैठकीला हजर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झाली बैठक
कारोनाची तिसऱ्या लेट येण्याची शक्यता असल्याने आंदोलन करू नये, पोलिसांनी केले आवाहन
आम्हाला परवानगी देत नसाल तर प्रकल्पग्रस्त तरुण आक्रमक होतील
आम्हाला आंदोलन करू दिलं तर ते अगदी शिस्तबध्द पद्धतीने होईल
आंदोलन चिघळले तर याला जबाबदार महविकास आघाडी सरकार असेल
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली.
संभाजी छत्रपती यांची ट्विटरद्वारे माहिती
राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
#मराठा_आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 22, 2021
पालघर : जिल्ह्याचा दौऱ्यावर असलेलं भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तलासरीत पाहोचले
ते दिवंगत माजी आमदार पास्कल धनारे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
त्यानंतर वसा येथे सांत्वनपर भेटीसाठी ते पुढे जाणार आहेत
12 एप्रिल रोजी माजी पास्कल धनारे यांचं कोरोनाने निधन झालं होतं
11 एप्रिल रोजी वसा येथील लक्ष्मण वरखंडे उपाध्यक्ष पालघर जिल्हा यांचं निधन झालं होतं
मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि 5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.
बीड :
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
शरद पवारांनी दिल्लीत बैठक घेणं स्वाभाविक
ज्या ज्या वेळेस देशाचे प्रश्न उदभवतात त्यावेळी शरद पवार दिल्लीत बैठका घेतात
अनुभवी नेता म्हणून दिल्लीत बैठका
यात काहीच गैर नाही
नाशिक – खाजगी कोचिंग क्लास असोसिएशनचे आंदोलन
कमी संख्येत क्लास सुरू करण्याची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आंदोलन
आंदोलन करून जिल्हाधिकार्यना निवेदन देत केली मागणी
कोचिंग क्लासेस बंद असल्याने आर्थिक फटका बसल्याची भावना
औरंगाबाद ब्रेकिंग :-
औरंगाबादेत ओबीसी समाजाचे आक्रोश आंदोलन सुरू
औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात आंदोलनाला सुरुवात
शेकडो ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी
राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ होतंय जोरदार आंदोलन
पुणे –
– 26 जूनला भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण पुण्यात,
– राजश्री शाहू जयंतीसह विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने रावण पुण्यात येणार,
– यावेळी चंद्रशेखर आझाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जाऊन राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार,
– आझाद समाज पार्टीचे पुणे कार्यकारी अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांची पत्रकाद्वारे माहिती.
नाशिक –
खाजगी कोचिंग क्लास असोसिएशनचे आंदोलन
कमी संख्येत क्लास सुरू करण्याची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आंदोलन
आंदोलन करून जिल्हाधिकार्यना निवेदन देत केली मागणी
कोचिंग क्लासेस बंद असल्याने आर्थिक फटका बसल्याची भावना
मुंबई एनसीबीने महाराष्ट्र पोलिसांच्या सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताच्या मुलाला ड्रग्स प्रकरणी अटक
एनसीबीने काल रात्री गोरेगाव भागात छापा टाकला आणि 100 हून अधिक एलएसडी ब्लोट्स सह त्याला अटक
सदर एसीपीने 90 च्या दशकात अंडरवर्ल्डबरोबर दोन हात केले आहेत, त्यांना आपल्या मुलाबद्दल माहित नव्हते
पुणे –
पुण्यात सीएचबी प्राध्यापकांचं बेमुदत आंदोलन
उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु
राज्यात महाविद्यालयात प्राध्यापक भरती करा
मासिक भत्ता बंद करून समान वेतन धोरण जाहीर करा
या मागणीसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई देणार आंदोलनाला भेट
थोड्या वेळात वरुण सरदेसाई भेट देऊन घेणार पत्रकार परिषद
औरंगाबाद –
औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे अर्धनग्न आंदोलन
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणार अर्धनग्न आंदोलन
थोड्याच वेळात होणार अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात
अर्धनग्न आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आंदोलनाला सुरुवात होताच कार्यकर्त्यांना घेणार ताब्यात
– लासलगाव बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक
– गेल्या 26 दिवसात 11 लाख 70 हजार क्विंटलची आवक
– कांद्यातून 180 कोटी रुपयांची उलाढाल
– मागील वर्षीच्या या दिवसाच्या तुलनेत साडेपाच लाख कांद्याची आवक ही जास्त व 130 कोटी रुपयांची जास्त उलाढाल
– कांद्याची विक्रमी आवक होऊन 700 रुपये सरासरी दरात मागील वर्षीच्या तुलनेत जास्त – सभापती सुवर्णा जगताप
अहमदनगर
परनेरच्या तहसीलदारांकडून खंडणी घेताना सामाजिक कार्यकर्ताला अटक
तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता अरुण रोडे याने मागितले होते 50 हजार रुपये
रोडे याने नदीपात्रातील वाळू उपसा व तहसील कार्यालयातील कामाविषयी तक्रार करीत होता
त्या तक्रारी मागे घेण्यासाठी मागितले हकते 50 हजार रुपये
तर तडजोड करून 30 हजाराची लाज घेतांना पोलीस निरीक्षक घनश्याम बाळप यांनी रंगेहाथ पकडले
नागपूर –
नागपूर शहरात हजारांवर बेकायदा बांधकामे
महापालिकेने आता बेकायदेशीर बांधकाम विरोधात कसली कंबर
1 हजार 348 बांधकाम ना दिल्या नोटीस
337 मालमत्ता धारकांना नोटीस देऊन कारवाई करण्यात आली
एम आर टी पी कायद्या नुसार बजावण्यात आल्या नोटीस
सोलापूर – पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठातील दहा जणांची पदोन्नती रद्द
तत्कालिन कुलसचिव डॉ.गणेश माणसा यांनी केलेल्या पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य
2017- 18 या कालावधीत तत्कालीन कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी विद्यापीठातील 10 जणांची केली होती पदोन्नती
या पदोन्नती शासन निर्देशानुसार तसे सेवाज्येष्ठतेनुसार झाले नसल्याचे घेण्यात आले होते विद्यापीठाकडे आक्षेप
आक्षेपांची दखल घेत विद्यापीठाने नियमबाह्य आढळलेल्या दहा कर्मचारी अधिकार्यांची पदोन्नती केली रद्द
या कर्मचार्यांना पुन्हा त्यांच्या चार वर्षांपूर्वीच्या मूळ पदी केले स्थापित
पदोन्नती प्रक्रिया राबविताना राखीव संवर्गासाठी 33 टक्के जागा रिक्त ठेवून उर्वरित जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आहे निलेश
नाशिक – अडीच वर्ष उलटून देखील ऐतिहासिक सुंदर नारायण मंदिराचे काम अपूर्ण
पुरातत्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे भाविक आणि नागरिकांमध्ये संताप
अधिकाऱयांनी दिले लॉक डाऊन चे कारण
2018 मध्ये खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते काम
तीन टप्प्यात होणार होते काम
मात्र पहिल्या टप्प्यातील कामच रखडल्याने नागरिकांमध्ये संताप
अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी
नाशिक – 1 जुलै पासून स्मार्ट बस सेवेला प्रारंभ
पहिल्या टप्प्यात शहरात धावणार 50 बसेस
26 जून रोजी तातडीची बैठक
27 ते 30 जून दरम्यान शहरात बस सेवेचा ट्रायल रन
वादग्रस्त बससेवेबाबत सर्वपक्षीयांचे मौन
नाशिक – विल्होळी गावाजवळ बिबट्याचे दर्शन..
वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु..
संपूर्ण कुटुंबा सह बिबट्याचे दर्शन
परिसरात भीतीचे वातावरण
विमानतळाला दिबांच्या नावासाठी संघर्षाचा लढा कायम राहणार
२४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; वेळ पडल्यास आत्मदहन करण्याचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना समजूनच घेतल्या नाहीत: आ.प्रशांत ठाकूर
आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर असेल तर आम्ही रिऍक्शन मोडवर असणार
दिबासाहेबांच्या नावासाठी आम्ही केंद्रातही जाणार
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे प्रकल्पग्रस्तांच्या भावनेची चेष्टा करत आहे – प्रशांत ठाकूर
मंत्रालयमध्ये बॉम्ब संबंधित ईमेल प्रकरणात आरोपी शैलेश शिंदेला अटक
मरीन ड्राईव पोलिस करत आहे पुढील कार्रवाई
मात्र मुलांच्या शैक्षणिक वर्ष हैचिंग शालेने वाया केले आम्हाला न्याय मिळत नाही अस आरोप
अहमदनगर
श्रीगोंदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना
आरोपी बाळासाहेब नाहटा यांनी गटविकास अधिकारी प्रशांत दत्तात्रय काळे यांना शिवीगाळ करून जीवे मरण्याची दिली धमकी
लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीची तपासणी करून सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करू नये अशी मागणी नाहटा यांनी केली होती
मात्र त्यांची मागणी काळे यांनी मान्य न केल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला
त्यानंतर नाहटा यांनी अश्लिल शिवीगाळ करून गाडीचा दरवाजा उघडून काळे यांना गाडीतून उडून जीवे मारण्याची धमकी दिली
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– धमकी, शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल
– दत्तवाडी पोलिस ठाण्यात स्थानिक भाजप नगरसेवक आनंद रिठे यांच्यावर गुन्हा दाखल
– रिठे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून संजय सुर्वे या इसमाने गळफास घेत आत्महत्या केलीय
– आत्महत्या केलेल्या संजय सुर्वे यांनी दत्तवाडी येथील इमारतीवर अनधिकृत टॉवर उभा केल्याची तक्रार नगरसेवक रिठे यांनी पालिकेत केली होती
– रिठे हे कारवाईची भीती दाखवून वेळोवेळी पैशाची मागणी आणि धमकी देत असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत केलीय
वर्धा
– वर्ध्याच्या बोदड (मलकापूर) येथे बहिण भावाचा मृत्यू
– फूड पोयजनिंग झाल्याची गावात चर्चा असल्याची माहिती
– मुलीचा आजारामुळे मृत्यू झाल्याची पोलीस सूत्रांची माहिती
– मुलाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतर होईल स्पष्ट
– उन्नती सिद्धधार्थ कांबळे (10 वर्ष), सम्यक सिद्धधार्थ कांबळे (2 वर्ष) अशी त्यांची नाव आहे
– 18 जून रोजी रात्री जेवण झाल्यानंतर आई आणि मुलांची प्रकृती अचानक बिघडली
– 19 जून रोजी सम्यकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
– प्रथम रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने भरती केलेल्या उन्नतीचा 20 जून रोजी मृत्यू झाला
– घटनेमुळे परिसरात हळहळ
– अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा मात्र पोलिसांसह , डॉक्टरांकडून अधिकृत दुजोरा नाही