Maharashtra News LIVE Update | अल्पवयीन मुलीची प्रियकराकडून हत्या, वर्ध्याच्या आर्वी येथील घटना

| Updated on: Jun 27, 2021 | 11:12 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

Maharashtra News LIVE Update | अल्पवयीन मुलीची प्रियकराकडून हत्या, वर्ध्याच्या आर्वी येथील घटना
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 27 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jun 2021 11:11 PM (IST)

    अल्पवयीन मुलीची प्रियकराकडून हत्या, वर्ध्याच्या आर्वी येथील घटना

    वर्धा :

    – वर्ध्याच्या आर्वी येथील घटना

    – अल्पवयीन मुलीची प्रियकराकडून हत्या

    – विहिरीत आढळला होता मुलीचा मृतदेह

    – चार ते पाच दिवसानंतर झाला उलगडा

    – अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत बोलत असल्याच्या कारणातून दोघांत वाद झाला

    – त्यानंतर प्रियकराने मुलीला विहीरीत ढकलून तिची हत्या केली

    – पोलिसांनी तपास कायम ठेवत प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली

  • 27 Jun 2021 09:24 PM (IST)

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला, महाराष्ट्र हद्दीत कर्नाटक पोलिसांनी उभारले तात्पुरते चेक नाके

    उस्मानाबाद :

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला, महाराष्ट्र हद्दीत कर्नाटक पोलिसांनी उभारले तात्पुरते चेक नाके

    उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील कसगी येथे सीमेवर कर्नाटक पोलिसांनी उभारले सीमा तपासणी चेक नाके

    शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी केला विरोध, डाव उधळला

    चौगुले यांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार, आगामी काळात वाद पेटण्याची शक्यता


  • 27 Jun 2021 08:01 PM (IST)

    तहसीलदाराच्या कार्यालयात कोतवालाची आत्महत्या, बुलडाण्यात खळबळ

    बुलडाणा : मोताळा तहसील कार्यालयातील कोतवाल विष्णू सूरपाटणे यांनी तहसील कार्यालयातील असलेल्या तहसीलदार यांच्या निवासस्थानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू, मात्र गळफास घेण्याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मात्र तहसील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ.

  • 27 Jun 2021 07:59 PM (IST)

    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा ससुनवघर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी

    वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा ससुनवघर येथे प्रचंड वाहतूक कोंडी आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज विकेंड लॉकडाऊन असूनही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर निघाले आहेत. त्यात मालजीपाडा येथे ब्रिजच काम सुरू असल्याने दरदिवशी येथे वाहनांच्या चार ते पाच किमीच्या रांगा लागत आहे. ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

  • 27 Jun 2021 07:10 PM (IST)

    ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर मंत्री धंनजय मुंडे यांचे प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर

    नांदेड: प्रीतम मुंडे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण टिकवावे, मी त्यांच्यासोबत आंदोलनात उतरायला तयार, मंत्री धंनजय मुंडे यांचे प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर

  • 27 Jun 2021 05:47 PM (IST)

    मराठा समाजाचे प्रतिनिधी खासदार संभाजीराजे यांच्या भेटीला

    मराठा समाजाचे प्रतिनिधी खासदार संभाजीराजे यांच्या भेटीला

    मराठा समाजातील समन्वयकांसोबत संभाजीराजेंचा हितगुज

    कोल्हापूरमधील भवानी मंडपात संवाद

    कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाज उपस्थित

    2 आंदोलन झाल्यावर संभाजीराजे यांचा संवाद

  • 27 Jun 2021 05:00 PM (IST)

    सोलापूर पालकमंत्री पदाबाबत दत्तात्रय भरणे यांचा मोठा गौप्यस्पोट

    इंदापूर :

    सोलापूर पालकमंत्री पदाबाबत दत्तात्रय भरणे यांनी केला मोठा गौप्यस्पोट
    खुद्द शरद पवार यांच्याकडे एक महिन्यापूर्वी केली होती पालकमंत्रीपदातून मुक्त करण्याची विनंती
    सोलापूरकरांचे पाणी नसतानाही सोलापूरकरांचा झाला होता गैरसमज
    पदापेक्षा माझ्या तालुक्याच्या विषय महत्वाचा, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे..

  • 27 Jun 2021 04:56 PM (IST)

    राज्यात ढगाळ हवामान, पुढच्या 3 तासात मुंबईसह अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता

    राज्यात ढगाळ हवामान; 3 तासात मुंबईसह दमन, पालघर, डहाणू, मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार
    पावसाची शक्यता आहे.त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यासह घाट परिसरातील अनेक शहरात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती

  • 27 Jun 2021 04:18 PM (IST)

    भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा महाविकास आघाडीच्या व्हीआयपी कल्चरवर घणाघात

    – भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा महाविकास आघाडीच्या व्हीआयपी कल्चरवर घणाघात,

    – बालेवाडी स्टेडियमच्या अथलेटिक्स ट्रॅकवरच व्हीआयपींनी केल्यात गाड्या पार्क,

    – आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र या विषयावर चर्चा करण्यासाठी काल बालेवाडीत आढावा बैठक घेण्यात आली,

    – या बैठकीला उपस्थित शरद पवार, क्रीडा मंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते,

    – या सर्व व्हीआयपीच्या गाड्या स्टेडियममधील अथलेटिक्स ट्रॅकवर पार्क करण्यात आल्या होत्या,

    -अथलेटिक्स ट्रॅकवरच गाड्या पार्क करणं चुकीचे असून महाविकास आघाडी सरकारची हि दादागिरी असल्याची शिरोळे यांची ट्विटवरून टीका.

  • 27 Jun 2021 04:13 PM (IST)

    ओबीसीचं नेतृत्व केलं, विरोधी पक्षनेता होतो, महसूल खात्याची अपेक्षा होती, पण… : विजय वडेट्टीवार

    मंत्री विजय वडेट्टीवार :

    – मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे

    – ओबीसीवर अन्याय झाल्याय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल

    – प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही

    – बावनकुळे साहेब… माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही

    – झुकायला आणि वाकायला तयार आहे समाजासाठी

    – मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात

    – धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारही नाही

    – महाराष्ट्रात तीन दिवस फिरलो तरी २५ लाखांची सभा होईल

    – झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये

    – ओबीसीचं खातं भेटले तेव्हा चपराशाही नव्हता, उधारीवर चालवतो खातं. समाज कल्याणच्या भरवशावर हे खातं चालवतो

    – ओबीसी खात्यासाठी जागा भरायला पैसे नाही म्हणता कार्यालयाला जागा नाही

    – काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं पण चुकी झाली

    – विरोधी पक्ष नेता होतो, ओबीसीचं नेतृत्व करतो. वाटलं महसूल खातं मिळेल, पण भेटले हे खातं. का भेटते ओबीसी आहे ना मी. पंकजा ताईलाही ग्रामविकास खातं भेटलं होतं

    – निवडणूका झाल्या कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा, आणि गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे

    – माझं काय होईल ते होईल, पण ओबीसींच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही

    – आपलं अडले चर सगळेच बाप म्हणावं लागतं, फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ

    – वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू

    – या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ

  • 27 Jun 2021 03:29 PM (IST)

    कोरोना काळात निवडणूक झाल्या नाही तर प्रशासक बसवू : नाना पटोले

    नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    – विधानसभेचा अध्यक्ष असतानाही मोर्चे काढले. जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर उतरलो

    – जनगणना राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी

    – ओबीसी संख्या किती ? नेमकी आकडेवारी केंद्र देत नाही

    – पेट्रोल-डिझेलवरचे मोर्चे काढले तर आमच्याच सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले

    – आता आयोग म्हणते कोरोना आहे, इम्पेरीकल डाटा गोळा कसा करायचा

    – इम्पेरीकल डाटा गोळा केंद्राने करावं की राज्याने करावं हा राजकीय मुद्दा आहे

    – फडणवीस म्हणाले चार महिन्यात आरक्षण आणून देतो, ते कुठून आणुन देणार माहित नाही

    – कोरोनात निवडणूक झाल्या नाही तर प्रशासक बसवू

    – आरक्षण मिळेपर्यंत निवडणूका व्हायला नको, यात कुणाचं दुमत नाही

    – काही लोकं संविधानापेक्षा मोठं समजतात, त्याचे फळं आपल्याला भोगावे लागतात

    – आपण एकत्र राहिले तर कुणीच बिघडवू शकत नाही.

    – आज एससी एसटी चं आरक्षण काढलं तर ते सरकार विरोधात रस्त्यावर उतरतात, आपल्या बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का?

    – बावनकुळे साहेब… आपलं आपल्याला करायचं आहे. दुसरे नाही करणार.

    – बावनकुळे यांना किरीट मिळाली नाही, तर ओबीसी समाजाला नाराज झाला

    – आरक्षण जाणे हे शुभ संकेत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज एकत्र आला. प्रत्येक राजकारण पक्षाला समजण्यासारखे आहे

    – पुढच्या काळात कुठल्याही राजकीय पक्ष ओबीसी / व्हीजेएनटीच्या वाट्याला गेले तर आडवं पाडल्याशिवाय राहणार नाही

    – आपण सगळे फडणवीसांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारकडे जावू

  • 27 Jun 2021 01:27 PM (IST)

    सप्टेंबरपासून महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

    राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    सप्टेंबरपासून महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

    केंद्र सरकारकडून राज्याला सूचना,

    महाविद्यालयाचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न ,

    मात्र बारावीच्या निकालानंतरचं पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सीईटीचा निर्णय घेणार,

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती …

  • 27 Jun 2021 11:43 AM (IST)

    मोदींकडून डॉक्टर दिनाचा उल्लेख

    पीएम मोदी म्हणाले की, आता काही दिवसात 1 जुलैला डॉक्टर दिन साजरा करु. हा दिवस देशाचे चिकित्सक आणि stateman डॉ बी.सी. राय यांच्या जयंती निमित्त समर्पित आहे. कोरोना कालावधीत डॉक्टरांच्या योगदानाबद्दल आम्ही सर्व कृतज्ञ आहोत.

  • 27 Jun 2021 11:37 AM (IST)

    जलसंधारण ही एक प्रकारे देशसेवा – मोदी

    देशात मान्सूनचा हंगाम आला आहे. पंतप्रधानांनी सांगितले की ते जलसंधारण ही एक प्रकारे देशासेवाच आहे. आपल्याला  पाणी वाचवावे लागेल आणि पावसाळ्याची भीती बाळगू नये.

  • 27 Jun 2021 11:29 AM (IST)

    कोरोना अद्याप गेलेला नाही, प्रत्येकाने लस घ्यावी – मोदी

    पीएम मोदी म्हणाले, जर कोणी तुम्हाला भ्रमित करत असेल तर तुम्ही त्यांच्या बोलण्यात येऊ नका. कोरोना अद्याप गेलेला नाही, प्रत्येकाने लस घ्यावी, जेणेकरुन कोरोना टाळता येईल. स्वतः लसीला घाबरु नका आणि लोकांना घाबरवू देखील नका. शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांनी ही लस बनविली आहे.

  • 27 Jun 2021 11:23 AM (IST)

    कोरोनाची लस न घेणे धोकादायक ठरू शकते – पंतप्रधान मोदी

    78वी मन की बात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    शक्य तितक्या लवकर लसीकरण करा

    कोरोनाची लस न घेणे धोकादायक ठरू शकते

    पंतप्रधानांकडून मिल्खा सिंग यांचे स्मरण

    मोदी म्हणाले मिल्खा सिंग यांना मी भेटलो तेव्हा त्यांना म्हणालो होतो की, “आपण 1964 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते, म्हणून जेव्हा आमचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये टोकियोला जात आहेत तेव्हा तुम्ही आमच्या खेळाडूंचे मनोबल वाढवावे.” .

  • 27 Jun 2021 10:50 AM (IST)

    कट कारस्थान करुन जिल्हा परिषद निवडणुका लादल्याय – सुनिल केदार

    सुनिल केदार –

    – कट कारस्थान करुन जिल्हा परिषद निवडणुका लादल्याय

    – धगधगती आग शांत होऊ द्यायची नाही

    – ओबीसी समाज उपेक्षित असलेला समाज

    – समाजासाठी टाकलेलं पाऊस मी मागे येऊ देणार नाही

  • 27 Jun 2021 10:33 AM (IST)

    पुण्यात उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर प्राध्यापकांचं टाळ भजन आंदोलन

    पुण्यात उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर प्राध्यापकांचं टाळ भजन आंदोलन,

    राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत देणार थोड्या वेळात आंदोलनाला भेट,

    गेल्या चार दिवसापासून सुरू आहे आंदोलन,

    आज वारकरी पद्धतीने आंदोलन केलं जातंय,

  • 27 Jun 2021 08:49 AM (IST)

    चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

    चंद्रपूर :

    वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

    चिमूर तालुक्यातील हरणी गावाजवळील शेतशिवारातील घटना

    काल संध्याकाळी शेतात काम करत असलेल्या शामराव नन्नावरे या 55 वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने केला हल्ला,

    हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

  • 27 Jun 2021 08:47 AM (IST)

    ओबीसी चिंतन बैठकीचा आजचा दुसरा दिवस

    – ओबीसी चिंतन बैठकीचा आजचा दुसरा दिवस

    – आज पंकजा मुंडे, नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थितीत

    – ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज बैठकीत ठराव होणार

    – ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार

  • 27 Jun 2021 08:47 AM (IST)

    जप्ती नोटिसांविरोधात उद्या नाशिक जिल्हा बँकेला घेराव

    – जप्ती नोटिसांविरोधात उद्या नाशिक जिल्हा बँकेला घेराव
    – रयत क्रांती संघटना आणि भाजप किसान मोर्चा करणार आंदोलन
    – सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात होणार घेराव आंदोलन
    – जिल्हा बँकेने दिलेल्या जमीन जप्तीच्या नोटिसांमुळे शेतकरी संघटना ही आक्रमक

  • 27 Jun 2021 07:56 AM (IST)

    औरंगाबादेत शस्त्रक्रिया सुरू असताना तरुण डॉक्टराचा मृत्यू

    औरंगाबाद  –

    शस्त्रक्रिया सुरू असताना तरुण डॉक्टराचा मृत्यू

    दिग्विजय शिंदे अस डॉक्टरांचं नाव

    खाजगी रुग्णालयात करत होते प्रॅक्टिस

    दुर्बीण द्वारे सुरू होती शस्त्रक्रिया

    शस्त्रक्रिया सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला मृत्य

  • 27 Jun 2021 06:57 AM (IST)

    अकोला राज्यमंत्र्यांनी केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये अन्न व औषध विभागाच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार -राजेंद्र शिंगणे

    पालकमंत्री बच्चू कडु यांच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान अकोला जिल्ह्यात अनेक पाणपट्ट्यांवर त्यांना प्रतिबंधित गुटखा विकत मिळत असल्याचे समोर आले

    अन्न आणि औषध प्रशासन या लोकांकडून हफ्ते घेत असल्याचा स्पष्ट आरोप यावेळी बच्चू कडु यांनी केला

    दरम्यान या संदर्भात अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांची सखोल चौकशी केली जाणार

    चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणालेत